सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 30, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४ सार्थ तुकारामगाथा अनेक प्रकारांनी सांगितले आहे पद्मपुराणात तुळशीचे संपूर्ण स्तोत्र आलेले आहे पुन पाताळखंडात तुळशी- दलाचे माहात्म्य वर्णन केले आहे तुल्सीदलाच्या सेवनाने अनेक रोग नाहीसे होतात, दारिद्रय नाहीसे होते, अनेक पापे नाहीशी होतात असे तेथे सांगितले आहे (दारिद्रयदु सभोग्यादिपापानि सुवहून्यपि । तुल्सी हरते क्षिप्र रोगानिव हरीतकी १४।८-९) मराठी संतानीही श्रीविष्णूवरावर आलेल्या या तुळशीचे मनापासून स्वागत केले आहे 'वैकुंठाहुनी आली । धन्य तुळशी माउली' म्हणून एकनाथानी तुळशीमाहात्म्यात तिचा गौरव केला आहे 'तुळशीचे पान । एक त्रैलोक्यासमान,' 'देवासी प्रिय तुळशीपान', 'तुळशी जाला कृष्णराबो' इत्यादी वचनातून एकनाथानी तुळशीचे माहात्म्य उत्तम रीतीने सांगितले आहे वारकरी पथात आजही तुळशीच महत्त्व विशेष आहे दारात तुळशीवृदावन, गळ्यात तुळशीची माळ व देवाला तुळशीहार याची महती विशेष अशी या सप्रदायात दिसून येते साधुसतानी केलेल्या विठ्ठलरूपाचे वर्णन वाचीत असताना एक प्रश्न मनात निर्माण होतो तो असा की हे मव वर्णन विठ्ठलाचे खरे, पण हे कोणत्या मूर्तीचे ? आज पंढरपुरास उभी आहे तीच मूर्ती सर्वाच्या डोळयासमोर होती काय ? आजही ती उभी आहे, तिला मुगुट आहे, कानात माशाच्या आकाराची कुंडले आहेत, कौस्तुभ मण्याचा हार गळ्यात आहे डाव्या छातीवर एक खळगा म्हणजे श्रीवत्सलाछन व उजव्या छातीवर एक वर्तुळ म्हणजे श्रीनिकेतन आहे दंडावर बाजूबंद आहेत, मनगटावर मणिवंध आहेत डाव्या हातात शंख आहे, उजव्या हातात कमल आहे विठ्ठलाचे असेच रूप सर्वसाधारणपणे साधुसन्तानी वर्णन केले आहे परंतु कधी फरक पडण्याचे कारण एक असू शकेल की विठ्ठलमूर्तीस पोषाख घालून, डागदागिने घालून नटविण्याची प्रथा असल्याने त्या सालंकृत रूपाचे वर्णन थोडे वेगळे यण्याची शक्यता आहे दुसरे असे की इतक्या दीर्घ कालावधीत मूर्ती एक जाऊन दुसरी आली असण्याची शक्यता दिसते तिसरे अतिशय महत्त्वाचे कारण असे की नामस्मरणान व भक्तीच्या आवेशात साधुसत तल्लीन होत असतात त्यांच्या नजरेसमोर सुशोभित झालेले सगुणसुंदर रूप नेहमीच असते मोठ्या आवडीने, कौतुकाने, प्रीतीच्या भराने साधुसतांनी विठ्ठलरूपाचे वर्णन केले तर त्यातील रहस्य समजण्यासारखे आहे विठ्ठल हा मदनाचा पुतळा आहे, हा चैतन्याचा गाभा आहे, ही अनंत लावण्याची शोभा आहे त्याच्या मुगुटाची शोभा मोठी सूर्याच्या झळाळासारखी आहे या मंतवचनाचा भावार्थ रसिकतेनेच समजावून घेण्यासारखा आहे ३ सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥ १ ॥ गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्व काळ ॥ २ ॥ विठो माउलिये हाचि वर देईं । सचरोनि' राहीं हृदयामाजी ॥ ३ ॥ तुका म्हणे काहीं न मागें आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टोपा - सदा-नहमी, जडो-जडून, विळून राहोत रखुमाई-रुक्मिणीचे प्राकृत रूप, सोयरिया- आप्तस्वकीया, सचरोनी-शिरून हृदयामाजी-अंत करणात, आणीक-इतर दुसरे अर्थ -हे सख्या, रुक्मिणीपते, श्रीविठ्ठला, माझे डोळे नेहमी तुझ्या मूर्तीवर जडून राहोत १ तुझे रूप अती गोड आहे, तुझे नावही अती गोड आहे याचेच प्रेम मला नेहमी देत जा २ हे विठ्ठल माऊली ! माझ्या अत करणात निवास करून तू राहावेस हाच एक वर मग तू दे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी दुसरे आणखी काही मागत नाही, तुझ्या पायापाशीच मला सर्व प्रकारची सुखे मिळतात ४ विवरण -या अभगात तुकारामबुवा विठ्ठलाच्या गाड रूपाचे व नावाचे वर्णन करून आपल्या मनाची तळमळ व एकमात्र इच्छा व्यक्त करतात परमेश्वरापाशी अगदी निकटची जवळीक प्रस्थापित करण्यासाठी भक्त विविध प्रकाराची नाती त्यास जोडवीत असतात माउलीखेरीज अधिक गोजवळ, अधिक निकटच, अधिक वात्सल्यपूर्ण मान दुसरे कोण ? 'विठो माऊलीय' असे म्हणून महाराज त्यास जणू मागोवरच बसत आहेत त्याला त्यांनी सोयरा असेही येथे म्हटले आहे रखुमाईचा पती असे सबोधून आणखी एका नाजूक व रम्य अशा नात्याचा उल्लेख करून बुवांनी आपल्या मनाची वावळीक प्रकट केली आहे रखुमाई हे रुक्मिणीचे प्राकृत रूप समजले जाने लक्ष्मीपासून लक्ष्मा-लखुमा-रुखमा-रखुमा असाही क्रम सागण्यात येतो १ यउनिया