भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 388, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 388

३५२ सार्थ तुकारामगाथा अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सच्चिदा नारायणा ॥ ३ ॥ रूप नाम घेसी आपुल्या स्वेच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥ ४ ॥ तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरिच नारायणा कळों येसी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - धडा-धड असलेल्या, अलक्षा-न दिसणारा अर्थ - देवा, तुझे यथार्थ वर्णन करेल असा समर्थ तुझ्याशिवाय कुणीही त्रैलोक्यात नाही १ हजारो मुखांनी तुझे वर्णन करता करता बिचारा नागराज शेषही थकून गेला व त्याच्या धड असलेल्या जिभाही दुमपून गेल्या २ सच्चिदानंदा, नारायणा, तू निर्गुण असून अव्यक्त, न दिसणारा, अपार व अनंत अशा स्वरूपाचा आहेस ३ ज्याचा जसा भाव असेल, तसे रूप व नाम तू आपल्याच इच्छेने त्याच्यासाठी धारण करतोस ४ तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, तुझे रूप जसे असेल, किंवा तू जसे दाखविशील तसेच आम्हास कळणार ५ ७०१ पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥ १ ॥ बांधूं विठ्ठलसागडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥ २ ॥ हे तो नाहीं सर्वकाळ । अमुप अमृताचें जळ ॥ ३ ॥ तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पथें येणें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सागडी-भोपळ्याचा ताफा अर्थ - या विठ्ठलभक्तीच्या आनंदाचा केवढा पूर आला आहे पाहा प्रेमाच्या लाटांवर लाटा उसळत आहेत १ विठ्ठलरूपाची ही सागडी बांधून आपण हा भवसागर तरून पैलतीरावर जाऊ तुम्ही सर्व गडी मज- बरोबर या व या पुरात उडी घाला २ कारण हरिभक्तीचा हा पूर सतत टिकणारा नाही अमाप आनंदाचे हे पाणी कायम टिकणारे नसल्याने आत्ताच वेळ साधा ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुमचे पुण्य थोर, म्हणून भक्तिमार्गाचा हा पूर तुमच्या समोरून चालला आहे ४ ७०२ आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें १ या चित्तापासुनिया ॥ १ ॥ पांडुरंग मनीं पांडुरंग ध्यानीं । जागृतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ २ ॥ पडिलें वळण इंद्रिया सकळा । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥ ३ ॥ तुका म्हणे नेत्रीं केले ओळखण । साजिरे ते ध्यान विटेवरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वळण-रिवाज रीत अर्थ - या माझ्या चित्तात एका पांडुरंगाची स्थापना झाल्यापासून मला आता दुसरे काही करण्यासारखे राहिलेच नाही १ माझ्या ध्यानात, माझ्या मनात तो एक पांडुरंगच वस्ती करून राहिला आहे माझ्या जागृत अवस्थेत, माझ्या स्वप्नात तो पांडुरंगच भरून राहिला आहे २ माझ्या सर्व इंद्रियाचा रिवाज पांडुरंगाकडे जाऊन काम करण्याचाच आहे याखेरीज दुसरा कुठला भावच माझ्यात उमटू शकत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात माझ्या डोळ्यांनी विटेवरच्या या तटस्थ ध्यानाचीच चांगली ओळख करून घेतली आहे ४ ७०३ मी तो सर्वभावे अनधिकारी । होइल कैसी परी नेणो देवा ॥ १ ॥ पुराणींचे अर्थ आयिता मनास । होय कासावीस जीव माझा ॥ २ ॥ इंद्रियांचीं आम्ही पांगिलो अकिर्तें । त्याचे रंगीं चित्त रंगलेसे ॥ ३ ॥ एकाचे ही मज न घडे दमन । अवघों नेमून कैसीं राखो ॥ ४ ॥ तुका म्हणे मज तारीं पंढरीराया । नाहीं तरी वाया गेलो दास ॥ ५ ॥ १ न मिळे