सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 317, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें[Page Header] सार्थ तुकारामगाथा २८३
[Body Text] चिंता बुवांना नव्हती. बुवा घरी आले तरी त्यांच्याबरोबर माणसे असत. त्यांची भगवद्भक्तीची चर्चा चाले, अभंग- निरूपण चाले, नामस्मरण, भजन चाले. या वृत्तीने संसार कसा होणार ? नवऱ्याचे काही लक्ष संसारावर नाही, असे पाहून मग ही जिजाई संतापत असे, रागवत असे. बुवा प्रसंगी कडक भाषा तिची सोशवत, हे आपल्याला इतर संदर्भात माहीत आहे. मग ही बोलून चालून शिक्षणाचा संस्कार नसलेली एक सामान्य अज्ञ स्त्री ती शुश्रोषापर कडक शब्दाचा वर्षाव करी. भारी रागावत असे. तिने एकटीने हा प्रपंचाचा गाडा ओढावा तरी कसा ? प्रपंचात काय लागत नाही ? मुलाबाळांना नीटपणे वाढविण्याची सर्व जबाबदारी निमूटपणे तिने पत्करावयास हवी होती. पण तेवढी समजूत तिला नव्हती असे दिसते. वरील अभंगात वर्णन केलेली परिस्थिती वस्तुस्थितीस धरून असेल तर, जिजाबाई तुकारामांना फारच कठोर उत्तरे देत होती असे दिसते. 'कोणाची बाईक होऊनिया ओढू । संवसारीं काढू आपदा किती ?', 'पोरें मरतीं तरी बरें होतें आतां' अशा शब्दात ती आपल्या मनातील संताप व्यक्त करीत आहे. 'बरें झालें देवा, बाईल कर्कशा' म्हणून तुकोबांनीही उल्लेख केला आहे.
तुकोबा व जिजाबाई यांच्या तांडी वरवर दिसणाऱ्या या अपशब्दातून दोघांच्या मनस्थितीचे व संप्रदायाचे विक्षेप निवडून काढणे कठीण काम आहे. सर्व लौकिक संसाराकडे तुकोबांनी पाठ फिरविली व ते एका विठ्ठलाच्या प्रेमात सापडले. मग या प्रारंभीच्या आयुष्यात सुखावलेल्या स्त्रीने कुणाच्या आधारावर प्रपंच ओढायचा ? तिचा तोल सुटला असला, तरी तिचीही बाजू समजावून घेण्यासारखी आहे.
बुवा एवढे परमार्थी, भक्तीच्या मार्गाने प्रवास करीत निघालेले, पण त्यांच्याही मुखातून स्वतःच्या पत्नी- विषयी अपशब्द निघत असत. मग जिजाबाई तर बोलून चालून स्त्री. धीमंदीत वाढलेली, तीही प्रसंगी त्रास असह्य झाल्यावर संतापून बोलत असे. पण दुपारच्या जेवणाची वेळ झाली की, भर उन्हात, डोक्यावर भाकरी घेऊन वाटघा- कुटपाच्या मार्गाने, पोरांच्या त्रासानं, मुमाराच्या फटफजितीने भारावलेली, गांगरलेली, कष्टी झालेली जिजाबाई आपल्या देवपिसे जडलेल्या नवऱ्यासाठी निघालेली दिसेल. यावळी तिच्या डोक्यावर भाकरी व मनात या देवभोळ्या 'ध्याना' बद्दल अपार प्रेमच असावे. जिजाबाई साध्वी होती, पतिपरायण होती, देवादिकांना मानणारी होती, पण स्वभावाने भारी तापट असावी. या स्त्रीच्या मनाचे रहस्य तुकोबाही जाणून होते. पायात काटा रुतल्यामुळे रगड़त लंगडत येणाऱ्या स्वस्त्रीची दैना पाहून तेही कळवळले. त्यांनी जेवणवेळेस घरी येण्याचे कबूल केले. तिला वारंवार उपदेश करून तिचे मन शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 'देवासाठीं जाले ब्रह्मांड सोइरें' असा बहुमोलाचा उपदेश तेही तिला करण्याचा प्रयत्न करीत असताना दिवसांन तिला केलेल्या पूर्णबोधाचा विचार पुढे आपण करणार आहोतच. पण अभंग क्र. १९८१ ते १९९१ पर्यंत तुकोबांनी ज्या श्रेष्ठ भूमिकेवर हा उपदेश केला आहे, त्याच्या चिंतनाने बुवांच्या व जिजाईच्या मनात आलेल्या क्षणिक यावटळी निघून जाव्यात. 'भले लोक तुज बहु मानवती । वाढेल या कीर्ती जगन्माजी । किंचित हें सुख टाकी वो चुकोनि । पावसील धनी परमानंद ।' या सारख्या किंवा 'नको चिंता करू वस्त्रा या पोटाची । माऊली आमुची पांडुरंग', 'वैष्णवाची दासी होई सर्वभावें । मुखीं नाम ध्यावें विठोबाचे' यासारख्या शब्दांच्या वर्षावाने जिजाबाईचे अंतःकरण पुढे पुढे शीतल झाले असावे व बुवांचा क्षणिक रागही नाहीसा झाला असावा. मुसानेतुराचे व भांडभांडुपणाचे मुख तिने धुवून टाकावे, अशी अपेक्षा तुकोबांची होती.
'तू माझ्या विचाराना येऊन मिळशील तर आपल्या मधील विरोध संपेल व देवावाचून तुला व मला दुसरे कुणीच नाही. मी त्याचीच सुखसाठीं केली आहे. तू मला त्यात साहाय्य करावेस' अशी महत्त्वाची विनंती प्रेमाच्या पोटी बुवांनी जिजाबाईस केली आहे. यात सर्व काही आले.
[Abhanga] ५७३ भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥ १ ॥ करिता नव्हे नीट श्वानाचे हें पुच्छ । खापरा परीस काय करी ॥ २ ॥ काय करिल तया साकरेचे आळें । बीज जैसें फळें येतीं तया ॥ ३ ॥ तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥ ४ ॥