सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 383, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंआपुलेंचि मन । करवी आपणां बंधन ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । तुम्ही कोडीं हीं उगवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- झाकुळिलें-झाकून टाकले, उगवा-सोडवा. अर्थ :- सर्व विश्वात भरून टाकणारी जी माया, तिने छायेप्रमाणे सर्व जगाला झाकून टाकले आहे. १ त्यामुळे जगातील सत्य वस्तूचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. अविद्येचे अथवा मिथ्या वस्तूचे महत्त्व मात्र एकसारखे वाढत आहे २ आपलेच मन आपल्याला या संसारबंधनात जखडून टाकीत असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या मिथ्या मायेची कोडी तुम्हीच सोडवा. ४ ६९१ पोटीं जन्मती रोग । तरि कां म्हणावे आप्तवर्ग ॥ १ ॥ रानीं वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी ॥ २ ॥ तैसें शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्तें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - आप्तवर्ग-जवळचे नातेवाईक अर्थ :- आपल्या पोटात अनेक रोगांचा जन्म झाला; म्हणून काय त्यांना आपण आपल्या मुलाप्रमाणे, आप्तवर्गाप्रमाणे मानतो की काय ? १ रानात पुष्कळ वनस्पती औषधाच्या असतात; म्हणून काय त्या निष्फळ झाल्या ? २ आपल्या शरीराचे व आपले नाते तसेच असते. तेवढाच त्याच्या क्रियाचा व आपल्या नात्याचा संबंध असतो. ३ ६९२ नव्हे शब्द एक देशी । सांडी गद्यशी कोणाला ॥ १ ॥ जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ २ ॥ मोकलिलें जावें बागें । भाता जेणें वाईलें ॥ ३ ॥ आतां येयें कैंचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥ ४ ॥