सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 76, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें५० सार्थ तुकारामगाथा १०४ काय दिनकरा । केला कोबड्याने खरा ॥ १ ॥ का हो ऐसा सत ठेवा । भार माझे माथा देवा ॥ २ ॥ आडविले दासीं । तरि का भरती उपवासी ॥ ३ ॥ तुका म्हणे हातीं । कळा सकळ अमती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दिनकरा-सूर्यास, दासीं-सेवकांनी अर्थ - सूर्य उगवताना कोंबडा आरवतो याचा अर्थ असा नव्हे की त्याच्या आरवण्याने सूर्य उगवतो कोंबड्याच्या ओरडण्याने सूर्याचे उगवणे खरे मानायचे काय ? त्याचा उदय स्वयंसिद्धच आहे १ माझे व देवाचे नाते असेच आहे सत लोकोहो, माझ्यावर सत्वाचे ओझे ठेवू नका माझ्या सत्त्वामुळे ईश्वराचे नाव सिद्ध होऊ नका २ सेवकांनी, स्वयंपाक करणाऱ्या नोकरानी जरी अडवून घेतले, किंवा सोडले तरी मालक काही उपाशी राहात नाही तसे माझे सत्त्व नसले तरी ईश्वराचे थोरपण स्वयंसिद्ध आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात सर्व कला, माझ्या गुणावगुणाची सारी किमया त्या अनंत स्वरूपी ईश्वराच्या स्वाधीन आहे ४ १०५ जेविता ही धरी । नाक हगंतिया परी ॥ १ ॥ ऐसियाचा करी चाळा । आपुलीच अवकळा ॥ २ ॥ साडावे माडावे । काय ऐसे नाहीं ठावे ॥ ३ ॥ तुका म्हणे करी । ताका दुधा एक सरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चाळा-निंदा, अवकळा-वाईट स्थिती, साडावे-सोडावे माडावे-पत्करावे, सरी-बरोबरी अर्थ - परसाकडेस बसले असताना ज्याप्रमाणे घाण येऊ नये म्हणून नाक धरतात त्याप्रमाणे काही लोक वेड्यासारखे जेवतानाच नाक धरतात १ अशा वेडसर क्रियामुळे आपली आपणच वाईट स्थिती किंवा फजिती करीत असतो २ कुठे काय करावे, काय धरावे, काय सोडावे याचा विवेकच त्हांना नसतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे लोक ताक व दूध याना सारखेच मानतात ४ १०६ हो का पुत्र पत्नी बधु । त्याचा तोडावा सबंधु ॥ १ ॥ कळो आले खटचाळसे । शिवो नये लिपो दोषें ॥ २ ॥ फोडावे मडके । मेले लेखीं द्यावें एके ॥ ३ ॥ तुका म्हणे त्यागें । विण चुकीजेना भोगेँ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मडके फोडणे-संबध तोडणे, द्यावे-द्यावाने अर्थ - ईश्वरप्राप्तीसाठी पुत्र असो, पत्नी असो, बंधू असो त्या सर्वांचा सबंध तोडून टाकावा १ हे सबध सर्व खटघाळ आहेत, आड येणारे आहेत असे समजून आल्यावर त्यांना शिवू सुद्धा नये, त्याच्या सहवासाचा दोष अंगी लावून घेऊ नये २ ती सर्व मेली आहेत असे समजून त्याच्या नावाने मडके फोडून त्याचा सबंध तोडून द्यावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा त्याग केल्याशिवाय संसारातील भोगाविषयीची आस्था दूर व्हायची नाही ४ १०७ ज्याल्याविण करी शोभनतातडी । चार ते गद्यडी करीतसे ॥ १ ॥ कासया पाल्हाळ आणिफांचे देखों । संगता नव्हे सुपी सासरेसि ॥ २ ॥ फुयाच्या ढेकरें न देवेळ पुष्टी । रूप दावी कष्टी' मळिण वरी ॥ ३ ॥ तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेविण नका याव घेऊ ॥ ४ ॥ १ दृष्टी