सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 506, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४६४ सार्थ तुकारामगाथा देवा, तुमच्यासाठीं आहे हें नीट जाणावे तुम्ही. ३ देवा, आणखी माझ्या मनाची ही अवस्था तुम्हांस किती प्रका- रांनी सांगावी हो ? सर्व प्रकारांचे सार हेच कीं, तुम्ही तुमच्या पायांचे दर्शन मला लौकर द्यावे. ४ तू मला भेट देशील न देशील, याच चिंतेने माझ्या मनाचा गाभा करपून गेला आहे. देवा, माझा तुला एवढा विसर कां पडला आहे हेंच मला समजत नाहीं. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, हे तू सर्व जाणीत कां नाहींस ? सर्व काही तू जाणून आहेस. तरी देवा तू मजवर कृपा कर मा एकदा. ६ १०३२ शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥ १ ॥ आळविती त्यांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ २ ॥ गांजलियांचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥ ३ ॥ भागलियाचा होईं रे विसांवा । परिसावी केशवा १ विज्ञापना ॥ ४ ॥ अंकिताचा भार वागवावा मायां । परिसावी अनंता विज्ञापना ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - विज्ञापना-विनंती, परिसा-ऐका, धांवणे-रक्षण, अंकिताचा-स्वाधीन असलेल्याचा. अर्थ :- देवा, जे शरण आलेले तुझे भक्त आहेत, त्यांना तू पाठ न दाखविता, त्यांच्यावर कृपाच करावीस अशी हे जगजेठी, तुला नम्र विनंती आहे. १ जे मनोभावे तुझी आळवणी करतात, त्यांना स्वीकृतीचे, कृपाप्रसादाचे उत्तर झटकन देऊन तू त्यांना तृप्त करावेस अशी विनंती आहे देवा. २ देवा, जे रंजलेले, गांजलेले, त्रासलेले आहेत, त्याचे तू रक्षण करावेस, नारायणा, ही माझी विनंती तुम्ही ऐकावी. ३ जे दमलेले आहेत, भागलेले आहेत, त्यांचा देवा, तू विसावा व्हावास. त्यांच्या विश्रांतीचे स्थान व्हावेस, केशवा, ही माझी विनंती तू ऐक ना. ४ जे तुझ्या स्वाधीन झाले आहेत, त्यांच्या रक्षणाचा भार देवा, तूच तुझ्या मस्तकावर घ्यावयास हवा. ही ही माझी विनंती अनंता, तू ऐकावीस. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता आम्हांस तुम्ही बिल्कुल विसरून जाऊ नये. देवा, ही एक विनंती माझी तुम्ही ऐका ना. ६ १०३३ कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥ १ ॥ कोणापाशीं आम्हीं सांगावें २ सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ २ ॥ कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार ३ कोण दुजा ॥ ३ ॥ कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥ ४ ॥ कोणावरी आम्हीं करावी हे सत्ता । होईल साहाता कोण दुजा ॥ ५ ॥ तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - पुसे-विचारील, सिणले भागलें-दमलेले, त्रासलेले, उगलें-उगाच, आपोआप, पार- (भार)-ओझे, भातुके-खाऊ. अर्थ :- देवा, आम्ही दमलेले आहोत, शिणलेले आहोत, त्रासलेले आहोत; अशा वेळी पांडुरंगा, तुझ्या- शिवाय उगाच आमची चौकशी प्रेमाने दुसरे कोण रे करणार आहे ? १ देवा, आम्ही आमच्या मनाचे सुखदुःख कुणापाशी सांगावे रे ? कोण माझी तहानभूक निवारण करील ? २ मला हा जो त्रिविध ताप झालेला आहे, तो तुझ्याशिवाय कोण रे दूर करील ? माझ्या मनावरचे हे ओझे कोण दूर करणार आहे ? ३ देवा, माझ्या इच्छेस येईल तो खाऊ मी कुणाजवळ रे मागावा ? आणि असा हट्ट घेतल्यावर कौतुकाने, प्रीतीने माझी समजूत तरी देवा, तुझ्याशिवाय दुसरे कोण काढणार आहे रे ? ४ आम्ही प्रेमाने, हक्काने कुणावर रे सत्ता करावी ? आमचा हा त्रास सहन करणारा कोण दुसरा आहे ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा, तूच माझा स्वामी असल्यामुळे तूच सर्व कांहीं जाणणार आहेस, असे मी मानतो. नारायणा, तुमच्या चरणांवर माझे दंडवत असो. ६ १ देो, २ सांगो, ३ भार.