भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 382, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 382

३५० सार्थ तुकारामगाथा ६९४ माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥ १ ॥ देवा अभिमान नको । माझे ठायीं येऊं सको ॥ २ ॥ देशीं चाले सिका । रितें कोण लेखी रका ॥ ३ ॥ हातीं सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मवितें-मोजते, धणी-मालक. अर्थ - धान्याचे माप उगाचच म्हणत असते की, मी धान्य मोजते, पण खरी गोष्ट अशी आहे की, मोजणारा जो मालक आहे तोच ते माप भरीत असतो व रिकामे करीत असतो १ देवा, माझ्या ठिकाणी असला अभिमान नको २ ज्या नाण्यावर राजाचा शिक्का आहे, तेच त्या देशात चालते शिक्क्याशिवाय असणाऱ्या गरिबाच्या नाण्याला कोण विचारणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या हातात सत्तेचे सूत्र आहे, त्याचीच थोरवी जिकडे तिकडे असते. ४ ६९५ कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥ १ ॥ मेलें वाऱ्या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ २ ॥ कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ॥ ३ ॥ तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसले भय ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - निरसले-संपले. अर्थ :- माझ्या या विठ्ठलाचे वैभव देशोदेशी सांगण्यासाठी कोण उपदेश करायला गेले होते ? १ माझा मायबाप जो विठ्ठल, त्याच्याच कृपेने वाऱ्याबरोबरच त्याचे नाम सर्व देशभर पसरून राहिले २ माझी वाणी हा उपदेश करीत आहे, तो तरी कुणाच्या सत्तेवर ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच निश्चयामुळे माझे भय दूर झाले आहे. ४ ६९६ सकळिकांच्या पाया माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥ १ ॥ अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । वरे पारखून बांधा गाठी ॥ २ ॥ फोडिलें भाडार धन्याचा हा माल । मी तव हामाल भारवाही ॥ ३ ॥ तुका म्हणे चाली जाली चहूँ देशीं । उतरला कसीं खरा माल ॥ ४ ॥