भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 307, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 307

सार्थ तुकारामगाथा २७३ ५४३ कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळ हृदयस्था ॥ १ ॥ अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ २ ॥ कां हे चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंद्रियांची गति 'कुंटेचि ना ॥ ३ ॥ तुका म्हणे कां रे धरियेला कोप । पाप सरलें नेणों पांडुरंगा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कंठस्फोट-घसाफोड, कोप-राग अर्थ - देवा, तू माझ्या अगदी हृदयात वास करुन असतानाही तुला माझा कळवळा कसा येत नाही रे ? १ देवा, नारायणा, तू निष्ठुर व निर्गुण आहेस असे वाटते, कारण मी घसाफोड करून शोक केला तरी तुला त्याबद्दल काहीच समजत नाही. २ माझे हे चित्त का विश्रांतीस पावत नाही ? विषयाकडे असणारी इंद्रियांची गती कुंठीत का होत नाही ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही असा राग मजवर का धरला आहे हो ? पांडुरंगा, अजून माझे पाप संपले नाही की काय ? ४ ५४४ दीनानाथा तुझीं ब्रिर्दें चराचर । घेसील कँवार शरणागता ॥ १ ॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ २ ॥ आपुल्या दासांचे न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥ ३ ॥ चक्र गदा हातीं आयुधें अपारे । न्यून तेथें२ पुरें करूं धांवें ॥ ४ ॥ तुका म्हणे तुज भक्तीचे कारण । कराया पूर्ण अवतार ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- बिदें-वचने, प्रतिज्ञा, आयुधें-शस्त्रे, न्यून-कमी अर्थ :- आपले जे शरणागत असतील त्याचा सांभाळ करणे, त्याची बाजू सावरणे हीच दीनानाथा, तुझी प्रतिज्ञा आहे ना ? १ पुराणांतून तुझ्या कीर्तीचे जे पवाडे गर्जून आहेत त्यावरून उघड उघड असे हेच आम्हास कळून आले. २ तू आपल्या भक्ताना काही कमी पडते, हे मुळोच सहन करीत नाहीस. त्याच्या मदतीसाठीच तू अखंडपणे उभा आहेस ३ यासाठीच तुझ्या हातात अपार अशी चक्र, गदा इत्यादी हत्यारे असतात. जिथे जे कमी पडेल ते पूर्ण करण्यासाठी तू धावत जातोस. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, भक्तीचे कार्य पूर्ण करण्यासाठीच तुझा अवतार आहे. ५ ५४५ वर्णू महिमा ऐसी नाही मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥ १ ॥ ठाचीची हे काया ठेविली चरणीं । आता ओवाळुनि काय सांडूं ॥ २ ॥ नाही भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥ ३ ॥ मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- साचा-खरोखर, पार-अंत, शेवट, थार-आधार. अर्थ :- देवा, तुझा महिमा पूर्णपणे वर्णन करावा अशी वाचा मजजवळ नाही तुझ्या महिम्याचा अंत वर्णन करता येणार नाही, असाच तो आहे १ हे माझे मूळचे शरीरच देवा, मी तुमच्या पायांवर अर्पण केले आहे, आता आणखी ओवाळून काय टाकू तुमच्यावरून ? २ देवा, तुमची सेवा करावी असा भावच नाही. जीव तुम्हांस अर्पण करावा तर तोही तुमचाच आहे ना देवा? ३ मला आता माझे असे जे तुला समर्पण करावे असे काहीच दिसत नाही. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तुझे अनंत उपकार फेड़ावेत यासाठी मजजवळ काही आधारच उरलेला नाही ५ ५४६ नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥ १ ॥ देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ २ ॥ १ फुटे, २ तेंचि. तु. गाथा....३५

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 307, कुल 611 में से · BharatKosha