सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 318, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२८४ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- पाषाण-दगड, श्वानाचें-कुत्र्याचे, खळ-दुष्ट. अर्थ- जो मनात भाव धरून वागेल त्याच्या सामर्थ्याने दगडाचा देवही त्याला तारील. पण मूळातच जो दुर्जन किंवा दुष्ट वृत्तीचा आहे, त्याला सज्जन तरी काय करणार ? १ कुत्र्याचे वाकडे शेपूट कधी तरी सरळ करता येईल काय ? खापराच्या तुकड्यास परीस काय करणार ? त्याला लोखंडच हवे. २ कडू लिंबाच्या झाडास साखरेचे आळे करून काय उपयोग ? जसे बीज असणार, तशी फळे त्याला येणार हे स्पष्ट आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या वेळेस वज्रासारख्या कठिण शस्त्राचा भंग होईल; पण या दुष्ट माणसाच्या स्वभावात बदल घडून येणार नाही. ४ ५७४ इच्छावें तें जबळी आलें । काय बोलें कारण ॥ १ ॥ नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ २ ॥ मुकियाचे परी जीवीं । साकर जेवीं खादली ॥ ३ ॥ तुका म्हणे काय बोलें । आतां भलें मौन्यची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खादली-खाल्ली, मौन्यचि-न बोलणे. अर्थ :- ज्याची इच्छा करावी ते सर्व प्राप्त झाले आहे. आता बोलायचे काही कारण राहिले नाही. १ हरीच्या नामरूपाची गाठ पडल्यामुळे आता सर्व गोष्टी अथवा विवंचना संपल्याच ना. २ मुक्याने साखर खाल्ली तरी, त्याला जशी तिची गोडी सांगता येत नाही तसे माझे झाले आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आणखी आता काय बोलावे; आता मौन धरावे, काहीच बोलू नये हे चांगले ४ ५७५ साधनें तरी हींच दोन्ही । जरी कोणी साधील ॥ १ ॥ परद्रव्य परनारी । याचा घरीं विटाळ ॥ २ ॥ दैवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥ ३ ॥ तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- परद्रव्य-दुसऱ्याची संपत्ती, परनारी-दुसऱ्याची स्त्री. अर्थ - साधनाने साधने करायची असली तरी हीच दोन करावीत. १ एक परद्रव्याचा विटाळ मानावा व दुसरे म्हणजे परस्त्री मातेप्रमाणे मानावी. २ मग मोठ्या भाग्याने देव त्याच्या घरी येतील. सर्व संपत्तीची अनुकूलता त्यास लाभेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, इतकेच नव्हे तर, अशा गृहस्थाचे शरीर म्हणजे देवाच्या घरचे भांडारच होय. ४ ५७६ आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥ १ ॥ मोहे धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ २ ॥ कोठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥ ३ ॥ सुख ठेवी आम्हासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥ ४ ॥ आम्हां घाली पाठीकडे । पुढें १कळिकाळाशीं भिडे ॥ ५ ॥ तुका म्हणे कृपानीधी । आम्हां उतरीं नांवेमधीं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- सूकर-वराह, कृपानीधी-कृपेचा सागर. अर्थ :- या देवाने आमच्यासाठी मत्स्य, कूर्म, वराह यांच्या रूपांनी अवतार घेतले आहेत. १ या देवाचे पंढरीनाथा, असे नाव घेताच हा देव आपल्या कृपेचा पान्हा देण्यासाठी मोठ्या प्रेमाने धावून येतो. २ तसे पाहिले तर कुठे तो दिसत नसला तरी अवचितपणे येऊन आमचे संरक्षण करीत असतो. ३ हा देव एवढा दयाळू आहे की, १ आपण.