भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 384, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 384

३४८ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- मिलटीधिया-भिल्लीणीच्या. अर्थ - अयोध्येच्या राजा, अरे रामराया, दीनानाथा, सख्या, १ तू माझे पाप, ताप व विघ्न दूर कर. दीनानाथा, मला सुखी कर. २ त्या भिल्लोणीची उष्टी बोरे खाऊनही तू भ्रष्ट झाला नाहीस. ३ मग मी तर तुझ्याशी प्रेमाने सलगी करणारे एक मूल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू मोठ्या सखोल अंतःकरणाचा आहेस. ४ ६८८ आमिषाचिये आसे गळ गिळी मासा । फुटोनिया घसा मरण पावे ॥ १ ॥ मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥ २ ॥ अंतकाळीं ज्याच्या नाम आले मुखा । तुका म्हणे सुखा पार नाही ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- आसे-आशेने अर्थ - मासे पकडणारे लोक आपल्या गळाला काही आमिष लावून गळ पाण्यात सोडतात त्या खाद्य पदार्थाच्या मिषाने मासे तो गळ गिळण्याचा प्रयत्न करतात व घसा फुटून मरण पावतात १ मरणाच्या वेळी तो तळमळ करीत असल्याने त्यास देवाची आठवण होते. २ तुकाराम महाराज म्हणतात, अंतकाळी का होईना, पण ज्याच्या मुखात ईश्वराचे नाव येते, त्याच्या सुखाला अंत असत नाही ३ विवरण - अंतकाळी आपण परमेश्वराचे स्मरण केले तर, आपणास याची प्राप्ती होईल, हा विचार सर्वच साधुसंतानी सांगितला आहे. भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायातील पाचव्या श्लोकात 'अंतकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् । य प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय ' जो अंतकाळी माझेच स्मरण करतो व देह सोडतो तो माझ्या स्वरूपाला येऊन पोचतो, असे आश्वासन माणसांस स्वतः भगवंतानेच दिलेले आहे येथे एक सावधपणाची सूचना अशी की, जन्मभर वाटेल ती कर्मे करून शेवटी मात्र परमेश्वराचे चिंतन केल्याने सर्व साधेल, अशी कल्पना येथे नाही अंतकाळी तरी परमेश्वराचे चिंतन का घडते ? तर जन्मभर त्याच्याच स्वरूपचिंतनात रंगून जाण्याची सवय असते म्हणून म्हणूनच गीतेच्या या श्लोकापुढील श्लोकातच नेहमी भगवंतास स्मरून वर्तन करण्याची सूचना दिलेली आहे कारण जन्मभर ज्याचे ध्यान तोच अंत काळीही स्मरणात येणार यासाठी परमेश्वराचे स्मरण अखंड- पणे नेहमीच हवे 'तेंवि जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तैंचि मरणाचिये मेरे । फार हों लाये ॥ आणि मरणीं ज्या जें आठवे । तो तेचि गतीते पावे । म्हणोनि सदां स्मरावे । मातेंचि तुवां' या ज्ञानेश्वराच्या उक्तीमधील 'सदा स्मरावे' यातील भावार्थ स्पष्ट आहे ६८९ तुजवरी ज्याचे मन । दरुशन दे त्याचें ॥ १ ॥ कैसा जाती शुद्ध भाव । हात पाय ना वृत्ती ॥ २ ॥ अवघियाचा करुनि मेळा । तुज डोळा रोखिले ॥ ३ ॥ तुका म्हणे तुज आट । लपोनि कोड दावीं देवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दरुशन-दर्शन अर्थ :- देवा, ज्याच्यावर तुझे प्रेम आहे, त्याचे तरी दर्शन मला दे ना. १ त्याची जात कशी शुद्ध आहे, त्याचा भावही कसा शुद्ध आहे, त्याच्या हातापायाचे व्यापार स्वतंत्र राहिलेले नाहीत, हे तरी मला पाहू दे ना. २ सर्व इंद्रियांचा एक मेळ करून ज्यांनी आपले डोळे तुमच्यावरच लाविले आहेत, ३ त्याचे कौतुकाने दर्शन मला द्या, देवा, मी तुमच्या आड उभा राहीन व ते सर्व पाहीन ४ ६९० विश्वव्यापी माया । तिणे झाकुळिलें छाया ॥ १ ॥ सत्य गेलें भोळथावरी अविद्येची चाली थोरी ॥ २ ॥