सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 426, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३८८ सार्थ तुकारामगाथा भरावे २ साखरेने युक्त असणारे दूध जरी सापाला पाजले, तरी त्याच्या अत्तरगातील विष नाहीसे कसे होणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, कुत्र्याला जरी गोड खिरीचे भोजन वाढले, तरी ते घटकन ओकून पडेल ४ ८१६ जेवीं नवज्वरें तापले शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥ १ ॥ तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ २ ॥ कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥ ३ ॥ तुका म्हणे मद्यपानाची आवडी । न रचे त्या गोडी नवनीताची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सन्निपात-वात, कफ, पित्त याचा प्रकोप कामिनी-कावीळ अर्थ - ज्याचे शरीर नवज्वराने तापले आहे, त्याला दूध विषाप्रमाणे कडूच लागणार १ त्याचप्रमाणे ज्याना परमार्थविचार दुरावलेला आहे, त्याला सन्निपातासारखा रोग झाला आहे असेच समजावयास हवे २ ज्याच्या डोळ्यांना कावीळ झाली आहे, त्याला सर्व जगत चंद्रासह पिवळेच दिसणार ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला मद्यपानाची आवड आहे त्याला ताज्या लोण्याचीही चव काय बरे असणार ? ४ ८१७ आता असो मना अभक्ताची कथा । न होईं दुश्चिता हरिनामीं ॥ १ ॥ नये त्याची कदा गोष्टी करु मात । जिव्हे प्रायश्चित्त त्याच्या नांवे ॥ २ ॥ प्रभाते न घ्यावे नाव माकडाचें । तैसे अभक्ताचें सर्वकाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे आता आठवू मंगळ । जेणे सर्व काळ सुखरूप ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुश्चिता-उदास, मंगळ-पवित्र अर्थ - मना, आता जे अभक्त आहेत, त्याची गोष्ट राहू दे दूर तू मात्र हरिनामाविषयो उदास होऊ नकोस १ त्याच्यासबधी आता तू कधीही विचार करु नकोस त्याचे नाव घेतले तरी, जिभेस प्रायश्चित्त घ्यावे लागेल २ सकाळच्या प्रहरी जसे माकडाचे नाव घेऊ नये, त्याचप्रमाणे त्या अभक्ताचेही नाव कधी घेऊ नये ३ तुकाराम महाराज म्हणतात आता अत्यंत पवित्र असा जो विठ्ठल त्याचेच स्मरण करू, तोच नेहमी सुखरूप असा आहे ४ ८१८ नाम आठविता सद्गदित कंठी । प्रेम बाढे पोटीं ऐसे करों ॥ १ ॥ रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टाय हीं गात्रीं प्रेम तुझें ॥ २ ॥ सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊ निशदिनीं नाम तुझें ॥ ३ ॥ तुका म्हणे तुजें न फिरों कल्पातीं । सर्वदा विश्रांति सता पाईं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वेंचो-खर्च होवो दुजें-दुसरे अर्थ - देवा, तुझे नाव आठवताच कठ सद्गदित व्हावा, अशा प्रकारचे प्रेम मनात वाढेल असे तू कर १ या सर्व अगावर रोमांच उभे राहावेत, डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहावेत आणि सर्व अष्टागात्ही तुझे प्रेम भरून यावे असे देवा, तू कर २ तुझ्या नामसकीर्तनात माझे सर्व शरीर खर्च व्हावे व रात्रदिवस देवा, तुझेच नाम मी गावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, कल्पाचा शेवट झाला तरी याजरीज दुसरे तू काहीही करू नकोस नेहमीच मला सतांच्या पायी विश्राती मिळल असे कर तू ४ ८१९ जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुख धर्म जें जें काहीं ॥ १ ॥ अधापुढें जेणे दिधला आधार । त्याचा हा विचार तोचि जाणे ॥ २ ॥ शरणागता जेणे घातले पाठीशी । तो जाणे तेविशीं राखो तया ॥ ३ ॥ कासे लागे तया न लगती सायास । पोहोनारा त्यास पार पावी ॥ ४ ॥ तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तोचि जाणे ॥ ५ ॥