सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 425, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३८७ अर्थ - जोपर्यंत पंढरपूर क्षेत्राचे दर्शन झालेले नाही, तोपर्यंतच वैकुंठाची थोरवी तुम्ही वर्णन कराल १ या क्षेत्रात मोक्षाची सिद्धी सेवकाप्रमाणे दीन रूप धारण करून घरोघरी जाऊन हिंडत असते २ येथे प्रत्येकाच्या घरी अंगणात तुळशीवृंदावन असून सडे टाकलेले असतात रांगोळ्या काढलेल्या असतात प्रत्येकाच्या घरी मोठा अभिनव सोहळा चालू असतो ३ येथे कथाकीर्तनात एकसारखा विठ्ठलाचा नामघोष चाललेला असतो दळणदळण करताना येथे पांडुरंगाच्या ओव्याही गाइल्या जातात ४ या ठिकाणी सर्व प्रकारची सुखे नेहमी भक्तांच्या सेवेत तयार असतात येथे परब्रह्म मूर्तिमंत होऊन नांदत असते ५ तुकाराम महाराज म्हणतात, जे मोठ्या प्रयत्नाने मोठमोठ्यांना साध्य होत नाही, ते हे रूप येथे पंढरीत विटेवर प्रत्यक्ष दिसते ६ ८१३ दुख वाटे ऐसी ऐको नये' गोष्टी । जेणे घडे तुटी तुझ्या पायी ॥ १ ॥ येतो कळवळा देखोनि या घात । करितो फजित नाइकती ॥ २ ॥ काय करु देवा ऐसी नाहीं शक्ति । दडुनि पुढती वाटे लावू ॥ ३ ॥ तुका म्हणे मज दावू नको ऐसे । दृष्टीपुढे पिसे पांडुरंगा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तुटी-वियोग, दडुनि-शिक्षा करून, पिसे-वेडे अर्थ - देवा, जेणेकरून तुमच्या पायाचा वियोग होईल व मनाला दुख होईल अशा गोष्टी तू मला ऐकू येतील असे करू नकोस १ या प्रापंचिकांची केवळ ऐहिक दृष्टी पाहून माझ्या मनात फारच कळवळा निर्माण होतो रे त्यांचा हा घात पाहून मी त्यांची फजिती करून पाहिली, परंतु ते काही ऐकतही नाहीत २ देवा, मी यांच्या- साठी काय करू रे ? यांना चांगली शिक्षा करून मार्गाला लावावे अशी शक्तीही माझ्याजवळ नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, असे संसाराच्या आसक्तीने वेडे झालेले लोक माझ्या दृष्टीपुढे सुद्धा नकोत ४ ८१४ शूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥ १ ॥ तेयीं अभक्तासी आवडे पाखांड । न लगे त्या गोड परमार्थ ॥ २ ॥ श्वानासी भोजन दिले पंचामृत । तरी त्याचे चित्त हाडावरि ॥ ३ ॥ तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष जाले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शूकरासी-डुकरास, पाखंड-नास्तिकपणा, वमितां-ओकल्यावर अर्थ - डुकरासारख्या प्राण्यास विष्ठा सावकाशपणे चघळोत राहणेच आवडते त्याला जरी मिष्टान्न वाढले, तरी त्याचा उपयोग त्याला काय ? त्याला काय गोडी वाटणार त्या पक्वान्नाची ? १ त्याप्रमाणे जे अभक्त आहेत, त्यांना केवळ नास्तिकपणाच आवडतो त्यांना कधी परमार्थ गोड लागतच नाही २ कुत्र्याला जरी पंचामृताचे भोजन दिले, तरी त्याचे चित्त हाडे चघळण्यावरच राहणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, सापाला जरी दूध पाजले, किंवा क्षीर पाजली, तरी तो विषाच्या रूपानेच ओकले जाणार ४ ८१५ रासभ धुतला महा तीर्थामाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥ १ ॥ तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हेचि मानस शुद्ध त्याचे ॥ २ ॥ सर्पासी पाजिले शर्करापीयूष । अंतरींचे विष जाऊ नेणे ॥ ३ ॥ तुका म्हणे श्वाना क्षीरीचे भोजन । सवेचि वमन जेवी तया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -रासभ-गाढव, शामकर्ण-शुभ्रकर्णी घोडा, खळा-दुष्टास, शर्करापीयूष-साखरमिश्रित दूध अर्थ - गाढवाला गंगेच्या तीर्थाने जरी न्हायला घातले, तरी काही त्याचा शुभलक्षणांनी युक्त असा देखणा घोडा होणार नाही १ त्याप्रमाणे दुष्ट असणाऱ्या माणसास उपदेश करून काय उपयोग ? त्याचे मनच कधी शुद्ध १ ऐकोनिया