सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 330, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२९६ सार्थ तुकारामगाथा ६११ विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसांवा ॥ १ ॥ विठ्ठल कुळींचें दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥ २ ॥ विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥ ३ ॥ विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोयळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेलें चाळा विश्व विठ्ठले ॥ ४ ॥ विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेविण चाड नाहीं गोता । तुका म्हणे आतां नाहीं दुसरे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका - आगमनिगम-वेद व शास्त्र वित्त-सपत्ती, मात-गोष्ट, सप्त पाताळ-अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, तलातल व पाताल असे सात पाताळ अधोलोक मानक आहेत अहितळ महितळ इत्यादी आणखी सात पाताळही सांगतात अर्थ - सर्व वेदांचे व शास्त्राचे निवासस्थान असणारा हा विठ्ठल आमचे एकमेव जीवन आहे सर्व सिद्धींचे साधन हा विठ्ठलच असून तो आमचा विसावा आहे आम्ही त्याचेच ध्यान निरंतर करीत असतो १ आमच्या कुळाचे दैवत हा विठ्ठलच असून आमची सारी संपत्ती आमचे सर्व गोत आमच्या सर्व चितवृत्ती या एका विठ्ठलात सामावलेल्या आहेत आमचे पुण्य व आमचा पुरुषार्थ या विठ्ठलरूपास आहे याचीच कथा आम्हास नेहमी प्रिय वाटते २ या सर्व लोकात विठ्ठलच भरून राहिलेला असून सप्त पाताळात त्याचीच वसती आहे सर्व त्रिभुवनात विठ्ठल भरून राहिला आहे ऋषिमूनींच्या मनात हाच विठ्ठल स्थिर झालेला आहे ३ हा विठ्ठल माझ्या जीवाचा जिव्हाळा आहे हा विठ्ठल मनाने कोवळा असून कृपाळू आहे हा प्रेमाचा एकमेव पुतळा असून या विठ्ठलाने सर्व विश्वात चाळविले आहे याच्याचमुळे सर्व विश्वाचे चलनवलन होत असते ४ हा विठ्ठल मायबाप, चुलता, बहीण, भाऊ अशा सर्व नात्यानी आमच्याशी सबंधित आहे याच्याशिवाय मला दुसरे कुठलेही गोत नाही तुकाराम महाराज म्हणतात आता याच्याखेरीज दुसरे कुणीच मला नाही ५ ६१२ बरवा झाला बेवसाव । पावलो चिंतिलाचि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पायला जीव विश्रांती ॥ १ ॥ वरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिन । तुमचें जालियां दरशण । जन्ममरण नाहीं आतां ॥ २ ॥ बरवे जाले आलो या ठाया । होते सचित ठायींचा पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मौंची ॥ ३ ॥ जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ति मधुसूदन । सम चरण देखियेले ॥ ४ ॥ जुनाट जुगादिचे नाणे । बहुता काळाचें ठेवणे । लोपले होतें पारिखेपणे । ठाववळण चुकविला ॥ ५ ॥ आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी । तुका म्हणे सिणलो जगजेठी । न लवों दिठी दुसऱ्याची ॥ ६ ॥