भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 454, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 454

४१६ सार्थ तुकारामगाथा व्यवसायाची गल्लत करून भागणार नाही. असा फाला करणारा गाढवच म्हणायला हवा ३ बाजारात लोभाने गेला आहे आणि स्वतःस मी निःस्पृह म्हणून घेत आहे, हे कसे पटणार ? ४ दुसऱ्याच्या कवितेतील काही प्रासादिक शब्द उचलून कवित्व करणाऱ्या भोंदू कवीचे काव्य हे खऱ्या तुपात पाणी मिसळल्याप्रमाणेच नव्हे काय ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, एक चांगले शूर तरी व्हावे, किंवा निव्वळ मजूर तरी बनावे. ६ ९०३ तेज्या इशारती । तटा फोक वरी घेती ॥ १ ॥ काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ २ ॥ नव्हे भांडखोर । ओढूनि धरूं पदर ॥ ३ ॥ तुका म्हणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तेज्या-तेजीत असणाऱ्या घोड्यास. अर्थ - तेजीत असणाऱ्या घोड्याला नुसती इशारत करताच त्याला समजते व तो त्याप्रमाणे वागू लागतो; परंतु निर्बुद्ध तट्टाला कितीही फोक मारिले तरी ते काही ऐकत नाही. १ तुम्हाला काय सांगावे ? तुम्ही त्याच्या- हूनही नीच झालेले दिसता. तेव्हा मी काय सांगतो ते नीट मनात धरा व त्याप्रमाणे वागा. २ मी काही तसा भांडखोर नाही; पण तुमचा पदर ओढून धरीन व काही सांगू शकेन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांनी तोंड खाली करून काळे करावे. ४ ९०४ मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥ १ ॥ आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ २ ॥ वर्णधर्म कोणी न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥ ३ ॥ वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥ ४ ॥ तुका म्हणे किती करावे फजित । तेचि छंद नित्य बहु होती ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कळीं-कलियुगात अर्थ - मागच्या संतांनी पुढे होणार होणार म्हणून जे जे सांगितले आहे, ते ते सर्व अनुभवास येऊ लागले आहे. १ या कलियुगात लोक आचारभ्रष्ट होतील व त्यामुळे पुण्य क्षीण होऊन पाप मात्र बलवान ठरेल. २ वर्णधर्माचा कोणीही विटाळ न मानता एकाच ठिकाणी सर्व वर्णांचा व जातींचा गोंधळ निर्माण होईल. ३ वेदांचे पठण करणारेच दारूचे सेवन करतील व हे भांडखोर विषयाचा भेद पाहणार नाहीत ४ तुकाराम महाराज म्हणतात, याची फजिती तरी किती करावी ? त्याचे तेच तेच छंद नित्याचे म्हणून होत राहतात ५ ९०५ अक्षरांचा श्रम केला । फळा१ आला तेणे तो ॥ १ ॥ अवघियाचा तळ घरी । जीबा उरी नुरउनी ॥ २ ॥ फळलें२ तें लवे भारें । पिक खरें३ आलें तईं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । पुढें भाव साराया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- अक्षराचा-पाठांतराचा. अर्थ :- काही अक्षरांचे व ग्रंथांचे पाठांतर करण्याचे श्रम केले म्हणून पुढील फळ प्राप्त झाले. १ त्याच्या आयुष्यात जीवदशा उरलेली नसून सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी तो विनम्र झालेला आहे. २ जो वृक्ष फळांच्या भारांनी खाली लवला आहे, त्यासच खरे व समृद्ध पीक आले आहे, हे खरेच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा हा भाव या देवापुढे ठेवावा सर्वांनी ४ १ फळो, २ भरले, ३ सरे