भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 365, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 365

सार्थ तुकारामगाथा ३३१ नाही ५ हा देव उच्च म्हणावा तर फार उच्च आकाशाएवढा आहे लहान म्हणावा तर अणुरेणुपेक्षाही लहान आहे तुकाराम महाराज म्हणतात, हे जे मी सागितले आहे, ते सर्व खरेपणाचे असून उगीच व्यर्थ स्तुती केली असे नाही ६ ६५९ काय आम्ही भक्ति करणे कैसी । काय एक वाहावे तुम्हासी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपीं गंधीं ॥ १ ॥ कसे करु इंद्रिया बंधन । पुण्यपापाचे खंडण । काय व्रत करु आचरण । काय तुजविण उरले तें ॥ २ ॥ काय डोळे झाकुनिया पाहू । मंत्रजप काय ध्याऊ । कवणे ठायी धरुनि भाव । काय ते याव तुजविण ॥ ३ ॥ काय हिंडो कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवू कैसा । काय तू नन्हेसि न कळे तैसा¹ । काय मी कैसा पाहो आता ॥ ४ ॥ तुझिया नामाची सरुळ । पूजा अर्चन मन माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । घेऊ पुष्पांजुळ तुका म्हणे ॥ ५ ॥

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 365, कुल 611 में से · BharatKosha