सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 319, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २८५ तो सुखाचा वाटा आम्हास देतो आणि दुःख स्वतःसाठी ठेवितो दुःखाचा घोट स्वतःच तो गिळीत असतो ४ आमचे सरंक्षण करण्यासाठी हा आम्हास पाठीशी घालतो व स्वतः प्रत्यक्ष काळाशी झगडण्यासाठी पुढे होतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, हा कृपेचा सागर आमच्या रक्षणासाठी भवसागरातील नावेत उतरलेला असतो ६ ५७७ रवि रश्मिकळा । नये काढिता निराळा ॥ १ ॥ तंसा आम्हा जाला भाव । अगीं जडोनि ठेला देव ॥ २ ॥ गोडी साखरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥ ३ ॥ तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - रश्मिकळा-किरणांचे तेज, ठेला-स्थिर जाला अर्थ - सूर्याची किरणे व त्याचे तेज याना सूर्यापासून वेगळे काढता येत नाही १ त्याप्रमाणेच देवाचे व आमचे नाते असून तो आमच्या सर्वांगातच स्थिर झालेला आहे २ साखरेपासून तिची गोडी निराळी काढता येईल काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो जो शब्द उमटेल, तो आकाशाच्या पोटातच विरून जाणार. जो जो भाव उमटेल, तो तो ईश्वराच्या रूपातच सामावलेला असणार ४ ५७८ थोडें परी निरें । अबिट तें घ्यावे सरे ॥ १ ॥ घ्यावें जेणे नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ २ ॥ चित्त ठेवी ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥ ३ ॥ आपले तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - निरें-स्वच्छ अर्थ - अगदी थोडे, पण स्वच्छ असलेले व वीट न येणारे, यथार्थ असेल तेच घ्यावे १ असे घ्यावे की, ज्याची कमतरता कधी पडूच नये एका बीजातून अनेक नवी बीजे तयार होतात तसे व्हावे २ आपले चित्त आपणास साक्षी ठेवावे, इतरांच्या उपचाराची पर्वा ठेवू नये ३ आपले हित नेमके कशात आहे ते पाहावे यातच सब सार आहे ४ ५७९ अवघे देव साध । परी या अवगुणाचा वाध ॥ १ ॥ म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ २ ॥ ऊस कांदा एक आळा । स्वाद गोडीचा ¹ निराळा ॥ ३ ॥ तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साध-साध्य अर्थ - सर्वत्र व्यापून राहिलेला देव हे एकच असून तो साध्य करून घेणे हे कर्तव्य असले तरी या अंगाच्या अवगुणामुळे बाध येऊन तो साधत नाही १ हे तत्त्व एकासारखे दुसरे दिसत असूनही हे त्यासारखे नसते २ ऊस व कांदा एकाच आळ्यात लाविले तरी त्याचा स्वाद व त्याची गोडी या गोष्टी वेगळ्याच असतात ३ तुकाराम महाराज म्हणतात विषाची व अमृताची बरोबरी होणार नाहीच ४ ५८० शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख ॥ १ ॥ म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ २ ॥ खवळलिया कामक्रोधीं । अगीं भरती आधिव्याधी ॥ ३ ॥ तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपोआप ॥ ४ ॥ १ पाहता