सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 553, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५०७ शब्दार्थ व टीपा - गुज-गुह्य गोष्ट रहस्य, काज-कार्य, निर्भर-पूर्ण अर्थ - देवा, माझ्या अंत करणातील रहस्य तुम्ही जाणलेत व त्याप्रमाणे कार्य केलेत १ आम्ही जो जो वचने बोललो, ती ती तुम्ही काही खाली पडू दिली नाहीत तू आम्हां अनाथांची माउलीच आहेस २ माझ्यासारख्या याचकाची सर्व आशा पदरोनियासा, मायबापा, तुम्ही पुरविली ३ माझ्या मनातील सर्व शका येथा, तुम्ही दूर केल्यात भेदभावाची काही शंका होती, तीही तुम्ही उरू दिली नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही मज तुमच्या कृपेने आता परिपूर्ण केले आहे मी आता तुझेच अपार असे गुणगान करीन ५ ११३२ उदार कृपाळ अनाथाचा नाथ । ऐकसी मात शरणागता ॥ १ ॥ सर्व भार माथा चालविसी त्याचा । अनुसरलीं वाचा काया मने ॥ २ ॥ पाचारिता उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावे ॥ ३ ॥ चालता ही पंथ सांभाळिसी वाटे । वारितील कांटे जडे हाने ॥ ४ ॥ तुका म्हणे चिंता नाही तुझ्या दासा । तू त्याचा कोंवसा सर्वभावे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - मात-हकीगत कोंवसा-आश्रयाचे स्थान अर्थ - देवा, तू अतिशय उदार आहेस, कृपाळू असून अनाथांचा नाथ आहेस माझ्यासारख्या शरणागताची हकीगत तू ऐकत असतोस १ जे तुला कायावाचामनेकरून अनुसरतात, त्याचा सर्व भार तू आपल्या मस्तकावर वाहतोस २ त्यांनी तुला हाक मारिली की, तू जवळ येऊन उभा राहतोस त्यांना जे ज्या काळी हवे असेल, ते त्या काळी तू देतोस ३ ते तुझे भक्त रस्त्याने निघाले की तू त्यांचा सांभाळ करतोस, त्यांच्या पायांना वाटेतील काटे बोचू नयेत म्हणून ते तू आपल्या हातानी दूर करतोस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्या दासाना कसलीही चिंता नसते कारण तू सर्वभावे त्याचा आश्रयदाताच आहेस त्याचे आश्रयस्थान तूच आहेस ५ ११३३ काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥ १ ॥ मज आता ऐसे नको करूं देवा । तुझा दास जावा वाया विण ॥ २ ॥ होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझ्या पायीं ॥ ३ ॥ अतरींचा भाव काय कळे लोका । एक मानी एका देखोवेखीं ॥ ४ ॥ तुका म्हणे तुझे पाय आतुडती । ते मज विपत्ति गोड देवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - जाणिवेचा-ज्ञानाचा देखोवेखीं-वरवरचा आतुडती-प्राप्त होतील, विपत्ती-दारिद्र्य अर्थ - देवा, मोठी कीर्ती, लौकिक लोकाकडून सन्मान, दंभ इत्यादींना घेऊन काय करू मी ? मला फक्त तुझे चरण दाखोव १ हा तुझा दास आता व्यर्थ जाईल असे देवा, आता मजविषयी काहीही करू नकोस २ मला या ज्ञानाचा फार मोठा भार उगाचच होऊन मी मात्र तुझ्या पायांना मुकेन, असे होऊ देऊ नकोस ३ अंतरगातील भाव काय लोकांना सहजासहजी समजतो की काय ? मानसन्मान हा एक दुसऱ्यास वरवरचाही दाखविता येतो ४ तुकाराम महाराज म्हणतात देवा, जर तुझे पाय प्राप्त होतील तर मग दरिद्रयासारखे सकटही मला गोड वाटेल ५ ११३४ मानाधवा जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं हे माझिया जीवा चाड ॥ १ ॥ तुझ्या पायासाठीं केली आराणूक । आना कांहीं एक नको दुजें ॥ २ ॥ करूनिया कृपा करीं अगीकार । न करीं उसीर आता देवा ॥ ३ ॥ नव्हे साच कांहीं कळो आले मना । म्हणोनि वासना आवरिली ॥ ४ ॥ तुका म्हणे आता मनोरथ सिद्धी । माझे कृपानिधी पाववावे ॥ ५ ॥