भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 368, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 368

३३४ सार्थ तुकारामगाथा अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचाचि थारा । बालत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥ ४ ॥ ऐसो उलघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलो काळें । आतां हे उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥ ५ ॥ सांडीन या संसाराची वाट । बहु येणे सोसविले कष्ट । दावी सत्या ऐसे नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट जालो देवद्रोही ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- दुस्तर-तरून जाण्यास कठिण, गणित-हिशेब, आवर्ती-चक्रात, खाणी-योनी, जन्म, भोवंडिले-दमविले, उगवावे-मुक्त व्हावे अर्थ - हा संसाररूपी सागर तरून जाण्यास फार कठिण असा आहे हा ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला तरी तो ओलांडिता येत नाही आजवर पुष्कळच या संसारसागराच्या पुरातून वाहून गेले त्यांना पैलतीर हाती लागलाच नाही १ देवा, कित्येक जन्माचा फेरा चालू आहे हातांरा, याचा काही हिशेबच नाही मजजवळ, या जन्माच्या चक्रात मी अवचितपणे सापडलो आहे फार मोठ्या संकटांतून फिरतो आहे २ माझे वय वाढले, पण त्या मानाने बुद्धी काही वाढली नाही. मी अज्ञानीच राहिलो माझ्या बुद्धीने परमार्थाविषयी काही आस्था धारण केली नाही अशा अवस्थेत मी परमार्थाविषयी विचार तरी कधी करावा ? ३ अनेक जन्मांतून आहार, झोप, भय, मैथुन याचीच वस्ती झाली बाल्य, तारुण्य, वृद्धत्व, यातून भोगनाच प्राधान्य म्हणत मिळाले ४ अशा प्रकारच्या अनेक जन्माची स्थळे उल्लघून मी आलो पण या काळाने मला फार दमविले आता या प्रपंचाच्या जाळयातून मुक्त व्हावे व दिवसाच्या साहाय्याने सुटका करून घ्यावी असे वाटते ५ आता या संसाराचा मार्ग मी सोडूनच देणार आहे या प्रपंचमोहाने फार कष्ट झाले मला तुकाराम महाराज म्हणतात, हा नष्ट, दुष्ट संसार खोटा असून खऱ्यासारखा भासतो, आणि त्यामुळेच देवाचा द्रोह करून आपण भ्रष्ट झाल्यासारखे होतो ६ ६६३ विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥ १ ॥ विठ्ठल स्मरणा कोवळा । विठ्ठल गौरवी आगळा । आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीलाविग्रही ॥ २ ॥ उभाचि परी न मनी सीण । नाही उद्धरिता भिन्न । समर्थांचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥ ३ ॥ रुचीचे प्रकार । आणिताती आदरें । फोटें ही न पडे अंतर । थोरा थोर धाकुट्या धाकुटा ॥ ४ ॥ करिता बळ धरिता नये । शोभता डोळे मनेच होय । आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥ ५ ॥ पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तो नाहीं भरिले रिते । करितो सेयन आइतें । तुका म्हणे चितें चित्त मेळवूनी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- दानाविसीं-दानाविषयी, आर्तभूता-दुःखी झालेल्या प्राण्यांना अर्थ - हा आमचा विठ्ठल देव भीमातीरावर निवास करून पंढरपुरात उभा आहे पुंडलिकापाशी हा तिष्ठत उभा आहे. भक्तांच्यावर कृपा करण्यासाठी हा फार उदार आहे १ हा विठ्ठल स्मरण करणारांना अतिशय कोवळा असून, त्याचा आणखी गौरव करणे कठिण आहे या गौरवाच्या पलीकडे तो आहे साऱ्या ब्रह्मांडास त्याचा आधार