भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 324, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 324

२९० सार्थ तुकारामगाथा अर्थ -- देवाची पूजा करीत असताना जर संत लोक घरी आले तर काय करावे ? १ त्यावेळी देव थोडा वेळ बाजूस सारून संतांचीच पूजा मोठ्या प्रेमाने करावी २ शाळिग्राम ही तेवढी विष्णूची मूर्ती, व दाराशी आलेल्या संतांचीच जात का त्याच्याहून वेगळी मानावी ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा समयास वैष्णवांच्या समुदायाचे पूजन करणे हे अधिक महत्त्वाचे आहे ४ ५९५ ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥ १ ॥ करिता स्वामीसवे वाद१ । अधिक अधिक आनंद ॥ २ ॥ असावा तो धर्म । मग साहो जातें वर्म ॥ ३ ॥ वदे वाग्देवी । तुका विठ्ठलीं गौरवी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वाद-सुसंवाद, वाग्देवी-वाणीरूप देवी अर्थ - जो ईश्वराची खरी सेवा अंतःकरणपूर्वक करितो त्याच्या जीवास कसले भय आहे ? १ ईश्वराशी सुसंवाद करता करताच त्याच्या मनास पराकोटीचा आनंद होतो २ हाच एकनिष्ठेचा धर्म असल्यास मग त्या स्वामीचे रहस्य समजले जाते ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वाणीरूपी देवीचा गौरव प्रत्यक्ष विठ्ठलाकडून केला जातो ४ ५९६ देवे जीव धाला । संसार तो कडू झाला ॥ १ ॥ तेचि येतील ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥ २ ॥ वेधी आणिकास । ऐसा जया अंगीं कस ॥ ३ ॥ तुका म्हणे भूक । येणे न लगे आणीक ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - धाला-संतुष्ट झाला कस-सामर्थ्य अर्थ - या देवाच्या प्राप्तीने माझा जीव संतुष्ट झाला आहे आणि मला हा लौकिक संसार कडू वाटू लागला आहे १ आता मला हरिहराच्या चिंतनाचे व भक्तीच्या तृप्तीचे डेंकर येतील २ आणखी दुसऱ्या वेळी अंतःकरण वेधून घेण्याचे सामर्थ्य याच्या अंगी आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्या संगतीच्या तृप्तीने आणखी भूक मला लागणार नाही ४ ५९७ नाम ताराचे ही सार । शरणागत यमकिंकर ॥ १ ॥ उत्तमाउत्तम२ । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ २ ॥ नाम जपता चंद्रमौळी । नामें तरला बाल्हाकोळी ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्णू काय । तारक विठोबाचे पाय ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - यमकिंकर-यमाचे दास, तारक-तारणारे, चंद्रमौळी-शिव अर्थ - या विठ्ठलाचे नाम हे सर्व साराचे सार होय याला यमाचे सेवकही शरण आलेले असतात १ उत्तमात उत्तम असलेल्या या पुरुषोत्तमाचे नाम तुम्ही वाणीने वारंवार उच्चारावे २ याच्याच नामाच्या जपाने शिवशंकर तरून गेले व वाल्या कोळ्याचा उद्धार झाला ३ तुकाराम महाराज म्हणतात, आणखी काय वर्णन करू ? या विठोबाचे पायच फक्त तारणारे आहेत ४ ५९८ गातो भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥ १ ॥ परि तू पतितपावन । करीं साच हें वचन ॥ २ ॥ मुखें म्हणवितो दास । चित्तीं माया लोभ आस ॥ ३ ॥ तुका म्हणे दावी वेशा । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥ ४ ॥ १ पाद, २ नाम उत्तम उत्तम