सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 367, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३३३ समर्थ रामदासांनी संसारदुःखाचे व नरदेहाचे अत्यंत किळसवाणे असे वर्णन केले असले तरी, सिद्धान्त सांगताना त्यांनी देहाची प्रतिष्ठा मान्य करून या दुर्लभ देहाचा यथायोग्य उपयोग कसा करावा तेच मागितले आहे. 'धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो । जो जो कीजे परमार्थ लाहो । तो तो पावे सिद्धीते' या भाषेत नर- देहाचे महत्त्व वर्णन करून समर्थांनी म्हटले आहे, 'नरदेह पांगुळ असतां । तरी तो कार्यास न येतां । अथवा थोटा जरी असतां । तरी परोपकारास न ये' या शब्दावरून शरीराचे ध्येय काय असावे हेही ध्यानात येणारे आहे. हे शरीर अस्थिमांसाचा पुतळा असले तरी, याच्याच साहाय्याने आपण सर्व कलांत निपुण होऊन ईश्वरनिष्ठ व्हायचे असते. 'अस्थिमांसांचा पुतळा । जेणे ज्ञानें सकळा फळा । शरीर भेद वेगळा ठाईं ठाईं ।' असा समर्थांचा या शरीराविषयी विवेक आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, हे शरीर स्वतः होऊन काही चांगले अथवा वाईट नाही. ते ईश्वराच्या भजनास लावावे, परमार्थप्रवण करावे, म्हणजे ते 'सुखाचे घोसुलें' कसे आहे याची प्रतीती येईल ६६१ इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥ १ ॥ न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुतस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥ २ ॥ जनमित्र होईं सफळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥ ३ ॥ कर्रिसी देवाविण आस । अवघी होईल निरास । तृष्णा वाढविसी बहुतस । कधीं सुखास न पवसी ॥ ४ ॥ धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हाचि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर¹ तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- भलत्या परी-कोणत्याही प्रकाराने, बहुतस-पुष्कळ. अर्थ - कोणत्याही प्रकाराने का होईना, पण तू इतके तरी कर. दुसऱ्याचे द्रव्य व दुसऱ्याची स्त्री यांची इच्छा सोडून दे आणि मग खुशाल सांसारिक व्यवहार कर. १ दांभिकपणे कुठलेही प्रयत्न करू नकोस. पुष्कळ शांतता धारण कर. जिव्हेने हरिनामाच्या सुगंधाचे सेवन कर. रामनामाच्या उच्चारात आळस करू नकोस २ सगळ्यांचा जिवलग मित्र हो. वाणीने अशुभ उच्चार कधी करू नकोस. वाईट लोकांची संगत कधी धरू नये. संतानी सांगितलेल्या भक्तिमार्गाने जाण्याचा तू प्रयत्न कर. ३ देवावाचून, जर काही इतर इच्छा करशील, तर मात्र मग तुझी निराशा होईल फार. फार तृष्णा वाढविलास तर मग कधीच सुख तुला होणार नाही ४ श्रीहरीवर विश्वास ठेवून मोठ्या धीराने वर्तन कर. सर्व काही करणारा हा देवच आहे, असा विश्वास मनात धारण कर. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव आपल्या योगक्षेमाचा भार वाहतो, काही कमी पडू देत नाही. ५ ६६२ संसारसिंधु हा दुस्तर । नुलंघवे उल्लंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगेचि तीर पैल थडी ॥ १ ॥ किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवर्ती भोवरा । बहुता थोरा धोळसिपा² ॥ २ ॥ वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली घरिली शुद्धि । मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनियां ॥ ३ ॥ १ अंतपार, २ धोळंडिया.