सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 380, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३४६ सार्थ तुकारामगाथा त्याच्यात मिसळत नाही. तशी माझी अवस्था झाली आहे. २ ताक व लोणी ही दोन्ही नावे एकाच मंथनातून झाली, किंवा सार व असार असा भेदही एकाच्याचमुळे झाला असला, तरी वरवरच्या गुणांमुळे दोन वेगळी दिसतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, शिंपल्यातून एकदा मोती वेगळे काढून दाखविल्यावर मग शिंपला जरी जन्मठिकाण असला तरी तो मोती काही त्याच्याशी पहिल्यासारखा जडला जात नाही. तसे संसाराशी माझे नाते पुनः काही जडणार नाही. ४
६८२ वरवा वरवा वरवा रे देवा तूं । जीवाहूनि आवडसी जीवा रे देवा तूं ॥ १ ॥ पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ २ ॥ अष्ट अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वर्णितां लक्षण रे देवा ॥ ३ ॥ मन जालें उन्मन अनुपम ग्रहण¹ । तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वरवा-चांगला, तनु-शरीर, अनुपम-दुसरी तुलना नसलेले. अर्थ :- देवा, तू फारच चांगला आहेस रे. म्हणूनच तू आम्हांस आमच्या जीवापेक्षाही आवडतोस. १ तुझे शोभिवंत मुख पाहताच आमचे डोळे तृप्त होतात. तुझे गुण ऐकून कान संतुष्ट होतात. २ तुला पाहताच, तुझी सर्व लक्षणे वर्णन करू लागताच देवा, माझ्या अष्टांगातील ताप व मनाचा शीण नाहीसा होतो ३ तुझ्या या अतुलनीय रूपलावण्याची शोभा पाहून माझे मन उन्मन होऊन गेले आहे. तुकयाबंधू म्हणत आहे, देवा, तुझा महिमा काही ध्यानात येण्यासारखा नाही. ४
६८३ सोइरियासि करी पाहुणेरु बरा । काढितो ठोंवरा संतांलागीं ॥ १ ॥ गाईसि देखोनि बदबदा मारी । घोड्याची चाकरी गोड लागे ॥ २ ॥ पानफुल वेश्येसी नेलसे उदंड । देखों² नेदी खांड ब्राह्मणासी ॥ ३ ॥ बाइलेच्या गोता आवडीनें पोसी । माता पितियासी दवडितो ॥ ४ ॥ तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावाया ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- पाहुणेरु-पाहुणचार, ठोंवरा-बडगा. अर्थ :- हा अधम मनुष्य पाहा कसा आहे चांगले श्रीमंत नातेवाईक आले की, त्यांना मनापासून पाहुणचार करितो, व दारात साधुसंत पाहताच त्यांच्या पाठीमागे बडगा घेऊन लागतो. १ गरीब बिचारी पवित्र गाय पाहताच तिला एकसारखा मारीत बसतो, पण धन्याच्या घोड्याची मात्र मनापासून सेवा करीत असतो. २ वेश्येला मात्र कौतुकाने व प्रीतीने पानफूल देऊन तिचे गुणगान हा करतो; पण ब्राह्मणाला मात्र फुटके सुपारीचे खांडही कधी याच्या हातून मिळणार नाही. ३ प्रिय असणाऱ्या बायकोच्या नातेवाईकांना हा मोठ्या आवडीने पोशीत असतो; पण स्वतःच्या आईबापांचा मात्र याने त्याग केलेला असतो. ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांच्या तोंडावर थुंकून त्याचा धिक्कार करावा. यमलोकीचे भोग भोगायलाच तो गेलेला असतो ५
विवरण :-केवळ संसारावर आसक्त होऊन बेताल बनलेल्या माणसाची जशी चित्रे तुकानी अनेक काढली आहेत त्याचा कडक शब्दात निषेधही केलेला आहे त्यानी हाच अभंग पुढे क्र १८४९ व ४२९६ म्हणून थोडयाफार ओळीच्या फरकानी पुन आलेला आहे
६८४ सोलीय जें सुख अतिसुखाहुनि । उमें हें³ अंगणीं वैष्णवांच्या ॥ १ ॥ वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ २ ॥ भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥ ३ ॥
१ अनुपम्प गहन, २ देखो, ३ तें.