भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 363, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 363

शूर तों तयासी बोलिजे जाणा । पाठोशीं घालुनि राखे दीना । पार पुण्य नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥ ४ ॥ आतां पुढें बोलणें तें काई । मज तारोसी तरीच सही । वचन आपुलें सिद्धी नेईं । तुका म्हणे तईं मज कळसी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- मात-गोष्ट, मंधीपणें-चांगल्या पंथानें, तईं-तेव्हांच. अर्थ :- देवा, पांडुरंगा, तुमच्याशी काही एक गोष्ट एकान्तात करायची आहे. ती अशी की, आमचे कर्म जर आम्हांस तारणारे आहे, तर मग तू उचित असे काय करणार आहेस ? १ उसने घ्यायचे व मग ते फेडायचे, हा कुठला धर्म ? आम्ही चांगले कर्म करायचे व मग तुम्ही ते परतफेडीसाठी कृपा करुन मोजायचे, हा कसा धर्म होईल? लोकांना तरी हे पटेल का ? याचे भूषण मिरविण्यात काय अर्थ ? उगाच जगात मोठेपण कशासाठी मिरविता ? २ ज्यास खायला मिळत नाही त्यास ते द्यावे. न बोलाविता जो येईल त्यास दान दिल्यास तेच उचित होईल जरी काही देणेघेणे नसले तरी, धनाची आशा नसली तरी, चांगल्या पंथाने औपधोपचार करून उपकार करावेत. ३ जो दीन लोकांना पाठोशी घालून रक्षितो, तोच शूर मानावा. नारायणा, याच माणसाच्या पुण्याईस काही सीमा नाही, त्याच्या भूषणाला अंत नाही. हे माझं बोलणे देवा, सत्यच माना तुम्ही. ४ आता यापुढे बोलायचे तरी काय ? तू मला योग्य प्रकाराने तारशील तरच खरे. तुकाराम महाराज म्हणतात, आता तू आपले पतितपावन हे नाव सिद्धीस ने. त्याच वेळेस तू पतितपावन आहेस असे मी जाणीन. ५ ६५७ चांगलें नाम गोमटें रूप । निवतो डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प अत्ति सार ॥ १ ॥ शस्त्र हे निर्याणीचा वाण । निकट समय अवसान । कोठें योजेल दश दान । संडी नारायण दुःख चिंतनैं ॥ २ ॥ सकळ श्रेष्ठांचें मत । पाये सिद्धी पावती अनंत । म्हणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढेंच ॥ ३ ॥ म्हणोनि रुसलों संसारा । सर्प विखार हा पांढरा । तुजशीं अंतर रे दातारा । याचे दावेदारांनिमित्त ॥ ४ ॥ येणें मज भोगविल्या' खाणीं । नसतां छंद लाविला मनीं । माजलों मी माझें श्रमणीं । जाली वोडणी विटंबना ॥ ५ ॥ पावलों केल्याचा दंड । प्राणी भोगविल्या उदंड । आतां केला पाहिजे षंड । तुका दंडवत घाली देवा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- गोमटे-गोरे, सुरेख, निर्याणींचा-शेवटच्या प्रसंगाचा, अवसान-देहाचा शेवट, दशदानें- गाय, भूमी, तीळ, सुवर्ण, तूप, वस्त्र, गूळ, लवण व गृह ही दहा दाने आपल्या धर्मग्रंथात सांगितली आहेत, संडी-दूर करितो, वोडणी-नालस्ती. अर्थ :- या श्रीहरीचे नाम व रूप चांगले देखणे व सुरेख आहे. हे पाहताच डोळे निवून जातात. पाप संपते. विठ्ठल विठ्ठल हा जप उघड असून अतिशय लहान व सारभूत असा आहे. १ आयुष्याच्या अखेरी अखेरीस तर हे नाम म्हणजे शरीराचा अंत जवळ आला असताना योजावयाचे शस्त्रच होय या श्रीहरीच्या नामापुढे दशदानांचीही १ भोगिल्या. तु. गाथा....४२

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 363, कुल 611 में से · BharatKosha