सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 457, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४१९ ९१३ ऐसे पुढती मिळता आता । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥ १ ॥ म्हणउनि फावले तें घ्यावे । नाम गावे आवडी ॥ २ ॥ संचित प्रारब्ध गाढें । धावे पुढे क्रियमाण ॥ ३ ॥ तुका म्हणे घुबडा ऐसे । जन्म सरिसे शुकराचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ऐसे-असा मानवी देह शूकर-डुक्कर अर्थ - मानवी देहासारखे उत्तम साधन पुढे प्राप्त होईल असे नाही याबाबतीत आपण स्वतंत्र नसून आपल्या हाती सत्ताही काही नाही १ म्हणून जो आज मिळाला आहे, त्याचा फायदा घेऊन ईश्वराचे नाव मोठ्या प्रेमाने घेत जावे २ कारण आपल्या संचित कर्माची मोठ्या प्रारब्धाची व क्रियमाणाची गती एकसारखी पुढे धाडत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात यापुढे कदाचित घुबडाचे, डुकराचे जन्म न येतील हे कशावरून ? तेव्हा तुम्ही या नरजन्मातच काय साधायचे असेल ते साधा ४ ९१४ सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आता कोण भाव निवडे एक ॥ १ ॥ संसाराची मज न साहेचि वार्ता । आणीक म्हणता माझें कोणी ॥ २ ॥ देहसुख काहीं बोलिले उपचार । विष ते आदर बद' वाटे ॥ ३ ॥ उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥ ४ ॥ तुका म्हणे काहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवाचे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - न साहे-सहन होत नाही, बद-वधन उपाधी-अडचण अर्थ - या सर्व लौकिक व सांसारिक गोष्टींविषयी माझा जीव त्रासून गेला आहे आता नाही असा कोणता एक भाव मी निवडून सांगू ? १ संसारासंबंधी तर मला कसलीच रुची नाही, त्याची वार्ताही सहन होत नाही आणि दुसऱ्याने कुणी हा संसार माझा माझा असे म्हटल्याचेही सहन होत नाही २ देहाला सुख देणाऱ्या काही उपचारांविषयी कुणी सुचविले तर तेही मला आवडत नाही इंद्रियसुखाचे हे भोग मला विषाप्रमाणे वाटतात त्याचे मोठे बंधनच माझ्या मनावर असते ३ कुणी माझा गौरव केला, कुणी माझी प्रतिष्ठा सांगितली तर त्या स्तुतीने माझा जीव फार कासावीस होतो ४ तुकाराम महाराज म्हणतात मला आता दुसरे काहीही सहन होत नाही मला या वैष्णवांचेच पाय महमी आवडतात मी त्यांचाच आश्रय घेतो ५ ९१५ आणीक काहीं या उत्तराचे काज । नाहीं आता मज बोलावया ॥ १ ॥ भिन्न भेद हे भावनाव्स्वभाव । नव्हे काहीं देव एकविध ॥ २ ॥ गुण दोष कोणे निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म ते ॥ ३ ॥ तरिच भले आता न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥ ४ ॥ तुका म्हणे गुण गाई या देवाचे । घेई माझे वाचे हेचि धणी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - काज-कारण धणी-तृप्ती अर्थ - आता दुसरे काही बोलावे हे कारणच मजजवळ नाही १ मानवी स्वभावानुसार ज्या ज्या भावना असतील त्या त्या प्रमाणे भिन्न भिन्न प्रकार असले तरी देव हा एकविध म्हणजे विविधतेतही एकपणानेच नटलेला आहे २ गुणांची व दोषांची निवड कोणत्या धर्मावरून करावी ? कर्म व अकर्म याची निवड कशी करावी ? याना कसे जाणावे ? ३ आता कुणाचीही संगत धरू नये यातच खरे म्हणजे चांगले आहे यामुळे दुःखाचे प्रसंगही आपोआप तुटले जातील ४ तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी या देवाचेच गुण गात राहील यातच तिची तृप्ती आहे ५ १ बध