भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 552, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 552

५०६ सार्थ तुकारामगाथा अर्थ - तू जर खरोखरच देव होण्याच्या मार्गात असशील व त्याप्रमाणे होशील, तर मग तू स्वतःच्या संगतीने इतरांनाही देव करून सोडशील १ आणि तू जर दुष्टच झालास तर, मग इतरांनाही तू तसेच दुष्ट बनवशील, याबद्दल तू शंका धारण करू नयेस २ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे जसे रूप असेल, तसे ते आरशात प्रति- बिंबित होत राहील ३ ११२९ कलिधर्म मागें सांगितले संती । आचार सांडिती द्विजलोक ॥ १ ॥ तेचि फळो आता येतसे प्रचिती । अधर्मा टेकती धर्म नव्हे ॥ २ ॥ तप व्रत करिता लागती सायास । पाळिता पिंडास गोड वाटे ॥ ३ ॥ देव म्हणऊनी न येती देउळा । संसारा वेगळा तरी का नव्हे ॥ ४ ॥ तुका म्हणे मज धरिता गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कलिधर्म-कलियुगातील धर्म द्विजलोक-ब्राह्मण लोक, पिंडास-शरीरास, गुमान- पर्वा, चौकशी अर्थ - कलियुगात अधर्मच सर्वत्र पसरेल, असे मागेच संतपुरुषांनी व ऋषिमुनींनी सांगितले आहे ब्राह्मण लोक या कलियुगात स्वतःचा आचारधर्म सोडून द्यायतील १ त्याचीच प्रचीती आता येत राहिली आहे सर्वजण धर्म सोडून अधर्माचाच आधार घेऊ लागले आहेत २ तपश्चर्या व व्रते वगैरे करण्यास फारच परिश्रम पडत अस- ल्यामुळे देहाचे लाड करून त्यास वाढविणे यातच त्याला गोडी वाटते ३ ते स्वतःच देव समजत असल्याने देवळात जाण्याची त्यांना गरजच वाटत नाही संसारापासून वेगळेही ते कधी निघत नाहीत ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी जर याची चौकशी केली तर तसे जे कोणी असतील ते खात्रीने नरकासच जातील ५ ११३० नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥ १ ॥ विनवितो रंक दास मी सेवक । वचन ते एक आइकावे ॥ २ ॥ तुझी स्तुति वेद करिता भागला । निवाताचि ठेला नेति नेति ॥ ३ ॥ ऋषि मुनि बहु सिद्ध कविजन । वर्णिता ते गुण न सरती ॥ ४ ॥ तुका म्हणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्त्ती देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - अपार-ज्याचा अंत लागत नाही असा अमूपा-ज्याचे मापच करता येणार नाही असा, रंक-गरीब, वाखाणी-नावाजणी करीन अर्थ - सर्व विश्वात भरून असणाऱ्या विश्वरूपा, विष्णू, मायबापा, तुला नमस्कार असो तुझ्या रूपाचा अंत नाही तुझ माप करता येत नाही १ मी देवा, तुझा गरीब दास व सेवक असून तुला मी विनंती करीत आहे माझे एक वचन तुम्ही ऐकावे २ देवा, तुझी स्तुती करीत असताना वेद थकून जातात 'नेति नेति' म्हणून ते स्तब्धच राहिले ३ अनेक ऋषिमुनी, अनेक सिद्ध, अनेक कविजन, हे जरी तुझे गुणगान करीत असले तरी तुमचे संपूर्ण वर्णन होऊ शकत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा परिस्थितीत तुझ्या कीर्तीचे वर्णन करावे, तुझ्या कीर्तीची वाखाणणी करावी, हे माझ्या वाणीला कसे जमणार ? ५ ११३१ अंतरींचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पाण्डुरंगा ॥ १ ॥ घातलें वचन न पडेचि खाली । तू आम्हा माउली अनाथाची ॥ २ ॥ मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥ ३ ॥ नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती कांहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे आता केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥ ५ ॥