सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 428, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३९० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- देवा, विठ्ठला, प्रपंचातील गोष्टींचा त्याग माझ्या मनातून सहजच, ध्यानात न येताही होत राहिला. १ संसाराच्या त्रासाने मी दमलेलो असल्यामुळे त्याग करावा असा भाव मनात येण्यापूर्वीच सहजासहजीच त्याग घडला. २ संसाराच्या भारामुळे, ऋणाच्या ओझ्यामुळे, माझा देह फारच जड झाला होता; आणि या संसा- राच्या तापामुळे मी फारच कासावीस झालो होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण आता मात्र परमार्थाच्या मार्गाविषयीचा आळस माझ्या मनातून पुरता गेला व असंख्य अशा संसारापासून निर्माण होणाऱ्या दोषांपासून मी मुक्त झालो. ४ ८२३ मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणवियाचे वाणी रवलाहें ॥ १ ॥ तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावले नरदेह ॥ २ ॥ ओटोन्ऱ्या परिस मुठीचें तें वाढे । यापरि केंवाडें स्वहिताचें ॥ ३ ॥ नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥ ४ ॥ तुका म्हणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाणी-धंदा, फावलें-प्राप्त झाले, केंवाडें-निश्चय. अर्थ :- शेतीचा धंदा करणाऱ्या कुणब्यास किंवा शेतकऱ्यास वेळ आली तर घरातील प्रिय माणसाचा मृत्यू झाला तरी, ते प्रेत तसेच झाकून ठेवून प्रथम शेत पेरण्याचे काम पाहावे लागते. १ त्याप्रमाणे तुम्ही आपले स्वतःचे हित साधावे. ज्यांना हे मानवी शरीर प्राप्त झाले आहे, त्यांनी तरी या हिताचा विचार करावा. २ धान्य पेरताना शेतकऱ्याच्या ओटीवर जे धान्य असते, त्याच्यापेक्षा पाभरीवरील मुठीत थोडे असले तरी ते जास्त समजायला हवे; कारण त्यातूनच अनेक पटींनी धान्य निर्माण होणारे असते; वाढणारे असते. त्याचप्रमाणे वाढ- णाऱ्या स्वहिताचा तुम्ही विचार निश्चयाने करावा. ३ कारण काळाची सत्ता काही आपल्या हातात नसते. जाणत्या माणसाने हे जाणून जन्ममृत्यूचा गुंता सोडवावा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी ही सूचना तुम्हांस केली आहे. जो या मृत्युलोकी शहाणा असेल त्यानेच हिचा विचार करावा. ५ ८२४ राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥ १ ॥ कोणी कोणाएथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ २ ॥ शृंगारि¹एलेंही तगोंपेत वरि । उमटे लौकरि जैसें तैसें ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खूण साम्या² येते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सांगातें-बरोबर, तगोंपेत-टिकून राहात्त. अर्थ :- जेथील मार्गाने राजा चाललेला असतो, त्याच मार्गाने त्याचे सर्व वैभव येत असते. त्या छत्रचामर- धारीना किंवा हत्तीघोड्यांना हे काही सांगावे लागत नाही. १ या जगात कोणीही कुणास विनाकारण मान देत नाही देवाच्या कृपेशिवाय असा मानही कुणाला मिळणार नाही २ एखाद्या वस्तूस वरवर शृंगारून टाकिले तरी, ती शोभा काही कायमची टिकून राहात नाही जे मूळचे स्वरूप असेल तेच लौकर बाहेर पडते. ३ तुकाराम महा- राज म्हणतात, ज्याच्या हृदयामध्ये नारायणाने निवास केला आहे, त्याच्यावर सर्वत्र समत्वाने पाहण्याची दृष्टी येऊन त्याच्यावर कृपाच होते. त्याचे समत्वदर्शन हीच त्याच्या कृपेची खूण होय ४ ८२५ वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आविर्भाव² ॥ १ ॥ शिकविले काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ २ ॥ सांडिले तें नाहीं घेत भेळवितां । म्हणऊनि लाता मार्गे सारी ॥ ३ ॥ तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे अंगें अनुभव ॥ ४ ॥ १ दिसो, २ आनुर्भाव.