सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 323, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २८९ ५९१ झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरु ॥ १ ॥ तुम्हीं सर्वो सर्वोत्तम । ऐसे विसरता धर्म¹ ॥ २ ॥ परिसा तुमचे देणे । तो त्या जागे अभिमानें ॥ ३ ॥ गाहाण्याने तुका । गर्जे मारूनिया हाका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आव्हेरु-तिरस्कार अर्थ - कल्पतरू तर बोलून चालून झाडच आहे पण तो आलेल्या याचकाचा तिरस्कार न करिता, त्यास आश्रय देतो १ आणि देवा, तुम्ही तर सर्वांविषयी सर्वोत्तम असे प्रभू असताना जवळ करण्याचा धर्म कसे विसरून जाता ? २ लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर त्याचे सुवर्ण बनविणे, हा धर्म त्या परिसाच्या अंगी तुम्हीच दिला असून, तो आपल्या कर्तव्याविषयी अभिमानाने जागृत आहे ३ तुकाराम महाराज गर्जना करून अशी गान्हाणी मोठ्याने लोकांना सांगत आहेत ४ ५९२ वसवावे घर । देवे बरें निरंतर ॥ १ ॥ सग आसनीं शयनीं । घडे भोजनों गमनी ॥ २ ॥ सकल्प विकल्प । मावऴोनि पुण्यपाप ॥ ३ ॥ तुका म्हणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वसवावें-निर्माण कराव अर्थ - या देहात देवाने आपले घर निर्माण करून त्यात निरंतर वसती करावी हे उत्तम १ या देवाचीच संगत आसनावर, शयनावर, भोजनप्रसंगी घडावी हे चांगले २ याच्या सहवासाने मन, अत करणातील सकल्प व विकल्प, पापपुण्य याच्या भावनाच नष्ट होतील ३ तुकाराम महाराज म्हणतात मग सर्व काळ त्या गोविंदाच्याच नामाचा सुकाळ करता येईल ४ ५९३ येथील हा ठसा । गेला पडोनिया ऐसा ॥ १ ॥ घरों देवाचे अबोला । त्यासि तेचि सवे त्याला ॥ २ ॥ नाहीं पाहावे लागत । एकाएकींच ते रितें ॥ ३ ॥ तुका म्हणे जन । तयामध्ये येवढें भिन्न ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ठसा-रीत सवे-सवय रितें-कमी अर्थ - देव आणि जन याच्यातील सबंधाची अशी ही रीतच पडून गेली आहे १ लोक या देवाची अबोला धरतात व तसाच अबोला धरण्याची सवय त्या देवालाही आहेच २ एकमेकाचे काही कमी पडते आहे, हे मुळी कुणाला पाहावेच लागत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, लोक व देव यांच्यात एवढी भिन्नता आहे ४ ५९४ करिता देवार्चन । घरा आले सतजन ॥ १ ॥ देव² सारावे परते । सत पूजावे आरते ॥ २ ॥ शाळिग्राम विष्णूमूर्ती । सत हो का भलते याती ॥ ३ ॥ तुका म्हणे सधी । अधिक वैष्णवाची मादी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - देवार्चन-देवाची पूजा, परते-बाजूला, आरते-प्रीतीनें, शाळिग्राम-गंडकी नदीतील काळा देवरूप दगड मांदी-समुदाय, सधी-अशा समयास १ नाम, २ तरी ते तु गाथा ३७