भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 364, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 364

३३० सार्थ तुकारामगाथा किंमत फारशी नाही या नारायणाच्या चिंतनाने संसाराचे दुःख दूर होते २ सर्व श्रेष्ठ साधुसंतांचे हे असेच मत आहे या नामामुळे सर्व सिद्धी व अनंतरूप हरी याची प्राप्ती होते म्हणून या श्रीहरीस त्याच्या नामरूपाच्या साह्याने शरण जावे एवढेच उचित असे करण्यासारखे आहे ३ हा संसार म्हणजे एक पांढरा विषारी सर्प असून देवा दातारा, याच्यामुळे तुझमध्ये व आमच्यात फार अंतर पडते असा हा रूपरूपी संसार मोठा दावेदार असल्याने मी त्याच्यावरच रुसलो आहे ४ याच संसाराच्या मोहामुळे मला नाना जन्म भोगावे लागले नाना नतरपा छंदांस याने मला लाविले, आणि याच्याच भ्रमात मी भ्रमण करीत राहिलो या कामी माझी फार नालस्ती व विटंबना झाली देवा ५ मी या संसाराच्या नादाने जे जे केले त्याचा पुरेपूर दंड मला मिळाला यामुळे पुष्कळ जन्माच्या खाणी मला भोगाव्या लागल्या तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मात्र याचा शेवट व्हावयास हवा देवा तुमच्या पायावर माझे अनेक दंडवत आहेत ६

६५८ चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचेचि नाम । दयाळु तरी अवघा धर्म । मला तरी दासा श्रम होऊ नेदी ॥ १ ॥ उदार तरी लक्ष्मीपेसी । जुझार तरी कळीकाळासी । चतुर तरी गुणाचीच रासी । जाणता तपासी तो एक ॥ २ ॥ जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अबळाभुलयणा ॥ ३ ॥ गाढचा तरी भावाचा अंकित । बराडो तरी उच्छिष्टाची प्रीत । ओगळ तरी कुब्जेंशीं रत । भ्याड अनंत बहु पापा ॥ ४ ॥ खेळतो येणेंचि खेळावा । नट तो येणेंचि अवगावा । लपोनि जीवीं न कळे जीवा । धरिता देवा नातुडेसी ॥ ५ ॥ उच तरी बहुतचि उच । नीच तरी बहुतचि नीच । तुका म्हणे बोलिलों साच । नाहीं अहाच पूजा केली ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा - गाढचा-गावडळ बराडो-जागाळभूत आवगावा-अंगी आणावा, नातुडेसी-सापडत नाहीस आहाच-उगीच व्यथ

अर्थ - हा देव फार चांगला म्हणून याचे वर्णन करावे, तर तो प्रत्यक्ष पूर्णकामच आहे याचे नावही गोड असल्याने त्या गोडीचे वर्णन काय करावे ? हा दयाळू आहे म्हणावे तर, सर्व धर्माचे सार जे दयाळुत्व हे तोच आहे यास भला तरी किती म्हणावे ? हा आपल्या दासांना काहीही श्रम होऊ देत नाही १ हा मोठा उदार आहे याचे घणन करावे तर प्रत्यक्ष लक्ष्मीच याची दासी आहे याच्या शौर्याचे वर्णन करावे तर, हा कळीकाळास म्हणजे प्रत्यक्ष यमासही अतिशय आहे याला चतुर म्हणावे तर, हा एक गुणांचीच रास आहे त्याला जाणणारा तो एक स्वतःच आहे २ हा देव जुनाट म्हणून याचे वर्णन करावे तर त्याच्या लीलेचे वर्णन पुष्कळ काळातही करता येण्यासारखे नाही हा नेणता असून गवळ्यारूपात गवळी होऊन राहिला आहे आणि लाघवीपणात तो एवढा चतुर आहे की, त्याने सर्व गोपीना भुलविले आहे ३ हा देव गावडळ म्हणावा तर तो भक्तिभावामुळे वश होणारा असला हा अतिशय आशाळभूत असून भक्त लोकाच्या उच्छिष्टाचे यास मोठच प्रेम असते हा देव इतका ओगळ की आठ ठिकाणी वक्र असणाऱ्या कुब्जेशी हा रममाण झाला असून, अनंत पापे करणाऱ्याना हा अतिशय भयदायक आहे ४ नाना प्रकारचे खेळ ते याच देवाने खेळावेत नाना प्रकारची अभिनयाची सोंगे यानेच अंगी आणावीत हा जीवाच्या मध्ये लपून राहिलेला असल्याने कुणास कळून येत नाही याला धरायला जावे तर, हा कुणाच्याच हातात सापडत