सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 452, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४१४ सार्थ तुकारामगाथा अर्थ - हा नारायण कृपा करील, धर्म दाखवील तरच पुढील खूण कळेल १ सत्य संतापाशी असते व त्याच्याशिवाय इतरांना मात्र मयाचीच परिस्थिती असते २ या परमेश्वराचे स्वरूप अणुरेणुएवढे असून त्याच्यात सर्वत्र प्रकाशच भरून राहिलेला आहे ३ इंद्रियावर स्वामित्व ठेवणारे जे कोणी आहेत त्यांनाच हे वर्म नीटपणे समजते ४ अनेक तर्क व कुतर्क करून नाना वाटा निर्माण करणारे व घटापटादिकांची शुष्क चर्चा करणाराची व्यर्थ नागवणूक मात्र होते ५ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी चांगले असे ज्ञानाजन डोळ्यात घालावे ६ ८९७ जातो न येति या वाटा । काय निरवितो करटा ॥ १ ॥ कैसा जालासे बेश्रम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ २ ॥ पाहे वैरियाकडे । डोळे वासुनिया रडे ॥ ३ ॥ बांधुनिया यमा हातीं । दिला नाहीं त्याची खती ॥ ४ ॥ नाही यापें काम । ऐसे जाणे तो अधम ॥ ५ ॥ अजून तरि मुका । का रे जालासि म्हणे तुका ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - बेश्रम-निलाजरा अर्थ - जेथे गेल्याने परत येता येणार नाही, अशी वस्तुस्थिती असली तरी आपल्या धनदौलतीची व संपत्तीची व्यवस्था हा करटा पुरुष अशाही वेळेस करीत बसला आहे १ कसा हा निलाजरा झाला आहे पाहा याला कसलीच लाज नाही रामाचे नाम घ्यायला काही हा तयार नाही २ हा अजूनही आपल्या शत्रूकडे डोळे मोठे करून पाहतो व रडतो ३ सर्वांनी मिळून याला बांधून यमाच्या हातात दिलेले असले तरी त्याची काही चिंता दृष्टी हा करीत नाही ४ या यमदूतांशी आपले काहीच काम नाही, असे अजूनही हा अधम समजत असतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, तू या प्रभूचे नाम घेण्याविषयी अजून तरी का मूक राहिला आहेस ? ६ ८९८ वाटा घेईं लवकरि । मागें अतरसी दुरी । केली भरोवरी । सार नेती आणीक ॥ १ ॥ ऐसीं भांबावलीं किती । काय जाणो नेणो किती१ । समय नेणती । माथा भार वाहोनि ॥२॥ नाहीं सारिले तोवरी । धाव घेईं वेग करीं । घेतले पदरीं । फावले ते आपुलें ॥ ३ ॥ फट लडी म्हणे तुका । एक न राहावे धका । तरिच या सुखा । मग कैसा पावसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भरोवरी-खटपट, फटलडी-हलकट मनुष्य अर्थ - अरे माणसा, नीट ध्यानात घे परमार्थाचा वाटा लौकर घे ना पदरात नाही तर मग विनाकारण प्रभूला तू अतरला जाशील सारी खटपट त केलीस व त्या श्रमाचे श्रेय इतरच घेऊन जात आहेत असे होऊ नये १ अशाच भ्रमात कितीजण सापडली आहेत ते काही नीट समजत नाही ही माणसे प्रसंग न ओळखता वृथा संसाराचा भार डोक्यावर वागवून कष्टी होत असतात २ जोपर्यंत आयुष्य सरले नाही, तोपर्यंतच वेगाने, त्वरेने धाव घेऊन जे पदरात आहे ते आपलेच आहे असे समजून घेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, अरे हलकट मनुष्या, तुला सत्यज्ञानाचा किंवा परमार्थविचाराचा एक धकासुद्धा सहन होत नाही असे असेल तर मग तुला या परमार्थ सुखाचा ठेवा कसा प्राप्त होईल ? ४ ८९९ चालावा पथ तो पाहिजे त्या ठाया । ऐकिल्या वाया वारता त्या ॥ १ ॥ ऐका जी वोझे पडतसे पाया । भावाची तें जायावाट नव्हे ॥ २ ॥ व्याली कुमारीचा अनुभवे अनुभव । सांगता तो भाव येत नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें पाहिजे आरालेँ । बियों निव्वळलें तरि भासे ॥ ४ ॥ १ भिती