भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 306, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 306

२७२ सार्थ तुकारामगाथा ५३९ सवसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥ १ ॥ शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगों होऊनि ठेला ॥ २ ॥ तुका म्हणे देहें दिला एकसरें । जयास दुसरें नाहीं मग ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - तीहीं-त्यानी, दारा-स्त्री, हर्षामर्ष-सुखदुख अर्थ - ज्याच्या चित्तात स्त्री व द्रव्य यांच्याबद्दल आसक्ती नाही त्यांनी ससारास पाठमोरे केले आहे ससार सोडला आहे असे मानावयास हरकत नाही १ ज्याला शुभ व अशुभ याच्याबद्दल सुख वा दुख वाटत नाही, तो या जगात प्रत्यक्ष जनार्दनच होऊन राहिला आहे असे समजावे २ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने आपला देह नेहमीच देवास अर्पण केला आहे, त्यास या जगात दुसरे काही उरले आहे असे नाही ३ ५४० देहबुद्धि वसे लोभ जया चित्तीं । आपुले जाणती पराये जे ॥ १ ॥ तयासि चालता पाहिजे सिदोरी । दुख पावे करो असत्य तो ॥ २ ॥ तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हे तापला तो ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -पराये-दुसऱ्याचे अर्थ - ज्याची देहबुद्धी अजून दूर झालेली नाही व ज्याच्या चित्तात लोभ वस्ती करून आहे, तो हे आपले, हे दुसऱ्याचे असे समजून असतो १ त्याला मात्र या जन्माची वाटचाल करीत असताना पुण्याची शिदोरी हवीच असत्य कर्म केल्यास त्यास दुखच होणार २ जो उन्हाने तापलेला आहे, त्यासच शीतल छायेची जरुरी वाटणार धर्म रक्षण करण्यासाठी असा प्रयत्न केलाच पाहिजे ३ ५४१ काळें खादला हा अवघा आकार । उत्पतिसहारघडमोडी ॥ १ ॥ बीज तो अंकुर आच्छादिला पोटाँ १ । अनंता सेवटी एकाचिया ॥ २ ॥ तुका म्हणे शब्दें व्यापिले आकाश । गुढार हे तैसे कळो' नये ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -उत्पत्ति-निर्मिती, सहार-शेवट, अनंता-कल्पांताच्या गुढार-गुह्य अर्थ - जगाची निर्मिती आणि सहार याच्या घडामोडीत जगास आलेला हा आकार काळ एकसारखा खात असतो १ ज्याप्रमाणे निर्माण होणारा अंकुर त्या बीजाच्या पोटीच सामावलेला असतो, त्याप्रमाणे कल्पांताच्या शेवटी सर्व चराचर विश्व त्या एकाच्याच पोटी विलीन होणार आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व आकाश शब्दाचेच आहे, हे गुह्य कसे कळून येत नाही ? ३ ५४२ आणीक काळें न चले उपाय । धरावे या२ पाय विठोबाचे ॥ १ ॥ अवघेंचि पुण्य असे तया पोटीं । अवधिया तुटी होय पापा ॥ २ ॥ अवघें मोकळें अवधिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥ ३ ॥ काळ वेळ नाहीं गर्भवासदु खें । उच्चारिता मुखें नाम एक ॥ ४ ॥ तुका म्हणे काहीं न लगे साडावे । सागतसे भावे घेती तया ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - या काळें-या काळात कलियुगात, तुटी-नाश अर्थ - या कलियुगात दुसरा काही उपाय करायलाच नको एका त्या विठोबाचे पाय धरले म्हणजे पुरे १ मग सर्व पुण्ये त्याच्या पोटात आली आहेत असे समजा त्यामुळे सर्व पापाचाही नाश वेगाने होईल २ त्या विठ्ठलाचे चिंतन केल्यानंतर सर्वजणाना सर्व काळ मोकळाच वाटेल त्यामुळे साऱ्या स्त्रीपुरुषाची कुळे उद्धरली जातात ३ श्रीहरीचे नाव मुखाने उच्चारण्यास काही काळवेळ पाहण्याची जरुरी नाही त्या नामाने गर्भवासाची दुखे दूर होतात ४ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी काही सोडून देण्याची गरज नाही जो कोणी भक्तिभावाने हे नाम घेत असेल त्यासच मी हे सागत आहे ५ १ केंस, २ ते