भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 366, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 366

शरीर उत्तम चांगले । शरीर सुखाचें घोसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साघलें परब्रह्म ॥ २ ॥ शरीर विटाळाचें आलें । मायामोहपाशजाळें । पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥ ३ ॥ शरीर सकळ हे शुद्ध । शरीर निधींचा ही निघ । शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगो देह शरीरा ॥ ४ ॥ शरीर अविद्येचा वाधा । शरीर अवगुणाचा राधा । शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा १ एक शरीरीं ॥ ५ ॥ शरीरा सुख नेदावा भोग । न द्यावे दु:ख २ न करी त्याग । नव्हे चोखटें ना चाग । तुका म्हणे येग करी हरिभजनीं ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा — धार-ठिकाण, स्थान, घोसुलें-घट, सुदा-चांगला, येग-जलदीने

अर्थ - हे शरीर म्हणजे दुःखाचे कोठारच होय शरीर हे अनेक रोगाच्या निवासाचे भांडारच होय शरीर हे अनेक धार्णीचे आधारस्थानच होय या शरीराएवढे अपवित्र काय आहे ? १ पण शरीर हे अतिशय उत्तमही आहे. शरीर म्हणजे अनेक सुखाचा घडच्या घड मानावा याच शरीरामुळे जे मनात धरावे ते साध्य होते परब्रह्माची साधनाही याच शरीराच्या साह्याने करावची असते २ हे शरीर म्हणजे विटाळाचे गोठलेले आळेच समजावे माया, मोह, पाश याचे जाळे म्हणजे हे शरीर समजावे या शरीराच्याचमुळे पतनाचा, स्खलनाचा प्रसंग येतो या शरीरावर काळाची नजर एकसारखी असते ३ हे मानवी शरीर अतिशय शुद्ध आहे शरीर हे सर्व धनाध्या साठ्याचा साठा आहे याच शरीरामुळे संसाराची बंधने तुटतात याच शरीराच्या मध्यभागी देवाची वस्ती असते ४ हे अविद्येचा वाघा म्हणजे साठाच होय साऱ्या दोषाचे रसायन या शरीरात असते या शरीरात फारच बाधा निर्माण झालेल्या असतात या शरीरात एकसुद्धा चांगला गुण नाही ५ म्हणून या शरीराला नाना प्रकारचे भोग देऊन सुख देऊ नये त्याचा त्याग करून दुखही देऊ नये तर तुकाराम म्हणतात, स्वतः शरीर आपण होऊन चांगलेही नाही व वाईटही नाही त्यास त्वरेने हरिमजनाकडे लावावे, म्हणजेच त्याचे रूप चांगले निर्माण होईल ६

विवरण — पंचमहाभूतांचा बनलेला हा गोळा म्हणजे शरीर मानवाच्या उदरात नऊ मास अत्यंत हाल सोडून याचा जन्म झाला याच्यात वाह्य त्याचा मग थाट सुरु झाला याच चोचले सुरू झाले याचीच किमत वाढली देहात्म- भावच वाढून बसला या देहामध्ये निवास करणारा दुसरा कुणी धनी आहे, हे विसरून हा देहधारी मनुष्य पंचविष- यातच रममाण झाला म्हणून साधुसंतांनी या देहाची भरपूर विटंबना केली दिसेल हा देह म्हणजे मलमूत्राचे कोठार, दुर्गंधीचा नाठा, असे वर्णन वाचून गत ह गरीग्गोईयांचे, देहाच्या लावण्याचे हप्ते होते, अशा गैरसमज होण्याचा संभव असतो संतांना देहान मागाहून मान्य होक, त देह हा एक परमार्थसाधनाचा, ईश्वरप्राप्तीचा सर्वोत्तम उपाय म्हणून याच मानवी देहाच्या साह्याने आपणास आपण वितू ती वस्तू गाधून करून घेता येते ईश्वरप्राप्तीचे एव पार महत्त्वाचे अस साधन म्हणून या शरीराकडे पाहिल्यास या शरीराइतके उत्तम दुसरे काय आहे ? अशाच प्रवृत्त सर्व मत विचारीत असताना दिसतील निवृत्तीनाथांनी 'देहीं देव आहे हैं बोलती वेद', 'निवृत्ती पहातु देहामाजी झातु देहोचि विसत्रु सर्वांठायीं' अशा शब्दात देहाच महत्त्व वर्णन वेडे आहे या देहामध्ये देव पाहण्यास शिकणे हे खरे सार आहे 'नरदेह परमपावन । तरी साधी ब्रह्मज्ञान', 'देह सांडाया ना मांडावा । येने परमायुंधि साधावा' असाच निर्वाळा एकनाथांनी दिलेला आहे 'देहिं देव्हिली पडरी' हे नामदेवाना लाभलेले सुख देहामुळेच ना ? 'धन्य धन्य तें शारीर । जेथ कथा निरंतर,' 'नरदेह उत्तम चांग । घरा वाग कीर्तनाची' या शब्दान्नी एकनाथांनी या नरदेहाचे माहात्म्य वर्णन केले आहे

१ सुघा, २ सुड