सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 327, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २९३ अर्थ - देवा नारायणा, माझ्या सर्व दुःखाचा नाश करा ना. १ माझ्या मनात तुम्ही वसती करुन माझी वृत्ती आपल्या पायांशी स्थिर राहील असे करा ना २ देवा, माझे सर्व हट्ट पूर्ण करावेत व हे फळ मला तुम्ही द्यावेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे परमेश्वराच्या चरणाशी दीन होतात, त्यांचा ईश्वर सर्व शीण दूर करीत असतो. ४ ६०६ मी तो दीनाहूनि दीन । माझा तुज अभिमान ॥ १ ॥ मी तो आलों शरणागत । माझें करावे स्वहित ॥ २ ॥ दिनानाथा कृपाळुया । सांभाळावें आपुल्या नांवा ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । भले नव्हे मोकलितां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मोकलिता-टाकून दिल्यास अर्थ - देवा, मी तर आता दीनाहून दीन झालो आहे तुझ्या पायाशी तू आता मजविषयी अभिमान धरावास १ मी तर देवा, तुला आता शरण आलो आहे. माझे सर्व प्रकारचे हित तुम्ही करुन दाखवा. २ दीना- नाथा, कृपाळू स्वामी, आपले नाव व कीर्ती याचा आपण नीट सांभाळ करावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मला तुम्ही टाकून दिल्यास ते बरे दिसणार नाही ४ ६०७ सुख वाटे तुझे वर्णितां पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥ १ ॥ व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥ २ ॥ वृक्षाचिया माथा सोडिला ससाना¹ । धनुष्यासि बाणा लावियेले ॥ ३ ॥ तये काळीं तुज पक्षी आठविती । धावें गा श्रीपती मायबापा ॥ ४ ॥ उडोनियां जातां ससाना मारील । बैसता विंधील पारधी तो ॥ ५ ॥ एकोनियां धांवा तया पक्षियाचा । धरिला सर्पाचा वेश वेगीं ॥ ६ ॥ डंखोनि पारधी भुमीसि पाडिला । बाण तो² लागला ससाण्यासी ॥ ७ ॥ ऐसा तूं कृपाळु आपुलिया दासा । होसील कोवसा संकटींचा ॥ ८ ॥ तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदांचिये वाणी वर्णवेना ॥ ९ ॥ शब्दार्थ व टीपा - ससाना-बहिरी ससाणा, शिकारी पक्षी, विंधील-ठार करील, कोवसा-आश्रय, आधार. अर्थ - देवा, तू किती दयाळू आहेस ? तुझे पवाडे गाताना मोठे सुख वाटते. मोठ्या प्रेमाने तुझे वर्णन करताना त्या गोडीची मिठीच तोंडास बसते १ एका वृक्षावर एका पक्ष्याच्या जोडप्यास पिले झाली थोड्याच वेळात एक दुराचारी व निर्दय पारधी त्या वृक्षापाशी आला २ त्याने या पक्ष्याची व पिलांची शिकार करण्याच्या हेतूने जवळचा बहिरी ससाणा वर पक्ष्याच्या घरट्याड्यापावर सोडून दिला, आणि आपण स्वतः खाली राहून त्याने पक्ष्यायावर बाण धरिला ३ या कठिण अशा संकटप्रसंगी देवा, त्या पक्ष्यांनी तुझे स्मरण कळवळून केले 'श्रीपती, मायबापा, धाव रे, या संकटातून मुक्तता कर' अशी त्यांनी प्रार्थना केली. ४ या पक्ष्याच्या मनात मोठीच चिंता होती वरच्या वर उडून जावे तर बहिरी ससाणा खाऊन टाकील न उडावे तर खालच्या पारध्याच्या बाणाने प्राण जाणार; असा प्राणसंकटाचा पेच त्या पक्ष्याच्या समोर होता. ५ पण देवा, तू त्या पक्ष्यांचा धावा ऐकलास, आणि घटकन एका महाभयंकर अशा विषारी सर्पाचा वेष धारण केलास. ६ सर्परुप घेऊन त्या पारध्याच्या पायात तू डसलास व त्याला भूमीवर पाडलेस; तेव्हा त्या पारध्याच्या हातून जो बाण निसटला, तो त्या ससाण्यास लागला व तोही मरण पावला ७ देवा, तुझे स्तवन करणाऱ्या दासावर तू अशी कृपा करतोस संकटकाळी असा तू आधार १ ससाणा, २ तो.