सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 389, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३५३ शब्दार्थ व टीपा:- परी-प्रकार, पांगिलों-पंगू, अंकिते-स्वाधीन अर्थ:- देवा, तुमची भक्ती करण्यास मी तर सर्वथा अनधिकारी आहे आता माझी स्थिती कोणत्या प्रकारची होईल, हे काही समजत नाही १ पुराणात सांगितलेला अर्थ मनात आला म्हणजे देवा, माझा जीव फारच कासावीस होतो २ इंद्रियांच्या स्वाधीन आम्ही झाले असल्याने पंगू आहोत त्याच्याच विषयाच्या रंगांनी आमचे चित्त रंगून गेले आहे ३ एकाही इंद्रियाचे दमन करणे मला जमलेले नाही तर मग या सर्व इंद्रियांना व त्यांच्या शक्तींना आवर मी कसा घालू ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीराया, तू माझे रक्षण कर नाही तर मी आता अगदी वाया चाललो आहे ५ (पुढे थोड्याफार फरकाने हाच अभंग क्र ३८६२ म्हणून आलेला आहे ) ७०४ लक्षूनिया योगी पाहाती आभास । ते दिसे आम्हास दृष्टीपुढें ॥ १ ॥ कर दोन्ही कटी राहिलासे उभा । सावळी हे प्रभा अंगकांती ॥ २ ॥ व्यापूनि वेगळें राहिलेसें दुरी । सकळा अंतरों निर्विकार ॥ ३ ॥ रूप नाहीं रेखा नाम ही जयासी । आपुल्या मानसीं शिव ध्याय ॥ ४ ॥ अंत नाहीं पार वर्ण नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाय ॥ ५ ॥ अचेत चेतले भक्ताचिया सुखें । आपुल्या कौतुके तुका म्हणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - लक्षूनिया-लक्ष देऊन अर्थ - काही नाही असा आभास, योगी लोक नीट लक्ष लावून पाहतात; पण तेच रूप सगुण होऊन आम्हास आमच्या दृष्टीपुढे स्पष्टपणे दिसते १ आपले दोन्ही कर कमरेवर ठेवून हा विटेवर उभा राहिला आहे याची प्रभा व अंगकांती सावळ्या रंगाची आहे २ निर्विकार असणारे हे तत्त्व सर्वत्र व्यापून, सर्वांच्या अंतःकरणात सामावून वेगळे राहिलेले आहे ३ अशा या तत्त्वास रूप नाही, रेखा नाही, आकार नाही, नावसुद्धा नाही. असे हे रूप आपल्या मनात शिव ध्यात आहे ४ यास कसलाही थारा नाही, जाती नाही, कुळ नाही, शिर नाही, हात नाहीत, पाय नाहीत ५ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे चैतन्यरहित वाटणारे निर्गुणनिराकार रूप आपल्या भक्तीच्या आवडीसाठी कौतुकाने व सुखाने सचेत होऊन सगुण व साकार झाले आहे ६ ७०५ कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥ १ ॥ कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोणत्या भावे देवा आतुडसी ॥ २ ॥ कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवणु कैसा तुज ॥ ३ ॥ कैसा गाऊ 'गीर्ती कैसा ध्याऊ चित्तीं । कैसी स्थिती मती दावी मज ॥ ४ ॥ तुका म्हणे जैसें दास केले देवा । तैसे हे अनुभवां आणीं मज ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - आतुडसी-प्राप्त होतोस. अर्थ - देवा, मी तुमचे ध्यान तरी कसे करू हो ? तुला पाहू तरी कसे ? मला याचकास यासबंधीचे वर्म दाखवाल काय ? १ देवा, मी तुमची भक्ती कशी करू ? सेवा कशी करू ? देवा, तू कोणत्या भावामुळे प्राप्त होतोस ? २ तुझ्या कीर्तीचे वर्णन कसे करू ? तुमचे रूप लक्षात तरी कसे आणू ? तुला मी जाणून तरी कसे घेऊ ? ३ गीतात देवा, तुला मी कसे गाऊ ? चित्तामध्ये ध्यान तरी कसे करू ? तुमची स्थिती कशी आहे? हे माझ्या अल्प मतीस दाखवा ना ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही मला ज्या अर्थी दास केले आहे, त्या अर्थी हा प्रत्यक्ष अनुभव मला आणून द्या ना ५ ७०६ निगमाचे वन । नको शोधूं करूं सीण ॥ १ ॥ या रे गौळियाचे घरीं । बाधलें तें दावें यरी ॥ २ ॥ १ किर्ती, कीर्ती तु. गाथा ४५