सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 370, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३३६ सार्थ तुकारामगाथा कान्होबा० नाट अभंग ८ ६६५ अगा ये वैकुंठनायका । अगा ये त्रैलोक्यतारका । अगा जनार्दना जगव्यापका । अगा पाळका भक्तांचिया ॥ १ ॥ अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा । अगा बळिवध वामना । अगा निधाना गुणनिधी ॥ २ ॥ अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा । अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥ ३ ॥ अगा महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा । अगा सुदरा सहस्रभुजा । पार मी तुझा काय वर्णू ॥ ४ ॥ अगा अवतारांपरंपरा । निरालबा' निर्विकारा । अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनांचिया ॥ ५ ॥ अगा धर्मराया धर्मशीळा । कृपासिंधु कृपाळा । अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ॥ ६ ॥ अगा चतुरा सुजाणा । मधुरांगिरा सुलक्षणा । अगा उदारा असुरमर्दना । राखें शरणा तुकयाबंधू ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा - निधाना-साठा, पार-अंत मधुरांगिरा-मधुरवाणी असलेला असुरमर्दना-असुरांचा नाश करणारा अर्थ - अरे वैकुंठनायका, माझे रक्षण करण्यास तू ये अरे त्रैलोक्याचे रक्षण करणाऱ्या देवा, अरे जनार्दना, सर्व जगास व्यापून राहणाऱ्या देवा भक्तांचे पालन करणाऱ्या देवा, मी तुला शरण आहे १ अरे वसुदेवदेवकीच्या मुला, अरे गोपिकांच्या रमणा अरे बळिराजास बांधून नेणाऱ्या वामना, अरे अनेक गुणांच्या साठ्या, मी तुला शरण आलो आहे २ अरे द्रौपदीच्या सख्या अरे मित्रा पांडवा, अरे माझ्या जीवाच्या जीवा अरे माधवा, अरे मधु नावाच्या दैत्याचा नाश करणाऱ्या मधुसूदना, मी तुला शरण आलो आहे ३ अरे महेश्वरा, अरे महाराजा, अरे श्रीहरी, ज्याच्या ध्वजावर गरुडाचा निवास आहे, अशा गरुडध्वजा, अरे सुंदरा, अरे हजार हाताच्या सहस्रभुजा, तुझ्या स्वरूपवर्णनास अंत नाही त्याचे मी काय वर्णन करू ? ४ अरे देवा, अवतारांची परंपरा तुझ्यापासूनच आहे तुला कुठलाही आधार नसल्याकारणाने तू निरालंब आहेस, तू निर्विकार आहेस अरे हातावर गोवर्धन धारण कर- णाऱ्या धरणीधरा अरे दीनांच्या माहेरा मी तुला शरण आलो आहे ५ अरे धर्मराया अरे धर्मशीला, तू कृपेचा सागर आहेस अरे प्रेमाच्या कल्लोळा तू सर्व कलांत प्रवीण आहेस ६ अरे चतुरा, सुजाणा, अत्यंत गोड वाणी असणाऱ्या मधुरांगिरा, सुलक्षणा, अरे उदारा, अरे असुरांचा नाश करणाऱ्या असुरमर्दना, हा तुकयाबंधू तुला शरण आला आहे त्याचे रक्षण तू कर ७ विवरण - नाटाच्या या प्रसिद्ध अभंगातील या पुढचे महालात अभंग तुकयाबंधू या मुद्रेन अंकित झालेले आहेत तुकयाबंधू याचे दोन अर्थ होऊ शकतात एक तुकारामबुवांचे धाकटे बंधू कान्होबा यांचे तरी हे अभंग असावेत, किंवा तुकयाबंधू म्हणजे भक्तजनांचा बंधू तुकोबा असाही अर्थ असणे संभवनीय आहे तुकारामांच्याच विचारांची छाप याही अभंगावर दिसते मागे अभंग क्र० ६४६ मध्ये ज्याप्रमाणे तुकारामबुवांनी अतिशय अव्यंग, मनोहर आणि साभिप्राय विशेषणे या संवाद्यन वापरून भाव व्यक्त केला आहे, त्याचप्रमाणे याही अभंगात तुकयाबंधू कान्होबा यांनी ईश्वराशी आपलं नाते वर्णन केले आहे १ निरालंब