सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 335, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३०१ आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथे म्या येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥ ४॥ करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामीं घ्यावा प्रेमा । सोडवीं भ्रमापासुनिया ॥ ५ ॥ हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं । करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका म्हणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- संघीं-संकटात, साई-छाया, पेणें-मुक्काम, धणी-तृप्ती. अर्थ :- देवा, आता माझ्या विचारांनी काही शुद्धी धारण करावी व माझ्या बुद्धीने प्रपंचापासून परतावे, सोडवून घ्यावे, असे कृपेच्या सागरा, काही तरी करा. या काळचक्राच्या संकटात सापडून मी त्रासलो आहे. १ तू मनात आणलेस तर काय करणार नाहीस ? राईचा डोंगर करशील, डोंगराची राई करुन दाखविशील. देवा, तुमच्या कृपेची छाया मजवर करा ना. हे आई, एवडी कृपा तू करावीस. २ या पूर्वीचा काळ अज्ञानपणात निघून गेला. माझ्या स्वभावातील गुणामुळे तो व्यर्थ झाला. यामुळे आयुष्य कमी होत राहिले, हेही ध्यानात आले नाही व पुढला शाश्वत सुखाचा मुक्काम दुरावला हेही समजले नाही. ३ आता मात्र माझ्या मनात भय निर्माण झाले असून दिवस एकामागून एक असे निघून जात आहेत. मी या जन्मास येऊन काय केले ? तुझ्या पायाचे स्मरण काही मनोभावे मी कधी केले नाही. ४ परंतु पुरुषोत्तमा, माझे पूर्वीचे अपराध क्षमा करावेत. तुमच्या नामाविषयी मला प्रेम द्यावे आणि या संसारभ्रमापासून मुक्त करावे. ५ तुमच्या गुणकीर्तनात माझे हृदय स्थिर व्हावे. तुमच्या पायांच्या ठिकाणीच मला स्थान मिळावे. तुमच्या नामसंकीर्तनाची गोडी वाणीने सेवन करु. तुकाराम महाराज म्हणतात, तृप्ती होईपर्यंत यात मी आता रंगून जाईन. ६ ६१८ जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥ १ ॥ जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाऊलें समचि साजिरीं । अंतरीं धरोनि राहिन ॥ २ ॥ जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ । खेळें हीं लाघव सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥ ३ ॥ जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥ ४ ॥ जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥ ५ ॥ जयाचे नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । तो हा तेजःपुंज रासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- साजिरीं-शोभिवंत, भाळ-मस्तक, कपाळ. अर्थ :- ज्या ईश्वराने मला हा शुद्ध व सात्विक असा जीव दान दिला आहे, त्याचेच चिंतन मी रोज करीत राहीन. या जगताचे जीवनच असणारा जो नारायण त्याचेच गुण मी गात राहीन. १ तोच देव या भिवरा नदीच्या काठावर कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्याची एकसारखी पावले अतिशय शोभिवंत अशी असून तोच मी माझ्या चित्तात धारण केली आहेत. २ हा विठ्ठल असुराचा, दुष्ट लोकांचा काळ असून आपल्या भक्तांचा सांभाळ मोठ्या