सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 450, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४६२ सार्थ तुकारामगाथा ८९० खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥ १ ॥ सवंगाचें केणें सांपडलें घरीं । भरुनि वैखरी सांटविलें ॥ २ ॥ घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदेवां दुर्बळा भाव तैसा ॥ ३ ॥ फडा आलिया तो न वजे निरासे । जरि कांहीं त्यास न कळतां ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां जालीसे निश्चिती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- उदमासी-व्यापारास, केणे-जिनस, माल, फडा-मंडळीस. अर्थ:- या विठ्ठलाच्या रूपाने खरेखुरे भांडवल आमच्या हाती आले असल्यामुळे याला काही आमच्या व्यापारात तूट येणार नाही. १ अतिशय स्वस्त असलेला असा विठ्ठलरूपी माल आमच्या घरीच सापडला असून त्याला आम्ही आमच्या वाणीतून साठवून ठेविला आहे. २ याचा लाभ सर्वांना देताना व घेताना होत असून सुदैवी असो, अथवा दुर्बल असो, सर्वांना त्यांच्या त्यांच्या भावाप्रमाणे हा प्राप्त होतो. ३ एकदा विठ्ठलभक्तांच्या मंडळीत, मेळाव्यात तो असला म्हणजे, काही मग निराश होत नाही हा; मग जरी त्यास आपण समजून घेण्याच्या प्रयत्नात नसलो तरी चालेल. ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र माझी निश्चिती झाली असून या विठ्ठलनामरूपी भांडवलाखेरीज आता चित्तात दुसरे काहीच धरणार नाही. ५ ८९१ पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥ १ ॥ रघवूनि ठेलों ठाव । जागा वाय सफळ ॥ २ ॥ पुढती चाली मनालाहो । वाढे देहो संतोष ॥ ३ ॥ तुका म्हणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - रघवूनि-व्यापून, क्षरभागी-क्षरणाऱ्या, कमी होणाऱ्या. अर्थ.-या श्रीहरीला मी माझे अंग पावलोपावली दिलेले असल्यामुळे माझे सर्व कार्य आता पूर्ण झाले आहे. १ जेवढी म्हणून विस्तृत जागा होती तो सर्व मी व्यापून राहिलो आहे. २ पुढे पुढे जाण्यात मनाला आनंद होत असून देहामध्ये संतोषही वाढत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक दिवशी कमी कमी होत जाणाऱ्या या जगाच्या आत, बाहेर मी सर्वत्र व्यापून राहिलो आहे. ४ ८९२ निवडूनि दिलें नवनीत । संचित ते भोगीत ॥ १ ॥ आतां पुढें 'भावसार' । जीवना थार पाहावया ॥ २ ॥ पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- संचित-नशिबात अर्थ :- आम्ही आता श्रीहरीच्या नामाचे नवनीत सर्वांना निवडून दिले आहे. ज्याने त्याने आपल्या नशिबाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा. १ आता यापुढे जीवनाला काही आधार शोधायचा असेल तर, हरिविषय हा एकच आधार होय. २ जे कोणी परीक्षा करणारे डोळस असतील, त्यांच्या हाती हे हरिनामाचे नवनीत पडेल व जे देहादिकांच्या दृष्टीने आंधळे बनलेले असतील, ते मात्र उगाच चाचपडत राहतील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी याचे मनोभावे सेवन करील, त्यासच हा लाभ निश्चित होईल. ४ ८९३ उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकिलें तें ॥ १ ॥ आपण जाऊन न्यावीं नरकास । वळें वेताळीस कुळें जग ॥ २ ॥ १ भवसार.