भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 381, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 381

सार्थ तुकारामगाथा ३४७ नामओघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥ ४ ॥ तुका म्हणे मोक्ष भक्तांचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सोलीव- अस्सल, गाभ्यातील. अर्थ :- गाभ्यामधील असल्याप्रमाणे अस्सल सुखाचा जो भाग अति सुखाहूनही मोठा असून तो वैष्णवाच्या अंगणांत उभा आहे. १ या वैष्णवांच्या अंगणांत तुळशीवृंदावन असून सडासंमार्जन केले आहे. नाना प्रकारांच्या सुंदर रांगोळ्या काढून चौक भरले आहेत. हा सर्व थाट पाहून देव मोठ्या आनंदाने येथे नाचतो. २ हा विष्णु- भक्त नेहमींच मुद्रा व गळ्यात तुळशीची माळ या अलंकारांनी सुशोभित झालेला असतो. ३ अमृताचे सार असे असणारा नामाचा ओघ त्याच्या मुखात असतो व देवाच्या पायांवरील धूलिकणानी याचे मस्तक सहजच पवित्र झालेले असते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांच्या मनांत मोक्षाची चुकून देखील इच्छा नसते उलट मोक्षच यांची इच्छा करीत असतो. ५ ६८५ तीर्थे केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥ १ ॥ जळो त्याचें ज्यालेंपण । न देखेचि समचरण ॥ २ ॥ योग याग अनंत केले । नाही समचरण देखिले ॥ ३ ॥ तुका म्हणे विठ्ठलपायीं । अनंत तीर्थे घडलीं पाहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- ज्यालेंपण-जन्म, जगण्याची स्थिति. अर्थ :- कुणी कोट्यवधी तीर्थयात्रा केल्या, पण पंढरपूर मात्र पाहिले नाही, १ तर त्याच्या जगण्याला आग लागो. काय त्याचा उपयोग ? कारण त्याने विटेवर उभ्या असलेल्या श्रीविठ्ठलाचे समचरण पाहिलेले नसतात. २ पुष्कळ यज्ञयाग केले आणि पांडुरंगाचे समचरण पाहिले नाहीत, तर काय त्यांचा उपयोग ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठलाच्या चरणांच्या दर्शनाने अनंत तीर्थयात्रा केल्याचे सार्थक आहे ४ ६८६ कोणतें कारण राहिलें यामुळे । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥ १ ॥ नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ २ ॥ नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी । अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या ॥ ३ ॥ हें तौं तुज कळों येतसे अंतरीं । लाखणीक' वरी साच भाव ॥ ४ ॥ तुका म्हणे देवा नासियंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- लाखणीक-लबाडी. अर्थ :- देवा, असे कोणते कारण उरले आहे की, ज्यामुळे मी तुला मुद्दाम बळेच कष्ट द्यावेत ? १ माझा काही जीव जात नव्हता, की कसली हानीही होत नव्हती हे सहज मनात आठवले इतकेच. २ मला कसलीही चिंता नव्हती, की मी काही उपाशी मरत नव्हतो; किंवा गाई म्हशी याची प्राप्ती व्हावी असेही मला वाटत नव्हते. ३ देवा, हे तर सर्व तुला तुझ्या मनात ठाऊक आहेच. माझ्या मनात खरा भाव आहे, की सर्व लबाडीच आहे हे तुला समजते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व गोष्टी नाशवंत असून त्यांच्या पायी तुझ्या पायाची ताटातूट व्हावी हे ठीक नव्हे. ५