भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 322, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 322

२८८ सार्थ तुकारामगाथा पापपुण्यझाडा । देतां तेथें मोठी पीडा ॥ ३ ॥ तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- संडी-सोडीत, झाडा-हिशेब. अर्थ :- हा दुष्ट मनुष्य आपल्या अंगचे अवगुण सोडीत नाही. कुणी त्याच्या स्वभावातील व वर्तणुकीतील वर्म काढल्यास त्यास फार त्रास झाल्यासारखे वाटते. १ पण भोगलेल्या कर्माची फळे पाहण्याचा प्रसंग आल्यावर काय करणार ? यमाच्या दंडाकडून डोके फुटेल, तेव्हा काय होणार ? २ यमासमोर पापपुण्याचा झाडा द्यावा लागेल तेव्हा मात्र मोठेच दुःख होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे मी काही बोललो की, या लोकांना त्याचा त्रास वाटतो ४ ५८८ पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥ १ ॥ अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ २ ॥ आइताच पाक । संयोगाचा सकळिक ॥ ३ ॥ तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पाक-भोजन, धणी-तृप्ती. अर्थ:- आजवर जो त्रास मी सर्वांना दिला त्याचा आता नाश होईल. १ याचे कारण असे की ज्याचा वीट कधीही येत नाही, अशा पांडुरंगाची संगत मी केली आहे. २ ईश्वर संगतीचे हे आयतेच भोजन मला मिळाले आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांला त्याच्यामुळे तृप्तता अमर्याद अशी झाली आहे ४ ५८९ दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख¹ ॥ १ ॥ झाडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ २ ॥ सिदोरी तें पापपुण्य । सर्वेंसिण भिकेचा ॥ ३ ॥ तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाहो-ओघ, प्रवाह, मार्ग. अर्थ:- नारायणास विन्मुख झाल्यामुळे हे सर्व लोक पाहा कसे दुर्बल बनलेले आहेत. १ आपले स्वत चे हित कशात आहे, हे पाहण्याचे यांनी सोडून दिल्यामुळे हे यमाच्या शिक्षेस मात्र प्राप्त होतात २ बरोबर जशी पाप- पुण्याची शिदोरी असेल, त्याप्रमाणे त्यांना अनेक जन्माचा शीण सोसावा लागेल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे असे असताना लटिक्याचा प्रवाह कैसा मार्ग कसा निर्माण झाला आहे पाहा. ४ ५९० वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥ १ ॥ जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ २ ॥ काळा नाहीं वाव । परा श्रमा कोठें ठाव ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तुरें-डंके, वाद्ये, तुतारी. अर्थ :- आम्ही देवाच्या भेटीला निघालो, या आनंदाच्या वार्तेने जिकडे तिकडे तुतारी निनादू लागेल. १ आम्ही अहंकार जिंकून शिखर चढून जाण्याची त्याची पायरी केलेली आहे. २ या आमच्या मार्गात आता यमास कसला वावच नाही. आणि दुसऱ्याच्या श्रमालाही येथे अवसर नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता वैकुंठाला जाताना त्या श्रीहरीला भेटणे फारच सोपे झाले आहे आम्हांस. ४ १ विन्मुख