सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
सार्थ तुकारामगाथा २९३ अर्थ - देवा नारायणा, माझ्या सर्व दुःखाचा नाश करा ना. १ माझ्या मनात तुम्ही वसती करुन माझी वृत्ती आपल्या पायांशी स्थिर राहील असे करा ना २ देवा, माझे सर्व हट्ट पूर्ण करावेत व हे फळ मला तुम्ही द्यावेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे परमेश्वराच्या चरणाशी दीन होतात, त्यांचा ईश्वर सर्व शीण दूर करीत असतो. ४ ६०६ मी तो दीनाहूनि दीन । माझा तुज अभिमान ॥ १ ॥ मी तो आलों शरणागत । माझें करावे स्वहित ॥ २ ॥ दिनानाथा कृपाळुया । सांभाळावें आपुल्या नांवा ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां । भले नव्हे मोकलितां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मोकलिता-टाकून दिल्यास अर्थ - देवा, मी तर आता दीनाहून दीन झालो आहे तुझ्या पायाशी तू आता मजविषयी अभिमान धरावास १ मी तर देवा, तुला आता शरण आलो आहे. माझे सर्व प्रकारचे हित तुम्ही करुन दाखवा. २ दीना- नाथा, कृपाळू स्वामी, आपले नाव व कीर्ती याचा आपण नीट सांभाळ करावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मला तुम्ही टाकून दिल्यास ते बरे दिसणार नाही ४ ६०७ सुख वाटे तुझे वर्णितां पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥ १ ॥ व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥ २ ॥ वृक्षाचिया माथा सोडिला ससाना¹ । धनुष्यासि बाणा लावियेले ॥ ३ ॥ तये काळीं तुज पक्षी आठविती । धावें गा श्रीपती मायबापा ॥ ४ ॥ उडोनियां जातां ससाना मारील । बैसता विंधील पारधी तो ॥ ५ ॥ एकोनियां धांवा तया पक्षियाचा । धरिला सर्पाचा वेश वेगीं ॥ ६ ॥ डंखोनि पारधी भुमीसि पाडिला । बाण तो² लागला ससाण्यासी ॥ ७ ॥ ऐसा तूं कृपाळु आपुलिया दासा । होसील कोवसा संकटींचा ॥ ८ ॥ तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदांचिये वाणी वर्णवेना ॥ ९ ॥ शब्दार्थ व टीपा - ससाना-बहिरी ससाणा, शिकारी पक्षी, विंधील-ठार करील, कोवसा-आश्रय, आधार. अर्थ - देवा, तू किती दयाळू आहेस ? तुझे पवाडे गाताना मोठे सुख वाटते. मोठ्या प्रेमाने तुझे वर्णन करताना त्या गोडीची मिठीच तोंडास बसते १ एका वृक्षावर एका पक्ष्याच्या जोडप्यास पिले झाली थोड्याच वेळात एक दुराचारी व निर्दय पारधी त्या वृक्षापाशी आला २ त्याने या पक्ष्याची व पिलांची शिकार करण्याच्या हेतूने जवळचा बहिरी ससाणा वर पक्ष्याच्या घरट्याड्यापावर सोडून दिला, आणि आपण स्वतः खाली राहून त्याने पक्ष्यायावर बाण धरिला ३ या कठिण अशा संकटप्रसंगी देवा, त्या पक्ष्यांनी तुझे स्मरण कळवळून केले 'श्रीपती, मायबापा, धाव रे, या संकटातून मुक्तता कर' अशी त्यांनी प्रार्थना केली. ४ या पक्ष्याच्या मनात मोठीच चिंता होती वरच्या वर उडून जावे तर बहिरी ससाणा खाऊन टाकील न उडावे तर खालच्या पारध्याच्या बाणाने प्राण जाणार; असा प्राणसंकटाचा पेच त्या पक्ष्याच्या समोर होता. ५ पण देवा, तू त्या पक्ष्यांचा धावा ऐकलास, आणि घटकन एका महाभयंकर अशा विषारी सर्पाचा वेष धारण केलास. ६ सर्परुप घेऊन त्या पारध्याच्या पायात तू डसलास व त्याला भूमीवर पाडलेस; तेव्हा त्या पारध्याच्या हातून जो बाण निसटला, तो त्या ससाण्यास लागला व तोही मरण पावला ७ देवा, तुझे स्तवन करणाऱ्या दासावर तू अशी कृपा करतोस संकटकाळी असा तू आधार १ ससाणा, २ तो.
२९४ सार्थ तुकारामगाथा होतोस ८ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी तुझी कीर्ती साऱ्या त्रिभुवनात पसरली असून तुझा महिमा वेदवाणीसही वर्णन करता येत नाही ९ विवरण - देव आपल्या भक्ताचा सांभाळ किती चतुराईने व तत्परतेने करतो याविषयी तुकारामबुवांनी या ठिकाणी एक लहानशी कथा सांगितली आहे एकाद्या कलात्मक कथेचे सारे गुण या कथेत एकवटलेले दिसतात दोन पक्षी, त्यांची लहान पिले, त्यांच्यावर एकाच वेळी आलेले दुहेरी संकट खालून पारध्याचा बाण, वरून बहिरी ससाणा , मग त्यांनी परमेश्वराचे केलेले स्मरण, आता हे पक्षी व त्यांची पिले यांचे प्राण वाचणार तरी कसे ही आपली अभंग वाचतानाची चिंता - या सर्व पार्श्वभूमीवर सर्पाचे रूप धारण करून आपल्या भक्तांना वाचविले हे आपणास समजून मनास एक प्रकारचा संतोप वाटतो देवाची प्रार्थना करणारे लहान पक्ष्याप्रमाणे का जीव असेनात, पण त्यांना न्याय मिळतो हा केवढा दिलासा बुवांनी या अभंगात माणसास दिलेला आहे ! ६०८ नाहीं दुकळलो अन्ना । परि या मान जनार्दना ॥ १ ॥ देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुक्लपक्षीं ॥ २ ॥ भोगी भोगविता । बाळासवे तोचि पिता ॥ ३ ॥ कर्म अकर्म जळाले । प्रौढें तुका ते उरले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुकळलो-महागला काळीं-कृष्णपक्षात अर्थ - देवा, मी काही मागायला तुझ्याकडे आलो आहे याचा अर्थ असा नव्हे, की मी अन्नाला महागलो आहे तुला जनार्दनास मान द्यावयाचा, याच हेतूने मी तुजकडे आलो आहे १ देवा मी तुला सर्व काळी साक्षी केला आहे शुक्लपक्षातच नव्हे, तर कृष्णपक्षातही मी तुला साक्षी केले आहे २ आपल्या मुलांना जो भोग घेण्यास शिकवितो, व जो स्वतःही भोगतो, तोच खरा पिता समजावा ३ त्याप्रमाणे देवा, आमचे कर्म, अकर्म या विषयांचा विचार नष्ट करून जे प्रौढ व टिकण्यासारखे आहे तेवढ्याचा आपण विचार करू, असे तुकाराम महाराज म्हणतात ४ नाटाचे—अभंग ६३. ६०९ प्रथम नमन तुज एकदंता । रगों रसाळ वोडवीं कथा । मति सोरस करीं प्रबळता । जेणे फिटे आता अंधकार ॥ १ ॥ तुझिये कृपेचे भरिते । आणीक काय राहिले तेथें । मारग सिद्धाच्यानि पथें । पावविसी तेथें तूंचि एक ॥ २ ॥ आरंभा आदि तुझें वदन । सफळ करिता कारण । देव ऋषि मुनि आदिकरुन । ग्रंथ पुराण निर्माणी ॥ ३ ॥ काय वर्णूं तुझी गती । एवढी कंची मज मती । दिनानाथ तुज म्हणती । करीं सत्य वचन हेंचि आपुले ॥ ४ ॥ मज याहावता मायेच्या पुरीं । बुडता डोहीं भवसागरीं । तुज याचुनि कोण तारी । पाय झडकरी तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - एकदंत-एक दात असणारा गणपती वोडवीं-निर्माण कर अर्थ - एकदंता, गणपते तुझा प्रथम नमस्कार करतो तुझ्या कृपेने तू रसाळ अशा कथा निर्माण कर माझी बुद्धी प्रसादयुक्त व प्रबळ करून तिच्यामुळे अज्ञानाचा अंधार दूर होईल असे कर १ एकदा तुझी कृपा पूर्णपणे भरून आली की, मग मला काय कमी आहे ? मोठ्या सिद्धांच्या पथांनीही तूच प्राप्त आहेस २ सर्व कार्यांच्या
सार्थ तुकारामगाथा २९५ आरंभी तुलाच वंदन असते. सर्वजन असेच सांगतात. देव, ऋषी, मुनी इत्यादींनी पुराणग्रंथांतून हेच निवेदन केले आहे. ३ तुझ्या बुद्धीचे व गतीचे मी वर्णन काय करावे ? माझ्या अल्प मतीत एवढे सामर्थ्य कुठे आहे ? तुला दीनानाथ म्हणतात ना ? मग मी दीन आहे. तू तुझे हे नाव खरे करून दाखीव ना. ४ मी या वृथा मायेच्या पुरात वाहात असताना, या भवसागराच्या डोहात बुडत असताना, तुझ्याशिवाय माझे रक्षण कोण करणार ? तुकाराम महाराज म्हणतात, गणपते, तू माझ्यावर लवकर कृपा कर. ५ ६१० प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार । चतुर्भुज फरशधर । न कळे पार वर्णितां ॥ १ ॥ तो देव नटला गौरीबाळ । पांयीं बांधोनि घागऱ्या घोळ । नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥ २ ॥ नटारंभीं थाटियेला रंग । भुजा नाचवी हालवी अंग । सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥ ३ ॥ जया मानयती देव ऋषि मुनी । पाहातां न पुरें डोळियां धनी । असुर जयाच्या चरणीं । आदीं अवसानीं तोचि एक ॥ ४ ॥ सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार । तुका म्हणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - दातार-दाता, फरशधर-परशू धारण करणारा, पार-सीमा, अंत, गौरीबाळ-पार्वतीचा मुलगा गणपती, मेळे-समुदाय, नटारंभीं-नृत्यनाट्याच्या आरंभी, चांग-चांगला, धनी-तृप्ती, आदीं-जन्माच्या वेळेस, अवसांनीं-मरणाच्या वेळेस. अर्थ -- सर्व कार्याच्या आरंभी प्रथम या गणपतीला नमन असो. सर्व सिद्धींचा दाता हा गणपती आहे. हा चार हातांचा असून याच्या एका हातात परशू म्हणजे कुऱ्हाड आहे. याच्या सामर्थ्याचा अंत लागत नाही. १ गौरीचा हा मुलगा आता चांगला नटलेला आहे. त्याच्या पायात घागऱ्यांचे चाळ बांधलेले आहेत. नारद तुंबरांचा समुदाय जमला आहे. याच्या सामर्थ्यामुळे इतर संकटांना पळता भुई थोडी झाली आहे. २ नृत्यनाटकाच्या आरंभी याचे रंगरूप नटलेले आहे. हा गणपती नृत्यात अंग विविध प्रकारांनी हालवत असून आपले हातही नाचवीत आहे. शेंदराच्या विलेपनाने याचे अंग चांगलेच माखले गेले असल्याने मोठे चांगले दिसत आहे. याच्या मुकुटावर नाग शोभून दिसतो ३ देव, ऋषी, मुनी याला मनापासून मान देतात, याचे रूप कितीही पाहिले तरी डोळ्यांची तृप्ती होत नाही. सारे असुर याच्या चरणी लीन होऊन असतात आपल्या जन्माच्या वेळेपासून अखेरपर्यंत याचेच एक रक्षण असते. ४ सर्व सिद्धींचा हा दाता असल्याने तो आमचा दाता आहे. याच्या रूपास अंत नाही. याच्या कृपेने मनुष्य भवसागर तरून जाईल. ५ विवरण - वरील दोन अभंगांत तुकोबांनी गणपतीस नमन केले आहे. गणपती हा सुखकर्ता, दुखहर्ता असल्यामुळे प्रत्येक कार्याच्या आरंभी त्यास नमन करण्याची चाल आहे. तो बुद्धीचा व सर्व सिद्धीचा दाता असल्या- चेही वर्णन अनेकांनी केले आहे तुकारामबुवांचे आराध्य दैवत श्रीकृष्ण वा विठ्ठल असले तरी त्यांनी गणपती या देवतेवरही अभंग केलेले दिसतात ज्ञानेश्वररामदासादी संतांनीही गणपतीचे अति सुरेख व भक्तिभावपूर्वक असे वर्णन केलेले आढळेल. या पुढचे व वरील दोन असे ६३ अभंग नाटाचे म्हणून प्रसिद्ध आहेत. नाट म्हणजे एकप्रकारचे नृत्य, नाट्य वगैरे तुकोबांच्या वेळीही अशा प्रकारचे खेळ होत असावेत. त्याच्या निमित्ताने हे अभंग झालेले दिसतात. 'देव नटला गौरीबाळ .. भुजा नाचवी हालवी अंग ' इत्यादी वर्णनावरून या नृत्यनाट्याच्या प्रसंगी गणपतीचे रूप घेऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्याची रीत त्याही काळी असावी असे दिसते.
२९६ सार्थ तुकारामगाथा ६११ विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसांवा ॥ १ ॥ विठ्ठल कुळींचें दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥ २ ॥ विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥ ३ ॥ विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोयळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेलें चाळा विश्व विठ्ठले ॥ ४ ॥ विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेविण चाड नाहीं गोता । तुका म्हणे आतां नाहीं दुसरे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका - आगमनिगम-वेद व शास्त्र वित्त-सपत्ती, मात-गोष्ट, सप्त पाताळ-अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, तलातल व पाताल असे सात पाताळ अधोलोक मानक आहेत अहितळ महितळ इत्यादी आणखी सात पाताळही सांगतात अर्थ - सर्व वेदांचे व शास्त्राचे निवासस्थान असणारा हा विठ्ठल आमचे एकमेव जीवन आहे सर्व सिद्धींचे साधन हा विठ्ठलच असून तो आमचा विसावा आहे आम्ही त्याचेच ध्यान निरंतर करीत असतो १ आमच्या कुळाचे दैवत हा विठ्ठलच असून आमची सारी संपत्ती आमचे सर्व गोत आमच्या सर्व चितवृत्ती या एका विठ्ठलात सामावलेल्या आहेत आमचे पुण्य व आमचा पुरुषार्थ या विठ्ठलरूपास आहे याचीच कथा आम्हास नेहमी प्रिय वाटते २ या सर्व लोकात विठ्ठलच भरून राहिलेला असून सप्त पाताळात त्याचीच वसती आहे सर्व त्रिभुवनात विठ्ठल भरून राहिला आहे ऋषिमूनींच्या मनात हाच विठ्ठल स्थिर झालेला आहे ३ हा विठ्ठल माझ्या जीवाचा जिव्हाळा आहे हा विठ्ठल मनाने कोवळा असून कृपाळू आहे हा प्रेमाचा एकमेव पुतळा असून या विठ्ठलाने सर्व विश्वात चाळविले आहे याच्याचमुळे सर्व विश्वाचे चलनवलन होत असते ४ हा विठ्ठल मायबाप, चुलता, बहीण, भाऊ अशा सर्व नात्यानी आमच्याशी सबंधित आहे याच्याशिवाय मला दुसरे कुठलेही गोत नाही तुकाराम महाराज म्हणतात आता याच्याखेरीज दुसरे कुणीच मला नाही ५ ६१२ बरवा झाला बेवसाव । पावलो चिंतिलाचि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पायला जीव विश्रांती ॥ १ ॥ वरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिन । तुमचें जालियां दरशण । जन्ममरण नाहीं आतां ॥ २ ॥ बरवे जाले आलो या ठाया । होते सचित ठायींचा पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मौंची ॥ ३ ॥ जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ति मधुसूदन । सम चरण देखियेले ॥ ४ ॥ जुनाट जुगादिचे नाणे । बहुता काळाचें ठेवणे । लोपले होतें पारिखेपणे । ठाववळण चुकविला ॥ ५ ॥ आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी । तुका म्हणे सिणलो जगजेठी । न लवों दिठी दुसऱ्याची ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - वेवसाव-व्यवसाय उद्योग दरुषण-दर्शन, काया-शरीर, जुगादिचे-अनेक युगाचे, न सुटे-सोडणार नाही, न खवों-लागू नकाम, दिठो-दृष्ट
अर्थ - देवा, आजपर्यंत जो व्यवसाय किंवा उद्योग मी केला तो खरा झाला, फळास आला कारण ज्याचे मी जन्मभर चिंतन केले, त्याचेच स्थान मला प्राप्त झाले आता तुमच्या पायी माझा भाव दृढ राहिला आहे तेथेच मला विश्रांती मिळाली आहे १ मला हा फायदाच ढळून आज झालेला दिसतो तुमच्या प्राप्तीने सारा त्रास दूर झाला असून, तुमच्या दर्शनामुळे मला आता जन्ममरणाची भीती उरलेली नाही २ बरे झाले देवा, या ठिकाणी येऊन पोचलो याच पायाशी माझे सर्व पूर्वकर्मांचे पुण्य साठविलेले होते कारण या स्थानाच्या प्राप्तीमुळे माझा देह- भाव पूर्णपणे पालटून गेला त्यावर प्रत्यक्ष परब्रह्माची छाया पडून ते ब्रह्मरूपच होऊन गेले ३ हे धन मी जे एकदा मिळविले आहे, ते कधी न विसजारे असून ते आनंदरवरूपाचे आहे अमूर्त असणारा हा मधुसूदन मूर्तरूपास येऊन येथे उभा आहे त्याची एकसारखी पावले पाहून मी संतुष्ट झालो आहे ४ अनेक युगांचे हे नाणे जुने असून पुष्कळ दिवसांचे हे ठेवण आहे. पण याची पारख करणाराच कुणी नव्हता म्हणून याचा ठावठिकाणा कुणास सापडला नाही तो सर्वज्ञ असल्याने नीट पारख्यावाचून तो कुणाला मिळण्यासारखा नव्हता ५ पण आता हा मला माझ्या जीवासाठी प्राप्त झाला आहे याच्या पायांस पडलेली मिठी मी आता कधी सोडणार नाही तुकाराम महाराज म्हणतात, हे जगजेठी, मी फार दमलो आहे रे मला दुसऱ्या कुणाची दृष्ट होईल असे तू करू नकोस ६
६१३ मी तव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमदबुद्धी । तुज म्या पाठविलें नाहीं कधौँ । वाचे कृपानिधी मायबापा ॥ १ ॥ नाहीं ऐकिले गाइले गीत । धरिली लाज साडिलें हित । नायडे पुराण बैसले सत । केली बहुत परनिंदा ॥ २ ॥ केला करविला नाहीं उपकार । नाहीं दया आली पीडिता पर । करूं नये तो केला व्यापार । वाहिला भार कुटुंबाचा ॥ ३ ॥ नाहीं केले तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण । नाहीं सतसेवा घडले दान । पूजावलोकन मूर्तीचें ॥ ४ ॥ असगसग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न फळे हित करावे ते फाय । नये बोलू आठवू तें ॥ ५ ॥ आप आपण्या घातकर । शत्रु जालो मी दावेदार । तूं तव कृपेचा सागर । उत्तरीं पार तुका म्हणे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - नावडे-आवडत नाही पिंड-शरीर
अर्थ - देवा मी अनाथ असून तुझे अनेक अपराध करणारा आहे मी कर्महीन असून माझी बुद्धी अगदी मद आहे माझ्या वाणीने हे कृपेच्या सागरा, मायबापा मी कधीही तुझी आठवण केली नाही १ कधी तुझे नाम ऐकिले नाही, कधी गाइले नाही या बाबतीत मी लाज धरून आपले स्वतःचे हित सोडून दिले मला पुराण ऐकत बसणारे संत कधी आवडले नाहीत मी आजवर पुष्कळ वेळा दुसऱ्याची निंदा केलेली आहे २ मी स्वतः कधी दुसऱ्यावर उपकार केला नाही कधी कुणास करू दिला नाही दुसऱ्यास दुख होताना माझ्या चित्तात कधी दया आली नाही जो उद्योग वा व्यवहार करू नये तो मी करीत आलो आहे मी केवळ कुटुंबाचा भार व्यर्थ धारण केला ३ मी कधी तीर्थयात्रेस गेलो नाही, हातापायासकट या देहाचेच केवळ पोषण मी केले मला कधी संतसेवा घडली नाही, की कधी दान मी केले नाही कधी देवा तुमच्या मूर्तीस डोळे भरून पाहून तिची पूजा केली नाही ४
तु गाथा ३८
२१८ सार्थ तुकारामगाथा मला नाजपर्यंत दुष्ट माणसाचीच संगत जडली होती. माझ्या हातून अनेक अन्यायकारक गोष्टी व अधर्माचे उपाय मी आजपर्यंत अनेक केले. आता माझे हित कशात आहे हेच मला समजेनासे झाले आहे. माझे अपराध मला आता आठवतही नाहीत, की ते वाचेने बोलूनही दाखविता येत नाहीत ५ असा मी आपला आपल्यासच घात करणारा झालो असून मी स्वतःचाच शत्रू व दावेदार बनलो आहे पण तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू कृपेचा सागर आहेस ना ? मला या संसारसागरातून पार कर ना ६ विवरण :-या अभंगात व इतरही कित्येक ठिकाणी तुकारामबुवांनी मी पापी, मी दुराचारी असा उल्लेख केलेला आहे माझी बुद्धी मंद आहे, मी कधी तुझे ध्यान केले नाही, पुराणकीर्तन ऐकले नाही, संतांची सेवा केली नाही, काही तीर्थयात्रा केल्या नाहीत, असंगाचे संग घडले, हातून अधर्म फार झाले इत्यादी अनेक अपराधांची मालिका बुवांनी वरीलसारख्या अभंगातून गुंफिली आहे पुढील क्र ६७० च्या अभंगात तर देवा, मी चांडाळ आहे, मी अमंगल आहे, अवगुणाची खाण आहे, मला 'अखंड विषयांची व्यथा' असून मी 'अधम पुरता अधमाहूनी' आहे असे त्यांनी म्हटले आहे निंदा, द्वेष, विश्वासघात, काम, क्रोध, दंभ, अहंकार माझ्यामध्ये भरपूर असून माझे 'सदा परद्वारीं परधनीं ध्यान' असून मला 'दासीगमन' ही घडले आहे असे बुवा म्हणतात या सर्व वचनांचा काय अर्थ ? बुवांचे पूर्वायुष्य या दृष्टीने तपासून पाहावयास काही अभ्यासक तत्पर झालेले दिसतात तुकारामबुवां वारंवार म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच त्यांच्या आधीच्या आयुष्यात काही भलेबुरे आचार- विचार होते की काय ? या प्रश्नाचा विचार करताना असेच म्हणावेसे वाटते की, हे सर्व उद्गार भक्तीस अनुकूल होत जाणाऱ्या पवित्र वृत्तीच्या पार्श्वभूमीवरचे आहेत असतील नसतील तसल्या पापांचा उच्चार करून कबुळतीस यायचे, दीनता प्रकट करायची, करुणा भाकावयाची व ईश्वरास जवळ करायचे, ही एक पद्धती भक्तिमार्गातील ठरून गेल्यासारखी आहे तुकोबांच्या अभंगातील सर्व पापे त्यांना शाब्दिक अर्थाने चिकटविता येणार नाहीत 'मी तों अपराधाची राशी । शिखा अगूट कोंपशीं' यासारख्या उद्गारातील अतिशयोक्ती व अनुतापाची भूमिका याचा मेळ घालूनच याचा विचार व्हावयास हवा ऐन तारुण्यात, वयात असताना तुकोबांच्या हातून दुराचार वा पापकर्म या गोष्टी घडल्या असल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात नाही अभंगातून अनेक प्रसंगी जो उच्चार होतो, तो केवळ भक्तीस अनुकूल होत राहणाऱ्या दीन व अनुतापयुक्त वृत्तीचाच निदर्शक मानणे युक्त होणार आहे नाही तर पुढे गाथेत क्र २८३५ चा अभंग 'माझिया मीपणावरी पडो पाषाण' या ओळीने सुरुवात होणारा वादग्रस्त अभंग आहे त्यातील सर्व दोष वाच्यार्थाने बुवांच्या अंगी लावण्याचे धैर्य कुणी करण्याचा प्रयत्न करील असे दिसत नाही कुणी तसा प्रयत्न केला तर तो टिकण्यासारखा नाही तुकोबा वृत्तीने सात्त्विक, पण धंदा वाण्याचा, सावकारकीचा या निमित्ताने काही निराळी व्यापारी नीती खरेखोटेपणाविषयी वापरावी लागली तरी, व्याकूळ होऊन जाणारे तुकोबा असल्या अभंगातील पातकांचे धनी स्वतः असतील हे संभवत नाही ऐन तारुण्यात माझ्या हातून पापे घडली, मी दुराचारी होतो, दुसऱ्यावर उपकार कधी केला नाही, संतांची निंदाच सतत केली, यासारख्या आत्मनिवेदनात अनुतापाची, न केलेल्या पातकांविषयी अनुतापाची वृत्तीच असणे शक्य आहे अंतःकरणातील प्रभू लौकर व्यक्त व्हावा, प्रकट व्हावा, प्रचीतीत यावा, यासाठी तुकोबांनी आपणा- पाठीमागे अनंत पातकांची नामावळी लावून घेतली ती शब्दशः सत्य मानून त्यांच्या चरित्रातील घटनांचे धागेदोरे हुडकणे व त्याचा अर्थ लावणे इष्ट व उचित नाही 'स्त्रियांचा तो संग नको नारायणा' यासारख्या वचनाने माहे झिडकारून टाकणाऱ्या तुकोबांच्या या अनुतापयुक्त उद्गाराचा अर्थ सावधपणे लावावयास हवा ६१४ आतां पावेन सकळ सुखें । सादलें फदा तें न देखें । अवघें सरलें पारिखें । सकळ देखें माहियेरे ॥ १ ॥ जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई । सकळ गोताचीच साई । पारिखें काई ऐसे नेणिजे ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा २९९ जगदाकारें जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघें आपुलेंचि आतां । लाज आणि चिंता दुन्हायली ॥ ३ ॥ वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैंतें आपण करीं । भीड न धरी चुकल्याची ॥ ४ ॥ सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस । बहु फार्मे पुरविला सोस । आतां उदास आपल्यातें ॥ ५ ॥ करितो कबतुक लाडें । मज बोलवितो कोर्डे । मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- साई-आधार, आश्रय, वारोनी गेली-निघून गेली.
अर्थ :- आता मी सर्व सुखाना मिळवीन याच्या प्राप्तीने जे सुख प्राप्त झाले, ते इतरत्र कधी भी पाहिलेच नाही. आता परकेपणाचा भावच कुठे उरलेला नसून, सर्वत्र माहेरच्याच नात्याचा संबंध मला दिसत आहे. १ ही विठ्ठलरखुमाई अगदी माझ्या जवळ आहेत. बहीण, भाऊ, बाप, आई या सर्व नात्यांना या विठ्ठलाचाच एक आधार आहे. आता दुसरे काही नाते मी जाणतच नाही २ सर्व जगतात एकाच सत्तेचा आविष्कार आहे, हे ध्यानात येऊन माझी परतंत्रता नाहीशी झाली. आता सर्वत्र एक आपलेच रूप आहे, असे समजल्याने माझी लाज व चिंता दूर झाली ३ आता माझी इच्छा याच सत्तेच्या घरी वसत असल्याने आपल्याच स्थानी आहे असे वाटते तो करील तसे घडत आहे. आता कुणाची या चुकल्याची भीडही धरीत नाही मी. ४ आजपर्यंत मी अनेक विकारांचा सासुर- वास सोसला पुष्कळाचा त्रास पुष्कळ दिवस सहन केला अनेक इच्छांचा सोस पूर्ण झाला आता मात्र मी या सर्व लौकिक वासनाविषयी उदास आहे. ५ माझे मायबाप कौतुकाने व लाडाने मला बोलवितात. गोडगोड उत्तरांनी माझी समजूत काढतात आणि तुकाराम महाराज म्हणतात, मीही त्याच्याशी बोबड्या बोलाने बोलत असतो ६
६१५ सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला । हिंडता दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥ १ ॥ माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । सज्जन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ २ ॥ काय सांगो गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥ ३ ॥ मज चालतां प्रयाणकाळीं । असता न दिसती जवळी । मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळों संचिताचे ॥ ४ ॥ आतां मज ऐसे करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- प्रयाणकाळीं-मरणाच्या वेळेस, दावा-विरोध.
अर्थ :- सर्व प्रकारची सांसारिक सुखे मिळवीन म्हणून माझा आजवरचा जन्म गेला. एक क्षणभरही मुक्तीचा विचार भी क्यो केला नाही. उगाच वणवण फिरताना मला त्रास मात्र झाला. सर्व प्रकारच्या सासारिक मायेने माझे आयुष्य भरून गेले होते १ माझे हित कशात आहे, हे कुणीच मला सांगितले नाही. त्याचा विचार माझ्याशिवाय इतर कुणी करीत नाहीत सज्जन सोयरे जे भोवती आहेत ते सारे सुखाचेच सोबती आहेत कुणीही जन्ममरणासंबंधी विचार करीत नाहीत. २ देवा, मातेच्या गर्भातील यातनाचे काय वर्णन करू ? मला त्या भोग्ाव्या
३०० सार्थ तुकारामगाथा लागल्या आहेत. मांस, मलमूत्र यांचीच सर्वत्र वेष्टण असते. त्यावेळीं मी तुलाच क्षणोक्षणीं स्मरत असतो. ३ माझा मरणकाळ जवळ आला असताना, मला जवळच्या नात्याची माणसे कुणी दिसतच नाहीत. देहपतन म्हणजे माती मातीस जाऊन मिळणे; पूर्वसंचिताप्रमाणे होणे एवढेच माझ्या ध्यानात येते. ४ देवा, आता माझ्यासाठी तू एवढे कर. तुझी काही चरणसेवा मला घडावी. तुकाराम महाराज या केशवास विनवीत आहेत की, या संसाराशी माझा काही विरोध निर्माण होईल असे तू कर. ५ ६१६ अगा ए सावळया सगुणा । गुणनधिनाम नारायणा । आमची परिसा विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ॥ १ ॥ बहु या उदराचे कष्ट । आम्हांसि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥ २ ॥ जालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न फळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥ ३ ॥ येथें तों नये आठव कांहीं । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाही । हित तों कांहीं दिसेचि ना ॥ ४ ॥ जीवित्व वेचिलें वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांही व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥ ५ ॥ माझा मींच जालों शत्रु । केंचा पुत्र दारा केंचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्गुरु तुका म्हणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - गुणनधी-गुणाचा साठा, परिसा-ऐका, विज्ञापना-विनंती, पांगिला-पंगू, दारा-पत्नी. अर्थ :- अरे श्यामसुंदरा, सगुणरूपा विठ्ठला, गुणाचा साठा असलेल्या नारायणा, आमची एक विनंती तू ऐक ना. या आपल्या दीन सेवकाचा सांभाळ तू कर ना. १ मी पोट भरण्यासाठीच फार कष्ट केले. त्यामुळे आम्ही देवा, कर्मभ्रष्ट झालो. तुमच्याकडे येण्याची वाट चुकली त्यामुळे म्हणून तर मी तुमच्या दाराशी कटकट करीत उभा आहे. २ देवा, या भोवतीच्या लोकांसाठी मी पंगू बनून राहिलो आहे. आंदण दिलेल्या दासीप्रमाणे मी या संसारात वागत आहे. देवा, तू मला या दृढ अशा बंधनातून कधी सोडवशील ? मी फार बांधलो गेलो आहे रे. ३ या संसारात मला तुझी आठवण काहीच येत नाही. येथे क्षणभर देखील विसावा मिळत नाही. मी आणखी काही वासनांच्या प्रवाही पडलो तर मग मला माझ्या हिताचे काहीच दिसत नाही. ४ माझे आयुष्य तुझ्या वियोगातच खर्च झाले ना ? अनेक जन्मांचा वृथा प्रवास करावा लागला. काही व्याधी जडल्या. रोग निर्माण झाले त्यामुळे देहाची काही तोडमोडही झाली. ५ अशा प्रकारे मीच माझा प्रभू बनलो. अशा वेळी मुलगा, पत्नी, मित्र यांचा कसलाही उपयोग होत नाही. कशासाठी मग हा एवढा पसारा मी मांडला ? तुकाराम महाराज म्हणतात, अहो, जगद्गुरू, तुम्ही याचा विचार करा एकदा. ६ ६१७ आतां मज धरवावी शुद्धि । येवुनी परतवावी बुद्धि । घ्यावें सोडवूनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रों ॥ १ ॥ करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले कहणेची खाई । करीं वो आई मजवरी ॥ २ ॥ मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणें आयुष्य 'जालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥ ३ ॥ १ होतें.
सार्थ तुकारामगाथा ३०१ आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथे म्या येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥ ४॥ करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामीं घ्यावा प्रेमा । सोडवीं भ्रमापासुनिया ॥ ५ ॥ हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं । करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका म्हणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- संघीं-संकटात, साई-छाया, पेणें-मुक्काम, धणी-तृप्ती. अर्थ :- देवा, आता माझ्या विचारांनी काही शुद्धी धारण करावी व माझ्या बुद्धीने प्रपंचापासून परतावे, सोडवून घ्यावे, असे कृपेच्या सागरा, काही तरी करा. या काळचक्राच्या संकटात सापडून मी त्रासलो आहे. १ तू मनात आणलेस तर काय करणार नाहीस ? राईचा डोंगर करशील, डोंगराची राई करुन दाखविशील. देवा, तुमच्या कृपेची छाया मजवर करा ना. हे आई, एवडी कृपा तू करावीस. २ या पूर्वीचा काळ अज्ञानपणात निघून गेला. माझ्या स्वभावातील गुणामुळे तो व्यर्थ झाला. यामुळे आयुष्य कमी होत राहिले, हेही ध्यानात आले नाही व पुढला शाश्वत सुखाचा मुक्काम दुरावला हेही समजले नाही. ३ आता मात्र माझ्या मनात भय निर्माण झाले असून दिवस एकामागून एक असे निघून जात आहेत. मी या जन्मास येऊन काय केले ? तुझ्या पायाचे स्मरण काही मनोभावे मी कधी केले नाही. ४ परंतु पुरुषोत्तमा, माझे पूर्वीचे अपराध क्षमा करावेत. तुमच्या नामाविषयी मला प्रेम द्यावे आणि या संसारभ्रमापासून मुक्त करावे. ५ तुमच्या गुणकीर्तनात माझे हृदय स्थिर व्हावे. तुमच्या पायांच्या ठिकाणीच मला स्थान मिळावे. तुमच्या नामसंकीर्तनाची गोडी वाणीने सेवन करु. तुकाराम महाराज म्हणतात, तृप्ती होईपर्यंत यात मी आता रंगून जाईन. ६ ६१८ जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥ १ ॥ जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाऊलें समचि साजिरीं । अंतरीं धरोनि राहिन ॥ २ ॥ जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ । खेळें हीं लाघव सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥ ३ ॥ जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥ ४ ॥ जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥ ५ ॥ जयाचे नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । तो हा तेजःपुंज रासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- साजिरीं-शोभिवंत, भाळ-मस्तक, कपाळ. अर्थ :- ज्या ईश्वराने मला हा शुद्ध व सात्विक असा जीव दान दिला आहे, त्याचेच चिंतन मी रोज करीत राहीन. या जगताचे जीवनच असणारा जो नारायण त्याचेच गुण मी गात राहीन. १ तोच देव या भिवरा नदीच्या काठावर कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्याची एकसारखी पावले अतिशय शोभिवंत अशी असून तोच मी माझ्या चित्तात धारण केली आहेत. २ हा विठ्ठल असुराचा, दुष्ट लोकांचा काळ असून आपल्या भक्तांचा सांभाळ मोठ्या
३०२ सार्थ तुकारामगाथा प्रेमाने करीत असतो मोठ्या कौतुकाने हा नाना प्रकारचे खेळ करीत असतो याच्या पायावर माझे मस्तक नम्र झाले आहे ३ हा या गोपाळांच्या समुदायात खेळ खेळण्यात रंगून गेला आहे यानेच बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठविले व तो त्याचे दार रक्षण करीत राहिला ४ हा श्रीहरी लावण्याचा पुतळा असून याच्या अंगी सर्व प्रकारच्या कला आहेत. याच्या गळ्यात वैजयंती माळ शोभून दिसत आहे या माझ्या स्वामिस अनेकवार नमस्कार असोत ५ याच्या नामाच्या उच्चाराने पाप नष्ट होते प्रत्यक्ष लक्ष्मीच याची दासी असते हा तेजाची प्रत्यक्ष रासच जणू असून तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याला सर्व भावाने शरण आलो आहे ६ ६१९ काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसे तुम्ही सांगा सतजन । करा समाधान चित्त माझें ॥ १ ॥ काय हे खंडईल कर्म । पाझपतील धर्माधर्म । कासयाने ते कळे वर्म । म्हणउनी भ्रम वाटतसे ॥ २ ॥ काय हो स्थिर राहेल बुद्धी । काहीं अरिष्ट न येल मधीं । धरिली जाईल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥ ३ ॥ काय ऐसे पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कुरवाळील जगजेठी । दाटइन कंठी सद्गदित ॥ ४ ॥ काय हे' निवतील डोळे । सुख ते देखोनी सोहळे । संचित फंसे ते न फळे । होतील डोहळे वासनेसी ॥ ५ ॥ ऐसी चिंता करी सदा सर्वकाळ । रात्रिदिवस हेचि तळमळ । तुका म्हणे नाही आपुले बळ । जेणे फळ पावे निश्चयेंसी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - खंडईल-नष्ट होईल, पाझपतील-कमी होतील अर्थ - संत लोकहो, सांगा ना, माझा उद्धार खरेच होईल ना ? तो नारायण माझ्यावर कृपा करील ना ? माझ्या चित्ताचे समाधान करा ना एकदा तुम्ही १ माझे प्रारब्धकर्म नष्ट होईल ना ? माझे धर्माधर्म कमी होतील ना ? काय केले म्हणजे मला या नारायणाचे रहस्य समजेल ? या चिंतेन माझ्या मनास भारी भ्रम होतात हो २ माझी बुद्धी या ईश्वराशी स्थिर राहील ना ? मध्येच काही एखादे संकट तर नाही ना येणार ? मनात ज्याची इच्छा धरून मी आहे ती सफल होईल ना ? गोड शेवट झालेला मला दिसेल ना ? ३ ज्याच्या योगाने माझी मिठी देवाच्या पायांशी पडेल असे पुण्य कधी तरी माझ्याजवळ साठून राहील काय ? तो जगजेठी मला हळुवारपणे प्रेमाने कुरवाळील ना ? माझा कंठ त्याच्या विषयीच्या प्रेमाने कधी भरून येईल ? ४ त्याच्या भेटीच्या सोहळ्याचे सुख पाहून माझे डोळे कधी बरे निवतील ? काय संचित आहे ते नीट कळत नाही पण अशा प्रकारच्या इच्छेचे डोहाळे मला लागले आहेत हे खरे ५ अशी चिंता मी सदा सर्वकाळ करीत आहे रात्रंदिवस माझे चित्त तळमळत असून तुकाराम महाराज म्हणतात, अशा तळमळीतून मला निश्चयाने फळ मिळेल असे बळ केवळ माझ्याच अंगी आहे असे नाही ६ ६२० तूचि अनाथाचा दाता । दुख मोह नासावया चिंता । शरण आलो तुज आता । तारीं कृपावंता मायबापा ॥ १ ॥ सतसंगति देहें चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा । हाच भाव माझिया जीया । पुरवीं देवा मनोरथ ॥ २ ॥ १ ते
मज भाव प्रेम देईं कीर्तीं । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्ना सोडवूनि हार्तीं । विनंती माझी परिसावी हे ॥ ३ ॥ आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपत्तिराज्यचाड धन । साकडें न पडे तुज जेणें । दुजें भक्तीविण मायबापा ॥ ४ ॥ जोडोमिया कर पायीं ठेवों माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवी व्यथा¹ मायबापा ॥ ५ ॥
शब्दार्थ य टीपा :- परिसावी-ऐकावी, साकडें-मकट
अर्थ - देवा, तूच आमच्यासारख्या अनाथाचा नाथ आहेस आमचे दुःख, मोह, आमची चिंता, याचा नाश तूच करतोस म्हणून देवा, तुला मी शरण आलो आहे. तेव्हा मायबापा, कृपावंत होऊन मला तार; माझे रक्षण कर. १ संताची संगती व तुझ्या चरणाची सेवा एवढ्याच गोष्टी दे तू. जेणेकरून तुझा विसर होणार नाही, हाच भाव माझ्या अंत:करणात दृढ व्हावा माझे एवढे मनोरथ देवा, तू पुरवावेस २ मला तुझ्याविषयी भावभक्ती वाटावी, प्रेम वाटावे, तुझे नाम व तुझी कीर्ती वर्णन करून तुझी स्तुती करण्याची हौस मला आहे तेव्हा तू ती पुरवावीस व माझी सर्व संकटे दूर करून ही विनंती तू ऐक ३ याशिवाय देवा, आणखी दुसरे मागणे काही नाही सुख, संपत्ती, राज्य, धन इत्यादींची काहीही किंमत मला नाही. हे मला देण्याविषयी तुला कधीच सकट पडणार नाही मायबापा, एक भक्ती मात्र तू द्यावीस ४ मी हात जोडून तुझ्या पायावर मस्तक ठेवीत आहे. तुकाराम तुला पंढरीनाथा, विनवीत आहे की, माझ्या अंतःकरणाच्या भावभक्तीच्या रंगावर तुझ्या प्रीतीचा रंग चढावा. एवढीच देवा, माझी तीव्र इच्छा आहे ५
६२१ सेदरीं² हैं देवी दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥ १ ॥ आपुले इच्छे आणिकां पीडो । काय तें देईल वराडी । कळी ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धि अधरा³ ॥ २ ॥ दासीचा ⁴पाहुनेरउखितें । धणी देईल आपुल्या हातें । करुणाभापणउचितें । हें तो रितें सतत शक्तिहीन ॥ ३ ॥ काय तें थिल्लरीचे पाणी । ओठ न भिजे न फिटे धणी । सीण तरों आदी आयसानीं । क्षोभे पुरश्चरणीं विले फळ ॥ ४ ॥ विलेपनें युजविती तोड । मार लोल⁵ वाहातो उदंड । करविती आपणादा दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥ ५ ॥ तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दन । तुका म्हणे त्याचें करा चिंतन । यदूं चरण येती सकळें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - सेदरीं-शेंदूर फासून केलेली, हेंदरी-आवळ, घाणेरडी, अवदान-बळी, वराडी-वाऱ्याचे- भूत, जोडो-प्राप्ती, अधरा-धैर्य नसलेली, पाहुनेर-पाहुणचार, उखीतें-दासीचे वेतन, थिल्लरीचे-डबक्यातील, धणी-तृप्ती, भांड-भाडखोर
अर्थ :- दगदादिकांना भाव न धरिता शेंदूर फासून येडीवाकडी व घाणेरडी देवदैवते व भूतेखेते यांची पूजा कशासाठी करावी ? आपल्या पोटासाठी एखाद्याच्या शिंताची भिक्षा मागणारी, बळी मागणारी ही दैवते
१ देवा मनोरथा, २ संदरी हेंदरी, दैवत ३ अधीरा, ४ पाहुणेर उषीत, ५ ळोळ
३०४ सार्थ तुकारामगाथा दुसऱ्याला काय देणार ? १ आपल्या इच्छेसाठी, तृप्तीसाठी दुसऱ्यांना छळतात त्या आशाळभूत दैवतापासून आपणास काय मिळणार आहे ? त्याच्या प्राप्तीचा उपयोग तरी काय ? त्याची बुद्धी थोडी असून त्याच्या अंगी धैर्य तर थोडेच असते २ दासीच्या पासूनच जर पाहुणचाराची इच्छा केली, तर स्वतःस वेतन देणाऱ्या आपल्या धन्यास तिला प्रथम विनंती करावी लागते मग ती उचित अशा करून भावनांनी काही स्वागत करील अशा प्रकारची ही रिकामी दैवते दाक्षिण्यहीन अशी असतात ३ एखाद्या डबक्यातील पाण्याचा काय उपयोग ? त्या पाण्यात ओठही भिजत नाही, तहान भागल्याची तृप्ती कधी होत नाही जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व त्रास मात्र सदोदित होतो एखाद्या पुरश्चरणात काही कमी पडल्यास जसा क्षोभ होतो व फळ नष्ट होते, तसे या क्षुद्र दैवताचे आहे ४ या दगडी दैवताचे तोंड शेंदराने झाकून टाकलेले असल्याने त्या भाराची लोळ ती नेहमी वागवीत असतात कधी हिंसाचाराने आपली आपणासच दंड अथवा शासन करून घेतात अशांना देव ढुंगी म्हणेल तर तो मनुष्य भांडखोर व खलबडघा म्हणावा लागेल ५ अशा प्रकारचा हा माझा नारायण नाही हा सर्व जगाला व्यापून राहणारा जनार्दन आहे तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे चिंतन मनापासून करा, म्हणजे ही क्षुद्र दैवते तुमच्या पायाशी नम्र होतील ६ विवरण - तुकारामबुवा सगुण मूर्तीचे उपासक असले तरी, भावभक्तीशिवाय जर कोणी दगडास शेंदूर फासून देवदेवतांचा पसारा मांडू लागला तर मात्र त्यांना खपत नसे एका विठ्ठलावाचून दुसरी दैवतं नमावीत अस त्यांच्या मनास वाटते दुसरी क्षुद्र देवदैवते व्यर्थ कष्ट देणारी, फसविणारी एकसारखी कशाची तरी मागणी करणारी असतात त्यांच्यात आपण समजतो तेवढेही सामर्थ्य नसते आसुरी वृत्तीनी ती नेहमी भारावलेली असून भक्तांना त्रास देणारी व पुन पुन नव्या देणगीची इच्छा करणारी असतात यांच्या नादी कशास लागावे ? सर्व देव सारखेच, सर्व वस्तूत एक परमेश्वर तत्त्व भरून राहिल आहे हे खरे पण हे कुणासाठी ? जो मनात एकनिष्ठ भाव धरून भक्ती करावयास उत्सुक आहे त्यासाठी मनात भावभक्ती नसताना उगाच आपले लौकिक सुखासाठी रोज नवीन दैवते निर्माण करून त्यांच्या वेड्यावाकड्या व तामसी भावना पुऱ्या करणाऱ्यांना तुकोबानी या अभंगात चांगलाच धडा दिलेला आहे दगडास शेंदूर फासून रोज नवे देव निर्माण करून गरीब बायाबापड्यांना फसविण्याचाही धंदा तुकाराम- बुवांच्या वेळेस जोरात चालू असावा भक्तवत्सल अंतःपारा पंढरीनाथ सोडून या क्षुद्र व अघोरी देवदेवतांची उपासना करणाऱ्याचा निषेध सर्वच साधुसंतांनी केलेला आहे ज्ञानेश्वरांनी तर ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायात माणसाच्या अज्ञानाचे वर्णन करताना, त्याच्या या रोज नवा देव शोधण्याच्या वृत्तीचा निषेधच केला आहे केवळ लौकिक सुखासाठी देव आठविणे व मनकामना पूर्ण न झाल्यास त्याच देवास नाव ठेवून दुसरा शोधणे ही काय खरी भक्ती म्हणायची ? अशी भक्ती करणारी माणसे कशी असतात ? ज्ञानेश्वरांनी तीव्र शब्दात सांगितले आहे- 'नातरी कांताच्या मानसीं । रिगोनि स्वैरिणी जैसी । राहाटे जारेंसीं । जावया लागीं ।।' नवऱ्याच्या अंतःकरणात शिरण्याचा प्रयत्न करणारी, पण मनातून दुसऱ्याच प्रियकराचे ध्यान करणाऱ्या जारिणीप्रमाणे या माणसाचे असे वर्तन असते एका दैवताने समाधान झाले नाही, मग दुसरे शोधायचे व पहिल्यांस नांवे ठेवायची- 'कुचवट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलीची परवडी । वरी तया ' अशी त्याची स्थिती असते या नव्यानाव्या देवाच्या शोधात असणाऱ्या माणसांस कधी समाधानच होत नाही तो सारखा भटकत असता बाजारबसवीप्रमाणे त्याचे भ्रमण चालू असते 'ऐसा अखंड भ्रमण करी । उषा नोहे क्षणभरी । अवघे न गावद्वारीं । आहेव जैसो ' असे म्हणून ज्ञानदेवानी या दैवतांचा व त्यांना भजणाऱ्यांचा निषेधच केलेला आहे तुकारामबुवांच्या वेळी तर या क्षुद्र व हिंसाचारी देवांचा सुळसुळाट झाला होता नवे नवे धर्मपंथ, शेंदराचे दैव, रक्ताचा, मांसाचा नैवेद्य, अघोरी उपाय याच्यासारख्या हीन मागणीला या दैवताचा बुवानी धिक्कार केलेला दिसून येता 'नव्हे जाणाई जोखाई मायराणी मेसावाई । बळिया माझा पंढरिराव जो या देवांचाही देव' असा स्पष्ट खुलासा बुवानी आणखी एका अभंगात (अ २३८४) करून 'वेताळें कंताळें । अळो त्याचे तोंड काळें' म्हणून आपल्या नेहमीच्या शब्दांत त्यांनी थेटपणे निषेध केला आहे
सार्थ तुकारामगाथा ३०५ ६२२ विषयओढीं भुलले जीव । आता याची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥ १ ॥ कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागले शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ २ ॥ बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवे जालिय तुटी । भोगिले मागें पुढें ही फोटी । होईल भेटी जन्मासी ॥ ३ ॥ जतिली १ घाणा बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे । चालिलों किती तें न कळे । दुःखें हारबळे २ भूकतान ॥ ४ ॥ एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानुनि अनित्य । न करिती नित्य नामस्मरण ॥ ५ ॥ तुका म्हणे न वेचता मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेचिता फुकाचेचि बोल । केवढें खोल अभागिया ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - नुपजे निर्माण होत नाही, सळे-बलाने, आर-टोचणी, आरबळे-दुःखाने आरडतील अर्थ - या जीवनाविषयीच्या वृथा लोभाने हे जीव कसे भुलून गेले आहेत पाहा आता याची कोण कीव करणार ? कारण याच्या मनात नारायणबद्दल भक्तिभाव कधीच निर्माण होत नाही चांगला नरदेह मिळालेला असतो त्याचा काय उपयोग ? १ काळाच्या मुखात सापडलो असताना या संसारात कसले सुख आहे ? या शरीरास आयुष्याचे माप लागले आहे ते बळाने एकदा कधी तरी पूर्ण भरेल व मग यमदूत येतील २ बळाने ओढायला लागतील व पुढल्या जन्माचीही अशीच अवस्था होऊन जाईल ३ एखाद्या डोळे बांधून घाण्यास जुंपलेल्या बैलाप्रमाणे याची अवस्था होईल त्याला मागेपुढे आरेची टोचणी एकसारखी असते त्यामुळे तो दुःखातच नेहमी राहतो किती भ्रमण केले, हेही त्याला समजत नाही त्याच्या प्रमाणेच ही माणसे दुःखाने एकसारखी ओरडत असतात तहानेने व भुकेने व्याकुळलेली असतात ४ आपल्या प्रारब्धामुळेच, क्रियमाण व संचित्तामुळेच, हा असा त्रास आपणास होत असतो तर मग हा देह अनित्य मानून नित्य नामस्मरण त्या एका परमेश्वराचे हे लोक का करीत नाहीत ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, द्रव्य खर्च न होता या विठ्ठलाचे रूप हृदयात साठविता येत असूनही त्या विठ्ठलाचे चिंतन याना रिती दुर्लभ झाले आहे पाहा ना फुकटचे विठ्ठलाचे नामही या अभाग्याना दुर्लभ किती झाले आहे पाहा ६ ६२३ आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तिमारग हळूचि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । का रे अघोरा दचकसी ना ॥ १ ॥ नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढिता कुडी प्राणा । ओढाळ सापडे जं धाम्या । चोर यातना धरिजेता ॥ २ ॥ नाहीं दिलें पावेल कैसा । चालता पथ तेणें वळसा । नसेल ठाउके ऐकतो जैसा । नेती बद जैसा धरोनिया ॥ ३ ॥ क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करिता कांहीं । ओढिती काटवणा सोईं । अग्निस्तंभीं याही कवटाळविती ॥ ४ ॥ देऊनि अगें कापती । तप्ते नदीमाजी चालविती । लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥ ५ ॥ १ जुतिले, २ आरबळ तु गाथा ३९
३०६ सार्थ तुकारामगाथा तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळोनि कंसा सोवळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥ ६ ॥ म्हणउनी करा कांही सायास । व्हायेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तिरस तुका म्हणे ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा :- कुंभयातना-नरकाचे दुःख, कुडी-शरीर, वळसा-संकट, बंद-चोर, पिंड-शरीर, सायास-उपाय, प्रयत्न अर्थ - या संसारास तुम्ही लागलेले आहात, तर एक उपाय करा ना. आपल्या मुक्तीचा मार्ग हळूच साधा. नाहीतर पुढे यमाच्या दंडाची शिक्षा फार भयानक असते. दुराचारी माणसा, हे सर्व ऐकून असा दचकतोस का ? १ शरीरातून प्राण बाहेर नेताना या यमास काही सुद्धा दया येणार नाही. ओढाळ जनावरास धान्य खाताना बरे वाटते; पण पाठीवर दणका बसताच त्याची काय अवस्था होते ? चोरास पकडल्यावर मग त्याची काय गती होते ? २ त्याचप्रमाणे तुमचीही अवस्था होईल काही दान दिल्याशिवाय हे स्थान मिळेल कसे ? या संसार पथा- वरील संकट जर माहीत नसेल मी सांगतो ते नीट ऐका. एखाद्या चोरास धरून नेतात तसे यमदूत तुम्हांस धरून नेतील. ३ पायात काही न घालता एक क्षणभरही तुम्हास चालवत नसे. त्याना मग हे यमदूत कांटेरी वाटेने फरफटत ओढीत घेऊन जातील. लोखंडाच्या खांबास तापवून, लाल करून, त्यास तुम्हाला भेटवतील. ४ ज्याकडे नुसते पाहिले तरी अंगास कापरे सुटते, अशा बेफाम नदीतून तुम्हांस चालवतील. जिचा काहीच ठाव लागला नाही तिच्यात तुम्हांला ते बुडवतील व वर काठीने मारतील हे यमदूत. ५ एखाद्या वेळेस अन्नपाणी न मिळाले तर तुमचा जीव कासावीस होतो, पण हे यमदूत तुम्हास कित्येक दिवस उपाशी ठेवतील. शरीराचे पोषण करून तो कसा सुस्व- रूप ठेविला होता तुम्ही; पण हे यमदूत त्यास तापलेल्या अग्नीच्या ज्वालात लोळवतील. ६ म्हणून लोकहो, काही तरी उपाय करा. या संसाराविषयी उदास व्हा. तुकाराम महाराज म्हणतात, मुख्य म्हणजे या देवाच्या नामाचा घोष करा. या भक्तिरसाचे सेवन करा. ७ ६२४ न बोलसी तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा । तुज मी नाहीं घालीत गोवा । बीड केशवा कासयाची ॥ १ ॥ उतरीं आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥ २ ॥ दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानशक्ति टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥ ३ ॥ म्हणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळें नेगास आपुलिया ॥ ४ ॥ तुझें म्यां घेतल्या वांचून । न वजे येथूनि वचन । हाचि माझा नेम सत्य जाण । आहे नाही म्हण तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- गोवा-भीड, नकट, वास-वाट. अर्थ :- देवा, तू माझ्याशी का बोलत नाहीस, हे मला आता समजले आहे. तुझे नाव पतितपावन, जगन्नाथ असे असून तू मला पावन करीत नाहीस याची लाज तुझ्या मनात असल्याने तू गप्प राहिला आहेस आणि मीही काही तुला संकटात टाकीत नाही. कशाचीही भीड घालीत नाही. १ तुझ्या मनावर याचा भार असेल तो उतरवून
५. उपदेश व पाखण्ड खण्डन अभंग
टाक. माझ्याशी एक दोन शब्दांनी बोल ना. माझा स्वीकार तुजकडून होत नाही, असे दिसताच मी त्याचाही विचार करीन. २ कोणी याचक यजमानाजवळ काही मागावयास गेला तर यजमानाने दान देऊन त्याचा मान राखला पाहिजे व याचकानेही जे मिळेल ते घेतले पाहिजे. दोघांनीही एकमेकांचा मान राखला पाहिजे. अशी ही धर्मनीती आहे. जर दान मिळाले नाही तर दोघांनाही दोष प्राप्त होतो. ३ म्हणून तर देवा, मी तुझी इच्छा करून आहे. तुझ्या वचनाची वाट पाहात आहे. मोठ्या सायासाने मी तुझ्याबद्दल धीर धरून उभा आहे. वाट पाहण्याच्या नेमास मी काही कधी चुकणार नाही. ४ तुझे वचन घेतल्याशिवाय मी येथून हलणारच नाही. हाच माझा खराखुरा नेम आहे असे तू जाण. ५ ६२५ आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण निघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥ १ ॥ न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझें लाधले पाय । आतां मज न विसंबे माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥ २ ॥ बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहेरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥ ३ ॥ आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसारसृष्टी । न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥ ४ ॥ आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सायासीं-खटपटीत, लाधतो-मिळतात. अर्थ :- देवा, आता मी इतर कुठल्या साधनमार्गांच्या खटपटीत पडणार नाही संसारदुःखांच्या पाशातही अडकणार नाही. मी आता संतांना शरण जाऊन तुझ्या पायाशी स्थान मिळवीन. ते त्यांना मागेन. १ माझे काय संचित कर्म होते, हे काही कळत नाही. कोणत्या पुण्याईने तुझे पाय लाभतील ? आई, आता तू मला विसरू नकोस ग. मी तुला अतिशय शोकाकुल होऊन विनवीत आहे. २ या संसारात मला फारच त्रास झाला. मोहमाया यांच्या ज्वालानी व विषारी गंधाने माझी फार विटंबना केली. सत्त्व, रज, तम या गुणाच्या तीव्र लहरी मनात निर्माण होऊन मी दुःखाने फारच गांजून गेलो आहे देवा. ३ आणखी मी माझे किती दुःख सांगावे तुला? या संसारदुःखांची मर्मकहाणी ऐकताना पाषाणसुद्धा दुभंगतील. माझ्या तर चित्तात भयाने कांपरेच भरलेले आहे ४ आता हे दुःख मला मुळीच सहन होत नाही. या संसाराची दुर्गंधी आता मला व्यथित करीत आहे. या दुखभाराने मी चांगला जाणता असून वेडाच बनून गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला पाव व माझे रक्षण कर. ५ ६२६ आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळों अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥ १ ॥ शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ति कांहींच नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक ऊणें रंकाहूनी ॥ २ ॥ मन स्थिर नाहीं माझिये हातीं । इंद्रियें धावतां नावरती । सकळ पुंटलिया युक्ती । शांति निवृत्ति जवळों नाहीं ॥ ३ ॥ सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥ ४ ॥
३०८ सार्थ तुकारामगाथा राहिलो धरुनि विश्वास । आधार नेटों तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका म्हणे यास तुझें उचित ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - रंक-गरीब, उपाव-उपाय, ठाव-आश्रय, नेटों-नेटाने, दृढ अर्थ - देवा, आता तुला जे कळेल ते, जे बरे दिसेल ते तू कर तारणार असशील तर तार, मारणार असशील तर मारतो जवळ घर पाहिजे असल्यास, अथवा दूरही कर मला या संसारात घाल अथवा घालू नकोस १ मी नेणतेपणाने तुला शरण आलो आहे मला भाव व भक्ती यांन्यातकी काहीच समजत नाही मी सर्व ज्ञानाच्या बाबतीत मद बुद्धीचा असून मी गरिवाहून गरीब आहे २ माझे मन माझ्या हातात स्थिर नाही माझी इंद्रिये बाह्य विषयाकडे धावतात, कितीही त्याना आवरले तरी ती आवरली जात नाहीत माझी सर्व युक्ती संपून गेली आहे शाततेची व निवृत्तीची वृत्ती माझेजवळ उरलेली नाही ३ देवा, मी माझ्या मनातील हा सर्व भाव तुला सागितला आहे तुझ्या पायावर मी हा जीव ठेविला आहे असे समज आता तुला जो पडेल तो उपाय तू कर तूच माझे सर्व आश्रयस्थान आहेस ४ मी तुझाच विश्वास धरून राहिलो आहे मोठ्या दृढ वृत्तीने मी तुझीच कास धरून उभा आहे, आधार घेतला आहे तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी आता आणखी काही प्रयत्न करण्याचे जाणीत नाही तुला काय योग्य वाटेल ते तू माझे करावेस ५ ६२७ देवा तू कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु । जीवनसिद्धि साधनांसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥ १ ॥ शरणागता वज्रपंजर । अभयदानी तू उदार । सकळा देवा तू अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ २ ॥ भागली स्तुति करिता फार । तेथें मी काय तें गद्धार । जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊ आता ॥ ३ ॥ नेणें भाव परि म्हणवों तुझा । नेणें भक्ति परि करितो पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धावणें ॥ ४ ॥ तुझिया बळें पंढरीनाथा । जालो निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथा । न भीं सर्वथा तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कृपाकरणासिंधु-कृपेचा, करुणेचा सागर, वज्रपंजर-वज्राचा पिंजरा, अगोचर- इंद्रियाना न समजणारा, गद्धार-मूर्ख, निर्भर-भाररहित अर्थ - देवा, तू कृपेचा, करुणेचा सागरच आहेस तूच आमचा मायबाप झाला आहेस आमचा बंधूही तूच आहेस आमच्या जीवनाची सिद्धी व साधनाचा सिंधू तूच एक आहेस हा संसारपाश तू तोडून टाक माझा १ शरणागताना अभय देण्यासाठी तू म्हणजे वद्याचा एक पिंजराच आहेस तू उदार असून अभय देणारा आहेस सर्व देवांना तू न समजून येणारा आहेस तू विकाररहित व अविनाशी आहेस २ सर्व देव तुझी स्तुती करता करता थकून गेले तेथ मी मूर्ख किती टिकणार ? पण मला तुझ्या स्वरूपाचा विचार समजावून घ्यायचा आहे तू आता मला अंतर देऊ नकोस ३ तुझ्याविषयी मनात भाव नसला तरी मी तुझा दास म्हणवितो, तुझी भक्ती कशी करावी हे मी जाणीत नसलो तरी हे देवा मी तुझीच पूजा करतो तेव्हा केशवा, तुझ्या पतितपावन नामासाठी तरी तुला माझ्या रक्षणासाठी धावून यावे लागेल ४ पंढरीनाथा, तुझ्या बळामुळे मी भाररहित झालो असून माझ्या मनातील सर्व दु खे संपली आहेत मी आता माझा सर्व भार तुझ्याच माथ्यावर ठेविला आहे तुकाराम महाराज म्हणतात, मी आता कुणालाही व्यर्थ भिणार नाही ५
सार्थ तुकारामगाथा ३०९ ६२८ कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज वा हरी ॥ अवघ्या नाशवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥ १ ॥ प्रथम केला गर्भी वास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिले नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥ २ ॥ बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा । वृद्धपणीं प्रवर्त्तली चिंता । खरें मागुता जन्म धरूं ॥ ३ ॥ क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौऱ्यांशी घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥ ४ ॥ आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं । तुझा दास मो दीन कामारी । तुका म्हणे करीं कृपा आतां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- थिता-जवळ स्थिर असलेला, भरोवरी-धम अर्थ :- श्रीहरी, या संसारामध्ये मी कोणते सुख मानून राहू रे ? तू साग एकदा ना. येथील सर्व सुखें नाशवंत आहेत. तू एक जवळ स्थिरपणे उभा होतास तोही दूर होतोस अंतरतोस. १ प्रथम मी आईच्या गर्भात निवास केला. तेथील कष्ट काय सांगावेत ? नऊ महिने परिपूर्ण असे मी दुख भोगले आणि मग कसा तरी या जन्मास आलो. २ सर्व बालपण काही न कळताच गेले. तरुणपणी विषयचिंतनाचा आयुष्य गेले. म्हातारपणी आता कसे होणार या चिंतेने मी ग्रासून गेलो. बरे मरून मोकळे व्हावे तर पुनः जन्म आहेच. ३ या संसारात एका क्षणा- चाही विसावा नाही. चौऱ्यांशी लक्ष जन्माच्या खेपा केल्या तरी, जी हाव पाठीशी लागली आहे ती काही केल्या संपत नाही. माझ्या या देहपणाच्या जाणिवेस आग लागो व ती नष्ट होवो. ४ पण देवा, आता हे थम पुरेत. दरिद्री होऊन मी तुझ्या दारात उभा राहीन. वाटेल ती कामे करणारा मी तुझा दास होईन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मजवर कृपा करा ना एकदा. ५ ६२९ सुख या संतसमागमें । नित्य दुणावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥ १ ॥ म्हणोनि नाहीं कांहीं चिंता । तूंचि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥ २ ॥ ऐसा हा कळला निर्धार । माझा तुज न पडे विसर । अससी देउनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळ ॥ ३ ॥ दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्षितमुवित जात्या कामारी दासी । त्याचें वर्म तूं आम्हापाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥ ४ ॥ जेथें तझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आम्हां आनंदास । सेवून ब्रह्मरस तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- संतसमागमें-संताच्या सहवासाने, दहन-नष्ट, कामारी-काम करणान्या. अर्थ :- देवा, या संतांच्या सहवासात काय सुख आहे म्हणून सांगू ? तुझ्या नामाने तर ते नित्य दुपटीने वाढत राहते. सर्व कर्मे त्यामुळे नष्ट होऊन जातात. जळून जातात. त्यामुळे मी मोठ्या प्रेमात व तुझ्या नाम- स्मरणात डुलत असतो. १ म्हणून देवा, आता मला कसलीही चिंता उरलेली नाही तूच आता आमची माता, आमचा पिता, बंधू, चुलता, आमची बहीण सर्व काही तूच आहेस देवा. सर्व नातेवाईकही तूच आहेस. २ आता
३१० सार्थ तुकारामगाथा हा विचार निर्धाराने मला समजला आहे. देवा, तुला माझा विसर कधीच पडणार नाही, हेही मला पक्के माहीत आहे. तू मला धीर देऊन सदैव जवळच असतोस. अंतर्बाह्य स्वरूपात तूच माझ्याजवळ असतोस. ३ दुःख कसे असते ते स्वप्नातही मला दिसत नाही. मुक्ती व भोगवृत्ती या काम करणाऱ्या दासी होऊन राहिल्या आहेत. त्या सर्वांचे रहस्य तुझ्यात असून तू तर प्रेमाच्या सुखासाठी आम्हाजवळ राहिला आहेस. ४ ज्या ठिकाणी तुझ्या कीर्तनाचा नित्य घोष असतो, तेथे सर्व पापे जळून नष्ट होतात. मग आमच्या आनंदास कमतरता कसली ? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मोठ्या प्रीतीने या ब्रह्मरसाचे, ईश्वराच्या ऐक्याचे सेवन करू. ५ ६३० देवा तूं आमचा कृपाळ । भक्तप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥ १ ॥ तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुढती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥ २ ॥ आम्हां भय चिंता नाहीं धाक । जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळिकवैकुंठ ॥ ३ ॥ न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्णू कीतीं तया सुखा ॥ ४ ॥ तुझियां नामाचीं भूषणें । तों ये मज लेवविलीं लेणें । तुका म्हणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आम्हां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- कृपाळ-कृपाळू, प्रतिपाळ-सांभाळ. अर्थ :- देवा, तू आमच्याविषयी फार कृपाळू आहेस रे भक्तांचा सांभाळ करणारा तू दीनवत्सल आहेस तू मोठी स्नेहाळ अशी माउली आहेस. आमचा सर्व भार तू घेतला आहेस १ आमची सर्व चिंता देवा, तुलाच लागली आहे. आमचे पाऊल वाकडे पडले तर तूच आमचे त्यावेळी रक्षण करितोस. मग पुढे तू आम्हास संतांच्या स्वाधीन करतोस आम्हाला दूर लोटण्यास तुला धीर कसा होणार ? २ त्यामुळे आता आम्हाला भय नाही की कसली चिंता नाही कसलाही धाक नाही जन्ममरणाविषयी काळजी नाही इहलोक व परलोकही आम्हास एकसारखाच झाला. सर्व ठिकाणे आम्हास वैकुंठाप्रमाणेच झाली. ३ दिवस आहे की रात्र आहे, हेही आम्हास समजेनासे झाले आहे. तुझ्या नामस्वरूपाची अखंड ज्योत अंतःकरणात लागली आहे या आनंदलहरींचे वर्णन देवा, मी करू तरी किती? या सुखाचे वर्णन किती करावे ? ४ देवा, तुझ्या नामाच्या भूषणाचे अलंकार तू मला घातले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्यामुळे आम्हास काहीही कमी पडणारे नाही. ५ ६३१ न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सांपडलो ॥ १ ॥ बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघडचा नागविलो चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥ २ ॥ तुज मागणें इतुले आतां । मज या निरवावें संतां । जाला घंटस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥ ३ ॥ अति हा निकट समय । मग म्यां करावे तें काय । दिवस गेलिया ठाकील छाय । उरेल हाय रातिकाळीं ॥ ४ ॥
होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता । ठाव तो न दिसे लपतां । बहुत चिंता प्रवर्तली ॥ ५ ॥ ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका म्हणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टोपा :- पवे-पावत नाही, ठाकील-येईल, छाव-अंधार, संधी-काळी.
अर्थ :- देवा, तुझी जयलोक प्राप्त होत नाही म्हणून मला फारच चिंता वाटत आहे रे. या माझ्या देहावर व प्रपंचाच्या वृत्तींवर पुष्कळांची सत्ता आहे. या बंधनांतून सुटका करवून घेण्याचा मी फार प्रयत्न करतो, पण मी त्यांत जास्त जास्तच गुंतत जातो. बलाढ्य अशा कर्मसत्तेच्या तावडीत मी सापडतो. १ माझ्या मस्तकावर पुष्कळच ओझे आहे. मी हा, हा देह माझा या भावनेमुळे या चोरामुळे मी नागवून उघडा झालो आहे. घरच्या घरीच असूनही माझी अशी अवस्था झाली आहे. २ देवा, तुला मागणे फक्त आता इतकेच आहे. मला तू या संतांच्या स्वाधीन करावेस. तुला विनविता विनविता माझा घसा फुटण्याची वेळ आली. मला आता निराश करु नकोस. ३ आता ही वेळही फार बिकट व कठिण आहे. यावेळी मी आता काय बरे करावे ? आयुष्याचे दिवस संपतील व संध्याकाळचा अंधार दाटून येईल आणि मग भयाण अंधाराचेच राज्य सुरु होईल. ४ मग संचित कर्माचीच सत्ता सुरू होईल. मग मी पराधीन होऊन बसेन. कुठे लपून बसावे तरी मला जागा सापडणार नाही. फारच चिंता त्यावेळी निर्माण होईल. ५ अशा या संकटाच्या वेळी हे कृपेच्या सागरा, तू धावून ये. तुकाराम महाराज म्हणतात, माझे सर्व बळ, सर्व बुद्धी, सर्व सिद्धी यांना मी तुझ्याच पायांवर समर्पित केले आहे. ६
६३२ आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥ १ ॥ येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥ २ ॥ ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीर्ति हे जगें वाणिजेते ॥ ३ ॥ घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली धार । अविनाश पर पद ऐसें ॥ ४ ॥ येयें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥ ५ ॥ केली आराणूक सकळां हातीं । धरावें धरिलें तें चित्तीं । तुका म्हणे सांगितलें संतीं । देईं अंतीं ठाव मज देवा ॥ ६ ॥
३१२ सार्थ तुकारामगाथा राहिलो आहे. सर्व लौकिक व्यवहारही सोडून दिला आहे. आपल्या अविनाशी स्वरूपाचा विचार आधी करूनच मी तुमचा आश्रय घेतला आहे. ४ या ठिकाणी धैर्य हे एकच धर्म जाणावयास हवे. या धैर्याच्या बळावर मी हा माझा देह नाशवंत व न टिकणारा आहे असाच मानला. तुझे नाम हेच एक जीविताचे सार मी मानले. ५ सर्व लौकिक वृत्तींच्याकडून सुटका करून घेऊन मी विश्रांतीस पावलो आहे. चित्तात जे धरावयास हवे ते धरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे संतांनी सांगितले तेच मी केले. आता मला जपवेस देवा, तू आश्रय द्यावास. ६ ६३३ बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होईजे ॥ १ ॥ दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ २ ॥ तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥ ३ ॥ ऐसिये पावलिलों ठायीं । आतां मी काई हों उतराई । येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझें आई पांडुरंगे ॥ ४ ॥ फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजबिलों बाळ निजस्थानीं ॥ ५ ॥ नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तीचिया ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- आतुडे-प्राप्त होते, येते, कवळ-दोष, चाडा-लोभासाठी अर्थ :- बरे झाले; मी या नरजन्मास आलो. हा एक फार मोठा लाभच मला झालेला आहे. यायोगे ईश्वरसान्निध्याच्या सर्व सुखांचा लाभ मला घेता येईल. १ ईश्वराने मला हात, पाय, कान, डोळे, मुख इत्यादी इंद्रिये दिली आहेत यांच्या उपयोगाने नारायणा, मला तुझी प्राप्ती होईल व मला जीवपणाचा व भवरोगाचा जो रोग लागला आहे तो नाहीसा होईल. २ यामुळे तिळतिळ असा पुण्याचा साठा हातून होईल व बहुत जन्मांच्या संचिताने तुझ्या नामाची जोड माझ्या वाचेस प्राप्त होईल. ३ अशा या महत्त्वाच्या ठिकाणी देवा, तुम्ही मला आणले आहे. आता याचा उतराई मी होऊ तरी कसा ? पण पांडुरंगा, तू माझी माउली असल्याने मी माझा एवढा जीव जरी तुझ्या पायी अर्पण केला तरी तो थोडाच होईल. ४ देवा, तू माझ्या डोळ्यांचा दोष नाहीसा केलास, अंतःकरणा- तील गुण-दोषांचा मळ तू धुऊन काढलास आणि तू प्रेमाने मला स्तनपान देऊन तृप्त केलेस, व या बालकाला आपल्या हृदयाशी झोपविलेस. ५ या अलौकिक आनंदास दुसरी जोडच नाही. याची नुसती हकीकत सांगताना सुद्धा गोड लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही आमच्या लोभासाठी व आमच्या भक्तीच्या कौतुकासाठी तू या सगुण आकारास आला आहेस. ६ ६३४ अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोथिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥ १ ॥ किती दोषा देऊं परिहार । गुणदोषे मळिलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार । गेला अंतपार ऐसें नाही ॥ २ ॥ विविध कर्म चौऱ्यांशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरणसांठवण ॥ ३ ॥