सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 456, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४१८ सार्थ तुकारामगाथा ९१० रडे अळंकार ऐन्याचियें¹ कांती । उत्तमा विपत्तिसंग घडे ॥ १ ॥ एकाविण एक अशोभ्य दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ २ ॥ रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रांधू नेणे-स्वयंपाक करणे जाणीत नाही. अर्थ :- अंगावर भरपूर अलंकार घातले आहेत; पण ज्याच्या अंगावर अलंकार आहेत, तोच सारखा रडत असेल किंवा तोच कांतिविहीन व दैन्यवाणा असेल तर मग काय उपयोग ? कारण दागिने अथवा अलंकार उत्तम असले तरी, ते विपत्तीच्या संगतीत असल्याने त्याची काती असून नसल्यासारखीच वाटते १ एकास दुसरे शोभून दिसणारे जर दातारा, नसेल तर त्याचा उपयोग काय ? पांडुरंगा, कृपेच्या सागरा, मग ते सुरूपही विशोभित दिसेल. २ चांगली स्वयंपाकाची आयती तयारी केली व ती ज्याला स्वयंपाक बिलकुल येत नाही, त्याच्यापुढे नेऊन ठेविली तर तिचा काय उपयोग होणार ? ती सर्व वायाच जाणार ना ! ३ तुकाराम महाराज म्हणतात, शेळीच्या गळ्यात कुणी सर्व चिंता दूर करणारा चिंतामणी बांधला तरी त्याचा काय उपयोग होणार तिला ? तो त्या स्थानी विशोभितच दिसणार. ४ ९११ दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसी ॥ १ ॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ २ ॥ भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें झांकितीळ डोळे । भोग देतेवेळे येईल कळों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तव-तर. अर्थ - या मानवी जन्मात दुःखाचे डोंगरच्या डोंगर सहन करावे लागतात, हे तर सर्वांनाच माहीत आहे. १ असे असूनही हे लोक आपल्या हिताचा विचार कधी करीत नाहीत, की कधी प्रभूच्या नामाचा घोष करीत नाहीत. २ या जन्मी आपण जे भोग भोगीत आहोत, ते पाहून या मागील जन्मात आपण उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे जे जे कर्म केले असेल ते ते ध्यानी येते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक याकडे या जन्मी डोळेझाक करतील व मग नाना खडतर भोग भोगताना मात्र त्यांना समजून येईल. ४ ९१२ सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥ १ ॥ मुखीं वाणी कानीं कीर्ति । डोळे मूर्ती देखाया ॥ २ ॥ अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होतीं पांगुळें ॥ ३ ॥ घरास आणि लायुनि जागा । न पळे तो² गा वांचे ना ॥ ४ ॥ तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सदैव-सुदैवाने, ठकलीं-फसली. अर्थ:-तुम्ही फार सुदैवाने जगणारे आहात, कारण ईश्वराने तुम्हाता सर्व अवयव नीटनेटके दिलेले आहेत. चालण्यासाठी पाय आहेत, पुण्यकर्म करण्यासाठी हात आहेत १ देवाचे नाव घेण्यासाठी वाणी मुखात आहे. त्याची कीर्ती ऐकण्यासाठी कान आहेत, त्याची मूर्ती पाहण्यासाठी डोळे आहेत. २ कित्येक आंधळे, बहिरे, मुके, पांगळे परमेश्वराची सेवा करिता येत नाही म्हणून फसले गेले आहेत ३ घराला आग लागली आहे व आत राहणारा जागा असून पळत नाही, तो कसा जिवंत राहणार ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, लोकांनो, तुम्ही आपल्या हिताविषयी नीट जागृत असा. ५ १ विघ्नवेने सगतीं, २ ते.