सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 333, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २९९ जगदाकारें जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघें आपुलेंचि आतां । लाज आणि चिंता दुन्हायली ॥ ३ ॥ वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैंतें आपण करीं । भीड न धरी चुकल्याची ॥ ४ ॥ सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस । बहु फार्मे पुरविला सोस । आतां उदास आपल्यातें ॥ ५ ॥ करितो कबतुक लाडें । मज बोलवितो कोर्डे । मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- साई-आधार, आश्रय, वारोनी गेली-निघून गेली.
अर्थ :- आता मी सर्व सुखाना मिळवीन याच्या प्राप्तीने जे सुख प्राप्त झाले, ते इतरत्र कधी भी पाहिलेच नाही. आता परकेपणाचा भावच कुठे उरलेला नसून, सर्वत्र माहेरच्याच नात्याचा संबंध मला दिसत आहे. १ ही विठ्ठलरखुमाई अगदी माझ्या जवळ आहेत. बहीण, भाऊ, बाप, आई या सर्व नात्यांना या विठ्ठलाचाच एक आधार आहे. आता दुसरे काही नाते मी जाणतच नाही २ सर्व जगतात एकाच सत्तेचा आविष्कार आहे, हे ध्यानात येऊन माझी परतंत्रता नाहीशी झाली. आता सर्वत्र एक आपलेच रूप आहे, असे समजल्याने माझी लाज व चिंता दूर झाली ३ आता माझी इच्छा याच सत्तेच्या घरी वसत असल्याने आपल्याच स्थानी आहे असे वाटते तो करील तसे घडत आहे. आता कुणाची या चुकल्याची भीडही धरीत नाही मी. ४ आजपर्यंत मी अनेक विकारांचा सासुर- वास सोसला पुष्कळाचा त्रास पुष्कळ दिवस सहन केला अनेक इच्छांचा सोस पूर्ण झाला आता मात्र मी या सर्व लौकिक वासनाविषयी उदास आहे. ५ माझे मायबाप कौतुकाने व लाडाने मला बोलवितात. गोडगोड उत्तरांनी माझी समजूत काढतात आणि तुकाराम महाराज म्हणतात, मीही त्याच्याशी बोबड्या बोलाने बोलत असतो ६
६१५ सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला । हिंडता दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥ १ ॥ माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । सज्जन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ २ ॥ काय सांगो गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥ ३ ॥ मज चालतां प्रयाणकाळीं । असता न दिसती जवळी । मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळों संचिताचे ॥ ४ ॥ आतां मज ऐसे करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- प्रयाणकाळीं-मरणाच्या वेळेस, दावा-विरोध.
अर्थ :- सर्व प्रकारची सांसारिक सुखे मिळवीन म्हणून माझा आजवरचा जन्म गेला. एक क्षणभरही मुक्तीचा विचार भी क्यो केला नाही. उगाच वणवण फिरताना मला त्रास मात्र झाला. सर्व प्रकारच्या सासारिक मायेने माझे आयुष्य भरून गेले होते १ माझे हित कशात आहे, हे कुणीच मला सांगितले नाही. त्याचा विचार माझ्याशिवाय इतर कुणी करीत नाहीत सज्जन सोयरे जे भोवती आहेत ते सारे सुखाचेच सोबती आहेत कुणीही जन्ममरणासंबंधी विचार करीत नाहीत. २ देवा, मातेच्या गर्भातील यातनाचे काय वर्णन करू ? मला त्या भोग्ाव्या