सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 96, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें६८ सार्थ तुकारामगाथा गाईंच्या बरोबर रानात, वनात जात असे त्याच्या सवंगड्यांबरोबर त्याची शिदोरी पाठीशी असे वनात गेल्यावर काही खेळ होत असत, नीडाविलास झाला की मग शिदोऱ्या सोडून जेवण होई यावेळी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र होत असाव्यात या मिश्रणास काला म्हणतात यात श्रीकृष्णचीही शिदोरी मिसळलेली असल्याने तिची चव या काल्यात आलेली असते त्यामुळे फार महत्त्व या काल्यास येते श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी यांच्या बालजीवनातील हे मधुर प्रसंग मराठी संतांनी मनापासून वर्णन केले आहेत श्रीकृष्णाच्या बालजीवनातील हा रम्य आविष्कार अतिशय लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी वनातील विविध क्रीडांचे व गोपांच्या खेळांचे फार सुंदर वर्णन केले आहे. पंढरपूरचा श्रीविठ्ठल हा श्रीकृष्णाचा बाल अवतार अस- ल्यामुळे या वनक्रीडांना फारच महत्त्व आहे या दृष्टीने हे काल्याचे अभंग पाहण्यासारखे आहेत यात गोळणी, हमामा, हुतुतू, चेंडूफळी, फुगड्या, हुवरी, दळण, कांडण, टिपरी, विटीदांडू, मृदंगपाट्या इत्यादी विविध खेळांचे रूपकात्मक वर्णन असून त्यातून अध्यात्माचे व परमार्थविचाराचे सुबोध विवेचन करण्यात आले आहे नुसता बोध कोरडा होतो, तो खेळाच्या, बाललीलांच्या रूपांनी दिल्यास अधिक पटतो श्रीकृष्ण व त्याचे बालमित्र यांनी मधुवनात केलेल्या क्रीडांचे अवीट वर्णन संतांच्या अभंगांतून पाहावयास सापडते श्रीकृष्णाची सुंदर अशी बालमूर्ती, त्याचा डौलदार असा गवळ्याचा वेष, गळ्यात हार, डोक्यावर मोरपिसांची टोपी, आणि भोवती साधे साधे पण श्रीकृष्णावर अपार प्रेम असलेले त्याचे अनेक सोबती यांच्या विविध खेळांचे प्रकार, त्यांच एकमेकांवर रागावणे, रुसणे, श्रीकृष्णाने समजूत काढणे, मग त्याच्या शिदोऱ्या सुटणे, त्यांची वनातील पंगत बसणे, कुणाची भाकरी, कुणाचा भात, कुणाचे दहीदूध, कुणाच्या लाह्या यांचेमधूनच सर्व मिश्रण-काला-करून त सर्वांना वाटणे इत्यादी विविध क्रीडामधील आनंद व अलौकिक सुख संतांनी काल्यावरचे अभंग करून स्वतः लुटले व इतरांसाठी सिद्ध केले बाम्होबा, पेंद्या इत्यादी विशिष्ट मित्रांचे उल्लेख संतांच्या अभंगांत येत असतात काही मित्र बोबडे, लंगडे, खुजे, पांगळे, बहिरे होते त्यांची मजेदार वर्णने त्यांनी केलेली आहेत. 'तुला कमाल ले, संभाल अपुल्या गाई' या नावाने एकनाथांचे एक प्रसिद्ध गीत या संबंधात ध्यानात येण्यासारखे आहे विविध खेळ, क्रीडा, भांडणे, मारामारी, पुनः गोडी, सलोखा, श्रीकृष्णाचे समजावणे व मग सर्वांचे एकत्रित भोजन यातील सुख भोगण्यासाठी स्वर्गातील देवसुद्धा पृथ्वीवर येण्याची इच्छा करतात ज्ञानेश्वरांच्या काळापासून हे काल्याचे अभंग प्रसिद्ध आहेत एखाद्या उत्सवाच्या अखेरीस, यात्रेच्या शेवटच्या दिवशी, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी काल्याचे कीर्तन करण्याची पद्धती अजून आहे 'वैष्णवाचा मेळ सबळ मिळाला । विठ्ठल नामें काला पदरींसी, 'म्हणून निवृत्तिनाथांनी याचे वर्णन केले आहे 'सोडिल्या शिदोरी । काला करी दहीभात । प्यारे अवघे समस्त । हरी गोपाळांसी देत' असे या काल्याचे वर्णन श्रीसेनामहाराजांनी केले आहे 'देव भक्त दोन्ही करिताती काला । तयाच्या सुखाला वर्णो कोण।' या शब्दात एकनाथानी काल्याच्या सुखाचे वर्णन केले आहे 'अवघ्या सोडियेल्या मोटा । आजीचा दही काला केला गोमटा ॥ घ्यारे घ्यारे दहीभात । आम्हा देतो पंढरीनाथ' अशा भाषेत संत भानुदासांनी या प्रेमसुखाची महती गाइली आहे 'एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटीं । माझा ज्ञानराज गोपाळांशीं लाह्या बांटी' अशी साक्ष ज्ञानेश्वरांच्याबद्दल जनाबाईने दिली आहे तुकाराम महाराजांनी तर या काल्याचे 'आजि देतो पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी' इतके वर्णन अतिशय विस्ताराने पण तन्मयतेने केले आहे श्रीकृष्ण व त्याचे मित्र यांच्या प्रेमाचे इतके अवीट वर्णन इतरत्र सापडणे कठिण आहे या प्रेमसुखाच्या दर्शनाने साऱ्या ब्रह्मांडास जणू वेड लागले 'काल्याचिये असे । देव जळीं जाले मासे' असे वर्णन तुकोबांनी एके ठिकाणी केले आहे 'धर्ची धर्ची घेऊ घास । ब्रह्मरस आवडी' अशी याची महती असल्याने 'गोकुळीच्या सुखा । अतपार नाही लेखा' असा निर्णय तुबांनी एका अभंगात दिला आहे काल्याच्या या सर्व अभंगात भगवंताचे प्रेम सर्वांवर कसे सारख्या प्रमाणात असते, कधी दुःखीकष्टी भक्तांकडे त्याचे अधिकच लक्ष कसे असते हेही ध्यानात येते प्रभुप्रेमाची व अध्यात्माची खेळता खेळता शिकवण देण्याची सोय संतांनी या काल्याच्या अभंगात केलेली आहे पंढरपूरच्या यात्रेतही काल्याच्या या प्रसंगास फार महत्त्व असते पंढरपूरच्या दक्षिणेस सुमारे एका मैलावर गोपाळपूर नावाची छोटी वस्ती आहे तेथे गोपाळकृष्णाचे देऊळ आहे विष्णुपद, गोपाळपुरा याच भागात श्रीकृष्णाने