सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 334, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३०० सार्थ तुकारामगाथा लागल्या आहेत. मांस, मलमूत्र यांचीच सर्वत्र वेष्टण असते. त्यावेळीं मी तुलाच क्षणोक्षणीं स्मरत असतो. ३ माझा मरणकाळ जवळ आला असताना, मला जवळच्या नात्याची माणसे कुणी दिसतच नाहीत. देहपतन म्हणजे माती मातीस जाऊन मिळणे; पूर्वसंचिताप्रमाणे होणे एवढेच माझ्या ध्यानात येते. ४ देवा, आता माझ्यासाठी तू एवढे कर. तुझी काही चरणसेवा मला घडावी. तुकाराम महाराज या केशवास विनवीत आहेत की, या संसाराशी माझा काही विरोध निर्माण होईल असे तू कर. ५ ६१६ अगा ए सावळया सगुणा । गुणनधिनाम नारायणा । आमची परिसा विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ॥ १ ॥ बहु या उदराचे कष्ट । आम्हांसि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥ २ ॥ जालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न फळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥ ३ ॥ येथें तों नये आठव कांहीं । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाही । हित तों कांहीं दिसेचि ना ॥ ४ ॥ जीवित्व वेचिलें वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांही व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥ ५ ॥ माझा मींच जालों शत्रु । केंचा पुत्र दारा केंचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्गुरु तुका म्हणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - गुणनधी-गुणाचा साठा, परिसा-ऐका, विज्ञापना-विनंती, पांगिला-पंगू, दारा-पत्नी. अर्थ :- अरे श्यामसुंदरा, सगुणरूपा विठ्ठला, गुणाचा साठा असलेल्या नारायणा, आमची एक विनंती तू ऐक ना. या आपल्या दीन सेवकाचा सांभाळ तू कर ना. १ मी पोट भरण्यासाठीच फार कष्ट केले. त्यामुळे आम्ही देवा, कर्मभ्रष्ट झालो. तुमच्याकडे येण्याची वाट चुकली त्यामुळे म्हणून तर मी तुमच्या दाराशी कटकट करीत उभा आहे. २ देवा, या भोवतीच्या लोकांसाठी मी पंगू बनून राहिलो आहे. आंदण दिलेल्या दासीप्रमाणे मी या संसारात वागत आहे. देवा, तू मला या दृढ अशा बंधनातून कधी सोडवशील ? मी फार बांधलो गेलो आहे रे. ३ या संसारात मला तुझी आठवण काहीच येत नाही. येथे क्षणभर देखील विसावा मिळत नाही. मी आणखी काही वासनांच्या प्रवाही पडलो तर मग मला माझ्या हिताचे काहीच दिसत नाही. ४ माझे आयुष्य तुझ्या वियोगातच खर्च झाले ना ? अनेक जन्मांचा वृथा प्रवास करावा लागला. काही व्याधी जडल्या. रोग निर्माण झाले त्यामुळे देहाची काही तोडमोडही झाली. ५ अशा प्रकारे मीच माझा प्रभू बनलो. अशा वेळी मुलगा, पत्नी, मित्र यांचा कसलाही उपयोग होत नाही. कशासाठी मग हा एवढा पसारा मी मांडला ? तुकाराम महाराज म्हणतात, अहो, जगद्गुरू, तुम्ही याचा विचार करा एकदा. ६ ६१७ आतां मज धरवावी शुद्धि । येवुनी परतवावी बुद्धि । घ्यावें सोडवूनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रों ॥ १ ॥ करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले कहणेची खाई । करीं वो आई मजवरी ॥ २ ॥ मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणें आयुष्य 'जालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥ ३ ॥ १ होतें.