सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
४ सार्थ तुकारामगाथा अनेक प्रकारांनी सांगितले आहे पद्मपुराणात तुळशीचे संपूर्ण स्तोत्र आलेले आहे पुन पाताळखंडात तुळशी- दलाचे माहात्म्य वर्णन केले आहे तुल्सीदलाच्या सेवनाने अनेक रोग नाहीसे होतात, दारिद्रय नाहीसे होते, अनेक पापे नाहीशी होतात असे तेथे सांगितले आहे (दारिद्रयदु सभोग्यादिपापानि सुवहून्यपि । तुल्सी हरते क्षिप्र रोगानिव हरीतकी १४।८-९) मराठी संतानीही श्रीविष्णूवरावर आलेल्या या तुळशीचे मनापासून स्वागत केले आहे 'वैकुंठाहुनी आली । धन्य तुळशी माउली' म्हणून एकनाथानी तुळशीमाहात्म्यात तिचा गौरव केला आहे 'तुळशीचे पान । एक त्रैलोक्यासमान,' 'देवासी प्रिय तुळशीपान', 'तुळशी जाला कृष्णराबो' इत्यादी वचनातून एकनाथानी तुळशीचे माहात्म्य उत्तम रीतीने सांगितले आहे वारकरी पथात आजही तुळशीच महत्त्व विशेष आहे दारात तुळशीवृदावन, गळ्यात तुळशीची माळ व देवाला तुळशीहार याची महती विशेष अशी या सप्रदायात दिसून येते साधुसतानी केलेल्या विठ्ठलरूपाचे वर्णन वाचीत असताना एक प्रश्न मनात निर्माण होतो तो असा की हे मव वर्णन विठ्ठलाचे खरे, पण हे कोणत्या मूर्तीचे ? आज पंढरपुरास उभी आहे तीच मूर्ती सर्वाच्या डोळयासमोर होती काय ? आजही ती उभी आहे, तिला मुगुट आहे, कानात माशाच्या आकाराची कुंडले आहेत, कौस्तुभ मण्याचा हार गळ्यात आहे डाव्या छातीवर एक खळगा म्हणजे श्रीवत्सलाछन व उजव्या छातीवर एक वर्तुळ म्हणजे श्रीनिकेतन आहे दंडावर बाजूबंद आहेत, मनगटावर मणिवंध आहेत डाव्या हातात शंख आहे, उजव्या हातात कमल आहे विठ्ठलाचे असेच रूप सर्वसाधारणपणे साधुसन्तानी वर्णन केले आहे परंतु कधी फरक पडण्याचे कारण एक असू शकेल की विठ्ठलमूर्तीस पोषाख घालून, डागदागिने घालून नटविण्याची प्रथा असल्याने त्या सालंकृत रूपाचे वर्णन थोडे वेगळे यण्याची शक्यता आहे दुसरे असे की इतक्या दीर्घ कालावधीत मूर्ती एक जाऊन दुसरी आली असण्याची शक्यता दिसते तिसरे अतिशय महत्त्वाचे कारण असे की नामस्मरणान व भक्तीच्या आवेशात साधुसत तल्लीन होत असतात त्यांच्या नजरेसमोर सुशोभित झालेले सगुणसुंदर रूप नेहमीच असते मोठ्या आवडीने, कौतुकाने, प्रीतीच्या भराने साधुसतांनी विठ्ठलरूपाचे वर्णन केले तर त्यातील रहस्य समजण्यासारखे आहे विठ्ठल हा मदनाचा पुतळा आहे, हा चैतन्याचा गाभा आहे, ही अनंत लावण्याची शोभा आहे त्याच्या मुगुटाची शोभा मोठी सूर्याच्या झळाळासारखी आहे या मंतवचनाचा भावार्थ रसिकतेनेच समजावून घेण्यासारखा आहे ३ सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥ १ ॥ गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्व काळ ॥ २ ॥ विठो माउलिये हाचि वर देईं । सचरोनि' राहीं हृदयामाजी ॥ ३ ॥ तुका म्हणे काहीं न मागें आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टोपा - सदा-नहमी, जडो-जडून, विळून राहोत रखुमाई-रुक्मिणीचे प्राकृत रूप, सोयरिया- आप्तस्वकीया, सचरोनी-शिरून हृदयामाजी-अंत करणात, आणीक-इतर दुसरे अर्थ -हे सख्या, रुक्मिणीपते, श्रीविठ्ठला, माझे डोळे नेहमी तुझ्या मूर्तीवर जडून राहोत १ तुझे रूप अती गोड आहे, तुझे नावही अती गोड आहे याचेच प्रेम मला नेहमी देत जा २ हे विठ्ठल माऊली ! माझ्या अत करणात निवास करून तू राहावेस हाच एक वर मग तू दे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी दुसरे आणखी काही मागत नाही, तुझ्या पायापाशीच मला सर्व प्रकारची सुखे मिळतात ४ विवरण -या अभगात तुकारामबुवा विठ्ठलाच्या गाड रूपाचे व नावाचे वर्णन करून आपल्या मनाची तळमळ व एकमात्र इच्छा व्यक्त करतात परमेश्वरापाशी अगदी निकटची जवळीक प्रस्थापित करण्यासाठी भक्त विविध प्रकाराची नाती त्यास जोडवीत असतात माउलीखेरीज अधिक गोजवळ, अधिक निकटच, अधिक वात्सल्यपूर्ण मान दुसरे कोण ? 'विठो माऊलीय' असे म्हणून महाराज त्यास जणू मागोवरच बसत आहेत त्याला त्यांनी सोयरा असेही येथे म्हटले आहे रखुमाईचा पती असे सबोधून आणखी एका नाजूक व रम्य अशा नात्याचा उल्लेख करून बुवांनी आपल्या मनाची वावळीक प्रकट केली आहे रखुमाई हे रुक्मिणीचे प्राकृत रूप समजले जाने लक्ष्मीपासून लक्ष्मा-लखुमा-रुखमा-रखुमा असाही क्रम सागण्यात येतो १ यउनिया
४ राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥ १ ॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ २ ॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥ ३ ॥ कासे सोनसळा पांघरे पांटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो ॥ ४ ॥ सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- राजस-सुंदर, राजतेजाने चमकणारा, सुकुमार-लहान मुलाप्रमाणे कोमल व नाजूक, मदन-सौंदर्यवान कामदेव, रविशशिकळा-सूर्यचंद्राचे तेज, लोपलिया-नाहीशा झाल्या. कस्तुरी-एक सुगंधी द्रव्य, मळवट-कपाळभर असलेला लेप, चंदन-एक सुगंधी वृक्ष, उटी-लेप, रुळे-डौलाने लोळते, वैजयंती-विष्णूच्या गळया- तील माळ हिरा, माणिक, पाच, नीळ व मोती अशा पंचरत्नाची ही असते. ओतले-साच्यातून तयार केले, कासे-कम- रेस, सोनसळा-जरीचा पीतांबर, पाटोळा-रेशमी वस्त्र, घननीळ-मेघाप्रमाणे निळा, सावळा-श्यामल, एकी- सवा-एका बाजूस. अर्थ :- स्वतः गोपीची भूमिका घेऊन आपल्या इतर सख्यांना तुकारामबुवा म्हणत आहेत, 'हा राजतेजाने शोभणारा, अतिशय सुकुमार असणारा, विठ्ठल म्हणजे सौंदर्यवान कामदेवाचाच पुतळा आहे. याच्या तेजापुढे सूर्याचे व चंद्राचे तेजसुद्धा लोपून जाते. १. याच्या कपाळावर कस्तुरीचा मळवट भरलेला असून सर्वांगावर चंदनाचा लेप लाविला आहे. याच्या गळ्यात वैजयंती माळ मोठ्या डौलाने लोळत आहे. २. मुगुट व कुंडले यांनी याच्या सुंदर मुखास शोभा चढली आहे. जणू काही हे मुख म्हणजे प्रत्यक्ष सुखच मुशीत घालून आकारात आले आहे. ३. या विठ्ठलाने पीतांबर नेसला आहे आणि अंगावर रेशमी वस्त्र पांघरले आहे. मेघाप्रमाणे सावळ्या रंगाच्या अंगकांतीच्या या श्यामल रूपाकडे बायांनो, पाहा तरी ४. तुम्हांला शक्य होत नाही तर तुम्ही सर्वजणी दूर व्हा पाहू; माझ्याच्यानें आता अधिक धीर धरवत नाही. ५.' विवरण :- परमेश्वराची जवळीक अधिक तीव्रतेने अनुभवण्यासाठी तुकाराममहाराजानी आणखी एका नात्याने त्याची आराधना येथे केली आहे गोपीच्या भूमिकेतून इतर अनेक मैत्रिणींना बरोबर घेऊन बुवा विठ्ठलाकडे पाहात आहेत राजस, सुकुमार, मदनाचा पुतळा या सर्व विशेषणात्मक वर्णनांचे सौंदर्य लक्षणीय आहे. कस्तुरी, चंदन, जरीची व रेशमी वस्त्रे, यासहित साधलेल्या ऐश्वर्याचे राजस वर्णन या भूमिकेवर शोभण्यासारखे आहे. गोपी- प्रमाणेच बुवा अगदी अधीर झाले आहेत. आपल्या मैत्रिणींना दूर सारून आपणच धावत जाऊन त्यास भेटावे अशी उतावीळ त्यांना झालेली आहे. या भावाचे अधिक वर्णन तुकाराम महाराजांच्या विराण्या किंवा विरहिणींचे अभंग अथवा गौळणीचे विवेचन करणेवेळी आपण पाहू. येथे श्रीविठ्ठलाला कृष्णाप्रमाणे घननीळ, सावळा असे सबोधिये आहे गूढता, सौंदर्य, तीव्र भावना यांचे प्रतीक म्हणजे निळा वर्ण. विशाल आकाशाचा निळा रंग; अथाग सागराचा निळा रंग, परमेश्वराच्या विस्तीर्ण रूपाची प्रभा निळसरच कल्पिली आहे योगप्रक्रियेतही या निळया रंगास महत्त्व आहे. या सावळया वा निळया रूपाचे वर्णन ज्ञानेश्वरांनी मोठ्या बहारीने केले आहे. 'निळिमे सारणी बाहे मोति- याचे पाणी' हे त्याचे वचन प्रसिद्ध आहे. 'सांवलियाचें तेज सांवळा धोधरी', 'सावळाचि नयनां दिसे', 'नीळवर्ण महा, नीळवर्ण स्यं', 'नीळवर्ण तनु नीळवर्ण गुणू'; 'नीळप्रभा दिसे, नीळपणे वसे' इत्यादी ओळींतून ज्ञानदेवानी घननीळाचे सान्निध्य वर्णन केले आहे. 'निळा पंढरपूरचा लावण्य पुतळा' 'नीळवर्ण घनश्याम । आत्माराम विटेवरी' अशा शब्दात एकनाथानी सावळया विठ्ठलास आळविले आहे मततत्त्वज्ञानात मुरलेले आधुनिक कवी 'बी' दानी नीळवर्णाचे मोठे सुरेख व यथायोग्य वर्णन केले आहे. त्यांनी म्हटले आहे; 'गूढत्वाचें, सुंदरतेचें, भावानलकतेचे नीलवर्ण हैं द्योतक यांच्या निःसीमतत्वाचें' ५ कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥ १ ॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ २ ॥
६' सार्थ तुकारामगाथा कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिलीं ऐसी मूर्ती ॥ ३ ॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवे मानसीं तेंचि रूप ॥ ४ ॥ झुरोनि पांजरा होऊं पाहे आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥ ५ ॥ तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- कास-काचा, वहिली-सुंदर, गरुडपार-पंढरपूर येथील पाडुरंगाच्या मंदिरातील सोळाखांबीमध्ये गरुडखांबाजवळची देवासमोरची जागा मानसीं-मनामध्ये, पांजरा-सापळा, अस्थिपंजर, आस-इच्छा, उदास-व्यर्थ, दुर्लक्षित अर्थ - हे हरी, हात कमरेवर आहेत, गळ्यात तुळशीच्या माळा आहेत असे तुमचे रूप माझ्या डोळ्यांना दाखवा ना. १ दोन्ही पाय विटेवर स्थिर आहेत असे तुमचे रूप मला दाखवा ना. २ पीतांबराची सुंदर कास शोभत आहे अशी तुमची सुंदर मूर्ती मला दाखवा ना. ३ विठ्ठला, तू गरुडपारावर उभा राहिला आहेस, हेच रूप मला नेहमी आठवत असते. ४ पंढरीनाथा ! आता तू भेटायला ये ना. तुझी वाट पाहता पाहता मी झुरून चाललोय. माझा देह म्हणजे नुसता हाडांचा सापळा राहिला आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनातील एवढी इच्छा तुम्ही पुरवावी; माझ्या या विनंतीस व्यर्थ करू नका. तुम्ही उदास नका राहू. ६ विवरण:- या अभंगात अशी अशी मूर्ती हे हरी, तुम्ही दाखवा असे म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या मनातील अधीरता दर्शविली आहे, 'गरुडपारावरी उभा राहिलासी' या रूपाची आठवण आपणास होते असे तुकोबांनी म्हटले आहे विठ्ठलमंदिरातील सोळाखांबी मंडप प्रसिद्ध आहे या मंडपास सोळा खांब असून यातील दक्षिण व पूर्व बाजूकडील दुसऱ्या ओळीतील एक खांब रुप्याच्या व सुवर्णाच्या पत्र्यांनी मढविलेला आहे यास गरुडखांब म्हणतात. गरुड हे विष्णूचे, विठ्ठलाचे वाहन व भक्त, म्हणून या खांबास आलिंगन देऊन लोक विठ्ठलाच्या दर्शनास जातात येथील जागेवरून विठ्ठलाचे मुखदर्शन पावले होते याच जागेस गरुडपार असेही म्हणतात पण या पारावर तू उभा राहिलास व ते रूप मला आठवते असे बुवा म्हणतात याचा अर्थ काय ? पूर्वी देवाचे स्थान या ठिकाणी होते की काय ? गरुडावरून देव आले ते प्रथम येथेच उभे राहिले असावेत इथेच त्यांना विटेवर उभे राहण्यास पुंडलिकाने सांगितले असावे, मग पुढे केव्हातरी मंदिराची वाढ. जसजशी होत गेली तसतसे विठ्ठलाचे स्थान बदलले असावे ६ गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कें देखेन ॥ १ ॥ वरवया खरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ २ ॥ मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥ ३ ॥ ओतिय श्रीमुल सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥ ४ ॥ उद्धव अक्रूर उभे दोहोंकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥ ५ ॥ तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- गरुड-विष्णूचे वाहन, वारिके-वाहन, वरवया-सुंदर, सुरूप, खरवंटा-चांगला, सुंदर, घनमेघ-दाट मेघ, झळाळ-लखलखाट, वामांगीं-डाव्या बाजूस, वेल्हाळ-लडिवाळ, लाडकी, उद्धव-श्रीकृष्णाचा परम मित्र, अक्रूर-श्रीकृष्णाचा मदतनीस, पवाडे-स्तुतिस्तोत्रे, सनकादिक-सनक, सनंदन, सनातन व सनत्कुमार हे ब्रह्मदेवाने चार मानसपुत्र आणिकांसारिखा-इतर देवांसारखा, पांडुरंग-विठ्ठलाचे एक नाव अर्थ - गरुड ज्याचे वाहन आहे व ज्याने पीतांबर नेसलेला आहे ते सावळे व मन हरण करणारे रूप मी केव्हां बरे पाहीन ? १. अतिशय सुंदर असणारा, घनदाट मेघांप्रमाणे सावळा असणारा व ज्याच्या गळयांत वैजयंतीमाळ आहे असा विठ्ठल शोभून दिसतो. २. याच्या डोक्यावर जो मुगुट आहे त्याचा लखलखाट कोटी सूर्यापेक्षाही अधिक आहे आणि याच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी शोभून दिसत आहे. ३. याचे सुंदर मुख सर्व सुखांचे
सार्थ तुकारामगाथा ७ ओतून तयार करावे इतके शोभिवंत असून याच्या डाव्या अंगास रुक्मिणीदेवी आहे ४. याच्या दोन्ही बाजूस उद्धव व अकूर उभे असून याची स्तोत्रे सनकादिक कुमार नेहमीं गात असतात ५. तुकाराम महाराज म्हणतात की हा काही इतर देवांसारखा नसून अनन्यसाधारण असा माझा हा सखा पांडुरंग आहे ६ विवरण • श्रीविठ्ठल हे विष्णूचेच रूप, याचा आणखी एक दाखला म्हणजे विष्णूचे जे वाहन तेच गरुड विठ्ठलाचेही या ठिकाणी कल्पिले आहे गरुड हा कश्यप व वनिता याचा पुत्र आईच्या दास्यविमोचनासाठी याने अमृताचा कुंभ मिळविला या कृत्यामुळे श्रीविष्णू याच्यावर संतुष्ट झाले व त्यांनी त्यास आपल्या ध्वजावर जागा दिली, व याने विष्णूचे वाहन होण्याचे मान्य केले विठ्ठलाच्या देवळात विठ्ठलासमोर महामंडपात एक लहानसे गरुड- मंदिर आहे या अभंगात बामांगी रुक्मिणी असे म्हटले आहे आज रुक्मिणी अगदी जवळ मागेच डाव्या बाजूस असली तरी थोड्या दूर अंतरावर शेजारीच तिचे स्वतंत्र देऊळ आहे परंतु सर्व संतानी विठ्ठलरखुमाई याचे सान्निध्य मानलेले आहे पुंडलिकाच्या मातृसेवेस भुलून द्वारकेहून जेव्हा देव दिंडीरवनात आले तेव्हा त्याच्याबरोबर रुक्मिणीही आली, पण आपल्यापेक्षा देवाला राधा व भक्तच अधिक प्रिय आहेत असे वाटून ती रुसली असल्याची समजूत आहे म्हणून ती थोडी दूर पंढरपुरास आहे इतरत्र मात्र विठोबा व रखुमाई एकत्र असतात पूर्वी केव्हा तरी पंढरपुरासही या दोन मूर्ती शेजारीशेजारीच असाव्यात असा जानत्याचा तर्क आहे उद्धव हा श्रीकृष्णाचा एक प्रिय सखा नंद, यशोदा व गोपी याचे सांत्वन करण्यासाठी श्रीकृष्णाने यास गोकुळात पाठविले होते हा मोठा ज्ञानी पुरुष, पण याच्या ज्ञानाचा परिणाम गोकुळातील भक्तावर फारसा झाला नाही सगुण प्रेमाने ज्ञानी उद्धवासही भक्तीचा महिमा पटवून दिला असल्याचा उल्लेख संताच्या वचनातून अनेक प्रसंगी येतो या आपल्या श्रेष्ठ भक्तास श्रीकृष्णाने सरस्वती नदीकाठी आत्मज्ञान सांगितले उद्धवगीता, अवधूतगीता यातून निर्माण झालेली आहे अक्रूर हा श्रीकृष्णाचा आणखी एक सहाय्यक प्रथम श्रीकृष्णास शासन करण्यासाठी मथुरेस घेऊन यावे म्हणून कंसाने याची योजना केली परंतु वाटेत यमुना नदीत स्नान करीत असताना याला श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला व त्याचे माहात्म्य अक्रूरास पटले तेव्हापासून हा श्रीकृष्णाचा सहाय्यक बनला ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली म्हणून विष्णू त्याच्या मानसपुत्राच्या रूपांनी प्रकट झाले तेच सनक, सनंदन, सनातन व सनत्कुमार या चार नावांनी प्रसिद्ध आहेत याची रूपे बालकाप्रमाणे असून मोठे विरक्त म्हणून याची प्रसिद्धी आहे श्रीविठ्ठल हा इतर देवांप्रमाणे नाही हा एक मोठाच ध्यास साधुसंताना होता यज्ञयाग, जपजाप्य, योग- साधना, कर्मकांड, नवस, तपश्चर्या इत्यादींनी इतर देव पावतात, तर विठ्ठल केवळ नामस्मरणाने, भजनाने, नुसती हाक मारण्याने प्रसन्न होतो तो स्वभावत च भक्तावर प्रसन्न आहे इतर देवांप्रमाणे याच्याशी देवाणघेवाण करावी लागत नाही 'न पूजीं आणिका देवा, न करूं त्याची सेवा,' 'आणिवांची रीति नाईके, न बोले,' इत्यादी वचनातून तुकारामबुवांनी केवळ विठ्ठल हेच आमचे दैवत असे आग्रहाने सांगितले आहे इतर दैवताच्या नादी लागू नये असा आग्रहही त्यांनी अनेक ठिकाणी धरला आहे या विठ्ठल दैवताचे दुसरे नाव पांडुरंग असे या अभंगात आले आहे विठ्ठल हे विष्णूचे रूप याबद्दल संशय नाही विष्णु या शब्दाचा कानडी अपभ्रंश 'विट्टि' असा होता या अपभ्रंशापासून विठ्ठल रूप तयार झाले असे डॉ रा गो भांडारकर यांनी सांगितले आहे विष्णु विठ्ठलु व विठु किंवा विठ्ठल या मार्गानीही विठ्ठलाचा संबंध विष्णूशी पोचतो परंतु पांडुरंग हे नाव या देवास कसे मिळाले ? याविषयी दोन तर्क संभवतात पांडुरंग हे शिववाचक नाव आहे शिव पांढऱ्या रंगाचा म्हणून पांडरंग किंवा पांडुरंग पंढरपुरास प्रथम शिवाचे देवालय असल्यामुळे फार प्राचीन काळी पंडरगे, पाडुरंगपल्ली, पाडुरंगपूर इत्यादी नांवे या गावास मिळाली व येथला देव पांडुरंग शिव ठरला परंतु पुढे श्रीविष्णूचे माहात्म्य वाढल्यावर शिवविष्णूचे ऐक्य वाढवून विष्णूच्या अवतारास, विठ्ठलास पांडुरंग म्हणण्याचा प्रघात पडला असा एक तर्क आहे दुसरे अनुमान असे की विठ्ठल हे दैवत पुंडलिकांमुळे भिवरेच्या तीरी स्थिर झाले तेव्हा हे पुंडलीकक्षेत्र, पौंडरिकक्षेत्र इत्यादी नावांनीही प्रसिद्ध झाले यावरून कानडी पंडरगे हे नाव व यावरून पांडुरंग हे नाव बनले की काय ? पंडरगे या कानडी शब्दाचे पंडरिका हे संस्कृत रूप व यावरून पांडुरंग हे नाव बनले असावे
८ सार्थ तुकारामगाथा विराण्या-अभंग ७ वाळो जन मज ह्मणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥ १ ॥ सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥ २ ॥ नाइके वचन बोलतां या लोका । ह्मणे जालो तुका हरिरता ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाळो-वाळित टाकोत, दूर करोत, शिंदळी-दुराचारी, वाईट चालीची स्त्री, न विसंबे-विश्वास ठेवीत नाही, लौकिक-या जगातील, हरिरता-परमेश्वराशी समरस झालेली अर्थ :- सर्व लोकांनी जरी मला दूर केले किंवा माझ्यावर बहिष्कार टाकला व मला दुराचारी स्त्री म्हटले तरी या त्यांच्या म्हणण्यावर हा वनमाळी श्रीविठ्ठल विश्वास ठेवणार नाही १ मी सर्व लौकिक म्हणजे या जगातील व्यवहार सोडून उदास झाले आहे मला त्यामुळे कसलेच भय उरलेले नाही, अथवा जीवन जगण्याची आशाही उरलेली नाही २ म्हणून या लोकांनी काही जरी कटु शब्दांनी मला म्हटले तरी मी ते आता ऐकणार नाही, कारण मी आता पूर्णपणे एका ईश्वराशीच समरस झाले आहे असे तुकाराम महाराज म्हणतात ३ विवरण - येथून पुढले पंचवीस अभंग 'विरहिणीचे अभंग' अथवा 'विराण्या'चे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत परमेश्वराशी संपूर्ण ऐक्य जे अनुभवास आले त्याचे वर्णन करताना साधुसंत अनेक प्रसंगी नाइलाज म्हणून व्यावहारिक प्रेमाचा, पतिपत्नीचा किंवा कधी प्रियकर-प्रेयसीचा दृष्टान्त घेऊन आपले मनोगत व्यक्त करतात पति-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी या नात्यातील तीव्रताच फक्त त्यांना अपेक्षित असते पतीची वा प्रियकराची वाट पाहण्यात, त्याचे स्मरण करण्यात, त्याचा ध्यास लावून घेण्यात, त्याच्याबद्दल तळमळण्यात अपार सुख पत्नीस वा प्रेयसीस होते प्रत्यक्ष मीलनातील आनंदापेक्षाही विरहातील आर्तता अधिक तीव्र, स्मरणाची जाणीव अधिक तीव्र, रूपचिंतनाची माधुरी अधिक चविष्ट असल्यामुळे भक्तीच्या क्षेत्रात या विरहाला मीलनापेक्षाही फार महत्त्व असते मीलनात किंवा अद्वैतानुभूतीत भोगसुख नाही सर्वच एक अशी अनुभूती आल्यावर कोण कुणाचे स्तवन करणार ? कोण कुणावर लटके रागावणार ? कोण कुणाचे भजन करणार ? म्हणूनच कित्येक ठिकाणी 'अद्वैतीं तो नाही माझें समाधान' यासारखे उद्गार साधुसंत काढतात ज्ञानाच्या भूमिकेवर वा तात्त्विक भूमिकेवर अद्वैत, पण भोगासाठी किंवा अद्वैताच्या अनुभवासाठी द्वैत भक्तीत पत्करावे लागते आणि या द्वैतात विरहाला फार मोठे स्थान आहे स्वत:स पत्नी वा प्रेयसी समजून साधु- संतांनी आपले जे अनुभव प्रकट केले आहेत त्यातील माधुरी अवीट आहे यातील शृंगारिक अर्थ वरवरचा असून त्याचा संबंध केवळ भाषेपुरता किंवा दृष्टान्तापुरताच आहे शृंगाराचे वरवरचे रूप असणाऱ्या या भक्तीच्या विशिष्ट प्रकारास 'मधुरा भक्ती' असे नाव असून त्यास शास्त्रकारांनी मान्यता दिलेली आहे नारदभक्तिसूत्रात भक्तीचे अकरा प्रकार सांगितले आहेत त्यात कांतासक्ती म्हणून एका विशेष प्रकाराचा उल्लेख आलेला आहे नारदांनी श्रेष्ठ भक्तीचा हाच आदर्श सांगितला आहे भगवंताला सर्वस्व अर्पण करणे, (तदर्पिताखिलाचारता), त्याच्या विस्मरणाने व्याकुळ होणे (तद्विस्मरणे परम- व्याकुलतेति) हीच नारदाच्या मताने खरी भक्ती होय गोकुळातील गोपींनी याच प्रकारची भक्ती केली असून त्यांचाच आदर्श नारदांनी मान्य केला आहे (यथा व्रजगोपिकानाम्) त्यांच्या मते भक्ती ही मुख्यतः प्रेमरूपच आहे (परमप्रेमरूपा) भगवान शांडिल्य यांनी प्रेममय भक्तीचाच पुरस्कार केलेला आहे (सा परानुरक्तिरीश्वरे) रूपगो- स्वामी, जीवगोस्वामी यांनी या भक्तीचे शास्त्रीय स्वरूप 'भक्तिरसामृतसिंधु', 'उज्ज्वलनीलमणि' यासारखे ग्रंथ लिहून सिद्ध केले आहे ८ आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । ह्मणोनि व्यभिचारा टेकियें ॥ १ ॥ रात्रदिस मज पाहिजे जवळि । क्षण १त्यानिराळी न गमे घडी ॥ २ ॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आता । रातले अनंता तुका ह्मणे ॥ ३ ॥ १ क्षण एव निराळी
सार्थ तुकारामगाथा ९ शब्दार्थ व टीपा -आधिच्या-पूर्वजन्मीच्या, भ्रतारें-पतीकडून, रातले-रममाण झाले अर्थ -पूर्वजन्मीच्या माझ्या पतीकडून माझी इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मी आज या वरवर गैर वाटणाऱ्या आचरणास प्रवृत्त झाले आहे १ तो धोंहोरो मला आता रात्रंदिवस माझ्याजवळ हवा त्याच्याशिवाय मला एक क्षणभरही करमणार नाही २ आता माझ्यादाद्दलची सर्व आशा सोडून द्या, कारण तुकारामबुवा म्हणतात की मी आता अनंताशी रममाण झाले आहे ३ विवरण - वरवर शृंगारात्मक दिसणाऱ्या या अभंगाच्या निमित्ताने तुकाराम महाराजानी आपण आता परमेश्वराशी रममाण झालेलो असल्यामुळे आपली आशा आता लोकांनी सोडून द्यावी असे विनविले आहे ९ हाचि नेम आता न फिरे माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥ १ ॥ घररिघी जाले पट्टराणी बळें । वरिले सावळें परब्रह्म ॥ २ ॥ वळियाचा अगसंग जाला आता । नाही भय चिंता तुका म्हणे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -घररिघी-स्वत होऊन घरात शिरणारी, पट्टराणी-मुख्य आवडती राणी, वरिले- स्वीकारिले, वळियाचा-बलवानाचा, समर्थाचा, अगसंग-संबध अर्थ -मी आज श्रीप्रभुशेजारी बसले असल्याने तेथून आता माघारी फिरणार नाही, हाच माझा निश्चय झाला आहे १ मी आता त्या सावळ्या परब्रह्मास वरले असल्यामुळे मी त्याची पट्टराणी झाले आहे मी स्वतः होऊन त्याच्या घरात शिरले आहे २ आता माझा संबंध बलवंताशी झालेला आहे त्यामुळे मला कुठलीच भीती किंवा चिंता उरली नाही ३ १० नाही काम माझें काज तुम्हासवे । होते गुप्त ठावे केले आता ॥ १ ॥ व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सरती लोकांमाजी जाले ॥ २ ॥ न धरावा लोभ काहीं मजविशीं । जाले देवपिशी तुका म्हणे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -काज-काय, सरतो-मान्य, देवपिशी-देववेडी अर्थ -भोवतालच्या लोकांना उद्देशून तुकारामबुवा म्हणत आहेत की, माझे आता तुमच्या बरोबर, काही काम उरलेले नाही आजवर माझा गुप्त संबंध ईश्वराशी होता तो आता तुम्हा सर्वांना माहित झाला आहे १ माझे हे निंद्यकर्म तुम्हास ठाऊक झाले आहे त्यामुळे माझे आचरण तुम्हास मान्य नाही २ तरी तुम्हीही आता माझ्या- विषयी कसलाच लोभ धरू नये, मी आता पक्की देववेडी झाले आहे ३ ११ विसरले कुळ आपुला आचार । पती भाये दीर घर सोय ॥ १ ॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातले अनंता चित्त माझें ॥ २ ॥ मज आता कोणी आळवाल क्षणी । तुका म्हणे कानीं बहिरी जाले ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - सांडिला-सोडिला, रातले-रममाण झाले, क्षणी-कवां अर्थ -मी आता आपले कुलशीलही विसरून गेले असून माझे घर, सोयरे, दीर, पती इत्यादींनाही मी विसरले आहे १ मी या जगातील रोजचा सर्व व्यवहार सोडून दिला असून मला आता कसलीच भीती व चिंता उरलेली नाही माझे चित्त आता त्या अनंताशी रमले आहे २ आता मी परत संसारात किंवा लौकिक व्यवहारात गुंतावे म्हणून कुणी मला आळवू नये तुकाराम महाराज म्हणतात, मी आता दोनही कानांनी बहिरीच झाले आहे ३ तु गाथा २
१० सार्थ तुकारामगाथा १२ न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥ १ ॥ सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥ २ ॥ आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : नाइकें-ऐकणार नाही. अर्थ : मी आता दुसरे काहीच पाहणार नाही, बोलणार नाही; आणि ऐकणार नाही; कारण माझ्या चित्तात आता एक श्रीहरी स्थिर झाला आहे. १ सासरी व माहेरी आता मला माझे म्हणून कोणी नाही; श्रीहरीच्या रूपात मी दोन्हीचे एकच स्वरूप मानले आहे. २ मीच भांडखोर म्हणून मजवर आळ आलेला होता; पण आता त्या प्रभूंसच मिळवून मी सर्वांवर मात केली आहे. ३ १३ दुजा ऐसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासुनिया ॥ १ ॥ बळियाच्या आम्ही जालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । जालों प्रीतिका गोविंदोसी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : दुजा-दुसरा, प्रीतिका-प्रीति करणाऱ्या अर्थ अनंत स्वरूपाच्या असणाऱ्या या हरीवाचून आता दुसरा कोणी बलवान आहे ? १ आणि या बलवंताच्या प्राप्तीमुळे आम्हीही बलवान झालो असून आमची सत्ता आता सर्वांवर राहील. २ तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही मूळचेच अतःकरणाने उदार आहोत; म्हणूनच गोविंदास प्रेम करून आम्ही जवळ करू शकलो. ३ १४ क्षणभरी आम्हीं सोसिलें घाईट । साधिलें अवीट निजसुख ॥ १ ॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥ २ ॥ तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : अवीट-वीट किंवा, कंटाळा न येणारे, निजसुख-मोक्षाचे सुख, साडीमांडी-टाळणे, पुन. घेणे, भरोवरी-श्रम, कष्ट अर्थ : लोकांच्या दृष्टीने मी त्याची निंदा क्षणभर सहन केली; पण त्या योगाने ज्याचा कधी कंटाळा येणार नाही असे मोक्षसुख मी मिळविले. १ पूर्वायुष्यात अनेक प्रकारची यातायात केली. अनेक गोष्टी टाळल्या. पुनः घेतल्या. सुखप्राप्तीसाठी अनेक परिश्रम घेतले, पण ते सर्व मला अधिकच दुःखाचे झाले. २ पण आता या अनंत स्वरूपाच्या प्रभूशी लीन झाल्यामुळे, पायांशी राहिल्यामुळे जाणेयेणे अथवा त्यातील कष्टच संपून गेले. ३ १५ आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥ १ ॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥ २ ॥ तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : दुजें-दुसरे, एकविध-एकनिष्ठ, अंगसंग-शरीराची जवळीक, शरीराचा भोग. अर्थः-आता मला कोणी वडील, कोणी धाकटे नाही. मीच मला वडील आहे व धाकटीही आहे. आता माझ्या मागाहून येणारे कोणी नाही ; पुढेही आलेले कोणी नाही. १ आता मला चांगला एकांतही मिळतो, तेव्हा एकनिष्ठ भावनेनेच मी राहतो व तो श्रीहरी माझयारोबर सर्व प्रकारच्या क्रीडा करतो. २ आमच्या दोघां- शिवाय दुसरे तेथे कोणीही नसते ३ १६ सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥ १ ॥ याचसाठीं सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषासीं ॥ २ ॥ तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥ ३ ॥
सार्थ तुकारामगाथा ११ शब्दार्थ व टीपा:- जाळ-जाळे, सांडियेले-सोडले, भरतार-पती, परपुरुष-श्रेष्ठ परमेश्वर अर्थ-आता मी सर्व सुखे नेहमीच भोगीन. मी सर्व मायापाश व नात्याची जाळी तोडून टाकली आहेत. १ या प्रभूसाठी मीं माझ्या पतीसही सोडले. मी या श्रेष्ठ परमेश्वराशी रममाण झाले आहे. २ त्यामुळे आता मला पुनः गर्भवासाची यातना राहणार नाही; आता प्रभुप्राप्तीचे औषध असेच केले आहे की जे फळ धरूच देणार नाही. पुन: लौकिकाची आशाच उरणार नाही. ३ १७ एका जिवें आतां जिणें जालें दोन्हीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥ १ ॥ नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥ २ ॥ तुका म्हणे जाले सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेगळीक-वेगळेपणा, भाक-वचन, इच्छा. अर्थ:-आता माझे व श्रीहरीचे अशी दोनही जीविते एकच झाली आहेत. आता वेगळेपणा असा काही उरलाच नाही. १ मी व नारायण यांच्यात आता निराळेपणा नाही. त्याला मी आर्त्त होऊन हाक मारली; तो मला मिळाला, माझी इच्छा त्याने पुरी केली व मला जवळ करून सांभाळले. २ माझ्या थोड्याफार परिश्रमाचे मला हे फळ मिळाले; आता ती दुजेपणाची वेळ संपली. ३ १८ हासों रूसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट तें ॥ १ ॥ सेवासुखें करूं विनोदेवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा:- आवडी-प्रेम, अंतरींची-मनाची. अर्थ : आता आम्ही हसू, एकमेकांवर रुसू व यातून प्रेमाची वाढ करू. मनातील अवीट गोडी चाखून एक- मेकांची सेवा करू. १ काही विनोदवचनांनी संभाषण करू. आता मी व नारायण हे एकच आहोत. २ मी आता या लौकिक जगाविषयी उदासीन झाले आहे. कारण मी हा श्रेष्ठ ईश्वर पती म्हणून केला असून मी त्याला स्वतःच्या आधीन करून ठेवला आहे. ३ १९ मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयांनो ॥ १ ॥ न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥ २ ॥ तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळियासवें आम्ही ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- न साहवे-सहन होत नाही, कूट-निंदा, ओखटें-वाईट, अमंगल, विचरों-हिंडत राहू अर्थ - आपल्या मागे मागे येणाऱ्या सांसारिक व लौकिकावर दृष्टी ठेवणाऱ्या स्त्रियांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणत आहेत; आता तुम्ही कोणी माझ्याबरोबर येऊ नका. बायांनो, तुम्ही सर्वजण सासुरवासिनी आहात. १ तुम्हांला हे लोक निंदात्मक शब्द बोलतील ते सहन होणार नाहीत कारण ते लोक फार वाईट व अमंगल असे बोलतात. २ पण मी मात्र सर्व लौकिकापासून मोकळी व विरक्त झाली असल्यामुळे या गोपाळकृष्णाबरोबर मी वाटेल तशी वागू शकते. ३ २० शिकविले तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥ १ ॥ प्रसंगीं या नाही देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥ २ ॥ तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - नित्य-अक्षय, कायम टिकणारे, अनित्य-क्षर, नाश होणारे अर्थ.-लौकिक संसाराविषयी तुम्ही मला जे शिकविले ते श्रीहरीशी माझा वियोग जोपर्यंत होता तोपर्यंतच मला पटत होते. १ आता या ऐक्याच्या भावनेत देहाची देखील शुद्ध आम्हास नाही; तेथे तुमचे वचन आता कोण
१२ सार्थ तुकारामगाथा मानणार ? २ तुकाराम महाराज म्हणत आहेत की माझ्या चित्तात आता अनंतस्वरूपाचा परमेश्वर बसलेला असल्यामुळे मला आता नित्य व अनित्य यांतील भेदही दिसेनासा झाला आहे ३ २१ सांगतो ते तुम्हीं अइकावे कानीं । आमुचे नाचणी नाचू नका ॥ १ ॥ जोवरी या तुम्हा मागिलाची आस । तोवरी उदास होऊ नका ॥ २ ॥ तुका म्हणे काय वायाविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -नाचणी-नादाने, मागिलाची-संसाराची लौकिकाची, आस-इच्छा धिंद-फजिती अर्थ -बायानो, मी सांगते ते तुम्ही आपल्या कानांनी नीट ऐका-माझ्या नादी काही केल्या तुम्ही सांगू नका १ कारण जोपर्यंत तुम्हांला लौकिक संसाराची जबर हाव आहे तोपर्यंत उदास होऊन वैराग्याचा आव आणू नका २ तुकाराम महाराज म्हणतात की अशामुळे काहीच पदरी न पडता तुमची फजिती मात्र होईल इकड़ेही पतीची मर्जी पालवून बसाल व तिकडे परमेश्वरासही मुकाल ३ २२ आजिवरी तुम्हा आम्हा नेणपण । कौतुके खेळणे सग होता ॥ १ ॥ आतां अमावर जाले अगुणाची । करू नये तेचि करों सुखें ॥ २ ॥ तुका म्हणे आता बुडविली दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -नेणपण-अज्ञान, सग-सोबत अगुणाची-निर्गुणाची अर्थ -आजपर्यंत तुम्ही व आम्ही अज्ञानाने लौकिक प्रपंचासच महत्त्व देऊन कौतुकाने खेळ एकमेकांच्या संगतीने खेळलो १ आता मात्र सर्व गुणाचा त्याग करून मी त्या निर्गुण परमेश्वराशी लीन झाले, आणि करू नयेत ते खेळ सुखाने करण्यासाठी तत्पर झाले २ तुकारामबुवा म्हणतात आता मी दोन्ही कुळे सासरची व माहेरची बुडवून एक नारायणास मात्र हृदयात स्थान दिले आहे ३ २३ सासुरिया वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावेचि ॥ १ ॥ साडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगू आता ॥ २ ॥ न व्हावी ते जाली आमुची भडाई । तुका म्हणे काई लाजो आता ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -साडवर-नवरा टाकलेली स्त्री भडाई-अपकीर्ती अर्थ -माझ्या सासुरवाडीस असे घडले की माझ्या पतीसच माझा वीट आला, आणि माहेरास तर दिलेली मुलगी दुसऱ्याचीच या भावनेने अलिप्तपणा सहजच होता १ आता या नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीस कोण आधार देणार ? जे काय व्हायचे नशिबात असेल ते भोगू आता २ दोन्ही ठिकाणी भांडणे होऊ नयेत, ती माझी झाली खरी, आता त्याबद्दल लाज धरण्यात काय अर्थ आहे ? ३ २४ मरणाही आधीं राहिलो मरोनी । मग केलें मनीं होते तैसे ॥ १ ॥ आता तुम्ही पाहा आमुचे नवल । नका वेचू बोल वायाविण ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसी सग सरी तुम्हा आम्हा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -वायाविण-व्यर्थ अर्थ -मरणाचे दुःख मी याच जन्मी जगू भोगले आहे प्रत्यक्ष देहत्यागापूर्वीच ती अवस्था या देहधारी अवस्थेतही आम्ही भोगत आहोत माझा संपूर्ण पालट झाला आहे, मग जे माझ्या मनात होते ते मी करीत राहिलो. १ आता तुम्हीच आमच्या आयुष्यातील नवल पाहा उगाच व्यर्थ वचन मात्र अर्थशून्य बोलू नका २ तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही सर्व बायका भयभीत आहात, तुम्हांला लौकिकाची आशा सुटलेली नाही तेव्हा तुमच्या- आमच्या संगतीची बरोबरी कशी होणार ? होणार नाहीच ३
सार्थ तुकारामगाथा १३ २५ परपुरुषाचे सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावे सीस ॥ १ ॥ संसारा आगी आपुलेनि हाते । लावूनि मागुतें पाहू नये ॥ २ ॥ तुका म्हणे व्हावे तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई १ ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - सीस-डोके, मागुतें-मागे अर्थ -त्या श्रेष्ठ पुरुषाच्या, परमेश्वराच्या सहवासाचे सुख भोगावयाचे असेल तर तळहातावर शीर घेऊनच जावे लागते, म्हणजे जिवावर उदार व्हावे लागते १ आपल्या हाताने आपल्या संसाराला आग लावावी लागते, संसारसुखावर पाणी सोडावे लागते, पुन त्याच्याकडे मागे वळूनही पाहू नये २ तुकाराम महाराज म्हणतात की दिव्यावर झेप घेणारा पतंग जसा जिवावर उदार होऊन झडप घालतो त्याप्रमाणे या मार्गातील लोकांनी धीट व्हावयास हवे ३ २६ आइकाल परी ऐसे नव्हे ताई । न सडा या सोई अंतराची ॥ १ ॥ नव्हे आराणूक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविले तें ॥ २ ॥ तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -न सडा-सोडू नका, आराणूक-तृप्ती, संतोप, गोविले-गुंतवून ठेविल अर्थ -बापानो, तुम्ही माझे म्हणणे ऐकाल, पण त्याप्रमाणे वागणे तुमचे किती होईल कुणास माहित ? पण तुम्ही या परमश्रेष्ठ संतांची संगत मात्र सोडू नका १ आणि लक्षात असू द्या की या लौकिक संसारापासून कसलाच संतोप तुमच्या मनास लाभणार नाही, पण आपले आपणच त्या संसारात गुंतून राहिलेले असतो २ तेव्हा मन जरा कठिण करा व ज्याचे मन असे कठिण होईल तेवढयाच माझ्या मार्गाने या ३ २७ आहाच वाहाच आत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हा संशा ॥ १ ॥ भेऊ नये तेथें भेडसावू कोणा । आवरूनि मना बद द्यावा ॥ २ ॥ तुका म्हणे काही अभ्यासावाचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - आहाच-आत वाहाच-बाहेर, गडणी-सावतीण, मैत्रिण, बद-बंदी, वायूचा निरोध करण्याची योगमार्गातील एक प्रक्रिया, अर्थ -आत मनात एक व बाहेर तोंडात एक अशा मैत्रिणी आम्हांस नकोत १ आमच्या मनात कसलेच भय नसते, मग आम्ही तरी इतरांना कसे दाखवू ? तुम्हीही आपले मन आवरून बदिस्त करून ठेवा २ आणि लक्षात असू द्या की कोणत्याही गोष्टीचा चांगला अभ्यास असल्यावाचून काही साध्य होईल असे नसते ३ २८ बहुताच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥ १ ॥ विचार करिता वाया जाय काळ । लटिकॆ ते मूळ फजितीचे ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - लटिकॆ-बाट, घटापटा-व्यथ खटपट घटाबादा म्हणजे आकाश बस कवडे, तर घटाच्या आकारात सामावलेले पट म्हणजे वस्त्र व त्यास ततू याच्या सवधावरून ईश्वर व जगत याच्या सवधाचे वगन करण्याची जी वेदान्ताची परिभाषा ती या पटपटादी खटपटीवरून प्रकट होते अथ -आम्ही काही पुष्कळ लोकाच्या मतांना मानणार नाही, कारण प्रत्येकाची भावना कशी वेगळी असेल याचे काय सागावे ? १ याबद्दल जो जो विचार करावा तो तो वेळ मात्र वाया जातो असे दिसते व ही चर्चाच व्यर्थ असून तोमुळे फजिती मात्र पदरी येते २ तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही वाटल्यास ही घटपटादी खटपट करा खुशाल, पण आमच्या वाटेस मात्र कोणी जाऊ नका ३ १ दीपावरी
१४ सार्थ तुकारामगाथा २९ त्याचे सुख नाहीं आले अनुभवा । कठिण हे जिवा तोचिवरी ॥ १ ॥ मागिलाचे दुःख लागो नेदी अगा । अंतर हे सगा नेदी पुढें ॥ २ ॥ तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - नेदी-देत नाही, सगा-भगतीस, श्रुति-वेद अर्थ - जोपर्यंत त्या परमपुरुषाच्या सहवासाचे सुख अनुभवास आले नाही तोपर्यंतच जिवाला हा मार्ग भारी कठिण वाटतो १ पण एकदा त्याची भेट झाली म्हणजे मग मात्र मागचे दुःख जाणवत नाही, आणि जे संगतीचे सुख मिळेल त्यात अंतरही पडत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात की हा परमपुरुष सर्वांना संपन्न असाच असून त्याचाच महिमा सर्व वेदांनी जाणून गाइला आहे ३ ३० न राहे रसना बोलता आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मने ॥ १ ॥ मानेल त्या तुम्ही अइका स्वभावे । मी तो माझ्या भावे अनुसरले ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्हीं फिरावे बहुतों । माझी तो हे गती जाली आता ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - रसना-जीभ वाणी आवडी-प्रेमाने अर्थ - बाबांनो, त्या श्रेष्ठ पुरुषाविषयी बोलताना प्रेमामुळे माझ्या वाणीला भान राहात नाही माझ्या मनाने तर त्याच्याच पायावर बुडी दिलेली आहे १ तुमचा जसा स्वभावविशेष असेल त्याप्रमाणे तुम्ही एकावे, मी मात्र माझ्या स्वभावानुसार त्याला अनुसरले आहे २ तुकारामबुवा म्हणतात, बाबांनो तुम्ही आता मागे फिरावे हे बरे माझी तर आता ही अशी गत होऊन गेली आहे ३ ३१ न बोलता तुम्हा कळो न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥ १ ॥ आता तुम्हा पुढे जोडीतसे हात । नका कोणी अत पाहो माझा ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी । करील ते हरी पाहो आता ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - गुज-गुपित गोष्ट सांडियेली-सोडली अर्थ - बाबांनो, मी ही माझ्या मनातील गुपित गोष्ट जर बोलले नसते तर तो तुम्हास समजली नसती, म्हणून तर लाज सोडून मी ही तुम्हास सांगितली १ पण आता मात्र मी तुमच्यापाशी हात जोडून विनवणी करीत आहे की आता माझा अंत कोणी पाहू नका २ तुकारामबुवा म्हणतात, आम्ही आता त्याच्या शेजारी सुखाने बसलो आहोत, आता तो श्रीहरी जे करील ते आम्ही पाहू ३ विवरण - येथ विराण्यांचे पंचवीस अभंग संपले अत्यंत तीव्र अशा अनुभूतीच्या प्रकटीकरणासाठी तुकाराम महाराजांनी ही अशी शृंगारिक भाषा वापरली असली तरी त्यातील रूपक एकदा ध्यानात आल्यावर मग मथितार्थ सरळपण ध्यानात येण्याजोगा असतो ३२ नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाही देवे ॥ १ ॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ २ ॥ देवापाशीं मागे आवडीची भक्ति । विश्वासेसीं प्रीति भावबळें ॥ ३ ॥ तुका म्हणे मना सांगतो विचार । धरावा निर्धार दिसेदिस ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सुस्वर-गोड आवाज, निर्धार-निश्चय अर्थ - तुकारामबुवा आपल्या मनास उपदेश करीत आहेत की मना, तुला मधुर शब्दांनी परमेश्वराचे स्तवन करता येत नसेल, कारण तसा गोड आवाज तुला मिळाला नसेल १ पण ध्यानात ठेव की ईश्वर काही त्याच्यासाठी भुकेलेला नाही तुला जसे येईल तसे 'रामकृष्ण रामकृष्ण' असे म्हण २ देवापाशी मोठ्या प्रेमाने
१. मंगलाचरण व विठ्ठल स्तुति अभंग
सार्थ तुकारामगाथा १५ तू भक्तीच माग आणि मोठ्या विश्वासाने व भावनेने त्याच्याशी प्रीती जडीव ३ मना, हा हाच एक निर्धार तू दिवसेंदिवस पक्का करावांस हा एक विचार तुला सांगतो ४ ३३ सावध जालों सावध जालों । हरिच्या आलो जागरणा ॥ १ ॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ २ ॥ पळोनिया गेली झोप । होते पाप आड तें ॥ ३ ॥ तुका म्हणे तया ठाया । ओल छाया कृपेची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जागरणा-देवासाठी केलेले जागरण, भजन, कीर्तन, भार-समुदाय, ओल-दाट अर्थ - परमेश्वराच्या कृपेने मी सावध झालो व हरीच्या भजनकीर्तनात मग्न झालो १ त्या ठिकाणी विष्णूभक्तांचे समुदाय मोठमोठ्याने हरिनामाची गर्जना करीत होते २ ते पाहून माझी झोप पळून गेली व जे काही थोडे पाप होते तेही संपले ३ तुकाराम महाराज म्हणतात त्याच ठिकाणी दाट कृपेची छायाही निर्माण झालेली असते ४ ३४ आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥ १ ॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ २ ॥ गीता भागवत करितो श्रवण । १आणीक चिंतन विठोबाचे ॥ ३ ॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या देवा पार नाहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जागता-सावध, हरिख-हर्ष, आनंद, पार-अंत, शेवट, तुलना अर्थ - आपले श्रेष्ठ हित कशात आहे हे जो जाणून आहे, म्हणजे ईश्वराच्या मोठेपणाची जाणीव ज्यास आहे त्याचे आईबाप त्याला प्रसवून धन्य झाले आहेत १ ज्याच्या कुळात सात्त्विक विचाराचे कन्यापुत्र निर्माण होतात त्याबद्दल प्रत्यक्ष ईश्वरासही हर्ष होतो २ जेथे अखंडपणे भगवद्गीता व भागवत याचे वाचन व श्रवण चालत असते आणि जेथे सतत चिंतन विठ्ठलाचे असते, ३ तेथील लोकांची सेवा मला घडली तर मग माझ्या देवास कसली तुलनाच राहणार नाही, एवढे दैव मोठे माझे होईल ४ ३५ अंतरोंची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥ १ ॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ २ ॥ आपुल्या वैभवे । शृंगारावे निर्मळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जेवी सवे । प्रेम द्यावे प्रीतीचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अंतरोंची-मनातील, गोडी-किंमत, सोयरा-नातेवाईक, शृंगारावे-सुशोभित करावे अर्थ - ईश्वर आपल्या भक्ताच्या अंतःकरणातील गोडी चाखीत असतो, त्याच्या हृदयात भावना कोणती असते हे तो पाहतो १ खरोखरच देव हा एकच खरा आपला आप्त आहे दीन दुबळ्याचा तोच नातेवाईक नव्हे काय ? २ तो आपल्या सामर्थ्याने आपल्या भक्तास निर्मळपणे सुशोभित करतो ३ इतकेच नव्हे तर तुकाराम महाराज म्हणतात की तो सोयरा ईश्वर आपल्या भक्ताबरोबरच जेवण करतो, व आपले स्वतःचे प्रेमही त्याला देतो ४ ३६ सुखे वोळव दावी गोहा । माझें दुख नेणा याहा ॥ १ ॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय फंसा म्हणे भेडा ॥ २ ॥ निपट मज न चले अन्न । पायली गहू साजा तीन ॥ ३ ॥ गेले वारीं तुम्हीं आणिली साखर । सातदीं² गेली साडेदहा शेर ॥ ४ ॥ १ अखंड २ सात दिवसा दाहा शेर
१६ सार्थ तुकारामगाथा अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर १ तूप पथ्या ॥ ५ ॥ दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाही पडे सुपती ॥ ६ ॥ नीज नये घाली फुलें । जवळी न साहती मुलें ॥ ७ ॥ अंगी चंदन लाविते भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥ ८ ॥ हाड गळोनि आले मांस । माझें दुःख तुम्हां नेणवें कैसें ॥ ९ ॥ तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥ १० ॥
शब्दार्थ व टीपा :- चोळंब - ढोंग, कौतुक, रागाव, गोहा - नवऱ्याला, मारिला - नादावलेला, भिडा - भिडेने, निपट - अगदी, न चले - पचत नाही, जात नाही, साजा - वेळेस, गेलेवारी - मागल्या वारी, बाजाराच्या दिवशी, सातदी - सात दिवसात, व्यथा - दुख, लहरी - चक्कर, भोवड, घेरी, सुपती - झोपी जाते, जिता - जिवंतपणीच
अर्थ - एक सुखात वाढलेली स्त्री आपल्या पतीला आपल्या नाजूक प्रकृतीचे ढोंग किंवा कौतुक वर्णन करून सांगत आहे आणि म्हणते, 'अहो, माझे दुःख कुणीच कसे जाणीत नाही?' १ आणि बायकोच्या प्रेमाने नादावलेला वेडा नवरा भिडेखातर 'होय य हो खरेंच' असे म्हणत राहतो २ त्याची बायको त्याला म्हणत असते, 'मला अन्न मुळीच जात नाही, पचत नाही. दिवसास तीन वेळास कसे तरी पायलीभर गहू पुरतात मला ३ गेल्या बाजाराच्या दिवशीच तुम्ही साखर आणलीत, पण ती साडेदहा शेर साखर मला कशी तरी सात दिवस पुरली ४ मला एकसारखे पोटाचे दुखणे आहे, म्हणून दूधभात व तूपसाखर याच्या पथ्यावर मला राहावे लागते ५ दोन प्रहरी मला चक्कर येत असल्यामुळे मी अंथरुणावर पडून झोपी जाते, कधी बेशुद्धही होते. ६ मला कधी धड झोपही येत नाही, मग मी माझ्या अंथरुणावर फुलांचा थर घालते जवळ सारखी किरकिर करणारी मुले मला सहन होत नाहीत. ७ माझे कपाळ नेहमीच दुखत असल्यामुळे मी कपाळावर, अंगावर चंदनाची उटी लावते ८ माझी सारी हाडे गळून गेली असून नुसते मांस उरले आहे, हे माझे दुःख तुम्हास कसे समजत नाही ? ९ तुकाराम महाराज म्हणतात, या असल्या ढोंगी बायकोच्या नादाने नवरा जिवंत असतानाच शुद्ध गाढव बनला व मेल्यावर नरकात गेला त्याला नीट प्रपंचही समजला नाहीं; परमार्थही साधला नाही १०
निरूपण :- तुकारामबुवांच्या अभंगातून भव्य असे तत्त्वनिरूपण वा कथाप्रसंगाचे, वृत्तान्ताचे कथन नसले तरी त्यांच्या अभंगांचे स्थूल मानाने दोन वर्ग करता येतात पहिल्या वर्गात त्यांची स्वतःची मनःस्थिती त्यांनी सविस्तर वर्णन केली आहे आपला उद्योगधंदा, आपला संसार, आपले वैराग्य, आपली साधना, आपणास झालेली गुरुप्राप्ती, आपली कवित्वशक्ती, परमेश्वरभेटीची तीव्र लालसा, तळमळ, उत्कंठा, ईश्वराचे रूपचितन, त्याच्या भेटीचा परमानंद, पुनः विरह, पुनः तगमग, पुनः दर्शनाचे सुख, मीलनाचा आनंद हा सर्व विलास पहिल्या प्रकारच्या अभंगातून बुवानी सविस्तर वर्णन केलेला आहे दुसऱ्या प्रकारच्या अभंगातून बुवा समकालीन लोकांना प्रपंच व परमार्थ याच्यासंबंधी उपदेश करीत आहेत ढोंगी, स्वार्थी गुरूंच्या मागे लागून लोक कसे फसत आहेत व त्यांचे ना धड परमार्थ ना धड प्रपंच, अशा अवस्थेत दिवस कसे वाया जात आहेत याचे चित्रण त्यांनी अनेक अभंगातून केले आहे लोकांचे वैयक्तिक प्रपंच कसे चुकीच्या मार्गाने होत आहेत याचीही चित्रे त्यांनी रेखाटली आहेत लोकही ढोंगी आहेत केवळ पैसा, केवळ स्त्री, केवळ मानसन्मान, केवळ स्वार्थ याच्याच नादी लागून परमार्थविचार अगदीच सोडून देत आहेत असे बुवाना दिसले ईश्वराचे नावही न घेता लोक निव्वळ प्रपंच प्रपंच, पैसा पैसा करीत आयुष्य कंठतात अशा भेसूर प्रपंचाची बुवानी फार मार्मिक व बोलकी शब्दचित्रे काढलेली आहेत प्रत्यक्ष उपदेशापेक्षाही असल्या उपरोधिक टीकेमुळे लोकांना जास्त समजते असा अनुभव सर्वत्र आहे
या अभंगात अशाच एका अर्थकामाधिष्ठित जोडप्याचे प्रपंचिक चित्र बुवानी उपरोधाने रंगविले आहे या अभंगातील बाई सुखाला, विलासाला चटावलेली आहे साऱ्यांनी, विशेषतः आपल्या नवऱ्याने सदैव आपलेच
१ साकर पथ्या
सार्थ तुकारामगाथा १७ कौतुक करावे असे तिला वाटते ही सुखासीन स्त्री सदोदित आपल्या पतीच्या मागे भुणभुण लावीत असते मला भूक लागत नाही, अन्न पचत नाही, पोट दुखते, कपाळ दुखते, दोन प्रहरी जीव घाबरा होतो, झोप येत नाही, हाडे गळून गेली आहेत या तक्रारी ही लाडावलेली स्त्री नेहमी करीत असते, आणि तिच्या सौंदर्याने मोहित झालेला नवरा 'हो हो खरेच आहे' अशी कबुली देत असतो असल्या ढोंगी व मतलबी बायकोच्या नादाने बिघडलेला नवरा हा या जन्मी गाढवाच्या बरोबरीचाच असतो व पुढल्या जन्मी नरकात जातो कारण लाडावलेल्या बायकोस सुधारण्याचे काम खरे म्हणजे पतीचे पण हा तर तिच्याच तंत्राने वागतो तिथे हे सर्व दोष आहे कारण पायलीभर गहू तिला रोज लागतात, साडेदहा शेर साखर तिला एका आठवड्याची लागते दूधभात व तूपसाखर तिला पथ्यासाठी लागतात हे पदार्थ तुकारामबुवांचे हे बोलणे उपरोधाचे असले तरी प्रापंचिकांना त्यांच्या स्थितीचे नीट वर्णन करून सांगणारे आहे समाजस्थितीचे किंवा समकालीन लोकांच्या प्रवृत्ताचे उपरोधिक वर्णन विनोदी भाषेत बुवा नेहमीच करतात नुसत्या उपदेशापेक्षा उपरोधिक टीकेने अधिक चांगले कार्य होते हे त्यांनाही माहित होते असे दिसते प्रपंचातील अनेक विषयावर भारुडात्मक रचना संतांनी जी विपुल प्रमाणात केलेली आहे तीत हा उपरोध प्रकर्षाने पाहावयास मिळतो मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचे दोष घालवून त्याला सन्मार्गास प्रवृत्त करण्याचे कार्य संतांना साधावयाचे होते एकनाथांनी या प्रकारच्या सांसारिक चित्राची अनेक शब्दचित्रे काढली आहेत 'बाई मी भोळी ग बाई मी भोळी । आठा दिसा खाते पुरणाची पोळी' या ओळीने सुरुवात असणारे एकनाथांचे एक चांगले भारुड- गीत प्रसिद्ध आहे अशा प्रकारे संसारात स्त्री व पुरुष याचे लक्ष केवळ अर्थकामावर कसे असते व त्यामुळे संसार कसा बिघडून जातो याची तुकारामबुवांची अभंगात्मक चित्रे विचारप्रवृत्त करणारी आहेत पुढे 'भ्रतारेंसी भार्या बोले गुजगोष्टी', 'कामाचा अंकित कांतलें प्रपंचित' यासारख्या अभंगातून हे प्रपंचदर्शन आपणास होणार आहेच तुकाराम- बुवांची प्रपंचविषयक मते यासारख्या अभंगावरून अजमावताना फार सावध असावयास हवे स्त्रीजातीसबंधी तुकारामबुवांचीही दृष्टी अनुदारपणाची होती असा आक्षेप वारंवार येतो, पण तो खरा नाही केवळ प्रपंच, केवळ धनलोभ, केवळ स्त्री व मुले यांच्याच नादात असणाऱ्याचा गौरव कोण करणार? प्रपंचाचे वा स्त्रीपुरुषाच्या प्रेमाचे रहस्य बुवांना समजत नव्हते असे नाही, परंतु त्यातील ढोंग, त्यातील लोभी वृत्ती, त्यातील ईश्वरविन्मुखता बुवांना दूर करावयाची होती ३७ पावले पावले तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥ १ ॥ जेथें तेथें देखों तुझींच पावले । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ २ ॥ भेदाभेदमते भ्रमाचे सवाद । आम्हा नको वाद त्याशीं देऊं ॥ ३ ॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥ शब्दार्थ व टीपा - पावले - मिळाले, दुजा - दुसरा, याहून वेगळा, सचले - माठून राहिले, भेदाभेदमते - नाना मताचे प्रतिपादन, भेद-अभेद, द्वैत-अद्वैत, सगुण-निर्गुण असे वाद, भ्रमाचे - भ्रममूलक, सवाद - भाषण, वाद - भांडण, कलह, अणु - अगदी लहान कण, नभाहूनि - आकाशापेक्षा, वाढ - मोठा अर्थ - परमेश्वरा, तुमच्यापासून जे काही मला मिळायचे होते ते सर्व मिळाले आहे आता देवा, मागणे एवढेच की मनातील हा भाव बदलू देऊ नका १ विठ्ठला, जेथे मी पाहतो तिथे तुझीच पावले मला दिसतात या त्रिभुवनात तूच भरून राहिलेला आहेस २ भेद, अभेद, द्वैत, अद्वैत हे सर्व भाषण भ्रमातून निर्माण झाले असल्याने त्याच्याशी वाद घालण्याचा किंवा भांडण करण्याचा प्रसंग मजवर आणू नकोस ३ देवा, एखादा अणूही असा नाही की ज्यात तू नाहीस तू अणूपेक्षाही लहान व आकाशापेक्षाही मोठा आहेस ४
१८ 'सार्थ तुकारामगाथा' त्याप्रमाणे अथवा ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे त्याप्रमाणे 'सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाच्या सुतीं ओविले' त्यानुसार परमेश्वरी सूत्रात हे जग ओवले गेले आहे सर्वत्र वासुदेवतत्त्व भरून राहिले हा एक भागवत धर्माचा प्रमुख सिद्धान्त आहे महाभारताच्या शांतिपर्वात 'सर्वभूताधिवासश्च वासुदेवस्ततो ह्यहम्' सर्व भूताच्या ठिकाणी मी वास करतो म्हणून मी वासुदेव ' असे स्पष्ट केले आहे गीतेतही 'वासुदेव सर्वमिति' असे वर्णन करून अगदी लहान अणूपासून अमर्याद आकाशापर्यंत परमेश्वर भरून राहिला असल्याचे वर्णन 'अणोरणीयान्महतो महीयान् 'सारख्या सूत्रात स्पष्ट केले आहे इतरत्रही तुकारामबुवानी 'अणुरेणुया थोडका । तुका आकाशाएवढा' अशा शब्दात स्वानुभव मागितला आहे 'सर्वं विष्णुमयं जगत्' म्हणजे सर्व जग विष्णुमय होऊन गेले असा भावार्थं 'जिये दृष्टी जाई तिथे भगवंताची पावलेच दिसावीत ही निष्ठा आहे 'ज्या ज्या स्थळीं हें मन जाय माझें । त्या त्या स्थळीं हें निज रूप तूझें' अशी जाणीव सर्वत्र आहे 'हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरनाचा घ्रोतला भावो' असा स्वानुभव असून 'जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत' ह भक्तियोगातील सूत्र येथे स्पष्ट झाले आहे ३८ वंदूं चरणरज सेवू उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडू ॥ १ ॥ अमुप हे गांठीं बांधू भाडवल । अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ॥ २ ॥ अवघे होती लाभ एका या चिंतने । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥ ३ ॥ जन्ममरणाच्या खुटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥ ४ ॥ गेले पुढें त्याचा शोधीत मारग । चला जाऊ माग घेत आम्ही ॥ ५ ॥ तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊ त्या माहेरा निजाचिया ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीका - चरणरज- चरणावरील धूलिकण, सेवू-सेवन करू, स्वीकारू, उष्टावळी-उष्ट्या पत्रा- वळी, अमुप-पुष्कळ, खुटतील-संपतील, चिरा घालणे-जन्ममरणाच्या फेऱ्या बंद करणे, एखाद्या गुहेच्या तोंडावर चिरा देऊन दारे बंद करतात त्याप्रमाणे माहेरा-जेथून आपण जन्मास आलो तेथे जाऊन मिळण्याची धडपड प्रत्ये- कास असते म्हणून या मूळस्थानास 'माहेर' असे संबोधण्याची प्रथा आहे पूर्वी लग्न रोवर झाल्यानंतर लहानपणी माहेरची ओढ जशी असते जशी ओड प्रत्येकास परमेश्वरास भेटण्याची असत असा भावार्थ अर्थ - त्या विठ्ठलाच्या पायावरील धुळीस वंदन करू त्याच्या उष्ट्या पत्रावळीही सेवन करून पूर्वकर्मांची होळी करून टाकू १ आमच्यासारख्या अनाथाना विठ्ठल हेच एक दैवत योग्य असल्याने हे न सरणारे भरपूर असे भाडवल आम्ही पदरात साठवून ठेवू २ या गोविंदाच्या चिंतनाने, त्याच्या नामसंकीर्तनाने सर्व लाभ आम्हास होतात ३ याच्या नामाने जन्ममरणाच्या खेपा संपतील व याच्या प्राप्तीचा हा एक सोपा मार्ग हस्तगत होईल ४ या मार्गावरून जे आमच्या अगोदरच पुढे गेले त्याचा मार्ग शोधीत शोधीत आम्ही त्याच्या मार्गावरच राहू ५ आम्ही आमच्या जीवपणावर चिरा (दगड) घालून, म्हणजे जीवपणाचा भाव संपवून निजात्मरूपाच्या माहेराला
सार्थ तुकारामगाथा १९ ३९ जेविले ते सत मार्गे उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥ १ ॥ सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा । पासोनि सकळा अवघ्या दुरीं ॥ २ ॥ परे परतें मज न लगे सांगावे । हे तो देवे बरें शिकविले ॥ ३ ॥ दुसर्यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥ ४ ॥ येणें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥ ५ ॥ लाचावला तुका भारितसे झड । पुरविले कोड नारायणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - झाडा-हिशेब, परे परते-परावाणीच्या पलीकडे, आतळत-स्पर्श करीत संकेत-खूण, पड-झाड, कोड-कौतुक इच्छा अर्थ - पूर्वी जे संत जेवले, त्यांच्या उष्ट्या पत्रावळी सर्व गोळा करून मी उच्छिष्टाची इच्छा करीत आहे. १ तुमच्या सर्व सोवळ्या ओवळ्यापासून मी निराळा आहे २ परावाणीच्या पलीकडे जे तत्त्व आहे त्यासंबंधी आता मला कुणी काही सांगू नये, मला हे देवाने चांगले शिकविले आहे ३ एका ईश्वराशिवाय आम्ही दुसऱ्या कोणासही स्पर्श करणार नाही, याच प्रकारची खूण मनाशी बांधून मी आता स्वस्थ उभा आहे ४ येणे कुणी काही कसलीही शंका धरू नये मला आता ईश्वरप्राप्तीच्या भोजनाचीच आवड आहे ५ मी याच गोष्टीसाठी हपापलेला असून तो- वरच मी अधाशासारखा तुटून पडत आहे आणि नारायणाने माझी ही इच्छा पूर्ण केली आहे ६ ४० देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥ १ ॥ ब्रह्मादिकासि हे दुर्लभ उच्छिष्ट । नका मानू वीट ब्रह्मरसी ॥ २ ॥ अवघिया पुरतें वोसडले पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥ ३ ॥ इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघेंचि आर्त पुरवितो ॥ ४ ॥ सरे येथें ऐसे नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळों घ्यावे ऐसे ॥ ५ ॥ तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हातें । कामारोसांगातें निरुपम ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - अवघिया-सर्वांना वोसडले-भरून चाल पाक-स्वयंपाक कामारी-मदत करणारा कामगार सांगाते-बरोबर निरुपम-उपमा नसलेला अर्थ - जे कोणी या मार्गास येण्यासाठी अधिकारी असाल त्यांनी देवाचा प्रसाद म्हणूनच भजन करावे १ कारण हे उष्टे अन्न ब्रह्मादिकांनासुद्धा दुर्लभ आहे, म्हणून या ब्रह्मरसाचा वीट तुम्ही मानू नका २ सर्वांना पुरेल एवढे भरून हे पात्र तयार आहे, आणि याचे सेवन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे ३ आणि ज्याची इच्छा करावी ते देणारा समर्थ येथे प्रसन्न झाला आहे, तो सर्वांची इच्छा पूर्ण करणारा आहे ४ या रसाचे सेवन कोणी कितीही केले तरी तो कधी संपणारा नाही व पुन पुन तो घ्यावा, त्याचा घास घ्यावा असे वाटत राहते ५ तुकाराम- महाराज म्हणतात हा ब्रह्मरसाचा स्वयंपाक स्वतः लक्ष्मीने केला आहे, आणि तिला मदत करणारा प्रत्यक्ष निरुपम असा परमेश्वर आहे ६ ४१ अवगुणाचे हातीं । आहे अवघी फजीती ॥ १ ॥ नाहीं पात्रासवे चाड । प्रमाण तें फिके गोड ॥ २ ॥ विष तांब्या वाटी । भरली लावू नये होंटीं ॥ ३ ॥ तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग याव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अवगुण-दुर्गुण पात्र-भांडे याव-फुकट व्यर्थ
२० सार्थ तुकारामगाथा अर्थ:-दुर्गुणांचा काहीच उपयोग नाही. त्यांच्यायोगे नेहमीच फजिती होत असते १ भांडे कसले आहे, चांगले की वाईट यावर काही नसून आतील पदार्थाच्या गुणावगुणांवर सर्व आहे. २ तांब्याच्या पवित्र वाटीमधील विष ते विषच, परिणामो घातकारकच होणार; ती भरलेली वाटी ओठाना लावता कामा नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात मूळचा भाव जो असेल तोच खरा; धरले सोंग व्यर्थ आहे. ४ ४२ हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥ १ ॥ कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाठीं ॥ २ ॥ ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलीती अंतीं ॥ ३ ॥ तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जागरण - भजनकीर्तन वगैरेसाठी केलेले जागरण, तुटी-नुकसान, वेचे-खर्च होत आहे, गुंती-मोह, माया, मोकलीती-सोडून देतात, अंतीं-शेवटी, अर्थ - मना, हरीच्या कथाकीर्तनाला का जात नाहीस ? १ केवळ प्रपंचाचा विचार करून तुझे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई तू करणार तरी कुठे ? आयुष्य हरिविना फुकट चालले ना ? २ ज्या मुलांबाळांचा व आप्तांचा तुला मोह पडत आहे ते तर अंतकाळी तुला सोडून जातील. ३ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरप्राप्तीचाच जो चांगला लाभ आहे त्याचाच तू विचार कर. ४ ४३ धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥ १ ॥ मज सोडवीं दातारा । कर्मापासुनि दुस्तरा ॥ २ ॥ करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥ ३ ॥ जिवोंच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुस्तर-तरून जाण्यास कठिण अर्थ - ईश्वरा, तू तर प्रत्यक्ष धर्माचीच मूर्ती आहेस आणि पापपुण्यही तुझ्याच हाती आहे. १ म्हणून हे दातारा, या कठिण अशा पापपुण्यात्मक कर्मापासून मला मुक्त कर. २ देवा, तू जर माझा स्वीकार केलास तर तुला काय माझा भार होणार आहे ? ३ सर्व जीवांचे जीवन असणाऱ्या देवा नारायणा, तुला माझे ओझे काय आहे ? ४ ४४ ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणें । बळिये आम्ही भले शरणागत ॥ १ ॥ कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाऋणी ॥ २ ॥ कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुपावें ॥ ३ ॥ बैसलिये ठायीं लागलें भरतें । त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥ ४ ॥ हरि नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥ ५ ॥ तुका म्हणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता कोण राहत राहो ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा -ब्रह्मादिक-ब्रह्मलोक वगैरे, बळिये-बलवान, पद्मनाभ-श्रीविष्णू, सेवाऋणी-सेवेने ऋणी. कामधेनु-इच्छिलेली वस्तू देणारी दैवी गाय, त्रिपुटो-ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान किंवा ध्येय, ध्याता, ध्यान, अशा तिघांचा समुदाय, लाटे-भरपूर मोठे अर्थ - ज्याच्या लाभापुढे ब्रह्मादिकांचेही लाभ ठेंगणे आहेत अशा ईश्वराच्या संगतीचा लाभ आम्ही मिळविला आहे; त्यामुळे मी शरणागत मोठा बलवान बनलो आहे. १ मी वासनेचा त्याग करून देवाच्या भजनाची जोड मिळविली आहे आणि त्यायोगे पद्मनाभ श्रीविष्णूलाच ऋणी करून ठेविले आहे. २ ईश्वराची ही भक्ती म्हणजे कामधेनूप्रमाणे असून तिच्या दुधाला अंत नसतो. जशी ज्याला इच्छा होईल तसा त्याच्यावर वर्षाव होत राहील. ३
सार्थ तुकारामगाथा २१ बसल्या ठिकाणीच तिच्या दुधाला भरते येते व त्याच्या प्राशनाने एवढी लय साधते की ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान ही त्रिपुटी नाहीशी होते ध्येय, ध्याता, ध्यान यातील भेद मावळतो ३ काय जाणावयाचे आहे ते, जाणणारा व त्याची झालेली जाणीव अशा वेगळया अवस्थाच शिल्लक राहात नाहीत ४ या जगात आम्हासारख्या विष्णुदासांना हरिनाम हाच एक विसावा आहे. नारायणाने विसावा आमच्याच देहांत घेतलेला आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात की ईश्वरप्राप्तीच्या या भोजनाचा लाभ फार मोठाच आहे येथे कुणीही उपाशी राहू म्हटले तरी राहू शकत नाही ६ ४५ दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि । आपणाबाहेरी । नलगे ठाव धुंडावा ॥ १ ॥ इतुले जाणावया जाणा । कोठे तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । १जाणतेचि साधावे ॥ २ ॥ देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा ॥ बुजगावणें चोरा । रक्षणसे भासतें ॥ ३ ॥ तुका म्हणे जागा । नको २धासपू घाउगा ॥ आहेसि तू आंगा । अगों डोळे उघडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुजें-द्वैत, जीवशिव, आत्मापरमात्मा ही भिन्न असल्याची जाणीव खंडे-सडल्यावर सपल्यावर, पारधी-शिकारी, धासपू-चाचपू, घाउगा-व्यर्थ अर्थ - एक द्वैत संपले की जे उरते ते सर्व परमेश्वराचेच रूप आहे मग त्याला शोधण्यासाठी आपल्या- बाहेर कुठे जावे लागत नाही १ पण हे ज्ञान होण्यासाठी मनाने मनाकडेच अंतर्मुख व्हावयास हवे, कारण पारध्यासच पारध्याच्या खुणा माहित असतात २ आधी देह हासुद्धा खरा नाही, मग त्यापासून निर्माण झालेला पसारा खरा कसा असणार ? शेतातले बुजगावणे हे जसे चोरास रक्षण करणारेच वाटते त्याप्रमाणे देह आपणास खरा वाटतो ३ म्हणून तुकाराम महाराज जागे करीत आहेत की, उगाच इकडे तिकडे ध्येयं चाचपू नका, देहातच तुम्ही ईश्वरस्वरूप आहात, हे देहातीलच ज्ञानदृष्टीने तुमच्या ध्यानात येईल ४ विवरण - संताच्या अभंगात द्वैताद्वैताचा उल्लेख नेहमी येतो मग द्वैती की अद्वैती ? याचे उत्तर संत तत्त्व ज्ञानाच्या वा बोधाच्या दृष्टीने अद्वैतीच त्यांची अनुभूती अद्वैताची दुजेपणा किंवा द्वैत संपल्यावर जे स्वरूप उरत तोच एक परमेश्वर हा या अभंगाचा मुख्य गाभा आहे दुजेपणा संपावा, भेद सर्व नाहीसा व्हावा, जीव वेगळा, ईश्वर वेगळा अशी भावना उरू नये यासाठी तर आग्रह आहे 'भेद तुटलीयावरि। आम्ही तुमचीच हो हरी' अशी जाणीव सर्वत्र आहे 'कासयाने पूजा करू केशीराजा' नावाच्या सर्वोत्तम अभंगात या अद्वैतानुभूतीचे फार चांगल वर्णन आलेले आहे नाव निरनिराळी म्हणून काय मूळ रूपही वेगवेगळे असावे ? जलप्रवाह निराळा, तरंग निराळा, सुवर्ण निराळे, अलंकार वेगळे किंवा तुकोबाच्या भाषेत बोलायचे म्हणजे 'खडा साळी साखर । झाला नामाचाची फेर ' नामाची भिन्नता, परंतु स्वरूपाच्या दृष्टीने एकताच की 'तुज मज नाहीं भेद' अशीच अनुभूती सर्वत्र आहे मग द्वैत आले कोठून ? 'अद्वैतीं तो नाहीं माझें समाधान ' असही तुकारामबुवा का म्हणतात ? याचे उत्तर अस की बोधाला, प्रचीतीला, तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर अद्वैतच; पण या अद्वैताची अनुभूती येणार ती द्वैताच्या साह्याने भोगायला द्वैत, अनुभूतीत अद्वैत दिसायला दोन पण असायला एक अशी वस्तुस्थिती आहे डोळे दोन पण दृष्टी एक ओठ दोन पण गोष्टी एकरूपाच्या एक वीजच वृक्षाच्या रूपाने आले सुवर्णच नाना अलंकाराच्या रूपानी व्यक्त झाले, अनेक लहरीच समुद्रावर उमटल्या, पण या सर्वात अनुभूती एका अव्यक्ताचीच आहे घरात सूर्य अस्तित्व दिसतो वाळात अग्नी वेगळा दिसतो पण सूर्याची व अग्नीची व्यापकता सर्वत्र जगत उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा हीच अनुभूती उदक व तरंग या द्वैतापासून यावयाची तत्त्वर बीजा पोटीं । वीज तश्यवरा शेवटी, 'असे हे द्वैताद्वैत चक्र आहे 'तुझी माझी एक ज्योती' हे अनुभवाचे सार आहे अध्ययनाला सुद्धा व्यक्त होण्याचा अद्वैताला द्वैतावर येण्याचा ध्यास असतो कारण त्याशिवाय सुख नाही त्या मूलस्थानाचा एकट्यास करमनास होणे म्हणून तो बहुविध आवा- रानी नटतो, व्यक्त होतो एका बीजाचा नाश झाल्यासारखा वाटून तरी अनेक टपोऱ्या दाण्याचे कणीस दिसते या अनेक दाण्यातही एक बीजच विविधनान नटलेल असत १ जाणे तणेंचि साधाव्या २ चाचपू
२२ सार्थ तुकारामगाथा ४६ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥ १ ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ २ ॥ कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पाये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भेदाभेदभ्रम-हे माझे, हे दुसऱ्याचे, हा पापी, हा पुण्यवान, हा लहान, हा मोठा अशा जाणिवेचा भ्रम, वर्म-खूण. अर्थ :- सर्व जगच विष्णुमय आहे, म्हणजे एकच तत्त्व सर्वत्र भरून राहिले आहे असे मानणे हा वैष्णवांचा धर्मच आहे. यात भेद मानणे, निराळेपणा कोणत्याही कारणाने कल्पिणे हे वाईट आहे. १ तुम्ही खरे भगवंताचे उपासक असाल तर जे कराल ते सत्याचे स्वरूप जाणून हिताचे असेल तेच करा. २ कुणाही जीवाचा मत्सर करु नका, कारण सर्वत्र एकच परमेश्वरतत्त्व भरून राहिले आहे, व त्या सर्वेश्वर पूजनाचे तत्त्व ध्यानात असू द्या. ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व अवयव एकाच देहाचे आहेत. जर एका अवयवास सुखाची किंवा दुःखाची अनुभूती आल्यास ती त्या जीवात सारखीच जाणवते. ४ विवरण :- वारकरी संप्रदायात या अभंगास फार महत्त्व आहे याचे कारण असे की दोन महत्त्वाचे विचार या अभंगात थोडक्या शब्दांत सांगितले आहेत सर्व जगतात एकच परमेश्वर भरून राहिला आहे असे समजून सर्व- श्वराची पूजा करण्याचीच वृत्ती आपली असावी असा एकत्वाचा बोध फार परिणामकारक रीतीने वर्णन केला आहे. या बोधाचा व्यावहारिक उपयोग म्हणजे सर्वत्र परमेश्वराचाच अंश व्यक्त झालेला असल्यामुळे हा लहान, हा मोठा हा उच्च, हा नीच, हा चांगला, हा वाईट, हा पुण्यवान, हा पापी असे भेद उरू नयेत एकट्याचाच हा सर्व विस्तार असल्यामुळे समानबधत्त्वाची जाणीव असणे जगण्याचे आहे, हा यातून निघालेला दुसरा विचार. मग कुणाचाही मत्सर करू नये हे ओघानेच आले. हेवा दावा, मत्सर आपण ज्याचा करणार तोच ईश्वरी अशाचा व्यक्त झालेला आकार असेल तर ? असा प्रश्न सर्वांच्याच मनासमोर उभा राहिला तर पुजळसे हेवेदावे मिटतील कटुता कमी होईल. भागवत धर्माने या समत्वाच्या दृष्टीने फार मोठी कामगिरी सामाजिक क्षेत्रातही केली आहे भेददृष्टीने पाहणे संतानी अमंगल मानले आहे ४७ आम्ही तरी आस । जालों टाकोनि उदास ॥ १ ॥ आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ २ ॥ भलते ठायीं पडों । देह तुरंगी हा चढो ॥ ३ ॥ तुमचें तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसों जैसों ॥ ४ ॥ गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥ ५ ॥ तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आस-इच्छा, आशा, तुरंगी-घोड्यावर मानामान-मान किंवा अपमान, खंती-काळजी अर्थ :- देहबुद्धीची आशा सोडून आता आम्ही उदास झालो आहोत. १ आता परमेश्वरा, मरणाचे भय कुणास आहे ? २ आता देह कुठे पडून जावो अथवा घोड्यावर चढो, आम्हांस त्याचे काय ? ३ यामुळे होणारे सुखदुःखादी विकार तुमचे तुम्हापाशीच राहोत, आमचा त्यांच्याशी संबंध नाही; आम्ही आहो तसेच राहू. ४ मान आणि अपमान, सुख आणि दुःख यांचा नाश करून आम्ही आता त्यांच्या पलीकडे गेलो आहोत. ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता यासंबंधीची मनांत बिलकुल चिंता उरलेली नाही. ६ ४८ निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥ १ ॥ मज हेंही नाहीं तेंही नाहीं । वेगळा वोहों पासुनी ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा २३ देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ॥ ३ ॥ अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुम्हाचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - देहभोग-देहास होणारे सुखदुःखादी विकार अर्थ :- आमची कोणी निंदा करोत अथवा कोणी स्तुती करोत, कोणी मार देवोत अथवा कोणी पूजा करोत, १ मला पहिल्याचे दुःख नाही दुसऱ्याचे सुख नाही. मी सुखदुःखान्याहोपेक्षा निरच्छाच आहे. २ देहभोगानुसार जे जे बरेवाईट प्रसंग येतील ते सर्व सारख्याच दृष्टीने मी भोगीन. त्याचे समत्वाने स्वागतच करीन ३ कारण ही सर्वच सुखदुःखे माझी स्वतःची नसून जनार्दन स्वरूपाच्या नारायणास ती मी अर्पण केली आहेत, मी तसा अलिप्तच राहिलो आहे. ४ विवरण - वरील दोन्ही अभंगात भक्ताच्या उदासीन वृत्तीचे रहस्य फार समर्पक रीतीने वर्णन केले आहे. त्याने आपले सर्व भाव व सर्व क्रिया सर्वज्ञ परमेश्वरास अर्पण केले असल्याने तो त्यात गुंतून राहात नाही, त्या मानअपमान, सुखदुःख याच्या पलिकडे असतो स्तुतिनिंदा त्याला सारखीच असते भगवद्गीतेच्या बाराव्या अध्या- यात 'यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । शुभाशुभपरित्यागी' (जो कशाचाही आनंद मानीत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही व इच्छाही करीत नाही, समचि शुभाशुभ फलही ज्याच्या मनात नसते) अशा भक्ताचा गौरव केला आहे त्याची वागणूक 'तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी' (निंदास्तुती समान मानणारी) असते सर्व साधुसंतांनी हाच बोध आपल्या आचरणातून व्यक्त केला आहे 'निंदा स्तुति कोणी करो दया माया । न धरीं चाड या सुखदुःखा' असे तुकारामबुवांनीही म्हटले आहे ४९ जन विजन जालें आम्हा । विठ्ठलनामा प्रमाणे ॥ १ ॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ २ ॥ वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥ ३ ॥ आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- विजन-एकान्ताची जागा, पट्टण-शहर, सरता झाला-सारखा झाला, विठ्ठल् रूपाने भरून राहिला अर्थ :- एका विठ्ठलनामामुळे आम्हास जनसमुदायात राहून विजनवासाची, एकान्ताची गोडी मिळाली १ जिकडे आम्ही पाहू तिकडे मायबाप विठ्ठलरखुमाईचीच रूपे आम्हास दिसतात २ वन असो अथवा नगर असो विठ्ठलवासामुळे सर्व ठिकाणे आम्हास सारखीच झाली ३ या अद्वितीय अशा समभावाच्या आनंदात आम्हाला सुख- दुःखाची आठवणही होत नाही; तुकाराम महाराज त्याच कौतुकाने नाचत आहेत. ४ विवरण-या अभंगात परमेश्वरी कृपेने भाग्यवान झालेल्या भक्ताची अवस्था समत्वाची कशी होते याचे उत्कृष्ट चित्रण आले आहे सर्वत्र विठ्ठलभावच प्रतीतीस आल्यामुळे सुखदुःख, स्तुति-निंदा याची भावना नष्ट झाली जनात आहोत की विजनात आहोत हेही आमच्या ध्यानात येत नाही असे बुवा सांगत आहेत या ठिकाणी 'जन विजन जाले आम्हा' या शब्दातील रहस्य समजावून घ्यावयास हवे जनसमुदाय व वननिवास ही स्थिती आम्हास समान वाटते म्हणजे वनातील एकान्त गर्दीप्रमाणे वाटतो, असे नसून शहरातील जनसमुदायातही एकान्ताचा अनुभव येण्याइतपत आमची विठ्ठलाशी तद्रूपता झाली आहे असा भावार्थ या विजनवासाचे, एकान्ताचे, वननिवासाचे महत्त्व साधकाच्या आयुष्यात फार मोठे आहे 'अरतिर्जनसंसदि' सर्वसामान्य जनांच्या समूहाची आवड नसणे हे एक आत्मज्ञानी माणसाचे लक्षण गीतेत सांगितले आहे हा आत्मज्ञानी 'विविक्त सेवी' म्हणजे विशिष्ट अशा एका- न्ताच्या स्थळी राहाणारा असतो 'एकान्तेवीण प्राणियांतें बुद्धि कैंची ?' म्हणून समर्थांनीही विचारले आहे यासाठी तुकारामबुवांनी गावातील गजबजाट सोडून भंडाऱ्याच्या डोंगरावरील वृक्षवल्लीच्या व वनचरांच्या सोबत्यात मन रमविले हा एकान्ताचा निवास बुवांच्या मनास फार रुचला येथे आपल्याच मनाशी आपणच संवाद