सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 455, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४१७ ९०६ उचित जाणावे मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायां स्थीर ॥ १ ॥ न घलावी १ धाव मनाचिये ओडी । वचन आवडी संतांचिये ॥ २ ॥ अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न लगे उपदेश तुका म्हणे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - स्थीर-स्थिर अर्थ - आपले चित्त शुद्ध करून, बुद्धी परमेश्वराच्या पायाशीं स्थिर करून, उचित असेल त्या धर्माचे धर्म आधी नीट जाणावे १ केवळ ओढाळ मनाच्याच ओघाने किंवा ओडीने धावत सुटू नये संतांच्या वचनाचा आव- डीने ध्यासच ठेवावा २ या संतवचनाचा विश्वास एकदा मनात स्थिर झाला म्हणजे मग तुकाराम महाराज म्हणतात, उपदेशही करावा लागणार नाही ३ ९०७ जीवन हे मुक्त नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥ १ ॥ बहुत अन्न विष मोहरीच्या माने । अवघेंचि तेणें विष होय ॥ २ ॥ तुका म्हणे जेणे आपुलें स्वहित । तैंसी करीं नीत विचारूनि ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - मानें-प्रमाणानसुद्धा अर्थ - एखादा मनुष्य अत्यंत पवित्र आचरणाचा असून तो जीवन्मुक्तही आहे तरीसुद्धा त्याने दुर्जनांची संगत सोडायला हवी १ अन्न पुष्कळ असले तरी मोहरीएवढ्या विषानेसुद्धा त्याज्यात सर्वत्र विष पसरून राहाते २ तुकाराम महाराज म्हणतात, ज्यात आपले स्वहित आहे त्याविषयी बरी नीती पाहून विचार करावा ३ ९०८ द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥ १ ॥ करोनिया हेंचि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥ २ ॥ तुका म्हणे हेंचि करूनि जतन । आलिया हो दान याचकासी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - लाग-पाठलाग अर्थ - द्रव्याचा आम्ही नेहमी विटाळच मानलेला आहे कारण या द्रव्याच्या मागे काळ एकसारखा पाठ- लाग करीत असतो १ म्हणून नारायणाचे नाम हेच मी माझे जीवन ठरवून राहिलो आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, याच भावाची मी जपणूक करणार असून जे कुणी याचक दान मागायला येतील त्यांनाही हेच देणार आहे ३ ९०९ द्रव्याचिया मागें कळिकाळाचा लाग । म्हणोनिया संग खोटा त्याचा ॥ १ ॥ निरयाचे मूळ घालुनिया मागें । माडिली प्रसंगें कथा पुढें ॥ २ ॥ आजिच्या प्रसगें हाचि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥ ३ ॥ प्रारब्ध काहीं न पालटे सोसें । तृष्णेचे हे पिसें वायांचिन ॥ ४ ॥ तुका म्हणे घेईं राहे ऐसें धन । सादर श्रवण करुनियां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - लाग-पाठलाग निरयाचे-नरकाच, प्रारब्ध-दैव अर्थ - द्रव्याची संगत, सोबत खोटी आहे असेच समजा कारण त्याच्या पाठीमागें एकसारखा काळ लागलेला असतो कळिकाळ त्याचा पाठलाग करीत असतो १ नरकाचे मूळ असणारे हे द्रव्य सोडून, त्याचा त्याग करूनच मी यापुढची कथा प्रसंगाने सांगत आहे २ आजच्याही प्रसंगी हाच लाभ तुम्ही करून घ्यावा व देवावर भार घालावा ३ आपल्या दैवात जे असेल ते कितीही प्रयत्न केला तरी पालटणार नाही त्यामुळे एकसारख्या तृष्णेचे येड व्यर्थ आहे असेच समजावे ४ तुकाराम महाराज म्हणतात नीट आदराने श्रवण करून परमार्थमार्गाचे जे धन कायम टिकेल तेच स्वीकारावे ५ १ घालावी तु गा ५३