सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 392, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३५६ सार्थ तुकारामगाथा ७१३ साठविला हरी । जीहीं हृदयमंदिरीं ॥ १ ॥ त्याची सरली येरझार । जाला सफळ¹ व्यापार ॥ २ ॥ हरी आला हाता । मग कैंचीं भय चिंता ॥ ३ ॥ तुका म्हणे हरी । काहीं उरो नेदी उरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - येरझार-जन्ममृत्यूची कटकट अर्थ - ज्याने आपल्या हृदयमंदिरात त्या श्रीहरीस साठविले आहे, १ त्याच्या पाठीमागची जन्ममृत्यूची कटकट संपली असेच समजावे त्याच्या जीविताचा व्यापार सफळ झाला असे समजावे २ एकदा श्रीहरीच हाताशी आल्यावर मग कसली चिंता किंवा भीती ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीहरी एकदा भक्ताच्या अंत करणात स्थिर झाला की मग कसलीही चिंता उरत नाही ४ ७१४ मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥ १ ॥ मज भक्तीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ २ ॥ आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥ ३ ॥ तुका म्हणे भेटी । पुरे एकचि शेवटीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आवडी-प्रेम अर्थ - देवा, तुमचा जो मोक्षाचा दुर्लभ ठेवा असेल, तो तुमचा तुम्हास ठेवा १ मला केवळ एका भक्ती- चीच आवड किंवा प्रीती असून मनात दुसऱ्या कशाविषयीही प्रेम नाही २ देवा, दातारा, मोक्षासारखे जे काही प्रकार तुमच्या जवळ असतील, त्याचा सांभाळ तुमचा तुम्ही करा ३ तुकाराम महाराज म्हणतात, मला तुमची एक भेट झाली म्हणजे पुरे त्यात सर्व काही पावले ४ ७१५ नामपाठ मुक्ताफळाच्या ओयणी । हे सुख सगुणी अभिनव ॥ १ ॥ तरी आम्ही जालो उदास निर्गुणा । भक्ताचिया मना मोक्ष नये ॥ २ ॥ द्यावे घ्यावे ऐसा येथें उरे भाव । काय ठाया ठाव पुसोनिया ॥ ३ ॥ तुका म्हणे आता अभयदान करा । म्हणा विश्वंभरा दिले ऐसे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ओयणी-ओवलेली माळ अर्थ - हरिनामाचे पाठ हीच एक मोत्यांची ओवलेली माळ आहे, व तिचे सर्वांत मोठे सुख श्रीहरीच्या सगुणवर्णनात आहे १ यासाठीच आम्ही निर्गुणाच्या स्वरूपाबद्दल उदास झालो आहोत कारण आम्हा भक्तांच्या मनात मोक्षाची कल्पना कधीही नसते २ या सगुण स्वरूपात दोघे असल्याने प्रेम देणे व घेणे असा प्रकार असतो मग इतर गोष्टींची चौकशी हवीच कशाला ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता अभयदान द्यावे अहो विश्व- भरा, असे अभयदान दिले, असे एकदा म्हणा ना ४ ७१६ भवासिंधूचे काय फोडें । दावी वाट चाले पुढें ॥ १ ॥ तारु भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ २ ॥ मागें उतरिले बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥ ३ ॥ तुका म्हणे लाग वेगें । जाऊ तयाचिया मार्गे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - फोडें-अवघड, तारू-नाव, लाग वेगे-त्वरेने अर्थ - या संसाररूपी सागराची भीती एवढी हवी कशास ? स्वतः विठ्ठलच वाट दाखवून आपल्या पुढे चालत असतो १ हा पांडुरंगच संसारसमुद्र तरून जाण्याची एक भली मोठी नाव आहे. तो हा सागर तरत १ सकळ