सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 518, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४७४ सार्थ तुकारामगाथा संता ब्रह्मरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥ ३ ॥ तुका म्हणे मी तो आपणासी ठावा । आहे बरा देवा जैसा तैसा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मानविले-मानसन्मान केला अर्थ - देवा, बाहेरच्या दृष्टीने या लोकांनी माझा मानसन्मान केला असला तरी, मी अंत:करणाने मात्र तेवढा मोठा झालेलो नाही १ म्हणूनच पंढरीराया, माझ्या मनात फारच चिंता वाटत आहे, आणि मनाची खरी अवस्था प्रकट करताना भारी लाज वाटते २ साधुसंतांना सारे जगच ब्रह्मरूप दिसत असल्याने ते कुणाचेच दोष पाहात नाहीत माझेही अवगुण त्यामुळे त्यांना दिसले नाहीत ३ परंतु देवा मी कसा आहे हे तुम्हास माहीत आहे तुकाराम महाराज म्हणतात, मी जसा आहे तसाच आहे हे तुम्ही जाणता ४ १०५९ काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसे ॥ १ ॥ कैसा सरता जालो तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हे ॥ २ ॥ पुराणांची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥ ३ ॥ तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवी हे देवा साच खरें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जीताती-जिवंतपणे वावरतात, सरता जालो-मान्य झालो, साच-खरे अर्थ - खरे पाहिले असताना माझ्या शरीरात कामक्रोधादी विकार जिवंतपणे वावरत असूनही मी वरच्या बाजूने मात्र अतिशय मृदू शब्द बोलीत आहे १ तरी सुद्धा पांडुरंगा मी तुमच्या पायाशी कसा मान्य झालो, हे काही माझ्या ध्यानात येत नाही २ पुराणातील संतांचे चित्त कशा प्रकारे शुद्ध असायला पाहिजे, याची ग्वाही दिलेली आहे तशा प्रकारचे काही माझ चित्त शुद्ध झालेले नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून देवा, जी काही खरी गोष्ट असेल ती माझ्या अनुभवास आणून द्या ना ४ १०६० स्तुति करों जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥ १ ॥ तुमचे मी दास संताचे दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ २ ॥ रामकृष्णहरि मन उच्चारणा । आवडी चरणा विठोबाच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे तुमचे सेवितो उच्छिष्ट । क्षमा करीं धीट होऊनिया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आवडी-प्रेम, सेवितों-खातो अर्थ - संत लोकांनो, मी तुमची स्तुती करावी, असा अधिकार मजजवळ नाही कारण तुमच्या योग्यतेचा विचारच मला समजत नाही १ तुम्हा संतांचा मी एक दुर्बल असा दास असल्याने तुम्ही तुमच्या पायावरच माझे रक्षण करावे २ रामकृष्ण हरि या मंत्राचाच मी उच्चार करीत असतो व माझे प्रेम विठ्ठलाच्या चरणावर दृढ असे आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतहो, मी तुमचे उच्छिष्ट खात असतो, मोठ्या धिटाईने सेवन करीत असतो मला तुम्ही क्षमा करावी ४ १०६१ बहु दूरवरी । वेठीं ओझें होते शिरों ॥ १ ॥ आता उतरला भार । तुम्ही केला अंगीकार ॥ २ ॥ बहु काकुलती । आलो मागें किती ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वेठी-बिगारीच्या पद्धतीत, अंगीकार-स्वीकार अर्थ - कित्येक जन्मपर्यंत मी या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात बिगारीस धरलेल्या नोकराप्रमाणे सापडलो होतो फार मोठे ओझे माझ्या डोक्यावर होते १ पण आता ते सर्व ओझे कमी झाले आहे देवा, तुम्ही माझा स्वीकार