भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 320, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 320

२८६ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा:- येर-दुसरे, आधी-मानसिक त्रास, व्याधी-शारीरिक दुःख, त्रिविधताप-आधिदैविक, आध्यात्मिक व आधिभौतिक ताप. अर्थ:- या जगात शांतीप्राप्तीसारखे दुसरे कुठलेही सुख नाही. बाकी दुसरे सर्व दुःखच आहे. १ म्हणून सर्वांनी आपल्या चित्तात शांतता धारण करावी; त्यामुळेच तुम्ही या भवसागरातून पैलतीराला जाता. २ जर अंतः- करणात कामक्रोधादी विचार सबळवून गेले, तर मानसिक व शारीरिक दुःखांनी जीवित भरून जाते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या शांतीच्या प्राप्तीमुळे त्रिविध ताप आपोआप नाहीसे होतात. ४ ५८१ गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव झाला सकळ ॥ १ ॥ आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ २ ॥ उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥ ३ ॥ हेम अळंकरा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा- परी-रीतीने, हेम-सोने. अर्थ :- गूळ हा गोडीने सर्वत्र एकसारखाच असतो. त्याप्रमाणे हा देवच सर्वत्र भरून राहिलेला आहे. १ आता मी या सर्वज्ञ व सर्वव्यापी देवाची कोणत्या रीतीने भजन, पूजन करू ? कारण देव सर्वत्र अंतर्बाह्य स्वरूपात भरून राहिला आहे. २ पाण्याहून वेगळा असा त्यावरचा तरंग कधी असतो काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, सोन्याच्या अलंकारांची नावे निरनिराळी असली तरी, सुवर्ण एकच असते. तसे देव व आम्ही भक्त एकच आहोत. ४ ५८२ परमेष्ठिपदा । तुच्छ करिती सर्वदा ॥ १ ॥ हेंचि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ २ ॥ इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥ ३ ॥ सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥ ४ ॥ पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥ ५ ॥ योगसिद्धिसार । ज्यासि वाटे तें असार ॥ ६ ॥ मोक्षायेवढें सुख । सुख नव्हेचि तें दुःख ॥ ७ ॥ तुका म्हणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा - परमेष्ठिपदा-ब्रह्मदेवाचे पद, विपत्य-संकट अर्थ - जे खरे भक्त आहेत ते ब्रह्मदेवाचे पदही नेहमीच तुच्छ मानतात १ नेहमी श्रीहरीचे चिंतन हेच त्यांचे धन असते. २ इंद्रपदाची जे सुखाचे भोग ते त्यांना भवरोगासारखे वाटतात ३ सर्व जगाचे राज्य जरी त्यांना मिळाले, तरी त्याच्याशी त्यांना कर्तव्य नसते ४ पाताळाचे अधिराज्य जरी त्यांना कोणी दिले, तरी ते त्यांना संकटच वाटते. ५ योगसिद्धींच्या पूर्णतेने जे लाभ होतील ते त्यांना दुःखाचेच वाटतात. ६ मोक्षप्राप्तीसारखे मोठे सुख त्यांना दुःखदायकच वाटते. ७ तुकाराम महाराज म्हणतात, एक श्रीहरीशिवाय त्यांना अवघा शीणच वाटतो. ८ ५८३ मोहोऱ्याच्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥ १ ॥ नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ २ ॥ स्वामीचिया¹ अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥ ३ ॥ तुका म्हणे खोडी । देवमनी न देती दडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मोहोर-एक प्रकारचा दगड, याच्या संपर्कात सूत असले तर ते अग्नीतही जळत नाही. देवमनी-घोडयाच्या गळ्याशी शुभ्रस्वस्तिक रंगाचा भोवरा असतो त्याच्यामुळे १ स्वप्नीचिया.