सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 379, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३४५ असणाऱ्या पक्ष्याची करुणरम्य कथा बुवांनी सांगितलेली आपण पाहिली आहे. आता येथे पारध्याच्या तावडीत चहू बाजूंनी सापडलेल्या एका हरिणाची व त्याच्या गोजिरवाण्या शावकाची तितकीच करुण कहाणी अत्यंत संक्षेपाने बुवांनी येथे निवेदन केली आहे. शिकारी श्वान, स्वतः पारधी, जाळी व वणवा या चहूबाजूंन्या संकटातूनही ईश्वर कसे रक्षण करितो, याचा एक समर्थ दिलासा भाविकांना तुकारामबुवांनी दिलेला आहे. ६७९ आशाबद्ध वक्ता । धाक१ श्रोतयाच्या चित्ता ॥ १ ॥ वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥ २ ॥ बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥ ३ ॥ माप तैसी गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धाक-धास्ती, भीती, गोणी-धान्याचे ओझे अर्थ:- ब्रह्मज्ञान किंवा परमार्थनिरूपण करणारा वक्ता जर आशाबद्ध असेल, त्याला जर लौकिकाची आशा असेल, अथवा श्रोत्यांच्याकडून आपणांस काही मिळावे, असा जर त्याला लोभ असेल, तर त्याचे निरूपण ऐकणाऱ्याच्या चित्तास धास्तीच वाटते १ त्याचे भजन व त्याचे निरूपण यामुळे वायाच जाते. कारण या ठिकाणी सर्वांचेच मन लोभात गुंतलेले असते. २ एक वक्ताच बहिर्मुख असल्यामुळे तो व त्याचे श्रोते दोघांचीही गती तशीच होते. ३ धान्याच्या गोणीत, ओझ्यात जे असेल तेच मापात येणार ना ? तुकाराम महाराज म्हणतात, दोनही वस्तु रिकाम्याच असल्यावर मग उपयोग काय ? ४ ६८० विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव या जगाचा ॥ १ ॥ विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ २ ॥ विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥ ३ ॥ विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥ ४ ॥ विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सोस घेतला जीवें ॥ ५ ॥ विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये२ कां झडकरी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा:- कोड-हौस, सोस-ध्यास अर्थ- विठ्ठला, तू उदाराचा राजा आहेस रे. या सर्व जगाचा प्राण आहेस. १ सर्व उदारांची तू रास असून तुझ्यापाशी सर्व प्रकारच्या सिद्धी असतात. २ विठ्ठला, तुझे नाव अतिशय गोड असून तू भक्तांची सर्व हौस पूर्ण करतोस. ३ विठ्ठला, तुझे श्रीमुख फारच शोभायंत व चांगले असून त्याच्या ध्यानात माझे चित्त गुंतून गेले आहे. ४ विठ्ठला, या माझ्या वाचेने तुझेच नाम निरनिराळ्या रसांत घेतले आहे. विठ्ठला, तुमचाच ध्यास या माझ्या जीवाने एकसारखा घेतला आहे. ५ विठ्ठला, हा तुका तुझ्यासाठी शोक करीत असल्याने तू लवकर येऊन माझे रक्षण का करीत नाहीस ? ६ ६८१ बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटाळिलों ॥ १ ॥ एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निवडीलें ॥ २ ॥ जालीं दोनी नामें एकाचि मथनीं । दुसरिया गुणीं वेगळालों ॥ ३ ॥ तुका म्हणे दाखविल्या मुक्ताफळां । शिपलेचि स्वस्थळीं खुंटलिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेटाळिलों-गुंतलो होतो अर्थ :- या बाह्य संसारात मी गुंतून गेलो होतो. पण मी आपल्या कर्तव्याच्या जोरावर सुखरूपपणे बाहेर पडलो. १ आता पुन: संसारात गुंतणार नाही. ताकातून एकदा लोणी बाहेर काढले की, ते परत काही १ भय, २ येगा. तु. गा...४४