सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 390, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंपीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥ ३ ॥ तुका म्हणे भार । माया टाका अहंकार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निगमाचे-वेदाच्या अर्थांचे. अर्थ :- या श्रीहरीचा शोध घेण्यासाठी तुम्ही वेदाच्या अर्थांच्या गहन अरण्यात कधी शिरू नका. तो त्रास कधी घेऊ नका. १ ते सुख पाहायचे असेल तर, तुम्ही या गोकुळात गवळ्यांच्या घरी या. येथे या श्रीहरीला दाव्याने बांधलेले तुमच्या दृष्टीस पडेल. २ तुम्हांस नीट वाट सापडली नाही व वर्म समजले नाही; म्हणूनच तुम्ही भ्रमात पडलेले दिसता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही तुमच्या शिरावर हा जो अहंकाराचा भार घेतला आहे, तो टाकून द्यावा. ४ ७०७ मन वोळी मना । बुद्धि बुद्धी क्षण क्षणां ॥ १ ॥ मीच मज राखण जालों । ज्यानें तेथेंचि धरिलों ॥ २ ॥ जें जें जेथें उठी । तें तें तया हातें कुंटी¹ ॥ ३ ॥ भांजिली² खांजनी³ । तुका साक्ष उरला दोन्ही ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वोळी-वळत आहे, रक्षण करीत आहे, भांजिली-ओहोटी, क्षय, खांजनी-भरती, वृद्धी. अर्थ :- माझे मनच माझ्या मनास वळवीत आहे, रक्षण करीत आहे. क्षणोक्षणी माझी बुद्धीच माझ्या बुद्धीस सावरीत आहे. १ मीच माझा राखण करणारा झालो असून, मी त्यामुळे जेथल्या तेथेच धरलो गेलो आहे. २ जे जे भाव मनात उठतात, ते ते त्याच मनाकडून कुंठित होतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मनाची ही ओहोटी व भरती होत असताना मनच साक्षी राहिलेले आहे ४ ७०८ ब्रह्म न लिंपे त्या मेळें । कर्माअकर्मा वेगळें ॥ १ ॥ तोचि एक तया जाणे । पावे अनुभविलें खुणें ॥ २ ॥ शौच अशौचाचे संधी । तन आळा तनाचि मधीं ॥ ३ ॥ पापपुण्यां नाहीं ठाव । तुका म्हणे सहज भाव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- शोच-शुद्धी, अशोच-अशुद्धी, तन-शरीर. अर्थ - कर्माकर्माच्या योगाने ब्रह्म कधी लिप्त होत नाही, शिंपले जात नाही. १ ज्याला या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला आहे, तोच एक त्याला जाणू शकतो. २ असे हे ब्रह्म शुद्धता व अशुद्धता यांच्या संधीमध्ये असून गवताच्याच आळयात गवत असते तसे हे समजावे. ३ या सहजभाव्यस्वरूप असणाऱ्या ब्रह्मतत्त्वात पाप वा पुण्य काही असत नाही. ४ ७०९ काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥ १ ॥ तरी काय तेथें असती थोडीं । काय जोडी तयांसी ॥ २ ॥ रिघतां धांवा पंव्रामध्यें । जोडे सिद्धि ते ठायीं ॥ ३ ॥ काय भस्म करील राख । अंतर पाक नाहीं तों ॥ ४ ॥ वर्णाआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालियां ॥ ५ ॥ तुका म्हणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- दरा-दरी, अंतर-मन, पाक-पवित्र. अर्थ :- जोपर्यंत अंत:करण वासणारहित होऊन समाधानाच्या अवस्थेस आले नाही, तोपर्यंत रानावनात अगर दरीमधील गुहेत निवास करून काय लाभ होणार ? १ तेथेच राहणारे प्राणी काय थोडे आहेत का ? त्यांना १ कुटी, २ भाजिली, ३ खाजनी.