सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
४१८ सार्थ तुकारामगाथा ९१० रडे अळंकार ऐन्याचियें¹ कांती । उत्तमा विपत्तिसंग घडे ॥ १ ॥ एकाविण एक अशोभ्य दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ २ ॥ रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रांधू नेणे-स्वयंपाक करणे जाणीत नाही. अर्थ :- अंगावर भरपूर अलंकार घातले आहेत; पण ज्याच्या अंगावर अलंकार आहेत, तोच सारखा रडत असेल किंवा तोच कांतिविहीन व दैन्यवाणा असेल तर मग काय उपयोग ? कारण दागिने अथवा अलंकार उत्तम असले तरी, ते विपत्तीच्या संगतीत असल्याने त्याची काती असून नसल्यासारखीच वाटते १ एकास दुसरे शोभून दिसणारे जर दातारा, नसेल तर त्याचा उपयोग काय ? पांडुरंगा, कृपेच्या सागरा, मग ते सुरूपही विशोभित दिसेल. २ चांगली स्वयंपाकाची आयती तयारी केली व ती ज्याला स्वयंपाक बिलकुल येत नाही, त्याच्यापुढे नेऊन ठेविली तर तिचा काय उपयोग होणार ? ती सर्व वायाच जाणार ना ! ३ तुकाराम महाराज म्हणतात, शेळीच्या गळ्यात कुणी सर्व चिंता दूर करणारा चिंतामणी बांधला तरी त्याचा काय उपयोग होणार तिला ? तो त्या स्थानी विशोभितच दिसणार. ४ ९११ दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसी ॥ १ ॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ २ ॥ भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥ ३ ॥ तुका म्हणे येथें झांकितीळ डोळे । भोग देतेवेळे येईल कळों ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- तव-तर. अर्थ - या मानवी जन्मात दुःखाचे डोंगरच्या डोंगर सहन करावे लागतात, हे तर सर्वांनाच माहीत आहे. १ असे असूनही हे लोक आपल्या हिताचा विचार कधी करीत नाहीत, की कधी प्रभूच्या नामाचा घोष करीत नाहीत. २ या जन्मी आपण जे भोग भोगीत आहोत, ते पाहून या मागील जन्मात आपण उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे जे जे कर्म केले असेल ते ते ध्यानी येते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक याकडे या जन्मी डोळेझाक करतील व मग नाना खडतर भोग भोगताना मात्र त्यांना समजून येईल. ४ ९१२ सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥ १ ॥ मुखीं वाणी कानीं कीर्ति । डोळे मूर्ती देखाया ॥ २ ॥ अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होतीं पांगुळें ॥ ३ ॥ घरास आणि लायुनि जागा । न पळे तो² गा वांचे ना ॥ ४ ॥ तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- सदैव-सुदैवाने, ठकलीं-फसली. अर्थ:-तुम्ही फार सुदैवाने जगणारे आहात, कारण ईश्वराने तुम्हाता सर्व अवयव नीटनेटके दिलेले आहेत. चालण्यासाठी पाय आहेत, पुण्यकर्म करण्यासाठी हात आहेत १ देवाचे नाव घेण्यासाठी वाणी मुखात आहे. त्याची कीर्ती ऐकण्यासाठी कान आहेत, त्याची मूर्ती पाहण्यासाठी डोळे आहेत. २ कित्येक आंधळे, बहिरे, मुके, पांगळे परमेश्वराची सेवा करिता येत नाही म्हणून फसले गेले आहेत ३ घराला आग लागली आहे व आत राहणारा जागा असून पळत नाही, तो कसा जिवंत राहणार ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, लोकांनो, तुम्ही आपल्या हिताविषयी नीट जागृत असा. ५ १ विघ्नवेने सगतीं, २ ते.
सार्थ तुकारामगाथा ४१९ ९१३ ऐसे पुढती मिळता आता । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥ १ ॥ म्हणउनि फावले तें घ्यावे । नाम गावे आवडी ॥ २ ॥ संचित प्रारब्ध गाढें । धावे पुढे क्रियमाण ॥ ३ ॥ तुका म्हणे घुबडा ऐसे । जन्म सरिसे शुकराचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ऐसे-असा मानवी देह शूकर-डुक्कर अर्थ - मानवी देहासारखे उत्तम साधन पुढे प्राप्त होईल असे नाही याबाबतीत आपण स्वतंत्र नसून आपल्या हाती सत्ताही काही नाही १ म्हणून जो आज मिळाला आहे, त्याचा फायदा घेऊन ईश्वराचे नाव मोठ्या प्रेमाने घेत जावे २ कारण आपल्या संचित कर्माची मोठ्या प्रारब्धाची व क्रियमाणाची गती एकसारखी पुढे धाडत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात यापुढे कदाचित घुबडाचे, डुकराचे जन्म न येतील हे कशावरून ? तेव्हा तुम्ही या नरजन्मातच काय साधायचे असेल ते साधा ४ ९१४ सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आता कोण भाव निवडे एक ॥ १ ॥ संसाराची मज न साहेचि वार्ता । आणीक म्हणता माझें कोणी ॥ २ ॥ देहसुख काहीं बोलिले उपचार । विष ते आदर बद' वाटे ॥ ३ ॥ उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥ ४ ॥ तुका म्हणे काहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवाचे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - न साहे-सहन होत नाही, बद-वधन उपाधी-अडचण अर्थ - या सर्व लौकिक व सांसारिक गोष्टींविषयी माझा जीव त्रासून गेला आहे आता नाही असा कोणता एक भाव मी निवडून सांगू ? १ संसारासंबंधी तर मला कसलीच रुची नाही, त्याची वार्ताही सहन होत नाही आणि दुसऱ्याने कुणी हा संसार माझा माझा असे म्हटल्याचेही सहन होत नाही २ देहाला सुख देणाऱ्या काही उपचारांविषयी कुणी सुचविले तर तेही मला आवडत नाही इंद्रियसुखाचे हे भोग मला विषाप्रमाणे वाटतात त्याचे मोठे बंधनच माझ्या मनावर असते ३ कुणी माझा गौरव केला, कुणी माझी प्रतिष्ठा सांगितली तर त्या स्तुतीने माझा जीव फार कासावीस होतो ४ तुकाराम महाराज म्हणतात मला आता दुसरे काहीही सहन होत नाही मला या वैष्णवांचेच पाय महमी आवडतात मी त्यांचाच आश्रय घेतो ५ ९१५ आणीक काहीं या उत्तराचे काज । नाहीं आता मज बोलावया ॥ १ ॥ भिन्न भेद हे भावनाव्स्वभाव । नव्हे काहीं देव एकविध ॥ २ ॥ गुण दोष कोणे निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म ते ॥ ३ ॥ तरिच भले आता न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥ ४ ॥ तुका म्हणे गुण गाई या देवाचे । घेई माझे वाचे हेचि धणी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - काज-कारण धणी-तृप्ती अर्थ - आता दुसरे काही बोलावे हे कारणच मजजवळ नाही १ मानवी स्वभावानुसार ज्या ज्या भावना असतील त्या त्या प्रमाणे भिन्न भिन्न प्रकार असले तरी देव हा एकविध म्हणजे विविधतेतही एकपणानेच नटलेला आहे २ गुणांची व दोषांची निवड कोणत्या धर्मावरून करावी ? कर्म व अकर्म याची निवड कशी करावी ? याना कसे जाणावे ? ३ आता कुणाचीही संगत धरू नये यातच खरे म्हणजे चांगले आहे यामुळे दुःखाचे प्रसंगही आपोआप तुटले जातील ४ तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी या देवाचेच गुण गात राहील यातच तिची तृप्ती आहे ५ १ बध
४२० सार्थ तुकारामगाथा ९१६ आपुल्या विचार करीन जीवांशीं । काय या जनांशीं चाड मज ॥ १ ॥ आपुलें स्वहित जाणती सकळें । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ २ ॥ आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥ ३ ॥ माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥ ४ ॥ तुका म्हणे भाकूं आपुली करुणा । जयाची वासना तया फळे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- चाड-किंमत, वोज-चांगला. अर्थ :- परमार्थासंबंधीचा विचार मी माझ्या जीवाला विचारूनच करीन. इतर लोकांची किंमत मला काय असणार ? त्यांचा संबंध काय ? १ जो तो आपले हित नीटपणे जाणीत असतोच; त्यांना त्यांच्या कर्मापासून निरोधित केले तर दुःखच होणार. २ माझी ही कथा कोणी ऐको वा न ऐको, किंवा कोणी आपल्या घरी सुखाने झोपी जावोत. ३ माझा तरी या मार्गात असा कोणता चांगला शेवट झाला आहे की, ज्याच्यामुळे मी इतरांना मार्गाला लावावे ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी स्वतःपुरती त्या ईश्वराची करुणा भाकेन. ज्याची जशी वासना तसा तो त्यास प्रसन्न होईल. तशी त्याची वासना फळद्रूप होईल. ५ ९१७ धाईं अंतरिच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥ १ ॥ विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ २ ॥ वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥ ३ ॥ अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥ ४ ॥ साधनाची सिद्धि । मौन करा स्थिर बुद्धि ॥ ५ ॥ तुका म्हणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - धाईं-संतुष्ट, ब्रह्मवृंदें-ब्राह्मणांचे मेळावे. अर्थ :- अंतःकरणातील परमेश्वररूपाच्या दर्शनाने जे सुख होईल ते ध्यानात धरून संतुष्ट व्हावे. मुखाने उगाच बडबड कशास करावी ? १ परमेश्वराच्या विषयांची अनुभवाची गोडी जोपर्यंत लाभलेली नाही, तोपर्यंत विधिनिषेधांची शुष्क चर्चा नुसती उर फोडणारी व्यर्थच होते. २ जोपर्यंत ईश्वरविषयक अनुभव आलेला नाही, तोपर्यंत हृदयातील तळमळ मात्र वाढत असते. ३ कित्येक जण आपल्याच विशिष्ट मताने येडावलेले असून त्यांचा त्यायोगे काहीही फायदा झालेला नाही. ते जिथे आहेत, तिथेच दिसतात. त्यांच्यांत कसलीही प्रगती झालेली नाही. ४ तुम्ही मौन धारण करून बुद्धी स्थिर करा. हीच खरी म्हणजे सर्व साधनांची सिद्धी आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु व्यर्थ वादविवाद करकरून हे ब्राह्मणांचे समुदाय किंवा मेळावे उगाच वाया मात्र गेलेले दिसतात. ६ ९१८ कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥ १ ॥ कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ २ ॥ भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥ ३ ॥ तुका म्हणे लागे हातां । काय मथिलें घुसळितां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कुशळ-कुशल, सांकडीं-संकटात, उपणुनि-पाखडून, मथिलें-पुसलेले असता. अर्थ :- जे शास्त्रांमध्ये कुशल आहेत, त्यांचे सारे आयुष्य विधिनिषेधांच्या जंजाळातच जाते व ज्यांची बुद्धी प्रगल्भ आहे, ते नेहमीच वाद करण्यास प्रवृत्त झालेले असतात. १ ढोंग किंवा दंभ व विषयांची संकटे यांत हे दीन बापडे लोक कसे फसून गेले आहेत पाहा. २ भुसा पाखडून काय हाती लागणार ? दाणेही जातील व भुसही हातचा जाईल. ३ आधीच लोणी काढून घेतले असताना मग ताक घुसळले असता काय हातात येणार ? ४
सार्थ तुकारामगाथा ४२१ ९१९ संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्या गव्हाणें जाणावे हे ॥ १ ॥ विठ्ठलाचे नाम घेतां नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ २ ॥ करितों कवतुक बोबडा उत्तरीं । झणी मजवरि कोप धरा ॥ ३ ॥ काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नयें ॥ ४ ॥ तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - गव्हारे = गवार माणसाने, अडाणी माणसाने, झणी = नको अर्थ :- मी माझ्या कवितांमधून जे काही बोलतो, ते खरे म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या संतांचीच उच्छिष्ट अशी वचने असतात मी अडाणी माणसाने याशिवाय काय बोलावे ? १ मला एका विठ्ठलाचे नामही शुद्धत्वाने नीट घेता येत नाही अशा स्थितीत मला आत्मबोधाचे ज्ञान कसे होणार ? २ मी काही कौतुकाने कवित्व करून बोबडे बोल बोलतो, यासाठी मजवर तुम्ही कोणी राग करू नका. ३ माझी जाती कोणती ? माझा अधिकार कोणता ? यासंबंधी तुम्ही कसलाही विचार नका करू. आणि याविषयीही मी फार बोलू नये ४ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु हा देवच मला बोलवितो. त्यात काही गुह्य अर्थ असला किंवा काही भावरहस्य असले, तर तो एक परमेश्वरच जाणणारा आहे. ५ विवरण - या एका महत्त्वाच्या व प्रसादपूर्ण अभंगात आपल्या कवित्त्वविषयी व अनुभूतीविषयी तुकोबांनी दानतीन तत्त्वे फार स्पष्टपणे व मार्मिक रीतीने सांगितली आहेत प्रथमच त्यांनी नेहमीप्रमाणे कबूल केले आहे की, मी तसा अडाणीच मनुष्य असून मागील, जे कोणी मोठे सत्पुरुष होऊन गेले त्यांचेच उष्टे बोल मी बोलत आहे मागे जे श्रेष्ठ ऋषीमुनी बोलून होते, त्याचाच भाव आपण कवितेत सांगून 'झाडू संतांचे मारग । आंदरांनी भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरला तो सेवू' अशा ओळींतून त्यांनी आपल्या कवित्वाच्या व भक्तिप्रसाराच्या कार्याचे पूर्वपरंपरामूल थोडक्यात येथेही स्पष्ट केले आहे दुसरा एक मुद्दा येथे उपस्थित झालेला आहे तो असा की, तुकोबा उच्च वर्णीयांच्या जातीचे नसल्यामुळे त्यांना कवित्त परावाक्यनिरुपणाचा अधिकार आहे की नाही ? त्यांनी वेदाचा अर्थ सांगावा की नाही ? अशा प्रका- रचे प्रश्न व त्याची चर्चा बुवांच्या वेळी होत होती या प्रकरणात त्यांच्यावर कित्येक कठिण असे अपमानाचे प्रसंगही गुदरले होतेच ते लक्षात ठेवूनच सांगतात का, मी हे सारे कौतुकाने कवित्व करीत आहे माझ्यावर कोणी रागही धरू नये माझी जात कोणती, हेही कोणी विचारू नये, असे त्यांनी विनविले आहे खरे म्हणजे विष्णुदासाना कसली आली ही जात ? असाच सिद्धान्त त्यांनी इतरत्र सांगितलेला आहे, आणि हा निर्णयही वेदशास्त्रास धरूनच असल्याची खात्री त्यांना होती 'यातायाती धर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं' उगाच आपला वर्णाचा अभिमान धरून कोण शहाणे झाले आहेत ? कोण पवित्र झाले आहेत ? उलट 'अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । संताचीं पुरानें भाट झालीं' एवढेच सांगून बुवा थांबत नाहीत, तर कबीर, लतिफ, सेना, कान्होपात्रा, दादू, चोखा, जनी इत्यादी तथाकथित यातिहीनांची उदाहरणे देऊन तुकारामबुवा विष्णुदासाना, विठ्ठलभक्ताना जातिधर्म उरत नाही, असच सांगतात "तुका म्हणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य ' तिसरा एक महत्त्वाचा विचार या अभंगातील असा की, आपण जरी यातीहीन आहोत तरी आपल्या मुखा- तून जी अभंगवाणी स्रवते ती नुसती प्रसादिक आहे असे नव्हे, तर प्रत्यक्ष देवाचीच आहे असा बुवांचा विश्वास होता आपणास देव बोलवितो हे त्यांनी कित्येक ठिकाणी स्पष्ट केले आहे तुकोबाना देव बोलवितो याचा अर्थ असा की, अनुभवाने तुकोबा स्वत च देवत्व या पदवीस पोचलेले होते सर्वत्रहि देवच पसरून राहिलेला असल्याची अनुभूती त्यांना होती 'भावारूढ तुका झाला एका एकीं । देवच लौकिकीं अवघा केला' एका भक्तिभावामुळे सर्व विश्वच देवमय झाल्यामुळे तुकोबा बोलतील ते देव बोलला असे मानण्यात गैर काय आहे ? आणि याच भूमिकेवरून तुका- रामबुवा नेहमी म्हणत असत, 'तुका म्हणे मज बोलवितो देव', 'म्हणती माझे बोल बोले पांडुरंग,' 'पांडुरंगे भार घेतला माझा, ' 'भावाइढ तुका मुद्रा विठोबाची, ' 'बोलवितो देव मज', 'परि त्या विश्वभरें बोलविले',
४२२ सार्थ तुकारामगाथा 'मज विश्वंभर बोलवितो' 'वदवी गोविंद तैंचि वदें' यासारख्या वचनाचा भावार्थ सहज, स्पष्ट व तर्कानही पटणारा असाच आहे ९२० चंदनाच्या वासे धरितील नाक । नावडे कनक न घडे हे ॥ १ ॥ साकरेची गोडी सारखी सकळा । थोरा मोठ्या बाळा धाकुटियां ॥ २ ॥ तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - कनक-सोन अर्थ - सुवासिक चंदनाच्या वासाने त्रस्त होऊन कुणी स्वतःचे नाक धरून बसतील का ? सोने कुणाला आवडणार नाही असे कधी होईल का ? १ साखरेची गोडी सर्वांना, थोरांना, लहानांना, मध्यम वयाच्या लोकांना सारखीच असते २ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझे चित्त जर शुद्ध असते तर लोकांनी ही अशी निंदा कधी केली नसती ३ ९२१ तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ॥ १ ॥ शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देही ॥ २ ॥ भावे हे कदान्न खासी त्याचे घरी । अभक्ताच्या परी नावडती ॥ ३ ॥ न वजासी जेथें दुरी दवडिता । न येसी जो चित्ता योगियाच्या ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - परी-प्रकार न वजासी-जात नाहीस अर्थ - देवा, तुझ्यासारख्या उदार बाहयाचे नाव दुसरोकड कुठे मिळणार ? तू दातृत्वाची एक रासच आहेस तू आपले स्वतः चे स्थानही आपल्या दासाना देतोस १ मग त्या सेवकाचे अथवा भक्ताचे कुळ शुद्ध आहे, की अशुद्ध आहे उच्च आहे की नीच आहे, हेही न पाहता त्याच्या निर्मळ देहात तू निवास करीत असतोस २ त्याच्या घरचे निकृष्ट अन्नही तू मोठ्या प्रीतीने खातोस देवा, परतु जे अभक्त असतात त्यांच्या घरी असणाऱ्या नाना पक्वान्नाचे प्रकारही तुला आवडत नाहीत ३ भक्ताच्या येथून तुला दूर केले, तरी तेथून तू हालत नाहीस, जात नाहीस, पण मोठमोठ्या योग्याच्याही चित्तात तू क्षणभरही ठरत नाहीस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा हीच तुती खरी खरी ब्रीदे आहेत असे चारही वेद सांगतात ५ ९२२ तरि का नेणते होते मागें ऋषी । तोंहीं या जनासी दुराविले ॥ १ ॥ वोळगती जया अष्ट महासिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥ २ ॥ कंदमूळें पाला घातुच्या पोषणा । खातील वास राणा तरी केला ॥ ३ ॥ लावूनिया नेत्र उगेचि बैसले । न बोलत ठेले 'मौन्यमुद्रे ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसे करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - तोंहीं-त्या ऋषींनाही, वोळगती-प्रसन्न होतात अष्ट महासिद्धी-अणिमा-शरीर सूक्ष्म होणे, महिमा-शरीर मोठ होणे, गरीर हल्के होण प्राप्ति-सब प्राण्याच्या इद्रियानी त्या त्या अधिष्ठात्री देवताना रूपाना सरध यण प्राकाम्य-ऐहिक व पारलौकिक स्थानी भोग व दानाचे सामध्य येण ईशिता-ईश्वराच्या ठिकाणची मायचा प्रेरणा वगिता-आसक्त न हाण आणि प्राकाम्य-इच्छितर गुण अमर्यादपण प्राप्त होण या आठ महासिद्धी म्हणून मागितल्या आहत राणा-रानाबनात अर्थ - जे या सर्वसामान्य लोकांपासून दूर राहिले, ते पूर्वचि ऋषीमुनी काय अज्ञानी होते की काय ? त्यांनी या सामान्य जनांना का दूर केले ? १ ज्यांना अष्टमहासिद्धी प्रसन्न आहेत, त्यांनी सुद्धा या सामान्य लोकांच्या १ मौनरूप
सार्थ तुकारामगाथा ४२३ बुद्धीने वागण्याचे नाकारलेले आहे. २ ज्यांनी रानावनांत निवास केला आहे, ते केवळ शरीरधारणेसाठीच कंदमुळे व पाला भक्षण करतात. ३ या त्यानंतर हे साधक सज्जन डोळे मिटून, ध्यानस्थ होऊन, अचोल होऊन, मौनव्रत स्वीकारून बसले आहेत. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझ्याही चित्ताची अवस्था अशीच होईल, असे तू करावेस अनंता, या सर्वसामान्य लोकांपासून तू मला दूर करावेस. ५ ९२३ कोणाच्या आधारे करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥ १ ॥ शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी याचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥ २ ॥ कलियुगीं बहु कुशल हे जन । छळितील गुण तुझे गातां ॥ ३ ॥ मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥ ४ ॥ तुका म्हणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठाव-आधार, सवा-बाजूनी. अर्थ :- देवा, आता मी कुणाच्या आधाराने या मार्गाविषयी विचार करू रे? माझ्या दीन जीवास कोण धीर देईल रे ? १ मी काही मोठा शास्त्रज्ञ नाही, पंडित नाही, मोठा याचकही नाही. मी एक यातीहीन असून मला दुसरीकडे कुठे आधारही नाही. २ आणि या कलियुगात तर लोक किती चतुर झाले आहेत ते पाहा तुझे गुणगान करीत असतानाही ते मला छळतील. ३ तेव्हा, देवा, आता मी काय करावे रे? तुझे भजन करू ? की या लोकांच्या नादी लागू ? दोन्हीकडून मी संशयात सापडलो आहे. मी काय करावे आता ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी या लोकांना दूर करू ? की यांच्याबरोबर मरण पत्करू ? दोनही गोष्टी मला बऱ्याच दिसतात. ५ ९२४ काय उणें जालें तुज समर्यासी । ऐसा मजपाशी कोण दोष ॥ १ ॥ जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥ २ ॥ तुजविण रत आणिकाचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दायीं मज ॥ ३ ॥ तुका म्हणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वेव्हार-प्रकार, रत-रममाण, आणिकांचे-दुसऱ्याचे, गुमान - भीड, उगवून - स्पष्ट करून. अर्थ :- देवा, तू सर्वसमर्थ असताना तुला कोणत्या गोष्टीची उणीव आहे ? किंवा माझा तरी असा कोणता दोष निर्माण झाला आहे ? १ तू माझा स्वीकार का करीत नाहीस ? मी हा सर्व प्रकार संतांच्या मेळाव्यात सांगू का ? २ तुझ्याशिवाय इतर दैवताच्या ठिकाणी मी रममाण झालो आहे, अशी साक्ष कुणी तरी द्यायला तयार आहे का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, उगाच भीड धरून काय बसला आहेस रे ? सर्व काही गोष्टी तुम्ही मला समजावून सांगा ना ४ ९२५ काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥ १ ॥ सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैंची उरी ॥ २ ॥ अनेक दीपांचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥ ३ ॥ तुका म्हणे नेंणे दुजें । एका विण पंढरीराजें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आन-इतर, दुजें-दुसरे. अर्थ :- या एका पंढरीनाथावाचून इतर दैवताचा मला काय उपयोग आहे ? १ एकदा नदी समुद्रास मिळाली की मग ती आपल्या वेगळ्या नावाने कुठे उरते ? २ सूर्य उगवताच इतर लहानसान दिव्याचा प्रकाश संपतोच की नाही ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, या एका पंढरीराजाशिवाय मी दुसरे दैवत कधीच जाणीत नाही. ४
४२४ सार्थ तुकारामगाथा ९२६ काय करु कर्माकर्म । धरें सापडले वर्म ॥ १ ॥ होसी नामाच सारिखा । समजाविली नाहीं लेखा ॥ २ ॥ नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी सचला ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें । काय होईल तुम्हा ओझें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लेखा-मर्यादा, वेचावेच-जमाखर्च अर्थ - कर्म व अकर्म याच्या कटकटींची चर्चा मी कशास करू ? मला या विठ्ठलाच्या नामाचे हे वर्म खरे सापडले आहे १ देवा, तू तुझ्या नामासारखाच कृपाळू व वत्सल होतोस व त्याचप्रमाणे आपल्या भक्ताची समजूत काढतोस अशी किती जनाची समजूत काढलीस त्याला सीमा नाही २ तुझ्या स्वरूपाविषयीही देवा काही खर्च वा काही जमा, असे न होता तू जसा आहेस तसाच साचून आहेस ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा, माझे ओझे तुम्ही का मानावे ? ४ ९२७ एकाएकीं हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥ १ ॥ आम्ही देवा शक्तिहीने । भाकू तेणे करुणा ॥ २ ॥ पावटणी केला काळ । जया बळ होते ते ॥ ३ ॥ तुका म्हणे वीर्यावीर । सतधीर समुद्र ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हातोफळी-हातावर हात मारून ठाया-ईश्वरस्वरूपात पावटणी-पायरी अर्थ - कित्येक बलवान साधुसत आपल्या हातावर हात देऊन, टाळी वाजवून ईश्वरस्वरूपास प्राप्त झाले आहेत १ पण देवा, आम्ही मात्र शक्तिहीन असल्याने तुझी करुणाच केवळ भाकू २ ज्या साधुसंताना सामर्थ्य होते, त्यांनी यमास आपल्या घरी चढून जाण्याच्या पायरीचे स्थान दिले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सत म्हणजे धैर्यवान व वीरातील वीर असून धीराचे समुद्रच आहेत ४ ९२८ पुढिलांचे इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥ १ ॥ सत गेले तया ठाया । देवराया पावतीं ॥ २ ॥ ज्येष्ठांचीं का आम्हा जोडी । परवडी न लभो ॥ ३ ॥ तुका म्हणे करीं फोड । पुरवीं लाड आमुचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - परवडी-प्रकार अर्थ - आमच्या पुढे जाऊन साधुसंतानी जे मिळविले, त्याचीच इच्छा मीही करीत आहे पण माझ्या अंगी तेवढे बळ मात्र नाही १ पण देवराया, यापूर्वीचे साधुसंत जेथे जाऊन पोचले आहेत, ते स्थान मला दाखवा त्या स्थानावर मला पोचवा २ ज्येष्ठ असणाऱ्या साधुसंतानी भक्तीचे जे जे प्रकार भोगले त्याचा लाभ आम्हांस का होऊ नये ? ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही आमचे कोडकौतुक करून लाड पुरवा ना ४ ९२९ कैवल्याच्या तुम्हा घरीं । रासी हरी उदंड ॥ १ ॥ मजसाटीं का जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ २ ॥ सर्वो गुणीं सपूरता । ऐसा पिता असोनी ॥ ३ ॥ तुका म्हणे पाडुरंगा । जालो सागा सन्मुख ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कैवल्याच्या-मोक्षाच्या, उदंड-पुष्कळ वाणी-कमतरता अर्थ - देवा, तुमच्या घरी मोक्षाच्या पुष्कळ राशी असतील १ मग मलाच सर्व बाबतीत कमतरता का हो ? मला त्यांचा वाटा का मिळत नाही ? २ तू सर्व गुणांनी सपूर्ण असून, सर्वांचा पिता असून माझ्या
सार्थ तुकारामगाथा ४२५ धांवतोस अशी उणीव का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तुमच्या समोर येऊन उभा आहे, मला सांगा ना सर्व काही ४ ९३० आपल्याला तुम्ही रूपासी समजा । फासया घरजा आरसिया ॥ १ ॥ हे तो नव्हे देहबुद्धीचे कारण । होईल नारायणे दान केले ॥ २ ॥ शत्रूचिया बाणे वर्मासि स्पर्शवे । हे तो नाहीं ठावे मोकलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे बहु मुरें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - फासया-बाय म्हणून, घरजा-त्याग, राग अर्थ - आपापल्या रूपांना तुम्ही समजून घ्या ना उगाच रागारागाने आरसाच टाकून देण्यात काय अर्थ आहे ? १ देहबुद्धी निर्माण होऊन नीट शरीर रक्षणाचे समजले म्हणजे गुह्यरूप प्राप्त होते असे नाही नारायणाने दान दिले तरच रूप आपणास मिळते २ शत्रूच्या बाणामुळे शत्रूच्या वर्मास स्पर्श होतो, पण ते बाण सोडणाऱ्यास समजत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, बहुमुलानी ही वचने सांगितली तरी सत्याशिवाय त्याना महत्व नाही ४ ९३१ न मनावी चिंता तुम्ही सतजनों । हिरा स्फटिकमणी केवि होय ॥ १ ॥ पडिला प्रसंग स्थळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ २ ॥ बहुतासी भय एकाचिया दंडे । बहुत या तोडे वचनासी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं बैसरी या सर । करायाचे चार वेडे वेडे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - न मनवी-मानू नये करू नये पारिखा-परका, सर-बरोबरी अर्थ - तुम्ही सत लोकानी कसलीही चिंता करू नये कारण हिऱ्याप्रमाणे लाभलेला हा परमेश्वर स्फटिक- मण्याप्रमाणे होणार नाही १ जेथे आपण आहोत, त्यानुसारच जो प्रसंग निर्माण झाला आहे काही परका भावही पाहिला हेही खरे आहे २ एकाला शिक्षा केली की, इतर पुष्कळांना भय वाटू लागते शब्दानाही पुष्कळ वेगवेगळा अर्थ प्राप्त झालेला असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, नाना प्रकारचे वेडेचार करणारी व इतरांची बरोबरी करणारी अशी माझी वाणी नाही ४ ९३२ यथाविधि पूजा करी । सामग्री तोवरि हे नाहीं ॥ १ ॥ आतां माझा सर्व भार । तू दातार घालविसी ॥ २ ॥ मंगळ ते तुम्हीं १ जाणा । नारायणा काय ते ॥ ३ ॥ तुका म्हणे समर्पिला । तुज विठ्ठला देहभाव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सामग्री-सामग्री अर्थ - देवा यथाविधीने पूजा करावी अशी काही सामग्री मजजवळ नाही १ परंतु दातारा, माझा सर्व भार आता तुम्हीच चालवीत आहात २ नारायणा, जे काही पवित्र व मंगल आहे ते तुम्ही जाणीत आहात ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा हा सब देहभाव मी तुलाच समर्पित केलेला आहे ४ ९३३ भवसिंधूचे हे तारू । मज विचारु पाहता ॥ १ ॥ चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ २ ॥ माझ्या खुणा मनापाशी । तें या रसीं बुडाले ॥ ३ ॥ तुका म्हणे वर्म आले । हाता भले हें माझा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - विचारु-विचार करून पाहता १ आम्ही जाणा तु गाथा ५४
४२६ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- मी नीट विचार करून पाहिले, तेव्हा देवा, तुम्ही मला भवसिंधू तरून नेण्याइतके समर्थ असे ताह आहात हे समजले. १ देवा, तुमचेच पाय मी माझ्या चित्तात धारण करीन गुप्त काय ते तेथेच आहे. २ माझ्या मनाच्या असलेल्या परमार्थाच्या सर्व खुणा या हरीच्या भक्तिरसात बुडून गेल्या आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हातात हे मर्म आले; हे फार चांगले झाले आहे ४ ९३४ पाहाता श्रीमुख सुखावले सुख । डोळियांची भूक न वजे माझी ॥ १ ॥ जिव्हे गोडी तीन अक्षराचा रस । अमृत जयास फिके पुढें ॥ २ ॥ श्रवणींची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद धारोनियां¹ ॥ ३ ॥ महामळें मन होतें जें गांबले । शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे ॥ ४ ॥ तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सापडलें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - न वजे-जात नाही, गांबले-भरलेले अर्थ - या श्रीहरीचे मुख पाहताच माझे सुख सुखावले गेले व माझ्या डोळ्याची भूक ही कधी जात नाही असे झाले. १ विठ्ठल या तीन अक्षराच्या भक्तिरसात गोडी निर्माण झाली असून तिच्यापुढे प्रत्यक्ष अमृतही फिके पडत आहे २ या श्रीहरीचे गुणगान ऐकण्याची वाटही चांगली शुद्धपणे चोखाळलेली असून सर्व भेदाभेद संपून गेले आहेत. ३ माझे मन मोठ्या मळामुळे भरलेले होते, ते यामुळे शुद्ध होऊन स्फटिकाप्रमाणे निर्मळ झाले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल म्हणजे माझ्या जीवनाचे जीवन असून एका फार मोठ्या मोलाचा साठा मला सापडला आहे ५ ९३५ हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देता ठायी द्वैत तुटे ॥ १ ॥ बोलापासि मात मन निवे हर्षे चित्त । दुणी बाढे प्रीत प्रेमसुख² ॥ २ ॥ जनात भूषण वैकुंठी सरता । फावले स्वहिता सर्वभावें ॥ ३ ॥ तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पाहयला ॥ ४ ॥ तुका म्हणे हा विठ्ठलचि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - आळंगीन-आलिंगीन, बाहीं-बाहूंनी. अर्थ :- या परमानंदस्वरूपाच्या श्रीहरीस मी दोन्ही बाहूंनी आलिंगन देईन. त्याला आलिंगन दिल्या- बरोबर द्वैताचा नाश होतो १ त्याच्याविषयी गोष्टी करण्यातच विशेष आनंद चित्ताला होतो, मन निवून जाते व प्रेमसुखात दुप्पटीने वाढ होते २ लोकात भूषण वाढून शेवटी वैकुंठाची प्राप्ती होते सर्व प्रकारचे स्वहित साधले जाते ३ सर्व प्रकारचा लौकिक व्यवहार संपतो, मायिक लोकाचार संपून जातो, आणि संसाराविषयीची भावना समूळ नष्ट होते ४ तुकाराम महाराज म्हणतात, मला याच विठ्ठलाची रात्रंदिवस सोबत हवी; माझ्या जीवास आणखी दुसरी कसलीही हौस नाही ५ ९३६ आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥ १ ॥ प्रेमपान्हा स्तनां सदा सर्वकाळ । दृष्टि हे निमंळ अमृताची ॥ २ ॥ भूक तान दुःख वाटो नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनिया ॥ ३ ॥ आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आम्हा करीं खेळावया ॥ ४ ॥ तुका म्हणे लावीं संताचा सांगात । जेयें न पवे हात कळिकाळाचा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - दवडी-नाहीसा कर, ठाव-स्थान, सांगात-सोबत. १ निवारुनि, २ प्रेमसुखें
सार्थ तुकारामगाथा ४२७ अर्थ - देवा, तू आमची कृपाळ अशी माउली आहेस आमची सावलीच असणाऱ्या विठ्ठला, मी तुला शरण आलेलो आहे १ देवा, तुझ्या स्तनात माझ्यासाठी सदासर्वकाळ प्रेमपान्हा तयार असावा तुझी दृष्टी अमृताची व निर्मळ अशी मजवर असावी २ देवा, मला भूक, तहान, दुःख, त्रास याचे कष्ट होऊ नयेत तू माझ्या अंतःकरणाचे गुण जाणून आहेस ३ आशा, चिंता, तृष्णा, माया याना तू दूर घालविले असून, आम्हास तुझ्या स्वरूपात खेळण्या- साठी स्थान निर्माण केले आहेस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू आम्हाता संताची संगत दे तो अशी दे की, ज्या ठिकाणी कळीकाळा यमाचाही हात पोचू शकणार नाही ५ ९३७ जेथें जावे तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेपें सतसंगें ॥ १ ॥ पूर्व पुण्यें बरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ २ ॥ भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतापायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे हेचि करावी मिरासी । बळी संतापाशीं द्यावा जीव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कपाळ-नशीब, सरिस-बरोबर अर्थ - ज्या ज्या ठिकाणी जावे, त्या त्या ठिकाणी आपले नशीब आपल्याबरोबर येत असते संताच्या संगतीने आपल्याला विशेष लाभ होत असतो १ आपल्याला आपली पूर्वपुण्ये जर अनुकूल झाली तर मग या विठ्ठलाशी किंवा संताशी वियोग होणारे मूळच उत्पन्न होणार नाही. २ संपत्ती, मुलगा, पत्नी हे खरे म्हणजे आपले भाग्य नव्हे या संताच्या चरणापाशी असलेला निवास चांगला असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, संताचे पाय हेच आमच्या मिराशीचे ठाणे व्हावे व आमच्या जीवाचा बळी याच संतांच्या पायावर जावा असे वाटते. ४ ९३८ आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हेचि दृढ ॥ १ ॥ जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ २ ॥ जोडीन ते आता देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥ ३ ॥ तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणे इहलोका आलो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तुटे-संपेल, दुस्तर-सांपडण्यास कठिन असा अर्थ :- आता मी या आयुष्यात इतर काही सोस करणार नाही या विठ्ठलाचे पाय दृढ भावाने चित्तात धरून ठेवीन १ यामुळे भवसिंधू उतरून जाण्यास मदत होईल संपण्यास कठिन असा गर्भवासही संपेल २ या आयुष्यात मी आता देवाचे चरण जोडीन, हेच माझे परमार्थविषयक असे अविनाशी धन आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले, हा मनुष्यदेह मला मिळाला आणि याच देहाने मी या लोकी जन्मास आलो ४ ९३९ जतन करीन जीवें । शुद्धभावे करुनी ॥ १ ॥ विठ्ठल विठ्ठल हे धन । जीवन अंतकाळींचे ॥ २ ॥ वदळ हे सचित सारू । बरवा करू उदिम हा ॥ ३ ॥ तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटीं साठवू ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वदळ-वरवरचे अर्थ - या विठ्ठलाचा ठेवा मी आता जीयाभावाने जपून ठेवीन शुद्ध भावाने मी त्याचे रक्षण करीन १ अंतकाळच्या जीवनाचे मुख्य धन, हे विठ्ठलस्वरूपाचेच आहे २ वरवरचे संचितकर्म जे आहे ते दूर सारून या विठ्ठलाच्या प्राप्तीचा व्यवहार धन्यापैकी करू ३ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलास हृदयाच्या पेटीत, या संपुटात साठवून ठेवू ४ १ पुढें
४२८ सार्थ तुकारामगाथा ९४० एवढा प्रभु भावे । तेणे सपुटीं राहावे ॥ १ ॥ होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ २ ॥ एवढा जगदानी । मागे तुळसीदळ पाणी ॥ ३ ॥ आला नावा रूपा । तुका म्हणे जाला सोपा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सपुटीं-भक्ताच्या हृदयरूपी संपुष्टात, संपुटात अर्थ - हा प्रभू खरे पाहता केवढा मोठा, पण नवल असे की, तो भक्ताच्या प्रेमासाठी तो त्याच्या हृदयसंपुटात वास करतो १ याची जशी भक्ती करावी तसा तो प्रसन्न होतो जी इच्छा मनात धरावी ती तो पुरवितो २ एवढा मोठा हा सर्व जगास दान देणारा ईश्वर, पण भक्ताजवळ केवळ एखादे तुळशीचे पान मागतो पाण्याचा थेंब मागतो, व तेवढ्याने तो संतुष्ट होतो ३ हा ईश्वर आपल्या भक्तासाठी खरे म्हणजे नावारूपास, आला व तुकाराम महाराज म्हणतात, हा सर्व लोकांना अतिशय सुलभ असाही झाला ४ ९४१ भाग्यें ऐसी जाली जोडी । आता घडी विसंबेना ॥ १ ॥ विटेवरी समचरण । संतीं खूण सांगितली ॥ २ ॥ अवघें आता काम सारू । हाचि करू कंव्वाड ॥ ३ ॥ तुका म्हणे खंडू खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - विसभेना-गोडणार नाही कँवाड-निश्चयाने अर्थ - माझे फार मोठे भाग्य, म्हणून या विठ्ठलाची प्राप्ती मला झाली आता याला मी एक क्षणभरही सोडणार नाही १ संतानी खूण सांगितल्याप्रमाणे विटेवर समचरण असलेल्या या देवाचा लाभ मला झाला २ आता बाकीची सर्व कामे दूर सारून याची जपणूक निश्चयाने करू ३ तुकाराम महाराज म्हणतात, पापपुण्यामुळे होणाऱ्या या पुढरुपा जन्ममरणाच्या खपा खंडित करू ४ ९४२ पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ॥ १ ॥ सर्वभावे लोभ्या आवडे हे धन । आम्हा नारायण तैशापरी ॥ २ ॥ तुका म्हणे एकविध जाले मन । विठ्ठला वाचून नेणे दुजें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - प्रमाण-पूज्य अर्थ - पतिव्रता स्त्रीस जसा तिचा पती नेहमी पूज्य असतो, त्याप्रमाणे हा नारायण आम्हास अत्यंत प्रिय आहे १ सर्वांवा लोभ असणाऱ्या माणसास ज्याप्रमाणे धन अतिशय प्रिय असते, त्याप्रमाणे या नारायणाविषयी आमच्या मनात प्रीती आहे २ तुकाराम महाराज म्हणतात, या पाडुरंगचरणी आमचे मन एकरूप झाले असून या विठ्ठलाशिवाय दुसरे मी काहीही जाणीत नाही ३ ९४३ विठ्ठल गीत गांवा विठ्ठल चित्तीं घ्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥ १ ॥ अनाथाचा वधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भयबंधु यमपाश ॥ २ ॥ तोचि शरणागता हा विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या सतासमागमें ॥ ३ ॥ विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धि । लागली समाधि विठ्ठलनामें ॥ ४ ॥ विठ्ठलाचे नाम घेता जाले सुख । गोडावले मुख तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - गोडावले-गोड वाट अर्थ - या विठ्ठलाचेच नाम गीतामध्ये गावे, याच विठ्ठलाचे ध्यान चित्तामध्ये धरावे विटेवर उभा असणारा हा विठ्ठल डोळे भरून पाहावा १ हा विठ्ठल अनाथांचा बंधू असून कृपेचा सागर आहे हाच आपल्या
सार्थ तुकारामगाथा ४२९ भक्ताचे भयपाश व यमपाश तोडून टाकतो २ शरण आलेल्या भक्तांना हाच विठ्ठल मुक्तीचे दान देणारा असून या संतसमागमात हा नेहमीच प्राप्त होतो. ३ हा विठ्ठल म्हणजे गुणाचा साठा असून याच्यामुळेच सर्व सिद्धी प्राप्त होण्यासारख्या आहेत. या विठ्ठलाच्या नामामुळे समाधीच लागून राहते. ४ विठ्ठलाचे नाम घेताना फारच सुख झाले असून मुखही गोड झाले आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. ५ ९४४ विठो सांपडावया हातीं । ठावी जाली एक गती । न धरी भय चित्तीं । बळ किती तयाचे ॥ १ ॥ लागे आपणचि हातीं । किंव भाकावी काकुलती । करीं मग चित्तीं । असेल तें तयाचे ॥ २ ॥ एकलिया भाववळें । कें सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें । उभा ठाके हाकेसी ॥ ३ ॥ बांधा माझिया जीवांसी । तुका म्हणे प्रेमापाशीं । न सोडों तयासी । सर्वस्वासी उदार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गती-मार्ग अर्थः- हा विठ्ठल हातात सापडण्याचा एक मार्ग सापडलेला आहे. आता त्याची भीती तुम्ही मुळीच बाळगू नका, त्याची शक्ती अशी कितीशी आहे ? १ त्याच्याजवळ जरा काकुळतीचा भाव व्यक्त केला, की तो आपण होऊन आपल्या भक्ताच्या हातात येतो. मग तो आपल्या मनात असेल त्याप्रमाणे त्या भक्ताचे करतो. २ एकटघाऱ्याच्या भक्तीच्या बळाने तो कधी तरी कालान्तराने सापडतो; पण वैष्णवांच्या समुदायात मात्र नुसती हाक मारली तरी तो उभा राहतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या देवाला माझ्या जीवाशी बांधून टाकावे. प्रेमपाशाने हृदयाशी बांधल्यावर सर्वविषयी मी उदार असलो तरी याला मात्र सोडणार नाही. ४ ९४५ वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कें पां येथें येतीं । तया जन्ममरणराती । नाहीं चित्तीं परलोक ॥ १ ॥ धन्यधन्य हरिचे दास । तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तोर्यावास¹ भेटीची ॥ २ ॥ कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रदिवस । वाट कर जोडोनियां ॥ ३ ॥ रिद्धिसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरिभक्तां ॥ मोक्षसायुज्यता । वाट पाहे भक्तांची ॥ ४ ॥ असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उध्दरिले । महादोषी चाडाळ ॥ ५ ॥ सकळ करिती त्याची आस । सर्वभावे ते उदास । धन्यभाग्य त्यास । तुका म्हणे दहपणे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- कें-केव्हा, छतो-वाळली, सायुज्यता-चतुर्विध मुक्तीमधील एक. अर्थः- या वैकुंठात भक्त केव्हा येतील ? याविषयी तेथील लोक एकसारखी वाट पाहात असतात. पण भक्ताना जन्ममरणाची चिंता कधीच नसल्याने त्यांच्या चित्तात परलोकाची अथवा वैकुंठाची इच्छा कधीच नसते १ श्रीहरीचे हे दास धन्य होत. त्यांना गर्भवासाचे दुःख नेहमीच सहजसुलभ वाटते. ब्रह्मादिक देवही यांच्या भेटीची १ तीर्था वास
४३० सार्थ तुकारामगाथा इच्छा करीत असतात आणि अनेक तीर्थे यानाच भेटावयास उत्सुक असतात २ याच्याकडून हरिकथेचे श्रवण व्हावे म्हणून यमधर्मासारखे थोर थोरही याची वाट रात्रंदिवस पाहात असतात हात जोडून ते मार्गप्रतीक्षा करतात ३ रिद्धीसिद्धी या न बोलावता येऊन हरिभक्ताचा शोध घेतात सायुज्यतेची मुक्ती अशा भक्ताची उत्सुकतेने वाट पाहात असते ४ हे हरिभक्त ज्या ठिकाणी उभे राहतील, त्या ठिकाणी नेहमीच प्रेमसुखात तल्लीन झालेले दिसतील यानी आपल्या संगतीने अनेक महादोषी व चाडाळ अशा दुर्जनाचाही उद्धार केला आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, सर्वजण याच्याच दर्शनाची इच्छा करितात, पण हे हरिदास मात्र सर्व भावानी उदासच असतात याचे दर्शन ज्याना होते त्याचे भाग्य धन्य आहे, असेच म्हणावयास हवे ६ ९४६ सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साठीं विकूं पाहे ॥ १ ॥ पारखी तो जाणे तयाचे जीवींचे । निवडी दोहोंचे वेगळाले ॥ २ ॥ क्षीरा नीरा कैसे होय एकपण । स्वादी तोचि भिन्न भिन्न काढी ॥ ३ ॥ तुका म्हणे थोटा १भागवलाचि खोटा । अपमान मोठा पावेल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पारखी-परीक्षा करणारा, क्षीर-दूध, नीर-पाणी थोटा-खोटा अर्थ - एखाद्या दागिन्यावर सुवर्णाची चमक असावी, पण पोटात मात्र तांबेच बसविलेले असावे, व खरे सोने म्हणून तो विकायला जावा १ पण नीट परीक्षा करणारा जो असतो तो त्यातील तांब्यास ओळखतात व तांबे आणि सोने वेगळे काढून दाखवितात २ दूध व पाणी याचे एक मूल्य कसे होईल ? स्वादामुळे दोन्ही वस्तू भिन्न भिन्न आहेत असेच ठरेल ३ तुकाराम महाराज म्हणतात असा हा स्वत मोठे असल्याचा अभिमान खोटाच आहे त्यामुळे अपमान मात्र होण्याचा संभव फार असतो ४ ९४७ फोडुनि सांगडी बाधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजी ॥ १ ॥ आपला घात आपणचि करी । आणिका सागता नाइके तरी ॥ २ ॥ भुकेभेणे विष घेऊ पाहे आता । आपल्याचि घाता करू पाहे ॥ ३ ॥ तुका म्हणे एक चालतील पुढे । तयासी वाकडे जाता ठके ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सागडी-नदी तरून जाण्याचे साधन, माजासी-कमरेला भुकेभेणे-भुकेच्या भीतीने अर्थ - नदीचे पाणी तरून जाण्याचे भोपळ्यासारखे साधन जर फोडून ते कमरेस बाधले तर मग तो सहजासहजी पैलतीरास कसा पोचणार ? १ तो मनुष्य आपला घात आपणच करून घेतो दुसऱ्याने सागितले तरी ऐकत नाही २ भूक लागली या भीतीने भूक भागविण्यासाठी कुणी जर विष खाल्ले तर मग काय होईल ? आपलाच घात आपण केल्याप्रमाणे होईल ३ तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वांपासून जे योग्य मार्गाने पुढे चालले आहेत, त्याच्याच मार्गाने आपणही जावे त्याच्याहून वेगळ्या मार्गाने जाताच फसल्यासारखे होईल ४ ९४८ उपकारासाठीं बोलों हे उपाय । येणेविण काय आम्हा चाड ॥ १ ॥ बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणउनि ॥ २ ॥ तुका म्हणे माझे देखतील डोळे । भोग देते वेळे येईल कळो ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - चाड-गरज अर्थ - हे परमार्थसाधनाचे उपाय मी केवळ दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी बोलत आहे नाही तर याविना माझे काय अडले आहे ? हे सांगण्याची गरज मला काय आहे ? १ परंतु हे अज्ञ लोक अज्ञानात बुडून चालले आहेत त्यांचे दुःख डोळ्यानी बघवत नाही याचा कळवळा माझ्या मनात फार येतो २ या संसारी लोकांना भोग भोगण्याची पाळी येईल तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, यांच्या दुःखाने आमचेच डोळे यांच्याकडे करुणेने पाहतील ३ १ आपण
विवरणः- स्वकर्म निष्काम झाल्यावर, स्वतः ईश्वरभेटीने तृप्त झाल्यावर, जीवशिवाच्या, आत्मा- परमात्म्याच्या ऐक्याची प्रचीती आल्यावर साधुसंत कशासाठी या जगांत वावरतात? या एका प्रश्नाचे स्पष्ट उत्तर तुकाराम महाराजांनी या एका महत्त्वाच्या अभंगात दिलेले आहे. सर्व जगत् हे एका बीजाचा विस्तार असल्याने व एकच आत्मतत्त्व सर्व भूतमात्रांत भरून असल्यामुळे, ब्रह्मभाव अथवा साक्षात्काराची भावना ही कधी एकाच व्यक्तींत सीमित होऊन राहात नाही. ती साऱ्या विश्वाला कवळण्यास सिद्ध होते. अज्ञानाने कष्टी बहुरी होणाऱ्या मानवांचे अश्रू पुसायला ती उत्सुक होते. ज्ञानेश्वरांपासून तुकारामरामदासांपर्यंत सर्व संतांनी आपल्या या कार्याने ॰॰ नष्ट केले आहे. धर्माच्या पालनासाठी व पाखांडखंडनासाठी आपण हातात शब्दाचे तीक्ष्ण बाण धरून हिंडत आहोत, असे तुकोबांनी एका अभंगात म्हटले आहे. जे रंजले-गांजलेले आहेत, त्यांना जवळ करणे हाच साधुसंतांच्या देवत्वाचा मुख्य धर्म आहे, असेही तुकारामबुवा सांगतात. अशा या दुःखी, कष्टी लोकांचा कळवळा या माणुसकांना मोठाच असतो. सर्व भूतमात्रांत पसरून राहिलेला ईश्वरी अंश दुःखित झालेला त्यांना पाहावत नाही. ‘चित्तेनें कर फाटतो’ या शब्दांत अस्ताव्यस्त झालेल्या समाजाच्या दुःखाचे स्वरूप रामदासांनी व्यक्त केले आहे.
९४९ आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥ १ ॥ होईं बा जागा होईं बा जागा । वाउगा कां गा सिणसीस ॥ २ ॥ जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसिन ना ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उपाव-उपाय, येर-दुसरा, वाव-व्यर्थ, जाणिवेच्या-ज्ञानाच्या
अर्थ :- ज्यामुळे ईश्वराची आठवण होईल, तो उपाय आपण करावा. इतर सर्व व्यर्थ असणारा खटाटोप टाकून द्यावा. १ अरे बाबा, माणसा, तू नीट जागे व्हावेस. उगाच का शिणतोस ? कष्टी होतोस ? २ ज्ञानाच्या व्यर्थ ओझ्याने तू या संसारसागरात बुडशील मात्र; मग त्यातून सुखरूपपणे बाहेर पडणे, कधी होणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तू एका भावभक्तीच्या बळावरच ईश्वरास प्राप्त करून घेशील. केवळ ज्ञानाने तुला सर्व काही समजेल असे नाही. ४
९५० माझ्या मुखावाटा नयो¹ हें वचन । व्हावें हें संतान द्रव्य कोणां ॥ १ ॥ फुBuffer/फुकाचा² विभाग पतनदुःखासी । दोहोंमुळे त्यासी तेंचि साधे³ ॥ २ ॥ नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानीं । सादर या मनीं होऊनियां ॥ ३ ॥ तुका म्हणे देव असाध्य यामुळे । आशामोहाजाळें गुंतलिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- संतान-मूलबाळ.
अर्थ :- कुणाला मूलबाळ व्हावे, कुणाला संतती प्राप्त व्हावी, असे शब्द माझ्या मुखावाटे कधी निघू नयेत. १ कारण या दोन गोष्टींमुळे फुकट दुःखाचा व पतनाचा वाटा मात्र प्राप्त होतो. २ माझ्या कानांनी कुणाची निंदा- स्तुती ऐकू नये व मनाने या मार्गास, म्हणजे निंदास्तुतीच्या मार्गास कधीही लागू नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आशा व नाना मोह यांच्या जाळघांत सापडल्यानंतर देव मात्र अप्राप्य होतो. ४
९५१ चित्त ग्वाही तेथे लौकिकाचें काई । स्वहित तें ठायीं आपणापें ॥ १ ॥ मनासी विचार तोचि साच भाव । व्यापक⁴ हा देव अंतर्वाही ॥ २ ॥ शुद्ध भावा न लगे सुचाया परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥ ३ ॥ भोगित्यासी काज अंतरींचें गोड । बाहिरल्या घाड नाहीं रंगें ॥ ४ ॥ तुका म्हणे भाव शुध्द हें कारण । भेटे नारायण होईल त्यांचा ॥ ५ ॥
१ नये, २ सुखाचा, ३ साध्य, ४ व्यापला.
४३२ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा - ग्वाही-साक्ष, काज-कारण अर्थ - ज्या स्थानी चित्त साक्षी झाले आहे, त्या ठिकाणी लौकिक गोष्टींची काय किंमत ? आपले स्वहित आपणच पाहावे १ अंतर्बाह्य सर्वत्र एकच परमेश्वर भरून राहिलेला आहे, असा जो मनाचा भाव होत असतो, तोच खरा मानाबपास हृदा २ आपल्या मनातील शुद्ध भाव काही कुणाला सांगावा लागत नाही तो दुसऱ्याच्या ठिकाणी आपल्याकडून प्रकट होत असतो ३ भोगणारा मनुष्य असतो त्यास अंतरंगातील गोडीशी कारण असते, बाहेरच्या रंगास तो कधी भुलत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनातील शुद्ध भाव हेच खरे म्हणजे ईश्वरप्राप्तीचे कारण होय अशा शुद्ध भावाने भजणाऱ्या भक्ताचा तो परमेश्वरच भाट होऊन जातो ५
९५२ नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥ १ ॥ काहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ २ ॥ खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगता ॥ ३ ॥ ज्याचे तोचि जाणे । मी मापाडें तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खंती-चिंता, मापाडें-माप टाकणारा अर्थ - मी हे जे बोलत आहे, ते काही माझे नव्हेच, ते सर्व त्या विठ्ठलाकडूनच बोलले जात आहे १ याविषयी तुम्ही कसलीही चिंता करू नये यात तुमचे हितच होईल, हे चित्तात नीट धारण करावे २ अहंकाराची खोटी वाट जी असते, ती सांगितल्याबरोबर टाकून द्यावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, मजकडून बोलविणारा जो विठ्ठल तो खरे काय तो जाणतो, मी केवळ माप टाकणारा मापाडी आहे ४
९५३ वासनेच्या मुखीं अदळोनि भीतें । निर्वाहापुरतें कारण ते ॥ १ ॥ या नांवे अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खूण त्याची ॥ २ ॥ सर्वकाळ हाचि करणे विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥ ३ ॥ तुका म्हणे जो जो भजनासी वळे । अंग तो तो कळे सन्निधता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भीतें-भिऊन, कारण-कार्य अर्थ - नाना वासनांना भिऊन, त्याची भीती बाळगून, त्याच्या तोंडात काही देऊन आपण जरूरीपुरतेच कार्य करावे १ चित्तात समाधान असणे हीच एक खूण मनात नारायणाचा निवास झाल्याची आहे २ आत्म- तत्त्वाचा विवेक मनात निरंतर करून, नेहमी हाच एक विचार करीत असावे ३ तुकाराम महाराज म्हणतात आपण ज्या ज्या प्रमाणात भजनाकडे वळू, त्या त्या प्रमाणात आपल्या अंगाअंगातून ईश्वराची जवळीक अनुभवास येईल ४
९५४ चिंतने अंचित राहिलो निश्चळ । तेचि किती काळ वाढवाये ॥ १ ॥ अबोल्याचा काळ आता ऐशापरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ २ ॥ करू आला तो तो केला उपलाहो । उरोच संदेहो दिला नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मोह परतेचि ना मार्गे । म्हणउनि त्यागें त्याग जाला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अंचित-निश्चिंत, चिंतारहित, उरी-उणीव, बाकी अर्थ - या भगवंताचे चिंतन एकसारखे केल्याने मी चिंतारहित झालो आहे आता हे चिंतन तरी किती काळपर्यंत वाढवावे ? १ आता न बोलण्याचीच वेळ आलेली दिसते काही बोल बोलावेत अशी बाकी आता राहिली आहे असे नाही २ ईश्वरप्राप्तीसाठी जो जो उपाय करावयास हवा, तो तो मी त्वरित केला असून मी माझ्या मनात कुठलाही संशय उरू दिलेला नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात तरीसुद्धा माझ्या मनातील लौकिक गोष्टी विषयांचा मोह काही संपतच नाही म्हणूनच मी सर्व प्रपंचाचाच त्याग करावा या मार्गास येण्याचे निश्चित केले ४
सार्थ तुकारामगाथा ४३३ ९५५ निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकी भिन्न भेद घडे ॥ १ ॥ तुम्हां आम्हां आतां न पडे यावरी । आहों तेंचि वरी जेथें तेथें ॥ २ ॥ आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगा आली कठिनता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - न पडे-पटणार नाही. अर्थ :- या सगुण रूपातच त्या निर्गुणनिराकार ईश्वराचे दर्शन घ्यावे हे खरे असले तरी त्याने परमेश्वराच्या एकत्वामध्ये भेद निर्माण होतो १ त्यामुळे नारायणा, तुमचे व आमचे काही पटणार नाही म्हणून यापुढे तुम्ही व आम्ही ज्या स्थानावर होतो तेथेच राहू. २ देवा, आपल्यापासून वेगळे आम्ही नसावे काही अंतर उरू नये, अशी विनवणी आम्ही पुष्कळ वचनानी केलेली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अनंता, तुमच्या- प्रमाणेच आमच्या अंगात कठिनता निर्माण झालेली आहे. ४ ९५६ तुजच पासाव जालोंसों निर्माण । असावे तें भिन्न कासयानें ॥ १ ॥ पाहाया जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असेचि ना ॥ २ ॥ ठेविलिये ठायीं आज्ञेचे पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुम्हांऐसा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पासाव-पासून, क्रियानष्ट-क्रिया न करणारा ज्याच्या क्रिया करणे संपले आहे असा अर्थ :- देवा, आम्ही तुमच्यापासूनच निर्माण झालो ना ? मग आम्ही तुमच्यापासून भिन्न कशाने झालो हो ? १ देवा, याचा विचार तुम्हीच करून पाहा ना एकदा तुमच्या-आमच्यात कमीपणा कुठेच असू नये २ ज्या ठिकाणी तुम्ही जसे ठेविले आहे, त्याच स्थितीत तुमच्या आज्ञेचे पालन करून मी राहिलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुमच्यासारखाच देवा, काहीही क्रिया न करणारा झालो आहे फक्त अकर्ता बनलो आहे ४ विवरण -एकाच ब्रह्मतत्त्वापासून, चैतन्यतत्त्वापासून या सर्व चराचर विश्वाची निर्मिती झाली असा सिद्धान्त भारतीय तत्त्वज्ञानात प्रमुख्यपणे प्रसिद्ध आहे ते तत्त्व अगदी प्रारंभी एकटेच होते, पण पुढे 'बहु स्यां प्रजायेय' अशी त्यालाच बुद्धी झाली व मग सर्व सृष्टीची उभारणी झाली म्हणजे या एकाच ब्रह्मापासून, एकाच बीजापासून सर्व सृष्टीचा चराचर संसार आवागम आला एकाच अव्यक्तापासून हे सर्व गुणरूपीधारी व्यक्त जगत् निर्माण झाले या ब्रह्मवृक्षाचे वर्णन महाभारतात फार समर्पक रीतीने आलेले आहे " अव्यक्त प्रकृती हे याचे बीज, बुद्धी हे झाड, अहंकार हा मुख्य पल्लव, मन व दहा इंद्रिये या सूक्ष्म डोध्या, पचमहाभूते ह्या मोठ्या शाखा स्थूल महाभूते इतर डहाळ्या, अशा स्वरूपाचा हा ब्रह्मवृक्ष पानाफुलांनी व शुभाशुभ फळांनी नेहमी समृद्ध असता सर्व प्राणिमात्रांना आधारभूत होतो " असे याचे वर्णन आढळते ज्ञानेश्वरी ग्रंथापासून या प्रतिमेचे वर्णन करताना या मूलभूत बीजा- तून निर्माण होणाऱ्या व्यक्त जगतास वृक्ष व त्याचा विस्तार याचीच उपमा देण्यात आलेली आहे हाच उपनिषदे व गीता यांतील अश्वत्थ वृक्ष होय. परब्रह्म किंवा ईश्वर व व्यक्त जगत किंवा जीव याचे हे असे बीजवृक्षाचे नाते लक्षात ठेवूनच साधुसंतानी मग ईश्वरास प्रश्न मोठ्या अडचणीचा कित्येक वेळा टाकलेला दिसतो आम्ही जीव बद्ध आहोत, पापी आहोत, संसारपाशात जखडलेले आहोत, कर्मांनी बद्ध आहोत व यातून आता मुक्त व्हावयास हवे, हा साऱ्या ध्यास सर्वांना असतो पण मी पापी, मी पतित, मी हीन, मी दुराचारी अशी भाषा तरी कशी संभवते ? हे पाप आले कोठून ? दुराचाराची वासना उठली कुठून ? यासारख्या प्रश्नांनी साधुसंतानी देवासही गाबडे घातलेले दिसते संत गोरोबांनी विठ्ठलाचे अभंग लिहिले आहेत, त्यात हाच प्रश्न निर्माण केला आहे आमच्यात जर विटाळ असेल, पाप असेल तर देवा, तुम्हीही प्रकृती रूपासावयाच हवी कारण तू बीजरूपाने आहेस आम्ही कार्यरूपांनी आहोत योगिनील सर्व तु. गाथा. ५५
४३२ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - ग्वाही-साक्ष, काज-कारण अर्थ - ज्या स्थानी चित्त साक्षी झाले आहे त्या ठिकाणी लौकिक गोष्टींची काय किंमत ? आपले स्वहित आपणच पाहाये १ अंतर्बाह्य सर्वत्र एकच परमेश्वर भरून राहिलेला आहे असा जो मनाचा भाव होत असतो, तोच खरा मानावयास हवा २ आपल्या मनातील शुद्ध भाव काही कुणाला सागावा लागत नाही तो दुसऱ्याच्या ठिकाणी आपल्याकडून प्रकट होत असतो ३ भोगणारा मनुष्य असतो त्यास अंतरंगातील गोष्टीशी कारण असते, बाहेरच्या रंगास तो कधी भुलत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनातील शुद्ध भाव हेच खरे म्हणजे ईश्वरप्राप्तीचे कारण होय अशा शुद्ध भावाने भजणाऱ्या भक्ताचा तो परमेश्वरच भाट होऊन जातो ५ ९५२ नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥ १ ॥ कांहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ २ ॥ खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगता ॥ ३ ॥ ज्याचे तोचि जाणे । मी मापाडें तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खंती-चिंता, मापाडें-माप टाकणारा अर्थ - मी हे जे बोलत आहे, ते काही माझे नव्हेच, ते सर्व त्या विठ्ठलाकडूनच बोलले जात आहे १ याविषयी तुम्ही कसलीही चिंता करू नये यात तुमचे हितच होईल, हे चित्तात नीट धारण करावे २ अहंकाराची खोटी वाट जी असते, ती सांगितल्याबरोबर टाकून द्यावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, मजकडून बोलविणारा जो विठ्ठल तो खरे काय तो जाणतो, मी केवळ माप टाकणारा मापाडी आहे ४ ९५३ वासनेच्या मुखीं अदळुनि भीतें । निर्वाहापुरते कारण ते ॥ १ ॥ या नांवे अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खूण त्याची ॥ २ ॥ सर्वकाळ हाचि करणे विचार । विवेकी सादर आत्मत्याचे ॥ ३ ॥ तुका म्हणे जो जो भजनासी वळे । अग तो तो कळे सन्निधता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भीतें-भिजून, कारण-काय अर्थ - नाना वासनांना भिजून, त्याची भीती बाळगून, त्यांच्या तोंडात काही देऊन आपण जरूरीपुरतेच कार्य करावे १ चित्तात समाधान असणे हीच एक खूण मनात नारायणाचा निवास झाल्याची आहे २ आत्म तत्त्वाचा विवेक मनात निरंतर करून, नेहमी हाच एक विचार करीत असावे ३ तुकाराम महाराज म्हणतात आपण ज्या ज्या प्रमाणात भजनाकडे वळू, त्या त्या प्रमाणात आपल्या अंगाअंगातून ईश्वराची जवळीक अनुभवास येईल ४ ९५४ चिंतने अंचित राहिलो निश्चळ । तेचि किती काळ वाढवावे ॥ १ ॥ अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ २ ॥ करूं आला तो तो केला लवलाहो । उरोच संदेहो दिला नाही ॥ ३ ॥ तुका म्हणे मोह परतेचि ना मार्गे । म्हणउनि त्यागें त्याग झाला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अंचित-निश्चिंत, चिंतारहित, उरी-उणीव, बाकी अर्थ - या भगवंताचे चिंतन एकसारखे केल्याने मी चिंतारहित झालो आहे आता हे चिंतन तरी किती काळपर्यंत वाढवावे ? १ आता न बोलण्याचीच वेळ आलेली दिसते काही बोल बोलावेत अशी बाकी आता राहिली आहे असे नाही २ ईश्वरप्राप्तीसाठी जो जो उपाय करावयास हवा तो तो मी त्वरित केला असून मी माझ्या मनात कुठलाही संशय उरू दिलेला नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात तरीसुद्धा माझ्या मनातील लौकिक गोष्टी विषयींचा मोह कधी संपतच नाही म्हणूनच मी सर्व प्रपंचाचाच त्याग करू या मार्गास येण्याचे निश्चित केले ४
सार्थ तुकारामगाथा ४३३ ९५५ निर्गुणाचे द्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥ १ ॥ तुम्हां आम्हा आता न पडे यावरी । आहों तेंचि बरी जेथें तेथें ॥ २ ॥ आपणापासुनी नसावे अंतर । वेचिलें उत्तर म्हणउनि ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगा आली कठिनता । आमच्या अनंता तुम्हां ऐसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - न पडे-पटणार नाही अर्थ - या सगुण रूपातच त्या निर्गुणनिराकार ईश्वराचे दर्शन घ्यावे हे खरे असले तरी त्यामुळे परमेश्वराच्या एकत्वामध्ये भेद निर्माण होतो १ त्यामुळे नारायणा, तुमचे व आमचे काही पटणार नाही म्हणून यापुढे तुम्ही व आम्ही ज्या स्थानावर होतो तेथेच राहू. २ देवा, आपल्यापासून वेगळे आम्ही नसावे काही अंतर उरू नये, अशी विनवणी आम्ही पुष्कळ वचनांनी केलेली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अनंता, तुमच्या- प्रमाणेच आमच्या अंगात कठिनता निर्माण झालेली आहे. ४ ९५६ तुजच पासाय जालोसो निर्माण । असावे तें भिन्न कासयाने ॥ १ ॥ पाहावा जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असेचि ना ॥ २ ॥ ठेविलिये ठायीं आज्ञेचे पाळण । करुनि जतन राहिलोंसें ॥ ३ ॥ तुका म्हणे आतां बोलतसे स्पष्ट । जालो क्रियानष्ट तुम्हाऐसा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पासाय-पासून, क्रियानष्ट-क्रिया न करणारा ज्याच्या क्रिया करणे संपले आहे असा अर्थ :- देवा, आम्ही तुमच्यापासूनच निर्माण झालो ना ? मग आम्ही तुमच्यापासून भिन्न कशाने झालो हो ? १ देवा, याचा विचार तुम्हीच करून पाहा ना एकदा तुमच्या-आमच्यात कमीपणा कुठेच असू नये २ ज्या ठिकाणी तुम्ही जसे ठेविले आहे, त्याच स्थितीत तुमच्या आज्ञेचे पालन करून मी राहिलेले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुमच्यासारखाच देवा, काहीही क्रिया न करणारा झालो आहे करुन अकर्ता बनलो आहे ४ विवरण - एकाच ब्रह्मतत्त्वापासून, चैतन्यतत्त्वापासून या सर्व सचराचर विश्वाची निर्मिती झाली असा सिद्धान्त भारतीय तत्त्वज्ञानात प्रमुखपणे प्रसिद्ध आहे ते तत्त्व अगदी प्रारंभी एकटेच होते पण पुढे 'बहु स्यां प्रजायेय' अशी त्यासच बुद्धी झाली व मग सर्व सृष्टीची उभारणी झाली म्हणजे या एकाच ब्रह्मापासून, एकाच बीजापासून सर्व सृष्टीचा चराचर संसार आकारास आला एकाच अव्यक्तातपासून हे सर्व गुणरूपधारी व्यक्त जगत् निर्माण झाले या ब्रह्मवृक्षाचे वर्णन महाभारतात फार समर्पक रीतीने आलेले आहे "अव्यक्त प्रकृती हे याचे बीज बुद्धी हे खोड, अहंकार हा मुख्य पल्लव मन व दहा इंद्रिये या सूक्ष्म डोल्या, पंचमहाभूते ह्या मोठ्या शाखा स्थूल महाभूते इतर डहाळ्या, अशा स्वरूपाचा हा ब्रह्मवृक्ष पानाफुलानी व शुभाशुभ फलानी नेहमी समृद्ध असतो सर्व प्राणिमात्रांना आधारभूत होतो' असे याचे वर्णन आढळते ऋग्वेदादी ग्रंथापासून या प्रक्रियेचे वर्णन करताना या मूलभूत वीजा- तून निर्माण होणाऱ्या व्यक्त जगतरूप वृक्ष व त्याचा विस्तार याचीच उपमा देण्यात आलेली आहे हाच उपनिषदे व गीता यातील अश्वत्थ वृक्ष हाय. परब्रह्म किंवा ईश्वर व व्यक्त जगत किंवा जीव यात हे असे बीजवृक्षाचे नाते लक्षात ठेवूनच साधुसंतांनी मग ईश्वरास प्रश्न मोठ्या अडचणीचा रित्या वेळा टाकलेला दिसतो आम्ही जीव बद्ध आहात, पापी आहोत, संसारपाशात जखडलेले आहोत, कर्मांनी बद्ध आहात व यातून आता मुक्त व्हावयास हवे, हा सारखा ध्यास सर्वांना असतो पण मी पापी, मी पतित, मी हीन मी दुराचारी अशी भाषा तरी कशी संभवने ? हे पाप आले कोठून ? दुराचाराची वासना उठली कुठून ? यासारख्या प्रश्नांनी साधुसंतानी देवासही मातले घातलेले दिसतात संत चोखामेळानी विटाळाचे अभंग लिहिले आहेत त्यात हाच प्रश्न निर्माण केला आहे आमच्यात जर विटाळ असेल, पाप असेल तर देवा, तुझीही प्रवृत्ती तपासावयास हवी कारण तू बीजरूपाने आहेस आम्ही कार्यरूपांनी आहोत बीजातील सर्व तु गाथा .५५
४३४ | सार्थ तुकारामगाथा गुणदोष वृक्षाच्या फुलाफळांत येतात ना ? मग याचा दोष वृक्षाकडे ? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा निष्कर्ष असा की, आम्ही सर्व देवा, तुझ्यापासून निर्माण झालेलो असल्यामुळे तुमच्या-आमच्यात भिन्नता नसावी तुकोबांची शिष्या बहिणाबाई हिने तर एका अभंगात या भूमिकेवरून विठ्ठलास विचारिले आहे, ' ' तुम्ही आम्ही मुलें होतौं एके ठायीं । कोणते अन्यायीं सापडलों ॥ तुझ्याचि हिताने वाढला संसार । आम्हो का रे दूर उतरलों ? " तुझ्याच इच्छेने हा संसार वाढला, मग तू स्वतंत्र, शुद्ध, मुक्त व भी मात्र बद्ध, पतित कसा ? असा हा प्रश्न आहे सर्व चराचर जगत व अव्यक्त ब्रह्मतत्त्व यांच्या या विक्षेप नात्यावर आधारलेला हा भक्तीचा विकास मराठी संतानी अतिशय गोड व लडिवाळ स्वरूपात रगविला आहे या त्याच्या सुखविलासास तत्त्वज्ञानाचे पाठबळ आहेच 'मया ततमिद सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि' मी आपल्या अव्यक्त स्वरूपाने हे सर्व जग विस्तारलेले आहे व माझ्या ठिकाणी ही सर्व भूते आहेत अशा अर्थाच्या गीतेतील श्लोकावर भाष्य करिताना ज्ञानेश्वरांनी अतिशय बहार करून आत्मा व परमात्मा, जीव व शिव, ईश्वर व भक्त याचा एकत्वाचा सवद्य वर्णन केलेला आहे त्यांनी अनेक गरवा व समर्पक दृष्टान्त देऊन म्हटले आहे की, 'माझेया विस्तारलेपणा नावे । हें अशेष नोहे आघवें ? । जैसे दूध मुराले स्वभावें । तरि तेंचि दही ॥ का बीजचि जाहले तरू । अथवा भांगराचि अलंकार । तैसा मज एकाचा विस्तारु । तें हे जग ॥ " ९५७ प्रीतिभग माझा केला पाडुरंगा । भक्तिरस सागा का जी तुम्हीं ॥ १ ॥ म्हणउनि काही न ठेवीं चि उरो । आलो वर्मावरी एकाएकीं ॥ २ ॥ न देखोचि काही परती माघारी । उरली ते उरी नाही मुळीं ॥ ३ ॥ तुका म्हणे आला अंतरासी खड । तरि माझें तोड खवळिले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- उरी-कमतरता, वर्मावरी-सूक्ष्म मुद्यावर अंतरासी-सवघास अर्थ - पांडुरंगा, या भक्तिरसाच्या निमित्ताने तुम्ही माझ्या प्रीतीचा भग केला आहे ना ? १ म्हणूनच मी आता कसलीच कमतरता न ठेवता, मी सूक्ष्म मुद्द्यावर येऊन तुमची वर्मे काढणार आहे २ तुमच्यापासून काही माघारे परतून येईल, असे मी पाहणारच नाही काही कमतरताही उरू देणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या-आमच्या सवघास असा हा खड पडला तर माझे तोंड मात्र खवळून जाईल ४ ९५८ लटिका ऐसा म्हणता देव । सदेहसा वाटतसे ॥ १ ॥ ऐसे आले अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ २ ॥ शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥ ३ ॥ तुका म्हणे ताळी नाहीं । एके ठायी चपळत्वे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लटिका-खोटा, मोळा-रीत, भेंडोळा-गुंडाळे, ताळो-ताळमेळ अर्थ - हा देव खोटाच आहे की काय, असा संशय माझ्या मनात आलेला आहे १ याची सेवा करता करता हाच अनुभव मला आलेला आहे २ तुम्ही देवा, शून्याकारी आहात, व तसेच असण्याची तुमची रीत आहे; असा तुमच्या कीर्तीचा डका सर्वत्र गर्जत आहे तुमच्या कीर्तीचे हे भेंडोळे सर्वत्र प्रसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही एकाच ठिकाणी असूनही चपळ असल्यामुळे तुमच्या कोणत्याही गोष्टीत ताळमेळ बसत नाही ४ ९५९ जंशासाठीं तैसे हाये । हे बरवे कळलेसे ॥ १ ॥ उदास' तूं नारायणा । मी ही म्हणा तुम्हीच ॥ २ ॥ ठका महाठक जोडा । जो धडपुडा लागासी ॥ ३ ॥ एकागीच भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वे ॥ ४ ॥ १ उदार
शब्दार्थ व टीपा :- वरवें-चांगले, धडकूडा-धडधडीत, प्रत्यक्ष अर्थ:- जो जसा असेल तसे आपण व्हावे, हे आम्हांस चांगले समजून आले आहे. १ नारायणा, तू जर उदास असशील, तर मीही तसाच उदास झालो आहे २ एका ठकास दुसरा महाठक भेटला, तसा तुमचा व आमचा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी एकाकी होऊनच माझा जीव दिनधोक असल्याने या देवापाशी असा भांडत आहे. ४
९६० बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न घराच ॥ १ ॥ आतां काशासाठीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ २ ॥ तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥ ३ ॥ तुका म्हणे लाजिरवाणें । अधीर जिणें इच्छेचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- हेवा-हाव अर्थ :- देवा, मी तुमच्यासाठी अनेक प्रकारांनी काकुळतीस आलो आहे; पण तुम्ही मात्र यासंबंधी तुमच्या चित्तात काहीही आणलेले दिसत नाही. १ मग देवा, आता कशासाठी खोटो हाव मी माझ्या मनात वागवू ? २ देवा, तुमच्याआमच्यांत ताटातुटी झाली आहे. आता तुमच्यात व आमच्यात भेट होणार, ती केवळ तुमच्याविषयोच्या चिंतनानेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे जिणे मनातील इच्छेमुळे मोठे लाजिरवाणे झाले आहे. ४
९६१ आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥ १ ॥ मढचापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ २ ॥ न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मढघापाशी-प्रेताजवळ ? अर्थ :- एक आश्चर्याची गोष्ट घडलेली माझ्या मनात आलेली आहे. १ प्रेतापाशी बसून त्याच्या नाते- वाईकांनी केलेला शोक जसा व्यर्थ जातो, तसेच मी आजवर देवा, तुमचेपाशी करुणा भाकली तो फुकट गेली. २ एखादे खोटे कृत्य पाहून मग राग कसा येऊ नये ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, माझ्या शब्दांना हा कसला शोध लागला ? ४
९६२ मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥ १ ॥ लटकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ २ ॥ हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सफळांसी ॥ ३ ॥ तुका म्हणे स्वामिसेवा । येयें देवा काशाची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संकोचों-संकोच धरू अर्थ :- मला कोणतीही वस्तू मागण्याची इच्छा नसल्यामुळे मी संकोच कोणत्या गोष्टीसाठी धरावा ? १ कुठल्याही खोट्या गोष्टीची मी स्तुती करणार नाही; कारण माझ्या मनात कोणतीच इच्छा नसते. २ जे हिशेबाने येईल त्याचा स्वीकार करावा, हे तर सर्वांनाच समजते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, या ठिकाणी कसली स्वामीसेवा आहे ? ४
९६३ पाठवणें १ पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥ १ ॥ घडलें तें भेटीसीवें । दिसेल बरवें सफळां ॥ २ ॥
१ पाटवणे.